group

नायजेरिया देशाची संपूर्ण माहिती Nigeria Information In Marathi

Nigeria Information In Marathi नायजेरिया हा आफ्रिकी पठाराच्या पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे उतरत गेलेला भाग आहे. 1ऑक्टोबर 1960 रोजी नायजेरियाचे संघराज्य म्हणून देश स्वतंत्र होऊन 1963 मध्ये नायजेरिया प्रजासत्ताकाची स्थापना झाली.तर चला मग जाणून घेऊया नायजेरिया या देशाविषयी माहिती.

Nigeria Information In Marathi

नायजेरिया देशाची संपूर्ण माहिती Nigeria Information In Marathi

नायजेरियात प्रामुख्याने आढळणारे लोक म्हणजे निग्रो होत. यांचे इतर अनेक जमातींशी मिश्रण झालेले आहे. बहुतेक भागांत निग्रोंचे प्रमाण अधिक आहे. शुद्ध निग्रो जमात केवळ दक्षिणेकडील जंगलव्याप्त प्रदेशात आढळते. नायजेरियाचे चलन हे नायरा आहे. अतिशय सुंदर अशी पर्यटनस्थळे आहे.

क्षेत्रफळ व विस्तार :

नायजेरिया हा आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वांत मोठा देश असून त्याचे क्षेत्रफळ 9,23,773 चौ. किमी. आहे. त्याचा विस्तार 2°30′  पू. ते 14° 30′  पूर्व व 4° 30′ उ. ते 14° 17′ उ. यांदरम्यान आहे.

याच्या उत्तरेला नायजर, पूर्वेला कॅमेरून व पश्चिमेस बेनिन प्रजासत्ताक हे देश असून दक्षिणेस अटलांटिक महासागराचे गिनीचे आखात व ईशान्येस चॅड सरोवर आहे. याची पूर्व-पश्चिम लांबी 1126.5 किमी. आणि दक्षिणोत्तर लांबी 1,050 किमी. आहे. अबुजा ही देशाची राजधानी आहे.

लोकसंख्या :

नायजेरिया या देशातील 2013 च्या जनगणने क्रमाने लोकसंख्या 17.4 कोटी होती. नायजेरिया आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा तर जगातील सातव्या क्रमांकाच्या  लोकसंख्येचा देश आहे.

हवामान :

नायजेरिया हा उष्ण कटिबंधात असला, तरी तेथे आग्‍नेयीकडे उष्णकटिबंधीय दमट, उत्तरेकडे व पश्चिमेकडे उष्णकटिबंधीय सॅव्हाना प्रकारचे व अतिउत्तरेकडे कोरडे स्टेप प्रकारचे हवामान आढळते. दक्षिणेकडे पावसाळा मार्च ते नोव्हेंबरपर्यंत असून त्यांत ऑगस्ट कोरडा जातो.

उत्तरेकडे मेच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. दक्षिणेकडे हवामान सम व सौम्य क्वचितच 32° से. पेक्षा जास्त, तर उत्तरेकडे ते विषम होत जाते. तेथे मध्यान्हीचे तपमान 38° से. पर्यंतही जात असले, तरी रात्र मात्र थंड असते. जॉस पठारावर तपमान कमी असते.

तपमानाप्रमाणे पर्जन्यमानातही विविधता आढळते. पश्चिमेकडील सरासरी पर्जन्यमान 175 सेंमी. आहे, तर पूर्वेस ते 425 सेंमी. पर्यंत वाढत असून अंतर्गत भागात ते कमी होते. काही ठिकाणी 125 सेंमी. पर्यंत पाऊस पडतो.

See also  मोनॅको देशाची संपूर्ण माहिती Monaco Information In Marathi

नायजेरियातील प्रमुख नद्या :

गिनी, माली, नायजर, बेनिन, ह्या नद्या नायजेरियाच्या प्रदेशातून वाहते. गिनीत नायजरला मॅफाऊ, निआंदन, क्कार येथे मीलो व सीगीरी येथे तिंगकीसो या उपनद्या मिळतात. नायजेरियात नायजरला गूंबा येथे केबी, सोकोटो, साकाबा, मूरेजी येथे काडूना आणि लोकोजा येथे सर्वांत मोठी बेन्वे या उपनद्या मिळतात.

इतिहास :

नायजेरियातील बायाजीद्दा दंतकथेनुसार  बगदादहून आलेल्या बायाजीद्दा या वीर पुरुषाने दौरा गावातील विहिरीपाशी एका सापाला मारले आणि मागाजीया दौरामा या स्थानिक राणीशी लग्न केले. बायाजीद्दच्या लग्नानंतर तिथली स्त्रीसत्ताक राज्य पद्धती संपुष्टात आली.

बायाजीद्दाला राणी पासून बावो नावाचा मुलगा झाला. राणीची दासी बाग्वारीया हिच्यापासून कारबागरी हा मुलगा झाला. या दोन्ही मुलांच्या वंशजांनी अनेक हौसा राज्ये स्थापन केली. नवव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत ही हौसा राज्ये शिखरावर होती.

चामडे, गुलाम, सोने, कापड, मीठ, मेहेंदी अशा वस्तूंचा व्यापार हे हौसा राज्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन होते. 1804 च्या सुमारास मुस्लिम धर्मीय फुलानी जमातीच्या आक्रमकांनी हौसा राज्ये नष्ट केली. नायजर नदीच्या पश्चिम भागावर योरुबा जमातीचे प्राबल्य होते.

साधारण दोन हजार वर्षांचा इतिहास सांगणारी ही जमात घाना देशापासून नायजेरिया पर्यंत पसरली आहे. विविध नगर राज्यांनि योरुबा जमत विभागली होती, त्यामुळे कुणी एक राजा असण्यापेक्षा स्थानिक बाहुबलींच्या जोरावर नगराचा कारभार चालायचा.

चार्ल्स थर्स्टन शॉ या पुरातत्त्व्वेत्त्याच्या इग्बो उक्वू, न्सुक्का या ठिकाणावरील संशोधनानुसार नायजेरिया मध्ये सुमारे एक लाख वर्षापूर्वीपासून मानवी वस्तीच्या खुणा आढळतात. पश्चिम नायजेरिया येथील इवो एलेरू येथे सापडलेला सर्वात पुरातन मानवी सांगाडा साधारण 13,000 वर्षापूर्वीचा आहे. इसवीसनाच्या नवव्या शतकात इग्बो प्रदेशात इग्बो जमातीच्या लोकांनी प्रगत अशी वसाहत स्थापन केली होती या प्रदेशातील ब्रांझ धातूच्या नमुन्यावरून तत्कालीन लोक इतर समकालीन वसाहतीपेक्षा अधिक सुधारलेले होते असे धातुकामावरून जाणवते.

See also  स्विझर्लंड देशाची संपूर्ण माहिती Switzerland Information in Marathi

समाजव्यवस्था :

नायजेरियामध्ये हौसा, योरुबा आणि इग्बो अश्या तीन प्रमुख जमाती आढळतात. या पैकी योरुबा आणि इग्बो जमातींमधील लोक ख्रिस्ती धर्माचे तर हौसा जमत प्रामुख्याने इस्लाम धर्माचे पालन करतात. ख्रिस्ती धार्मिक लोकांची संख्या पश्चिम आणि दक्षिणेत जास्ती आहे. हौसा जमातीचे आणि इस्लामचे प्राबल्य उत्तर आणि पूर्व भागात आहे.

वनस्पती व प्राणी :

नायजेरियातील समुद्र किनाऱ्याजवळ 16 ते 96 किमी. रुंदीचे खारफुटी व दलदली जंगल असून त्यापलीकडे 80 ते 160 किमी. रुंदीची विषुववृत्तीय वर्षावने आहेत. त्यांत तेल्या ताड, सापेली, मॉहॉगनी, इरोको, ओबिची इ. वृक्ष उंच वाढतात. आग्‍नेयीकडील प्रदेशात मूळचे अरण्य नाहीसे झाले असून तेथे फक्त पामची झाडे दिसतात.

वेस्टर्न व मिड वेस्टर्न प्रदेशांत कोको व रबर यांच्या लागवडी केलेल्या आहेत. अरण्य-पट्ट्याच्या उत्तरेस मधूनमधून चिंच, गोरखचिंच, लोकस्टबीन इ. झाडे असलेला सॅव्हाना गवताळ प्रदेश आहे. तो उत्तरेकडे विरळ, खुरट्या झाडांचा व बुटक्या गवतांचा होत जातो. चॅड सरोवराकडे बाभळीसारखी झाडे, मरुसदृश वनस्पती आणि नद्यांकाठी चिंचोळा झाडी प्रदेश आढळतो.

येथील जंगलात गोरिला, चिंपँझी यांप्रमाणे इतर माकडेही सापडतात. निरनिराळे साप, मगर, सुसर व नद्यांत मासे भरपूर सापडतात. नायजेरियात अनेक प्रकारचे काळवीट आहेत.

पाणघोडा, हत्ती, जिराफ, सिंह हे क्वचित कोठेकोठे आढळत असून त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. चित्ता, रानमांजर, गवत खाणारा उंदीर, खारी, सायाळ यांची संख्या भरपूर आहे. येथे घार, गिधाड, लावा, पोपट इ. विविध पक्षी आणि फुलपाखरे, कीटक, मोठमोठे विंचू, माशा इ. प्राणीही विपुल आहेत.

शेती व्यवसाय :

नायजेरियात शेती हाच अर्थव्यवस्थेचा मुख्य पाया आहे. अन्नधान्याच्या बाबतीत हा देश बऱ्याच प्रमाणात स्वयंपूर्ण आहे. कोको, भुईमूग, कापूस, ताडतेल, रबर ही प्रमुख नगदी पिके आहेत.

तसेच कथिल, खनिज तेल, कोलंबाइट ही खनिजे महत्त्वाची आहेत. शेतीला पूरक असा येथे पशुपालन व्यवसाय केला जातो.

उद्योगधंदे :

लोखंड व पोलाद, सुती कापड व्यवसाय, हस्तव्यवसाय, कातडी वस्तू, हातमाग, भांडी, ताड तेलाच्या आणि शेंगदाणा तेलाच्या गिरण्या हे येथील महत्त्वाचे व्यवसाय आहेत. त्या व्यतिरिक्त इतर उद्योगही वाढीस लागले.

See also  घाना देशाची संपूर्ण माहिती Ghana Information In Marathi

सिमेंट, सिगरेट, विटा व कौले, पीठ, बिस्किटे, साखर, मिठाई, पादत्राणे, रंग, रबरी धावा, खिळे, नटबोल्ट, रेडिओ, दूरचित्रवाणी, मोटारींचे भाग जोडणे, रबराच्या वस्तू, भांडी, बीर व इतर पेये, साबण, फळांचे रस, डबाबंद अन्नपदार्थ, धातूचे डबे, प्लायवुड, सूत, कापड, मृत्तिकाशिल्प इ. आहेत.

नायजेरियातील प्रमुख पर्यटन स्थळ :

यंकरी राष्ट्रीय उद्यान :

नायजेरियाचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रीय उद्यान उत्तर-पूर्वच्या सवाना मध्ये स्थित आहे. यँकरी हा एक लोकप्रिय इको-गव्हनस्टिग आहे, ज्यात बरेच वन्यजीवन हत्ती आहेत आणि विस्मयकारक हॉट स्प्रिंग्ज आहेत.

जोस :

नुकतीच हिंसाचारामुळे वेढली गेली, खरोखर एक मनोरंजक वस्तुसंग्रहालय व लहान वन्यजीवन पार्क असलेला जोस खरोखर एक सुंदर शहर आहे जेथे पाइजी हिप्पो हा मुख्य आकर्षण आहे. हवामान छान आणि थंड आहे आणि कोण शहरात भेट देण्याची संधी गमावणार.

लागोस :

पश्चिम आफ्रिकेची वाणिज्यिक राजधानी, लागोस एक उत्साही, भयानक जागा असून 10 दशलक्ष लोकसंख्या आहे. शहरामध्ये नाईटलाईफेन उत्तम आहे, अनेक रस्त्यावरची बाजारपेठ आणि एक सभ्य राष्ट्रीय संग्रहालय आहे. आपण मूलभूत सुरक्षितता सावधगिरी बाळगल्यास आपण शहरी आफ्रिकेचा सर्वात अधिक उत्साही होतो.

कानो :

उत्तरी नायजेरियातील मुख्य शहर अभ्यागतांसाठी खूप मनोरंजक स्थळ आहे, पारंपारिक हौसा घरे, बाजार, मशिदी, अमीरचे राजवाडा आणि मूळ रंगद्रव्य खड्डे

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment