सरकारी योजना Channel Join Now

कोल्हा प्राण्याची संपूर्ण माहिती Fox Animal Information In Marathi

Fox Animal Information In Marathi कोल्हा हा एक चतुर प्राणी म्हणून ओळखला जातो. कोल्ह्याबद्दल तुम्ही अनेक कथा किंवा गोष्टी वाचल्या असतील किंवा निदान तुमच्या आजी-आजोबांकडून ऐकल्या तरी असतीलच. जगातील सर्वात चपळ प्राण्यांच्या गटांमध्ये कोल्ह्याचा समावेश होतो. कोल्हा या प्राण्याबद्दल अनेक दंत कथा प्रचलित आहेत. इंग्रजीमध्ये फॉक्स या नावाने ओळखला जाणारा हा प्राणी एक मांसाहारी प्रकारातील प्राणी असून तो जंगलामध्ये आपले वास्तव्य करत असतो.

Fox Animal Information In Marathi

कोल्हा प्राण्याची संपूर्ण माहिती Fox Animal Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण अतिशय लबाड किंवा चतुर समजल्या जाणाऱ्या कोल्हा या प्राण्याविषयी माहिती बघणार आहोत.

नावकोल्हा
गटप्राणी
प्रकारजंगली शिकारी प्राणी
उपप्रकारमांसाहारी प्राणी
शास्त्रीय नाववुलपेस
साधारण आयुष्यमान१० ते १५ वर्षे
साधारण वस्तुमान अथवा वजनकिमान ०३ ते कमाल १५ किलोपर्यंत
साधारण उंची२० ते ५० सेंटी मीटर पर्यंत.

जगभर जवळपास २१ प्रचातींमध्ये आढळणारा हा कोल्हा प्राणी रंगाने राखाडी लाल किंवा तत्सम रंगांमध्ये आढळून येतो. कोल्हा हा प्राणी झाडांवर देखील सहजपणे चढू शकतो तो उभय पक्षी अर्थात मांसाहार व शाकाहार दोन्हीही ग्रहण करणारा प्राणी असून सस्तन प्राण्यांच्या गटांमध्ये मोडतो. कोल्हा हा नेहमी एकटं राहण्यासाठी उत्सुक असतो आणि तो विविध प्रकारचे आवाज काढून त्यामध्ये आनंद मानत असतो.

कोल्ह्याच्या खानपानाच्या सवयी:

कोल्हा हा असा प्राणी आहे जो विस्तीर्ण स्वरूपातील अन्न खाण्यास पसंती देतो. मुख्यत्वे मांसाहारी असणारा हा प्राणी काही वेळेस शाकाहारी पदार्थ देखील खातो. त्याच्या आहारामध्ये त्यापेक्षा लहान प्राणी पक्षी मासे किंवा पक्षांची अंडी इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. कोल्ह्याच्या सर्वात आवडत्या प्राण्यांमध्ये ससा या प्राण्याचा समावेश होतो. ससा दिसल्यावर तो कधीही सशाची शिकार करणे सोडत नाही.

अगदी चतुर व लबाड असलेला हा कोल्हा सशाच्या पाठीमागे अगदी मांजराप्रमाणे पावले टाकत हळूहळू जातो आणि त्याची शिकार करतो. काही मिळाले नाही तर कोल्हा लहान प्राण्यांमध्ये उंदराला देखील खातो. कोल्हे हे खाण्यासाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. ते उंदराप्रमाणेच बेडूक देखील खाण्यास प्राधान्य देतात. कारण बेडूक संत गतीने चालत असल्यामुळे कोल्ह्याला बेडूक पकडणे सोपे जाते.

काही वेळेला तो शेतातील भाज्या किंवा फळे देखील खातो यातील द्राक्ष हे फळ कोल्ह्याच्या अतिशय आवडीचे आहे. तसेच तो शेतकऱ्याच्या शेतातील ऊस देखील खातो. त्याची ऊस खाण्याची पद्धत अगदी अनोखी असते त्यामुळे कोल्ह्याने ऊस खाल्लेला आहे हे सहज लक्षात येऊ शकते.

कोल्ह्याचे आयुष्यमान:

कोल्हा हा जंगली आणि त्यातले त्यात शिकारी प्रकारचा प्राणी असल्यामुळे त्याचे आयुष्यमान फारसे जास्त असत नाही. कारण शिकारीच्या सततच्या दगदगीमुळे त्याचे आयुष्य कमी होते. जंगलात राहणाऱ्या कोल्ह्याचे आयुष्यमान साधारणपणे दोन वर्षांपासून पाच वर्षांपर्यंत असते. मात्र जर कोल्ह्याला सर्वकाही आयते मिळाले तर त्याचे आयुष्यमान वाढते म्हणूनच प्राणीसंग्रहालयातील कोल्ह्यांचे आयुष्यमान हे जंगली कोल्यांपेक्षा अधिक म्हणजेच साधारणपणे १५ वर्षांपर्यंत असते.

कोल्ह्याच्या विविध प्रजाती:

कोल्हा हा पृथ्वीवरील बऱ्याच देशात आढळणारा प्राणी असल्यामुळे त्या त्या ठिकाणांनुसार त्यांनी आपल्यात बदल करून घेतलेले आहेत. ज्यामुळे कोल्ह्याचे अनेक प्रजातींमध्ये विभाजन झालेले आहे. त्यातील काही महत्त्वपूर्ण प्रजातींबद्दल आपण चर्चा करूया.

सर्वात पहिली प्रजाती म्हणजे लाल कोल्हा होय. त्याला इंग्रजी भाषेमध्ये रेड फॉक्स असे म्हटले जाते. उलपेस उलपेस असे शास्त्रीय नाव असलेल्या या कोल्ह्याची बुद्धिमत्ता असाधारण अशी असते. त्याचे डोके पांढरे तर पाय गडद रंगाचे असतात. शेपटी देखील कधी कधी पांढरी असू शकते.

हा कोल्हा उंचीला सुमारे ७८ इंच वाढू शकतो. तर वजनाने दहा पाउंड पर्यंत असतो. हा कोल्हा अमेरिकेच्या उत्तर भागासह मध्य अमेरिका व आशिया खंडामध्ये आढळून येतो. मांसाहाराबरोबरच हा प्राणी फळे भाज्या यांसारखे शाकाहारी पदार्थ देखील खात असतो.

कोल्याची अजून एक प्रजाती म्हणजे अफगाण कोल्हा होय. त्याच्या शरीरावर काही प्रमाणात काळे केस असतात. अफगाणिस्तानच्या मध्यापासून पूर्वेकडील भागापर्यंत या कोल्याची लोकवस्ती आढळून येते. उंचीला केवळ ४० ते ५० सेंटीमीटर असलेला हा कोल्हा तीन किलो पर्यंत वजनदार असतो. हा कोल्हा समुद्रसपाटीपासून तब्बल दोन हजार मीटर उंचीपर्यंत देखील आपली घर बनवत असतो.

कोल्ह्याची आणखी एक प्रजाती म्हणजे आर्टिक कोल्हा होय. मित्रांनो यालाच स्नोफॉक्स किंवा ध्रुवीय कोल्हा असे देखील म्हटले जाते. काही भागात याला व्हाईट फॉक्स नावानेही ओळखतात. उंचीला हा कोल्हा इतरांपेक्षा अधिक असतो जो सुमारे ११० cm पर्यंत उंच असतो. मात्र वजनाने  देखील हा तीन किलो पर्यंतच असतो. उलपेस लागोपेरू असे शास्त्रीय नाव असलेला हा कोल्हा तीन ते चार वर्ष जगू शकतो.

यानंतर चौथी प्रजाती म्हणजे ग्रे कोल्हा होय. हा कोल्हा रंगाने राखाडी असून अमेरिकेच्या उत्तर व मध्य भागामध्ये आढळून येतो. हा कोल्हा उंचीला मध्यम अर्थात ७५ cm पर्यंत वाढतो. मात्र याची शेपटी लांब म्हणजेच ४० cm पर्यंत असते. हा ६ किलो वजनापर्यंत देखील वाढू शकतो. कोल्ह्याच्या प्रजातीमधील सर्वात हुशार प्रजाती म्हणून या प्रजातीला ओळखले जाते.

निष्कर्ष:

अगदी बालपणीच अनेक गोष्टी मार्फत या लबाड कोल्ह्याची आपली ओळख झालेली आहे. कोल्हा हा एक मांसाहारी प्राणी असून तो चालाखीने फसवून आपल्या शिकारीला मारण्यास प्रसिद्ध आहे. अशा या आजच्या भागामध्ये आपण कोल्ह्याबद्दल माहिती बघितलेली आहे.

ज्यामध्ये तुम्हाला कोल्ह्याच्या आहाराविषयी, शरीर रचनेविषयी, आयुष्याविषयी माहिती मिळाली. तसेच कोल्ह्याच्या विविध प्रजाती कोणत्या आहेत आणि कोल्हाबाबतची विविध मनोरंजक तथ्य रूप माहिती इत्यादी गोष्टी वाचायला मिळालेल्या आहेत.

FAQ

कोल्हा कोणकोणत्या प्रकारचे अन्न खातो?

मित्रांनो प्रामुख्याने कोल्हा हा मांसाहारी प्राणी असल्यामुळे तो शिजवलेले अथवा शिजवलेले मौंस खाण्यास प्रथम प्राधान्य देतो. तसेच मानवी वस्तीत शिरल्यास तो पाळीव प्राण्यांचा देखील फडशा पाडतो. तसेच कोल्हे शाकाहारी पदार्थातील भाज्या फळे ब्रेड इत्यादी गोष्टी देखील खाऊ शकतात. त्यांना द्राक्ष फार आवडतात तसेच ते ऊस देखील खात असतात.

कोल्हे कोणत्या प्रदेशात आढळून येतात?

मित्रांनो बहुदा कोल्हे हे जंगली प्रदेशात राहत असतात. त्यांच्या राहण्यासाठी ओलसर जमीन आणि मुबलक अन्न असलेली ठिकाण उपयुक्त ठरतात. मित्रांनो मानवाच्या अतिक्रमणामुळे तुम्हाला अनेक प्राणी मानवी वस्तीमध्ये आलेले आढळून आले असतील. मात्र कोल्हा हा क्वचितच मानवी वस्तीमध्ये दिसतो कारण कोल्ह्याला एकांतात राहणे आवडते.

कोल्हा बद्दल काय विशेष माहिती सांगता येईल?

मित्रांनो मांजरी प्रमाणे आपल्या पायाची नखे आत घेऊ शकणारा प्राणी म्हणून कोल्ह्याला ओळखले जाते. कोल्ह्याच्या डोळ्याला उभ्या बाहुल्या असतात ज्यामुळे त्यांचे डोळे मांजराप्रमाणेच दिसतात. असे असले तरी देखील कोल्हा ही प्रजाती कुत्र्याशी जास्त साधर्म्य दाखविते.

कोल्ह्याच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान प्रजातींची नावे काय आहेत?

कोल्ह्याच्या सर्वात मोठ्या प्रजातीचे नाव रेड फॉक्स तर सर्वात लहान प्रजातीचे नाव कुंपण कोल्हा असे आहेत.

कोल्हे निशाचर प्राणी आहेत का?

होय कोल्हे हे निशाचर प्राणी असून ते आपल्या शिकारी करिता किंवा अन्न शोधण्याकरिता रात्रीचे बाहेर पडतात. त्यामुळेच तुम्हाला कोल्ह्यांचा आवाज अर्थात कोल्हे कोई रात्रीची ऐकू येते.

आजच्या भागामध्ये आपण कोल्हा या अतिशय चतुर प्राण्याविषयी माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नेहमीप्रमाणे आम्हाला कमेंट मध्ये कळवा तसेच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना या प्राण्यांची माहिती व्हावी याकरिता शेअर करा. तसेच तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवा.

धन्यवाद!!!

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment