Thane District Information In Marathi ठाणे हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. राज्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिकेचा जिल्हा म्हणून ठाणे या जिल्ह्याचा सर्वदूर परिसर आहे. लोकसंख्येच्या बाबतीत ठाणे हा जिल्हा महाराष्ट्रातील तिसरा मोठा जिल्हा आहे.
ठाणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती Thane District Information In Marathi
औद्योगिक विकासाच्या बाबतीत सुद्धा ठाणे हा जिल्हा राज्यात तिसरा क्रमांक येतो. ठाणे जिल्ह्यामध्ये अणुशक्ती पासून वीज तयार करण्याचे केंद्र तारापूर येथे आहे. या जिल्ह्याला अरबी समुद्राची किनारपट्टी लाभलेली आहे. तर चला मित्रांनो आपण या जिल्ह्याविषयी आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
विस्तार व क्षेत्रफळ :
ठाणे या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 9,563 चौरस किलोमीटर एवढे आहे. ठाणे या जिल्ह्याच्या सीमेला लागून पश्चिमेस अरबी समुद्र तसेच दक्षिणेस रायगड जिल्हा व पूर्वेस सह्याद्री पर्वत रांगेला लागून नाशिक व अहमदनगर हे दोन जिल्हे आहेत.
उत्तरेस गुजरात, रजाय व दादर, नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत. ठाणे जिल्ह्यातील वाशी या गावाच्या परिसरात नवी मुंबई वसविली आहे.
ठाणे शहराला पोखरण व तुळशी तलावातून नळाचे पाणी पुरवठा केला जातो. राष्ट्रीय महामार्ग NH 48 या जिल्हातून गेला आहे. 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि नवा पालघर जिल्हा निर्माण करण्यात आला.
लोकसंख्या :
ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 1,10,54,131. ऐवढी आहे. येथील साक्षरता दर 85% एवढा आहे. तर या जिल्हा मध्ये 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 880 आहे.
समाजजीवन :
हा जिल्हा जंगलांनी समृद्ध असून या जिल्ह्यात वारली, ठाकूर, कातकरी इत्यादी आदिवासी जमाती वास्तव्य करतात. मुंबई शहर, मुंबई उपनगर या शहराचे आकर्षण म्हणून संपूर्ण देशातून लोक मुंबईकडे स्थलांतर होतात. परंतु त्याचे वास्तव्य मात्र मुंबईत न राहता बाजूच्या लागलेले ठाणे या जिल्ह्यात राहतात. ठाणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत कुणबी व आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे.
भाषा व संस्कृती :
ठाणे जिल्ह्यांतील स्थानिक भाषा म्हणून आगरी बोलीकडे प्रामुख्याने पाहिले जाते. येथील मुख्य भाषा ही मराठी आहे. ठाणे शहराची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ठ जोडलेली आहे. तरी देखील आता या शहरात उत्तर भारतीय, सिंधी, गुजराती, दक्षिण भारतीय, मुस्लीम, मारवाडी अश्यांसारखे कितीतरी समाजाचे लोक या ठिकाणी स्थलांतरीत झालेले आणि आपले उद्योग व्यवसाय मोठया प्रमाणात विकसित करतात.
जिल्ह्यातील तालुके :
ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत. डहाणू, मोखाडा, जव्हार, पालघर, शहापूर, वाडा, वसई, भिवंडी, मुरबाड, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, तलासरी, विक्रमगढ, अंबरनाथ हे सर्व तालुके या जिल्हा मध्ये आहे.
महाराष्ट्रात इचलकरंजी नंतर कापड उद्योगाकरता ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्याचा क्रमांक लागतो.
इतिहास:
ठाणे शहरात सोपारा येथे अशोकाचा शिलालेख व स्तूप आहे. यांच्या काळात भारतात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार झाला. वसईचा भुईकोट किल्ला 23 मे 1739 रोजी थोरल्या बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ चिमाजी अप्पा यांनी पोर्तूगिन कडून जिंकून घेतला.
1817 मध्ये ठाणे जिल्ह्याचे क्षेत्र आता ब्रिटीशांनी पेशव्यापासून जोडले आणि ते ठाणे येथे मुख्यालय असलेल्या उत्तर कोकण जिल्ह्याचा भाग बनले. त्यानंतर त्याच्या सीमेत लक्षणीय बदल झाले.
1850 मध्ये दक्षिण कोकण जिल्ह्याचा काही भाग जोडून उत्तर कोकण जिल्ह्याचा विस्तार करण्यात आला आणि 1853 मध्ये हे नाव बदलून ठाणे जिल्ह्यात ठेवले गेले. 1853 मध्ये पेन, रोहा आणि महाड या तीन उपविभागांना कोलाबाच्या उंड्री आणि रेवदंडा एजन्सींमध्ये ठाणे अंतर्गत कोलाबाच्या उपजिल्हाधिकारी म्हणून विलीन केले गेले आणि शेवटी 1869 मध्ये स्वतंत्र कोलाबा जिल्हा होण्यास वेगळा झाला.
1866 मध्ये ठाण्यातील प्रशासकीय उपविभागांची पुनर्रचना व नावे बदलली गेली संजन डहाणू, कोळवण शहापूर आणि नासरपूर कर्जत म्हणून. वडा पेठा तालुक्याच्या स्तरावर श्रेणीसुधारित केले. 1861 मध्ये उरण महाल सालसेटपासून विभक्त झाला आणि त्याला पनवेलच्या खाली ठेवले गेले.
पनवेल, उरण आणि कारंजा या वाड्यांसह, 1883 मध्ये कोलाबा जिल्ह्यात आणि कर्जत 1891 मध्ये बदली झाली. 1917 मध्ये वांद्रे येथे मुख्यालय म्हणून एक नवीन राजवाडा बांधला गेला आणि 1920 मध्ये साल्सेटला उत्तर साल्सेट आणि दक्षिण साल्सेट या दोन तालुक्यांमध्ये विभागले गेले.
जेव्हा रेल्वेसेवा सुरू झाली तेव्हां सर्वात आधी रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे धावली. मुंबई मधल्या मध्य रेल्वे उपनगरीय आणि हार्बर मार्गावरचे एक रेल्वेस्थानक ठाणे आहे.
ठाणे शहर हे फार प्राचीन शहर असुन, या शहराचा उल्लेख मध्ययुगातील शिलालेखात आणि ताम्रपटात आपल्याला सापडतो.
हवामान:
ठाणे या जिल्ह्याला दोन वेगळ्या हवामानाच्या किनारपट्टी लाभलेल्या आहेत. एक म्हणजे पश्चिम किनारपट्टी व दुसरी म्हणजे पूर्व किनारपट्टी त्यामुळे या जिल्ह्यातील वातावरण अतिशय उष्ण व दमट असते.
किनारपट्टीच्या प्रदेशात उन्हाळ्याचे सरासरी दैनिक कमाल तापमान 32.9° असते. आणि हिवाळ्यातील किमान 16.8° होते. जिल्ह्यात सरासरी वार्षिक पाऊस खूप चांगल्या प्रमाणात पडतो.
व्यवसाय व उद्योग:
ठाणे या जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. त्या जिल्हातील डहाणू, पालघर, वसई या तालुक्यांत विहिरींमार्फत जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने तेथे एकाहून अनेक पिके घेतली जातात. येथील मुख्य पीक हे भात आहे.
सर्वसाधारणपणे पावसाळ्यात बहुतेक भागांत भाताचे पिक व इतर हंगामात मुंबईच्या बाजारपेठेत मागणी असणारी नगदी पिके काढली जातात. कडधान्ये व भाजीपाला यांचेही उत्पन्न होते. वाढत्या अंतराबरोबर पिक बदलत जाते.
मुंबईजवळील वसई तालुक्यात केळी, फुले, पालेभाज्या, विड्याची पाने अशा अधिक नाशवंत वस्तूंचे पिक आढळते. तर पालघरसारख्या अधिक अंतरावर असणाऱ्या तालुक्यात वांगी, दुधभोपळा, मिरची, गवार यांसारख्या अधिक टिकाऊ गोष्टींची लागवड आढळते.
डहाणू तालुक्याचे अंतर त्याहूनही जास्त असल्यामुळे तेथे मुख्य भर चिकू, पेरू, आंबे, अननस, पपई यांसारख्या फळांवर आढळतो.
गवत हे देखील एक नगदी पीकच आहे. गवत आगगाडीने मुंबईला जाते व तिथे सर्व पिकाला मोठी बाजापेठ आहे. मात्र किनाऱ्यापासून दूर गेल्यास केवळ निर्वाह शेतीवर विसंबून राहणारा आदिवासी अतिशय गरीब असल्याचे जाणवते.
या भागात भाताखालील क्षेत्रे कमी होऊन त्याऐवजी नागली, वरी यांसारखी पिके करतात. ठाणे जिल्हयात मुंबई प्रमाणेच मत्स्य व्यवसाय मोठया प्रमाणात चालतो. येथील मासे विदेशात आणि आखाती देशात देखील पाठवले जातात.
ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरणाचा विकास झाला. भिवंडी हे कापड उद्योगाचे मुख्य केंद्र आहे. या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारपट्टी लागल्यामुळे मत्स व्यवसाय हा एक मोठा उद्योग आहे. यावर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतात. औद्योगिक विकासाच्या बाबतीत देखील ठाणे जिल्हा राज्यात तिसरा आहे.
पर्यटन स्थळ:
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे अतिशय प्राचीन असे शिवमंदीर आहे. जे अतिशय लोकप्रिय आहे. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी पहावयास मिळते.
पेशवाकालीन विठ्ठल मंदिर हे मंदिर ठाणे पश्चिमेला जुना स्टेशन रस्त्यावर कुटिरोद्योग मंदिरासमोर आहे.
मासुंदा तलाव किंवा तलावपाळी हा ठाणे शहरातील एक प्रमुख आणि अतिशय प्राचीन तलाव आहे. हे एक लोकप्रिय व पर्यटक स्थळ आहे.
कल्याण कसारा मार्गावरील टिटवाळा येथील सिध्दीविनायक महागणपती मंदिर फार प्रसिद्ध असुन नवसाला पावणारा श्रीगणेश अशी त्याची माहिती सांगीतली जाते.
बोर्डी हे ठिकाण एक करमणुकीचे ठिकाण असून येथील किल्ला प्रेक्षणीय आहे. येथील उदरवाडा हे पारशी लोकांचे पवित्र ठिकाण आहे.
वसई हे गाव पोर्तूगान कडून चिमाजी अप्पांनी जिंकलेल्या ऐतिहासिक किल्ला वसई ची केळी व विड्याचे पान म्हणून प्रसिद्ध आहे. हे अतिशय लोकप्रिय आहे.
ठाणे जिल्हयातील भिवंडी तालुक्यात वज्रेश्वरी हे स्थळ भाविकांकरता फार लोकप्रिय ठिकाण आहे. या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड असुन त्याचा उपयोग अनेक आजारांवर होत असल्याची येथील भाविकांची श्रध्दा आहे.
मित्रांनो, ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा इतर मित्रांना शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Metro Rail In Marathi
Essay On World Wildlife Day In Marathi
My Country India Essay In Marathi