भारत देशाची संपूर्ण माहिती India Information In Marathi

India Information In Marathi आशिया खंडातील एक प्रमुख प्रजासत्ताक आणि जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र आहे. हिंदुस्थान या नावानेही भारताला ओळखले जात असून हे नाव सिंधू नदीवरून पडले आहे.तर चला मग पाहूया त्याविषयी सविस्तर माहिती.

India Information In Marathi

भारत देशाची संपूर्ण माहिती India Information In Marathi

इराणी लोक सिंधूच्या पूर्वेकडील लोकांना हिंदू म्हणत. पेहलवी भाषेतील एका शिलालेखातही भारतवर्षाला हिंदू म्हटल्याचे आढळते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत तसेच ‘इंडिया’ हे इंग्रजी नावही स्वीकारण्यात आले.

क्षेत्रफळ व विस्तार :

भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौ. कि.मी. असून भारताचा विस्तार अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे. भारताच्या मुख्य भूमीचे स्थान हे 8° 4′ उत्तर अक्षवृत्त ते 37° 6′ उत्तर अक्षवृत्त आणि 68° 7′ पूर्व रेखावृत्त ते 97° 25′ पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान आहे. इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक आहे.

हे 6°45′ उत्तर अक्षवृत्तावर आहे. भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. भारताच्या वायव्येस : पाकिस्तान व अफगाणिस्तान, उत्तरेस चीन, नेपाळ, भूटान दक्षिणेस श्रीलंका ,आग्नेयेस इंडोनेशिया नैऋत्येस मालदीव, पूर्वेस म्यानमार (ब्रह्मदेश) व बांगला देश ही राष्ट्रे आहेत. पूर्वेस बगालचा उपसागर, पश्चिमेस अरबी समुद्र तर दक्षिणेस हिंदी महासागर आहे.

भारताचे हवामान :

भारतात साधारणपणे 6 मुख्य प्रकारचे हवामान आढळून येतात. त्यात अंदमानमध्ये आढळणारे विषुववृत्तीय सदाहरीत जंगलांपासुन ते पश्चिम राजस्थान मधील थरचे वाळवंट पण आढळते. दक्षिण भारतातील उष्ण दमट हवामानापासुन ते उत्तरेतील हिमालयामध्ये पाइन वृक्षाची जंगले तसेच हिमनद्या व शीत वाळवंटाचा समावेश होतो.

परंतु या वैविध्यतेत सर्वात महत्त्वाचा घटक आहे ते मौसमी वारे व त्यानी येणारा पाउस ज्यावर संपूर्ण भारत, खासकरून शेती उद्योग अवलंबुन आहे. भारतात ढोबळमानाने 4 ऋतु आढळून येतात. मौसमी पावसाचा काळ (जून ते सप्टेंबर), मौसमी पावसानंतरचा काळ (ऑक्टोबर ते डिसेंबर), हिवाळा (जानेवारी व फेब्रुवारी) व उन्हाळा (मार्च ते मे).

भारतातील वन्य प्राणी व पक्षी :

भारतात बरीच जंगले आहेत, त्यामध्ये सिंह, वाघ, बिबळ्या, निरनिराळ्या प्रकारची मांजरे, मुंगूस, लांडगा, कोल्हा, जंगली कुत्रा, अस्वल, रानडुक्कर, हत्ती, गेंडा, हरिण, गवा, कृंतक : उंदीर, खार इ. व माकड या मांसाहारी व शाकाहारी प्राण्यांचा समावेश होतो. यांतील बरेच प्राणी भारतात आढळतात.

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. हंस, बदक, तितर, कबूतर, पोपट, साळुंकी, मैना, कोकिळ, कावळा, चिमणी, बगळा, पारवा, सुतार, करकोचा, टिटवी, खंड्या, ससाणा, गिधाड, घार, गरुड इ. पक्षी भारतात बहुतेक सर्वत्र आढळतात.

भारताचा इतिहास :

भारत हा देश मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. येथील लिखित इतिहास  2,500 वर्षांपूर्वीचा असून इतर पुराव्यांनुसार भारतात 70,000 वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्व आणि इतिहास आहे. भारताचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली असाच राहिलेला आहे.

भारतामध्ये  प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ताकेंद्री आल्या. या राजवटीने भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केलं. यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होय.  मौर्य साम्राज्य ज्याला गुप्त राज्य असेही म्हटले जाते.

हे भारताच्या पहिले प्रभावी असे केंद्रीय शासन होते. भारतामध्ये सत्ता ही मोठ्या काळापर्यंत टिकून राहिली. देशातील ती पहिली केंद्रीकृत अशी सत्ता होती. या काळामध्ये राज्यकर्त्यांनी मोठा भूप्रदेश आपल्या अंमलाखाली आणला आणि प्रजा कल्याणकारी शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रध्वज :

भारताचा राष्ट्रध्वज तिरंगी असून त्यात वरील भागी केशरी, मध्य भागी पांढरा व त्याखाली गडद हिरवा अशा तीन रंगातील समप्रमाण आडवे पट्टे असतात. त्यांतील पांढऱ्या पट्टावर मध्य भागी चरख्याचे निदर्शक असे गडद निळ्या रंगातील 24 आऱ्यांचे चक्र असून ते सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्रानुरूप रेखलेले आहे.

भारतीय संविधान समितीने 22 जुलै 1947 रोजी हा राष्ट्रध्वज समत केला. भारतीय ध्वजसंहितेत राष्ट्रध्वजाचे आकारमान, वापर इत्यादींसंबंधी नियम दिलेले आहेत. राष्ट्रीय फूल कमळ तर राष्ट्रीय प्राणी हा सिंह आहे.

भाषा :

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, इथे जवळजवळ सर्व राज्यांमध्ये एक वेगळी भाषा बोलली जाते, भारताची मुख्य भाषा हिंदी आहे आणि मुख्य 17 भाषा भारतात बोलल्या जातात.

येथे सर्व भाषांचे वेगळे महत्त्व आहे. रामायण आणि संस्कृत भाषेचा वापर महाभारतासारख्या महान कथा लिहिण्यासाठी केला जात असे पण तमिळ ही भारतातील सर्वात जुनी भाषा मानली जाते.

वेशभूषा  :

आपल्या देशात अनेक संस्कृती आणि अनेक भाषा असल्यामुळे, अनेक प्रकारचे पोशाख येथे आले आहेत, प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान केले जातात. भारतातील सर्वात प्रसिद्ध वेशभूषा महिलांसाठी साडी आणि पुरुषांसाठी धोती कुर्ता मानली जाते.

धार्मिक सण व उत्सव :

भारतीय लोक हे अतिशय उत्सवप्रिय आहेत. एक भारतीय मुख्य सण म्हणजे दिवाळी होय. प्रत्येक प्रांतात सण हे कमी अधिक प्रमाणात साजरा करतात. तसेच प्रत्येक प्रांताचे खास सण आहेत.  बौद्ध  धर्मीयांचे आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिन हे तीन मुख्य सण आहेत.

भारताच्या बहुतांशी सण हे धार्मिक आहेत. इतर मुख्य सणांमध्ये मकरसंक्रांत, होळी, पोंगल, गणेश चतुर्थी, नवरात्री, दुर्गापूजा, दसरा, ओणम हे महत्त्वाचे सण आहेत. ख्रिश्चन व इस्लाम धर्मीय पण नाताळ व ईदचे सण साजरा करतात. धार्मिक सणांसोबतच 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिवस, 26 जानेवारी गणतंत्र दिवस व गांधी जयंती तसेच शिवजयंती हे सण साजरे करतात.

भारतीय संस्कृती :

भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात जुनी संस्कृती आहे जी सुमारे 5000 हजार वर्षे जुनी आहे. भारतीय संस्कृती ही जगातील पहिली आणि महान संस्कृती मानली जाते. “विविधतेमध्ये एकता” हे विधान येथे सामान्य आहे म्हणजेच भारत हा एक वैविध्यपूर्ण देश आहे जिथे विविध धर्माचे लोक त्यांच्या स्वतःच्या संस्कृती आणि परंपरेसह शांततेने एकत्र राहतात. वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांची भाषा, खाण्याच्या सवयी, चालीरीती इत्यादी भिन्न आहेत, तरीही ते एकतेने राहतात.

भारतीय संगीत व नृत्य :

भारतीय शास्त्रीय संगीत व लोकसंगीत दोन्ही प्रकारात विविध उपप्रकार असून प्रत्येक उपप्रकाराची शैली आहे. या विविध शैलींचीच विविध घराणी असून प्रत्येक घराण्याने आपापला वेगळेपणा व ठसा भारतीय संगीतावर उमटवला आहे.

भारतात वेगवेगळे शास्त्रीय व लोकनृत्याचे प्रकार आहेत.  भांगडा नृत्य (पंजाब), बिहु नृत्य (आसाम),  छाऊ (पश्चिम बंगाल), संबळपुरी (ओडिशा),  घूमर (राजस्थान), लावणी (महाराष्ट्र) हे काही लोकनृत्याचे प्रसिद्ध प्रकार आहेत.

प्रमुख नद्या व व पर्वत :

भारतात गोदावरी नदी, कृष्णा नदी, भीमा नदी, गंगा नदी, यमुना नदी, ब्रम्हपुत्रा नदी, महानदी ह्या मुख्य नद्या असून तिच्या बऱ्याच उपनद्या आहेत. त्याच प्रमाणे भारतात हिमालय पर्वत, सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत आहे.

पर्यटन स्थळ :

भारत पर्यटन दृष्टीने समृद्ध देश आहे. देश-विदेशातील पर्यटक भारतातील विविध स्थळांना भेट देऊन येथील अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेरात कैद करतात. तर चला मग पाहुया अशाच काही पर्यटन स्थळाविषयी माहिती.

दार्जिलिंग :

दार्जिलिंगला क्वीन ऑफ हिल्स म्हटलं जातं. पश्चिम बंगाल स्थित दर्जिलिंग हे चाहाच्या मळ्यांसाठीही विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय येथील डोंगर दऱ्यांमध्ये विस्तारलेली हिरवीगार वनराई पर्यटकांवर नेहमीच भूरळ घालते.

उदयपूर :

राजवाड्यांच शहर म्हणून ओळख असलेल्या राजस्थानमधील उद्यपूरमध्ये अनेक जुने राजवाडे आहेत. उदयपूरचे नाव पूर्वी मेवाड असे होते. या शहराला ऐतिहासिक महत्त्व असल्याने त्याची ओळख पॅलेस सिटी म्हणून ओळखले जाते. या शहरातील सिटी पॅलेस संग्राहलय आणि सिटी पॅलेस कॅम्पलेक्स ही प्रेक्षणिय स्थळे आहेत.

केरळ :

दक्षिणेतील केरळही पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला मोठा समुद्र किनारा लाभल्यामुळे अनेक सुंदर बीच, सोबतच हिरव्यागार वनराईची चादर ओढलेले डोंगर रांगा पर्यटकांचे लक्ष्य नक्की वेधून घेताता. केरळमधील चुआर बीच, कोवलम बीच, मरुदेश्वर बीच, बेकल बीच वर्कला बीच आणि शांघमुघम बीच आदी बीच प्रसिद्ध आहेत.

म्हैसूर :

म्हैसूरलाही राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला भेट देण्यासाठी पर्यटक अतिशय आतूर असते.

लडाख :

हे असे स्थान आहे, जिथे तुम्ही फक्त मे महिन्याच्या शेवटी जाऊ शकता. बाईकवरुन लडाखला जाण्याची तरुणांमध्ये वेगळीच क्रेझ असते. इथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.

लोहगड :

सह्याद्रीच्या विस्तीर्ण रांगांमुळे महाराष्ट्रा अनेक किल्ले आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण राज्यात किल्ल्याची बांधणी करुन हिंदवी साम्राज्याची स्थापना केली. यातीलच एक किल्ला म्हणजे, लोहगड. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment