मुंबई जिल्ह्याची संपूर्ण माहिती Mumbai District Information In Marathi

Mumbai District Information In Marathi मुंबई, ही महाराष्ट्राची राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्म पावलेले शहर, भारतातले सर्वात श्रीमंत शहर, सर्वाधिक कोट्याधीश आणि अब्जाधिश असणारे शहर अशी मुंबईची ओळख आहे.तर चला मग आपण मुंबई या जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

Mumbai District Information In Marathi

मुंबई जिल्ह्याची संपूर्ण माहिती Mumbai District Information In Marathi

मूळ मुंबई सात बेटांची आणि मासेमारी करणारे कोळी लोक यांचे ते मूळ निवासस्थान होते.मुंबई ही भारताची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजन यांची राजधानीच आहे. अशा अनेक रहस्य मुंबईमध्ये दडलेले आहे.

क्षेत्रफळ व विस्तार :

मुंबईचे एकूण क्षेत्रफळ 603.4 चौरस किलोमीटर आहे, ज्यामधील 437.71 चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे आहेत.

मुंबई शहर जिल्हा हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर 18° 52′ आणि 19° 04′ उत्तर अक्षांक्ष आणि 72° 47′ आणि 72° 54′ पूर्व रेखांशादरम्यान वसलेले आहे.

हे शहर पश्चिम आणि दक्षिणेला अरबी समुद्र आणि पूर्वेला ठाण्याची खाडी अशा प्रकारे तिन्ही बाजुंनी पाण्याने वेढलेले आहे. उत्तरेला मुंबई उपनगर जिल्ह्याची सीमा आहे.

तालुके :

मुंबई जिल्ह्यात एकुण 3 तालुके आहेत.

अंधेरी, बोरीवली, कुर्ला.

लोकसंख्या :

मुंबई शहराची लोकसंख्या 2011 च्या जणगणनेनूसार 30,85,411 एवढी आहे. मुंबई जिल्हयाचे साक्षरतेचे प्रमाण 89.2 % आहे. मुंबई जिल्हयाचे लिंग प्रमाण 832 आहे.

हवामान :

मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात आणि  अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवास येतात, एक म्हणजे आर्द्र व व दुसरा ऋतू शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात मार्च ते ऑक्टोबर तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते.

तापमान 30° से. पर्यंत जाते. मान्सूनचा पाऊस मुंबईत जून ते ऑक्टोबरपर्यंत पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान 2,200 मि.मी. आहे. विक्रमी वार्षिक पर्जन्यमान 1954 साली 3,452 मि.मी. इतके झाले होते, तर एका दिवसात सर्वांत जास्त पाऊस 26 जुलै, 2005 रोजी 944 मि.मी. इतका पडला होता.

नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतूत मध्यम सापेक्ष आर्द्रता व मध्यम तापमान असते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे या बदलाकरता कारणीभूत असतात. वार्षिक तापमान कमाल 40° से. ते किमान 10° से. इतके असते.

विक्रमी वार्षिक तापमान कमाल 43° से. व किमान 7° से. असे नोंदवले गेले आहे.

मुंबई हे नाव कसे पडले :

मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे.  पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी  बॉम्बे केले. मुंबई, बम्बई आणि बॉम्बे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती.

काहीजण या नगरीला मुंबापुरी म्हणतात. 1995 मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले.

मुंबई जिल्ह्याची भाषा :

मुंबईत एक खास मराठी बोली बोलली जाते. मूळ मराठी कोळी आगरी, भंडारी यांची वेगवेगळी बोलीभाषा आहे. काही काळाने इतर राज्यांतील अमराठी लोकं येऊन त्यांची हिंदी भाषा लादली जाऊ लागली, ती मराठी माणसाला बोलता येत नाही. तसेच मराठी न येणारे हिंदी भाषिक टपोरी मिश्र भाषा बोलू लागले. तिला बम्बय्या हिंदी म्हणतात.

मुंबई जिल्ह्याचा इतिहास :

मुंबई या जिल्ह्याचा इतिहास खूप प्राचीन आहे. पूर्वी मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. 250 सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. 3 च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती.

शिलाहार या हिंदू साम्राज्याने 1343 पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली.  एलिफंटा गुंफा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. 1534 साली  पोर्तुगीजांनी बहादूर शहाकडून मुंबई काबीज केली व बॉम बाहीया असे नाव दिले.

1661 रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन ब्रेगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून  ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली.

सन 1734 मध्ये मुंबई बेटे व आसपासचा परिसर पोर्तूगीजांच्या अमला खाली होता. साधारण 1760-61 मध्ये पोर्तूगीजांनी हा प्रदेश ब्रीटनच्या महाराणीला भेट म्हणून दिला. मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मीती होण्या पुर्वी या भू-भागाचे नाव साष्टी बेटे होते व सन 1971-72 पर्यंत हा प्रदेश पोर्तूगीज अमलाखालील गोवा राज्यात समावीष्ट होता. 1771-72 नंतर ह्या प्रदेशावर ब्रिटीश साम्राज्याचा अधिकार आला.

मुंबई जिल्ह्यातील प्रमुख नद्या :

मुंबई जिल्हात प्रमुख तीन आहे. त्याविषयी सविस्तर माहिती आपण पाहूया.

मिठी नदी :

ही नदी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. मिठी नदी विहार झोन परिसरात उगम पावते व दक्षिणेकडे व वांद्रे-कुर्ला संकुल मधुन वाहते आणि शेवटी माहीम बे येथे अरबी समुद्रात मिळते. त्याच्या दक्षिणेकडील मार्गाचा मोठा भाग भरतीसंबंधीचा कारणास्तव प्रभावित आहे.

एकूण 13.5 किलोमीटर लांबीचे हे नदी पात्र आहे आणि 7295 हेक्टर क्षेत्रावरील पूरग्रस्त क्षेत्र जे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील काही भाग व्यापते. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून 3.5 किमीचा विस्तार आहे, जो मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटीने नियोजन आणि विकसित केली आहे.

दहिसर नदी (मंडपेश्वर) :

मुंबई उपनगर जिल्ह्यात दहिसर नदी ही दुसरी मुख्य नदी आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या तुळशी तलावातून उगम पावते, भायंदर क्रीकमार्गे अरबी समुद्र भेटण्याआधी मागाठाणे, कान्हेरी, दहिसर, मंडपेश्वरमार्गे वाहते.

पोइसर नदी :

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (लाहुगड) उगम पावते, आकुर्ली, पोईसर, कांदिवली, वलनी, मालाड मधुन वाहते आणि मालाड खाडीमार्गे अरबी समुद्राला मिळते.

ओशिवरा नदी :

ही नदी फिल्म सिटी गोरेगांवमध्ये उगम पावते. मालाड क्रीकमार्गे अरबी समुद्राची भेट घेण्याआधी, दोन उपनद्या नदीत सामील होतात, एक नदी संतोष नगर मधून येते आणि दुसरी एक ओशिवरा मधून येते आणि आरे कॉलनी पुलाजवळ नदीला मिळतात.

लोक व समाज जीवन :

मुंबईमध्ये कोळी समाजातील लोक हे मुंबई ही पूर्ण बनण्या अगोदरपासून समुद्रकिनाऱ्यावर अस्तित्वात आहेत, म्हणूनच मुंबई ही कोळी लोकांची आहे असे सांगण्यात येते. त्यांचा समुद्रावर उदरनिर्वाह आहे.

हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असतानाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला “कोळीवाडा” असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत.

याव्यतिरिक्त माहीम, शीव,  धारावी, कुलाबा, वडाळा, शिवडी, वरळी, वेसावे,  कफ परेड, मांडवी, चारकोप, बंदरपखाडी, खार, गोराई, मालाड, मढ, आगरी समाज हे मुंबई, ठाणे  आणि रायगड जिल्ह्यात खाड्या, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे.

तलाव :

मुंबई जिल्ह्यात मुख्य तीन तलाव आहेत. तुलसी तलाव, विहार तलाव, पवई तलाव.

पर्यटन स्थळे :

एस्सेल वर्ल्ड, जल क्रीडा उद्दान, गोराई काल्पनिक जमीन, जोगेश्वरी.

लेणी :

कन्हेरी लेणी, जोगेश्वरी लेणी.

महत्वाची स्थळे :

मुंबई या जिल्ह्यांमध्ये बरीच पर्यटन स्थळ आहे. माउंट मॅरी चर्च, भाभा परमाणु संशोधन केंद्र,
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पवई राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय टर्मिनल विमानतळ, सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ, आरे दूध कॉलनी, आयएनएस हॅम्ला, फिल्म सिटी.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

Essay On Makar Sankranti In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment