Social Worker Information In Marathi प्रत्येक समाज आणि संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे लोक आढळून येतात. यामध्ये धर्म, जात, लिंग, वय, रंग, वर्ण या विविध घटकांवर विविधता आढळून येते. मात्र या सगळ्या गोष्टींवर भेदभाव न करता सर्वांनी शांततेत नांदावे अशी इच्छाधारी असामान्य व्यक्ती यांना समाजसेवक असे म्हटले जाते. समाज एका आदर्श स्थितीमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या समाजाच्या सेवकांना केवळ देशाचे कल्याण हेच ध्येय ठाऊक असते.
समाजसेवक यांची संपूर्ण माहिती Social Worker Information In Marathi
आज काल जगभर मानव अनेक प्रकारचे शोषण किंवा वाईट कृत्य करून मानवाचे निसर्गावरील वर्चस्व आणि सत्ता प्रस्थापित करू पाहत आहे. तसेच मानवा मानवामध्ये देखील इतरांवर वर्चस्व गाजवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. या सर्व गोष्टींना आळा घालण्याचे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य या समाजसेवकांमार्फत केले जाते.
प्राचीन काळापासूनच समाजामध्ये भेदभाव पूर्ण वातावरण आणि विविध गटांचे शोषण चालत आलेले आहे. आणि या गोष्टींवर भाष्य करण्यासाठी प्रत्येक काळामध्ये समाजसेवकांची देखील वर्णी लागलेली आहे. एका सुसंस्कृत समाजाच्या चरित्रावरील डाग म्हणून या वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा उल्लेख केला जातो, मात्र तो डाग कितीही वाईट असला तरी समाजसेवक या नावाच्या धूलाई पावडरने त्यांचा नायनाट १००% होतोच.
आज या भागामध्ये आपण समाजसेवकांबद्दल माहिती घेणार आहोत…
नाव | समाजसेवक |
प्रकार | कार्य |
विविध समाजसेवक | राजा राम मोहन रॉय स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती ईश्वरचंद्र विद्यासागर महात्मा ज्योतिराव फुले बाबा आमटे विनोबा भावे मदर तेरेसा इत्यादी |
कार्य | समाजामध्ये एकता, बंधुता व शांतता प्रस्थापित करणे. |
राजाराम मोहन रॉय:
सतीची चाल कोणत्या व्यक्तीने बंद केली असे विचारले की आपोआपच आपल्या तोंडातून राजाराम मोहन रॉय यांचे नाव बाहेर पडते. या समाजसेवकाने समाजामध्ये जातिव्यवस्था नष्ट करणे, धार्मिक कट्टरतावर आवर घालणे यांसारख्या अनेक सामाजिक विकृतींवर कार्य केले होते. आणि त्यातीलच एक महत्त्वाची कृती म्हणजे सती प्रथा होय.
त्यांनी सती प्रथेविरुद्ध अनेक चळवळी करून शेवटी सती प्रथा बंद पाडण्यात यशस्वी झाले. त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून किंवा भारतीय पुनर्जागरण निर्माता या नावांनी ओळखले जाते. त्यांचा जन्म २२ मे १७७२ या दिवशी बंगाल राज्याच्या हुबळी जिल्ह्याच्या राधानगर येथे झाला होता. त्यांच्या आईचे व वडिलांचे नाव अनुक्रमे त्रिवाणी रॉय व रमाकांत रॉय असे होते.
स्वामी विवेकानंद:
नरेंद्र नाव असणाऱ्या या विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी १८८३ रोजी कलकत्त्यामध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वर देवी तर वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते. लहानपणापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या स्वामी विवेकानंदांना वेद, शास्त्र, तत्त्वज्ञान, संस्कृती, कला, संगीत व सामाजिक विज्ञान यांसारख्या अनेक विषयांमध्ये रुची होती. तसेच त्यांचा धार्मिक व्यासंग देखील प्रचंड होता. त्यांनी अमेरिकेमध्ये आपल्या ज्ञानाचा विस्तार करत भारताचा झेंडा तिथे रोवला होता.
स्वामी दयानंद सरस्वती:
मूळ शंकर या नावाने जन्मलेल्या स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्मदिन १२ जानेवारी १८२४ आहे. त्यांचा जन्म गुजरात या राज्यांमध्ये झाला होता. स्वामी वयाच्या २१व्या वर्षी आपले घरदार त्यागून स्वतःला स्वामी दयानंद सरस्वती हे नाव धारण सन्यासास गेले.
त्यांनी वेदांकडे परत चला हा संदेश देतानाच मूर्ती पूजा मात्र नाकारली, व अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्यास देखील नकार दिला. ते नेहमी म्हणत की हिंदू धर्म महान आहे, मात्र त्यातील विविध वाईट चालीरीती बंद व्हायला हव्यात. त्यांनी १८७५ मध्ये आर्य समाजाची स्थापना करून आपला धर्मप्रसाराचा वसा पुढे चालत ठेवला. त्यांनी आंतरजातीय विवाह मान्यता, विधवांना पुनर्विवाह करण्याची परवानगी, तसेच शूद्र व स्त्रिया यांना वेद वाचण्यास परवानगी यांसारख्या अनेक सुधारणा केल्या.
महात्मा ज्योतिबा फुले:
११ एप्रिल १८२७ या दिवशी सातारा मधील एका माळी कुटुंबात जन्मलेल्या ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या बद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी अवघ्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी विवाह केला होता. त्यांना समाजातील जातीव्यवस्था आणि लिंगभेद फार खटकत असे, महिलांना देखील शिक्षणाचा समान अधिकार असावा असे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
त्यांच्या या कार्यामध्ये त्यांना पत्नी सावित्रीबाई फुले यांचा देखील मोलाचा हातभार लागला, या दोन्ही उभयंतांनी मिळून महिला शिक्षणासाठी खूप मोठे कार्य केलेले आहे. आज त्यांच्या या देणगीमुळेच महिला अनेक क्षेत्रांमध्ये शिक्षण घेत प्रगती करू शकलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक महिलेने व मुलीने या दांपत्याला नक्की पुजले पाहिजे.
निष्कर्ष:
समाजसेवक हा अगदी प्राचीन काळापासून समाजाचा कणा मानला गेलेला आहे. या समाजसुधारक लोकांमुळे समाजाची रुळावरून घसरत चाललेली गाडी पुन्हा पूर्व पदावर येण्यास मदत होते. त्यामुळे त्यांना प्रत्येक काळामध्ये मानसन्मानाची वागणूक देण्यात आलेली आहे, मात्र असे असले तरी देखील काही कर्मठ लोकांमुळे या सुधारणांना अडथळा निर्माण होई. आणि तसेच हे लोक चांगल्या समाज सेवकांवर अत्याचार करत असत.
आज आपण समाजसेवकांबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. त्यामध्ये तुम्हाला विविध समाजसेवकांच्या बद्दल माहिती मिळाली असेल, तसेच त्यांचे सुधारणा व कार्य, सोबतच त्यांच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या इतर गोष्टींबद्दल देखील वाचायला मिळाले असेल. स्वामी विवेकानंद, राजा राम मोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, ज्योतीराव गोविंदराव फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर, विनोबा भावे, बाबा आमटे व मदर तेरेसा यांसारख्या समाजसेवकांचा समावेश होतो.
FAQ
समाजसेवकांना भारतीय समाजामध्ये किती महत्त्व किंवा स्थान आहे?
मित्रांनो, समाजसेवक हे भारतीय समाजाचा कना म्हणून ओळखले जातात, हे तुम्हाला माहितीच आहे. भारतीय समाजाला दया, सहिष्णुता, क्षमता, यांची जाणीव करून देत संस्कृती टिकून ठेवण्याकरता प्रयत्न करणारे हे समाजसेवक भारतीय समाजात अतिशय पूजनीय स्थानावर आहेत. त्यांच्या बंधुभावाच्या शिकवणीमुळे प्रत्येक नागरिकांमध्ये शांततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. आणि त्यांच्या या कार्याचे संविधानाच्या प्रस्तावनेत सुद्धा उल्लेख करण्यात आलेले आहेत.
परदेशी व्यक्तींना भारतामध्ये येऊन समाजसेवा करायची असेल तर त्यांना काय करावे लागेल?
मित्रांनो, कुठेही जाऊन समाजसेवा करायची असेल तर त्यासाठी फार काही करावे लागत नाही. मात्र समाजसेवा ही एक रोजगार प्रकारातील सेवा समजल्या गेल्यामुळे भारतामध्ये येऊन समाजसेवा मध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना व्हिसा असणे आवश्यक ठरते. ज्याचा प्रकार रोजगार व्हिसा असा असतो.
भारतीय समाज म्हणजे नेमके काय असते?
समाज म्हणजे सारख्या विचारांच्या किंवा सारख्या जाती धर्माच्या लोकांचा समूह होय. यामध्ये महिला समाज, पुरुष समाज, हिंदू समाज, यासारखे समाज बघायला मिळतात. तसेच स्वतंत्र पूर्व काळामध्ये वैचारिक स्तरावर स्थापन करण्यात आलेले विविध समाज होते. यामध्ये सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज यांसारख्या समाजाचा समावेश होतो.
मदर तेरेसा या समाजसेविकेचा जन्म कुठला व कधीचा आहे?
मदर तेरेसा या भारतीय नव्हत्या. त्यांचा जन्म मॅसेडोनिया या ठिकाणी दिनांक २६ ऑगस्ट १९१० या दिवशी झाला होता.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले ध्येय कोणते निश्चित केले होते?
मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना साक्षर व शिक्षित करणे हे आपले पहिले ध्येय निश्चित केलेले होते.
आजच्या भागामध्ये आपण समाजसेवक यांच्या बद्दल इत्यंभूत माहिती पाहिलेली आहे. प्रत्येक वेळी प्रमाणेच तुम्हाला या माहितीबद्दल प्रतिक्रिया तर सांगायच्या आहेतच, शिवाय तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करायची आहे. मित्रांनो तुम्ही दिलेल्या सूचना व प्रतिक्रिया आम्हाला तुमच्यापर्यंत अजून नवनवीन चांगली माहिती पोहोचवण्यास मदत करत असतात. त्यामुळे सूचना देण्यास देखील कचरू नका.
धन्यवाद…