यवतमाळ जिल्ह्याची संपूर्ण माहिती Yavatmal District Information In Marathi

Yavatmal District Information In Marathi यवतमाळ, शहराचे नाव पूर्वी यवत किंवा यवते असे होते. येवतीचा महाल असा प्रत्यय लागून, या शहराचे नाव यवतमाळ असे पडले. महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी अग्रेसर असल्यामुळे पांढरे सोने पिकवणारा, किंवा कापसाचा जिल्हा म्हणून यवतमाळ ओळखले जाते.चला तर मित्रांनो, आपण या जिल्ह्याविषयी आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Yavatmal District Information In Marathi

यवतमाळ जिल्ह्याची संपूर्ण माहिती Yavatmal District Information In Marathi

यवतमाळ हा महाराष्ट्र जिल्ह्यातील विदर्भातील एक जिल्हा आहे. यवतमाळ हे विदर्भातील लोकसंख्येनुसार तिसरा मोठा जिल्हा आहे. यवतमाळ शहर हे जिल्ह्याची राजधानी आहे. वर्धा व पैनगंगा, या दोन नद्या या जिल्ह्याच्या प्रमुख नद्या आहेत.

विस्तार व क्षेत्रफळ :

यवतमाळ या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 13,594. चौरस किलोमीटर एवढे आहे. यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेला लागून उत्तरेस वर्धा व अमरावती जिल्हा आहे. तसेच दक्षिणेस नांदेड जिल्हा व आंध्र प्रदेश आहे. पूर्वेस चंद्रपूर जिल्हा आणि पश्चिमेस परभणी व अकोला, जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत. जिल्ह्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर सर्वात मोठे धरण आहे.

लोकसंख्या :

यवतमाळ, जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 27,75,457. लोकसंख्येची घनता 204 प्रति चौरस किमी एवढी आहे. येथील साक्षरता दर 80.7% असून लिंग गुणोत्तर प्रमाण 1.055% आहे. या जिल्हा मध्ये 1000 पुरूषांमागे 951 स्त्रिया आहेत.

यवतमाळ, जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. मराठा, मुस्लिम, कुणबी, माळी, बंजारा तसेच, कोळी आणि कोलाम आणि काही प्रमुख आदिवासी जमाती जिल्ह्यात रहवाशी आहेत. येथे मराठी हिंदी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषा बोलल्या जातात. यवतमाळ हे विदर्भातील लोकसंख्येनुसार तिसरा मोठा जिल्हा आहे.

यवतमाळ जिल्हा हवामान :

यवतमाळ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान 46° से. पर्यंत तर हिवाळ्यात 11° से. पर्यंत असते तर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 965 मि.मी आहे. जिल्ह्याचा सुमारे 21% भाग (2850 चौ.कि.मी.) हा वनक्षेत्रात मोडतो.

व्यवसाय :

या जिल्हा मध्ये मुख्य व्यवसाय शेती आहे. पांढरे सोने (कापुस) पिकविणारा जिल्हा म्हणून विदर्भाच्या खुशीत असलेला यवतमाळ जिल्हा, अनेक गुणवैशिष्ट्यांनी भरलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाची पिके कापूस, ज्वारी, भुईमूग, तूर-डाळ ही आहेत. जिल्ह्याला कापूस, लाकूड, चुनखडी, कोळसा व संत्री या वस्तूंद्वारे महसूल मिळतो.

यवतमाळमध्ये, पुसद, वणी, दिग्रस, घाटंजी, पांढरकवडा, राळेगाव, उमरखेड, दारव्हा व नेर ही महत्त्वाची व्यापार-केंद्रे आहेत. चांदले शिलाई मशीन हे उमरखेड तालुक्यातील शिलाई मशीनचे अधिकृत व्यापार केंद्रे आहेत.

यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास :

यवतमाळ, शहराला देखील इतिहासाची अशीच किनार लाभलेली आहे. या भागाने अनेक राजे महाराजांचा उदय व अस्त झालेला आहे. महाभारतात विदर्भाचा उल्लेख आढळतो, तव्दतच यवतमाळचा देखील उल्लेख सापडतो. त्यानंतर मौर्य साम्राज्य, सातवाहन, वाकाटक राजवंश, चालुक्य राजवंश, राष्ट्रकूट वंश, यादव वंश, दिल्ली चे सुल्तान, पुढे 1853 ला जिल्हा ब्रिटीशांच्या सत्तेखाली आला.

1903 ला यवतमाळ ला हैदराबाद च्या निजामाने करारावर घेतले होते. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. 1905 साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.

ख्रिस्तपूर्व, 272 ते 231 मधील काळात राजा सम्राट अशोक मौर्य याच्या राज्याचा बेरार हा सुद्धा भाग होता. परंतु कदाचित मौर्य राज्याच्या अध:पतना अगोदर मौर्यांनी स्थानिक चोरांच्या टोळीच्या मदतीने हे राज्य आपल्या ताब्यात घेतले व अशारितीने पुष्यमित्र संगा राज्याचा शेवट केला.

पुष्यमित्र हा शेवटचा मौर्य बृहद्रथा याच्या सैन्याचा सेनापती होता. त्याने आपल्या राजाला फितुरीने मारून स्वतःची राजवट उभी केली व विदिशा जे कि सध्याचे भिलाषा या शहराला राजधानी म्हणून घोषित केले.

पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र हा नंतरच्या काळात राज्य कारभार पाहू लागला. राज्याच्या सीमा वाढविण्याच्या प्रयत्नात त्याने विदर्भाच्या राज्याशी युध्द करण्याचा प्रयत्न केला व पराजित झाला. शेवटी दोघांमध्ये तह होऊन वर्धा नदीला दोन्ही राज्यामधील सीमारेषा म्हणून मान्य केले.

विदर्भाच्या राजाची राजवट व कुळ याचा कुठेही उल्लेख आढळत नाही. तसेच पुढे त्याचे साम्राज्य कुठपर्यंत स्थापित झाले. याची नोंद सुद्धा दिसत नाही. परंतु ह्या घटनेची नोंद मात्र आढळून आली ज्यामुळे पूर्व बेरारच्या साम्राज्याला त्यावेळी बराच फरक पडला.

जिल्ह्यातील तालुके :

यवतमाळ, जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत. जिल्ह्यातील तालुके आहेत. आर्णी, उमरखेड, कळंब, केळापूर, झरी, जामणी, घाटंजी, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, महागांव, मारेगांव, राळेगांव, वणी, यवतमाळ तालुका इत्यादी.

नद्या :

वर्धा व पैनगंगा ह्या जिल्ह्यातील दोन मुख्य नद्या आहेत. पैनगंगा नदीचे उगमस्थान अजंठा पर्वत रांगातील दक्षिण-पश्चिम बुलढाणा शहरात आहे. ती वर्धा नदीची मुख्य उपनदी म्हणून सुद्धा मान्यता पावली आहे. नदी तळ खूप खोल असून तिचा मार्ग बराच नागमोडी स्वरूपाचा आहे.

पैनगंगा आपल्या संपूर्ण नागमोडी मार्गामुळे जिल्ह्याची दक्षिण सीमारेषा तयार करते. पूस, अऱ्हा, अडान, वाघाडी व कुंज ह्या पैनगंगेच्या जिल्ह्यातील महत्वाच्या उपनद्या होत.

जलसंधारण :

यवतमाळ’ जिल्ह्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर सर्वात मोठे धरण आहे. वनराई बंधारे या योजनेखाली 2005 ते 2008 या चार वर्षांत तब्बल 28,553 बंधारे बांधण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात 2004 साली दुष्काळ होता. सुमारे सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी वाया गेली होती. नद्या, नाले, विहिरी, विंधनविहिरी कोरड्या झाल्या होत्या. जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी 1.99 मीटरने खाली गेली. 95% गावांमध्ये डिसेंबर अखेर पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते.

उद्योग :

औद्योगिक दृष्ट्या यवतमाळ हा विदर्भातील एक मागासलेला जिल्हा आहे. येथे मोठ्या उद्योगांचा विकास फारच कमी झालेला आहे. बरेचसे उद्योग, कृषी उत्पादनांवर आधारित आहेत. तेल व डाळ-गिरण्या, कापूस वटणी व दाबणी ,  अन्नधान्य प्रक्रिया, लोहारकाम, सुतारकाम, मातीची भांडी, लाकूड कापणी, विणकाम, बेकरी उत्पादने, पादत्राणे,  दोर,  कौले व विटा तयार करणे यांसारखे लघू,  परंपरागत व कुटिरोद्योग बरेच आढळतात. यांतील बहुतेक उद्योग तालुक्यांच्या मुख्य ठिकाणी अधिक प्रमाणात आढळतात.

वनी तालुक्यातील चुनखडीच्या साठ्यांमुळे त्यातील राजूर येथे चुनाभट्‌ट्या  आहेत. चुनखडी उत्पादनांवर आधारित उद्योगधंदे स्थापन करण्याचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. वणी तालुक्यातील चनाखा येथे सिमेंट कारखाना उभारण्याची योजना आहे.

कारण तेथील चुनखडी सिमेंट उत्पादनयोग्य आहे. राजूर,  वणी, चनाखा,  मुकुटबन, गौराळा व चनाखा,  भिवकुंड हे मुख्य चुनखडी उत्पादक प्रदेश असून पिसेगाव, वरूड,  चिंचोली इ. ठिकाणी कोळशाचे साठे आहेत. पुसद व पांढरकवडा येथे सूत व कापडगिरण्या, तर पोफळी तेथे साखरकारखाना आहे. लाकूड कापण्याच्या गिरण्या,  लाकडी सामान, खेळणी, पेन्सिली तयार करणे इ. वनोत्पादनावर आधारित उद्योगधंद्यांच्या वाढीस जिल्ह्यात खूपच वाव आहे.

पर्यटन स्थळ :

यवतमाळ, या जिल्हातील वनी तालुक्यामध्ये रंगनाथ स्वामीचे मंदिर प्रसिद्ध आहे. कळंब, या तालुक्यामध्ये पोहरा देवीचे जगदंबा मंदिर बंजारा समाजासाठी काशी म्हणून ओळखली जाते.

जैनांची काशी म्हणून ओळखले जाणारे शिरपूर जैन हे पुरातन गाव, जैन धर्मियांचा तीर्थक्षेत्राबरोबरच प्रेक्षणिय पर्यटन स्थळ आहे.घाटंजी हे गाव मोरोली महाराजांच्या यात्रे करिता प्रसिद्ध आहे.

यवतमाळ हा जिल्हा प्राचीन भारताच्या इतिहासाची संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था येथे आहे. येथील केदारेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.घाटंजी जवळच्या अंजी येथील नृसिंह मंदिर, वणी, तपोणा, पुसद, महागाव, कळंब येथील चिंतामणी मंदिर, रंगनाथ स्वामींचे मंदिर इत्यादी पर्यटनस्थळे येथे आहेत.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment