सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण माहिती Sindhudurg District Information In Marathi

Sindhudurg District Information In Marathi महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग हा जिल्हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो.चला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी आणखी सविस्तर माहिती पाहूया.

Sindhudurg District Information In Marathi

सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण माहिती Sindhudurg District Information In Marathi

हिरवीगार गर्द वनराई छत्रपती शिवाजी महाराजांची असामान्य कर्तृत्वातून निर्माण झालेल्या सिंधुदुर्ग हा किल्ला देखील या जिल्ह्यात पाहायला मिळतो. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त किल्ले असणारा जिल्हा आहे.

या जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प जमसांडे, तालुका देवगड येथे उभारण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून 1 मे 1981 ला महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला.

विस्तार व क्षेत्रफळ :

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 5,222 चौरस किलोमीटर एवढे आहे. तसेच या जिल्ह्याच्या सीमेला लागून उत्तरेस रत्नागिरी जिल्हा व पश्चिमेस अरबी समुद्र तसेच दक्षिणेस गोवा व कर्नाटक राज्य आणि पूर्वेस सह्याद्री पर्वताच्या रांगा व कोल्हापूर जिल्हा आहे.

लोकसंख्या :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 8,48,868. ऐवढी आहे. सिंधुदुर्ग हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.

या जिल्हा मध्ये 1000 पुरूषांमागे 1036 स्त्रियांचे प्रमाण आहे. येथील साक्षरता दर 86.54% येवढे आहे. तर लिंग गुणोत्तर प्रमाण 1.05% आहे. येथे विविध जाती व धर्माचे लोक राहतात.

जिल्ह्यातील तालुके:

सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. जिल्ह्यात देवगड, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, दोडामार्ग आणि वैभववाडी हे आठ तालुके आहेत.

जिल्हाचे मुख्य ठिकाण प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरोस ब्रुद्रुक येथे आहे. वेंगुर्ले या तालुक्या मध्ये काजू संशोधन केंद्र आहे.

नद्या:

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त नद्या सह्याद्री पर्वतातून उगम पावतात व अरबी समुद्राला जाऊन भेटतात. या जिल्हा मध्ये शुक, गड, कर्ली, निलारी, तेरेखोल, जोग, जगबुडी, देवगड, आचरा या जिल्ह्यातील मोठ्या पश्चिमवाहिनी नद्या असून त्यांना मिळणाऱ्या अनेक लहान नद्या सह्याद्री पर्वतश्रेणीतच उगम पावतात. समोर जाऊन ह्या नद्या कृष्णा नदीला तसेच अरबी समुद्राला जाऊन भेटतात.

सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा इतिहास:

सिंधुदुर्ग या जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभलेला आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला सिंधुदुर्ग जिल्हा अतिशय नैसर्गिक लावण्य लाभलेला हा जिल्हा एक ऐतिहासिक वारश्याला जन्म देतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना इ. स. 1 मे 1981 साली झाली. रत्नागिरी जिल्हा चे विभाजन करून सिंधुदूर्ग हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्‍नागिरी जिल्हा होते. ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग ह्या जिल्ह्यात आहे. 1999 साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.

राज्यातील सर्वात जास्त किल्ले असणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्हामध्ये ऐकूण 37 किल्ले असुन किल्ल्याचे सर्व प्रकार येथे बघायला मिळतात. जे दुसऱ्या कोणत्याच राज्या मध्ये नाही. जसे सागरी जलदुर्ग किल्ला, भुमीवरचा भुईकोट किल्ला, आणि उंच डोंगरावरचा गिरीदुर्ग किल्ला येथे आहे. हे सर्व किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे.

16 व्या शतकात संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज सत्तेचा उदय झाला. आणि सिंधुदुर्ग जिल्हा याला काही अपवाद नव्हता. अखेर 1675 मध्ये सुलतानाच्या हातून हा जिल्हा शिवरायांच्या हाती आला.

मराठ्यांनी 1871 पर्यंत जिल्ह्यावर वर्चस्व राखले मात्र 1871 मध्ये ब्रिटीश आणि पेशव्यां मधील संघर्ष संपला आणि जिल्हा ब्रिटिशांच्या हातात गेला.

सन 1819 मध्ये दक्षिण कोकण नावाचा वेगळा जिल्हा निर्माण करण्यात आला व त्याचे मुख्यालय प्रथम बाणकोट व नंतर रत्नागिरी येथे ठेवण्यात आले. 1830 मध्ये उत्तरेकडील तीन उपविभाग ठाणे जिल्ह्यात वर्ग केले गेले आणि सिंधुदुर्गला एका उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला. 1832 मध्ये रत्नागिरी नावाने एक नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. इ. स.1945 मध्ये कणकवली नावाचे एक नवे महल निर्माण करण्यात आले.

व्यवसाय व उद्योग:

सिंधुदुर्ग येथील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. येथे प्रामुख्याने भात हे पीक घेतले जाते. शेती व मच्छीमारी हे या जिल्ह्यातील दोन प्रमुख व्यवसाय आहेत. येथे प्रामुख्याने आंबा, फणस, काजू, कोकम, नारळ, सुपारी, केळी इत्यादी जिल्ह्यातील नगदी पिके होतात.

देवगड व वेंगुर्ले येथील हापूसआंबा प्रसिध्द आहे. येथील आंबा, काजू, रातांबा आदींच्या लागवडीखाली क्षेत्र जास्त आहे. आणि उत्पादनाबरोबरच जिल्ह्याच्या उत्पन्नात सुद्धा वाढ झाली. तसेच काजूचे सर्वाधिक उत्पादन देण्यामध्ये देखील हा जिल्हा ओळखला जातो.

भात हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून नाचणी, वरी, तीळ, नागली, मिरी इत्यादी पिके होतात. भातापासून पोहे व चुरमुरे तयार करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात या जिल्हा मध्ये केला जातो.

या जिल्हामध्ये आंब्यावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात नवीन पिढी प्रयत्न्न करत आहे. नारळाच्या बहुविध वस्तू बनविण्याचे उद्योग जिल्ह्यात आढळतात. काथ्या, काथ्यापासून सुंभ, ब्रश व पायपुसणी तयार करतात. दावी वदोरखंड बनवितात. झावळ्यांपासून केरसुण्या बनवितात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हातमागावर कापड विणन्याचा उद्योग केला जातो. तसेच कणकवलीचे हातमागा वरील पंचे प्रसिद्घ आहेत. तांबड्या मातीपासून भांडी, मडकी, शेगड्या यांबरोबरच नक्षीदार तुळशी वृंदावने बनविण्याची खासियत येथील कुंभारांत आढळते.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी खेळणी व लाकडी फडे वस्तू बनवल्या जातात. हे ठिकान जगभर प्रसिद्ध आहे आणि येथील वस्तू ला विदेशात मोठ्या प्रमाणत मागणी आहे. सावंतवाडी, कुडाळ व वेंगुर्ले येथे कृषी उत्पादनाच्या प्रमुख बाजारपेठा आहेत.

हवामान:

सिंधुदुर्ग जिल्ह्याला अरबी समुद्राची किनारपट्टी लाभल्यामुळे येथील वातावरण उष्ण व दमट असते. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त उष्ण तर हिवाळा मध्ये येथील वातावरण थंड असते. येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

या जिल्ह्याचे वेगळे वैशिष्ट आहे राज्यात सर्वाधिक पाऊसाची नोंद आंबोली हे गाव जिल्ह्यातील कुशीत वसलेले आहे. येथील सरासरी पावसाचे प्रमाण हे 300 सेमी आहे. तर उन्हाळी तापमान हे 35° ते 40° ऐवढे होते.

जंगली प्राणी:

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे येथे वेगवेगळ्या प्रकारचे पाणी आढळून येतात. जंगलात हत्ती, बिबट्या, लांडगा, सांबर, गवा, रानडुक्कर, ससा, कोल्हा, हरिण वगैरे प्राणी आढलून येतात.

तसेच दोडामार्ग या तालुक्या मध्ये हत्ती या प्राण्याची संख्या वाढली आहे. या जंगलामध्ये प्रामुख्याने ऐन, साग, शिसव, नाणा, किंजळ, शिवण, हिरडा, खैर इत्यादी वृक्षांच्या जाती आहेत.

पर्यटन स्थळ:

या जिल्हा मध्ये कणकेश्वर या ठिकाणी यादव कालीन शिवमंदिर प्रसिध्द आहे. येथे मोठ्या प्रमाणात लोक दर्शनाला जातात.

आंबोली हे एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहेत. सुट्टीच्या दिवशी येथे लोक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी जात असतात. तसेच आंबोली पासून जवळच नारायणगड व महादेवगड हे डोंगरी किल्ले आहेत. हे किल्ले खूप प्राचीन आहेत.

सिंधुदुर्ग हा किल्ला सुद्धा शिवरायांनी बांधला आहे. तसेच विजयदुर्ग येथे शिवाजी महाराजांनी जलदुर्ग किल्ला बांधलेला आहे. हे एक प्राचीन व महत्वाचे ठिकाण आहे.

आरवली-शिरोडा येथे विठोबा, सातेरीदेवी व नवलाईदेवी तर आजगाव येथे वेताळेश्वर मंदिर आहे. येथे मोठ्या गर्दीने भक्त दर्शनाला येतात.

वेंगुर्ल्याची पुळण आणि तेथील सागरेश्वर मंदिर प्रसिद्घ असून गावातरामेश्वर व सातेरीदेवी यांची सुरेख मंदिरे आहेत.

मालवण येथे श्री गणेशाचे मंदिर प्रसिद्ध आहे, तसे येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनाला येत असतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी शहरात सुंदर राजवाडा व मोती तलाव आहेत. जो अतिशय लोकप्रिय आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In MarathiMy School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment