भंडारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती Bhandara District Information In Marathi

Bhandara District Information In Marathi भंडारा जिल्ह्यात 3,648 लहान मोठी तळी आहे, त्यामुळे या जिल्ह्याला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते तसेच सुगंधी तांदुळ आणि तांबे या उत्पादना करता हा जिल्हा खूप प्रसिद्ध आहे. याव्यतिरीक्त इथे काही पर्यटन स्थळ किंवा मंदिर आहे. तर चला मग आपण या जिल्ह्याविषयी आणखी विस्तृत माहिती पाहूया.

Bhandara District Information In Marathi

भंडारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती Bhandara District Information In Marathi

विस्तार व क्षेत्रफळ :

या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 3,716 वर्ग कि.मी असून भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेस गडचिरोली व चंद्रपूर, पश्चिमेस नागपूर हे महाराष्ट्रातील जिल्हे, तर उत्तरेस बालाघाट, पुर्वेस दुर्ग हे प्रदेश राज्यातील जिल्हे आहेत. भंडारा, गोंदिया व साकोली हे जिल्ह्याचे तीन तालुके आहेत.

उत्तरेकडे बालाघाट व भंडारा जिल्ह्यांदरम्यान बावनथरी, वैनगंगा व वाघ या नद्यांची नैसर्गिक सरहद्द आहे. तसेच नैऋत्येस नागपूर-भंडारा व दक्षिणेस चंद्रपूर-भंडारा यांदरम्यानची सीमा वैनगंगा नदीमुळे निर्माण झालेली आहे.

लोकसंख्या :

भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या 12,00,334 एवढी असून 1000 पुरूषांमागे 979 स्त्रिया आहेत. मराठी या प्रमुख मापेशिवाय हिंदी, गोंडी, पोवारी, उर्दू, सिंधी, गुजराती, होलिया, तेलुगू, कोष्ठी, कालारी इ. भाषा बोलल्या जातात. लोकांचे मुख्य अन्न भात भाताच्या जोडीला चूण असते.

जेवणात भाकरी अगर पोळी, लाखोळीचे वरण व भाजी असते. जवसाच्या तेलाचा वापर बराच केला जातो. तलावातून शिंगाडे मिळतात.

धार्मिक जीवन :

प्रत्येक गावात मारूतीचे तसेच मुतूया देवाचे मंदिर आढळते. दिवाळीच्या दिवशी गोवारी लोक मुतूया मंदिराजवळ गुरे उभी करूण ढोल वाजवून नाच-गाणी करतात. शेतामध्ये सेवाऱ्या नावाच्या देवाची स्थापना केलेली असते.

भिमसेन हा गोंड लोंकाचा देव आहे. घराघरात धुलादेव असतो. धुलादेवाची पूजा वर्षातून एकदा व तीही फक्त पुरूषच करतात. घाटावर किंवा नदी व नाला उतरण्याच्या ठिकाणी धीवर लोंकाचा बेल समु्द्रराजा नावाचा देव असतो. गोंधळ व दंढार तसेच करमा हा गोंडचा नृत्यप्रकार या जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात आढळतात.

भंडारा जिल्ह्यातील तालुके :

भंडारा जिल्ह्यातील 7 तालुके आहे, ते पुढीलप्रमाणे. भंडारा, साकोली, तुमसर, पवनी, मोहाडी, लाखनी, लाखांदुर.

इतिहास :

भंडारा जिल्ह्याचा प्राचीन इतिहास विशेष ज्ञात नाही. पूर्वी या प्रदेशावर गवळ्यांचे राज्य असावे. इ.स. सातव्या शतकापासून येथील काही भागावर हैह्यवंशीय राजपूत राजांचे अधिराज्य होते व त्यांची राजधानी नागपूर जिल्ह्यातील नगरधन येथे असावी, असे मध्य प्रदेश राज्याच्या बिलासपुर जिल्ह्यातील रतनपुर येथे सापडलेल्या शिलालेखावरुन दिसून येते.

बाराव्यात ते सोळाव्या शतकांपर्यंतच्या कालावधीत राजपूतांच्या सत्तेचा ऱ्हास होत जाऊन तेथे गोडांची सत्ता प्रस्थापित झाली. सतराव्या शतकात येथील काही भाग छिदवाडा जिल्ह्यातील देवगड येथील बख्त बुलंदशहाच्या अंमलाखाली होता. या काळात या प्रदेशाची बरीच प्रगती झाली. बख्त बुलंदनंतर चांद सुलतान, रघुजी भोसले, आप्पासाहेब भोसले व नंतर ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली हा भाग आला.

राजे रघुजी भोसले यांच्या कारकीर्दीत शेतीला व उद्योगध्यांना उत्तेजन मिळाले. त्यामुळे या प्रदेशाची भरभराट होऊन प्रजा सुखी व संपन्न होती, असा उल्लेख आढळतो. तसेच त्यांनी पेंढाऱ्यांचा जनतेला होणार त्रास कमी करण्यासाठी पवनी, सान-गडी, कामठा, लाजी इ. ठिकाणी गढ्या बांधून घेतल्या. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत राज्यकारभाराचे मुख्य ठिकाण भंडारा केले व पूर्वीच्या वैनगंगा प्रांत भंडारा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला.

तलाव :

जिल्ह्यात 580 मोठे आणि 13,758 लहान व मध्यम आकाराचे तलाव आहेत. म्हणूनच ‘महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा’ अशी भंडारा जिल्ह्याची ख्याती आहे. येथील तलाव दोन प्रकारचे आहेत. पहिला प्रकार म्हणजे डोंगराळ प्रदेशात, विशेषतः गायखुरी, नवेगाव व पळसगाव डोंगररांगांमधील अर्धचंद्राकार खोलगट भागातील तलावांचा.

हे तलाव आकाराने मोठे असले, तरी त्यांचा विस्तार अनियमित असून या तलावांचे काठ घनवेष्टित, ओबडधोबड टेकडयांनी बनलेले असल्यामुळे त्यांवरील पाणी तलावात जमा होते. या तलावाची बांधनी कोहली जमातीच्या आदिवासींनी केली असून बांधकामामध्ये कसल्याही योजनाबद्ध तंत्राचा वा अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर केलेला नाही.

दुसऱ्या प्रकारच्या तलावांची बांधणी सामान्यपणे डोंगर पायथ्याच्या उतारावर किंवा दरीच्या सामान्य उताराच्या भागात मातीचे बांध घालून केलेली आढळते. यात प्रामुख्याने पावसाचे पाणी साठते. यांचे पाणलोट क्षेत्रही कमीच आहे. त्यामुळे यांचे स्वरूप हंगामी असून उन्हाळ्यात किंवा अवर्षणकाळात पाणीपुरवठयासाठी यांचा उपयोग होऊ शकत नाही. तरीही जलसिंचनाच्या व मत्स्यपालनाच्या दृष्टीने त्यांना महत्त्व आहे.

व्यवसाय :

येथील मुख्य व्यवसाय शेती असुन शेती आणि जंगलांपासुन मिळणाऱ्या उत्पन्नावर येथील अर्थव्यवस्था अवलंबुन आहे. या जिल्ह्यात लोहखनिज विपुल प्रमाणात असून येथील प्रमुख पिके पुढीलप्रमाणे तांदूळ, गहू, मिलेट.

तांदळाच्या चिन्नोर, दुभराज, काळी कमोद या सुवासिक जाती प्रसिद्ध आहेत. भंडारा हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त प्रमाणात तांदूळ पिकविणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात बावनथडी, चूलबंद, कन्हान, बाघ, गोसे धरण, कवलेवडा धरण, ही धरणे आहेत. या धरणांमुळे तेथे पाण्याचा पुरवठा शेतीसाठी उपलब्ध असतो.

उद्योग :

जिल्ह्यातील उद्योग प्रामुख्याने कृषी व वनोत्पादनावर आधारित आहेत. शेतीमधून निघणारी भात, तेलबिया ही प्रमुख व्यापारी पिके, वने वनोत्पादने, मँगॅनीज, लोह व इतर खनिजांचे साठे इत्यादींच्या विपुलतेमुळे जिल्ह्यात औद्योगिक विकासास खूपच वाव आहे. खापरखेडा, तुमसर या विद्युतनिर्मिती केंद्रांकडून येथील कारखान्यांना विद्युतपुरवठा केला जातो. कवडसी येथेही एक उपविद्युत् निर्मिती केद्र उभारले जात आहे.

पितळी भाडयांच्या निर्मितीसाठी तर हा जिल्ह्या प्राचीन काळापासूनच प्रसिद्ध आहे. मोटारदुरुस्ती व अभियांत्रिकी उद्योगांसाठी गोंदिया, भंडारा काच उद्योगांसाठी गोंदिया, भंडारा काच उद्दोगासाठी गोंदिया लाकूड कापण्याच्या गिरण्यांसाठी गोंदिया, तुमसर, तिरोडा व आमगाव अशी ठिकाणे प्रसिद्ध आहेत. सुती व लोकरी कापड विणकाम, सुतार व लोहारकाम, मातीची भांडी, विटा आणि कौले, वने व बांधकाम, विडी, नीरा, गूळ तयार करणे इ. कुटिरोद्योग चालतात.

वनस्पती व प्राणी :

येथील अरण्ये उष्ण कटिबंधीय पानझडी प्रकारची असून मिश्र व साग अरण्ये असे त्याचे दोन प्रकार पडतात. साग हा येथील आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष असून या वृक्षाच्या अरण्यांनी एकूण 5% क्षेत्र व्यापले आहे. साग, हालडा, टिनसा,शिसव, हुआ, धावडा, तेंडू, लेंडिया, आवळा, आचार, मोयेन, बिजा, मिरा, मोह, खालई, मोखा, धामण, सेमाल, हालदू, तिवस, रोहान, खैर, डिकेमाली, गारारी इ. व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे वृक्ष आहेत.

काळीव, लाल माकडे, वाघ, सांबर, चितळे, बिबळ्या, रानमांजर, तरस, कोल्हा, गवा, रानकुत्रा, अस्वल, बिजू, रानडुक्कर, ससा, सायाळ, मुंगुस, भेकरा, माउस डीअर, नीलगाय, काळवीट, चिंकारा, चारशिंगी हरिण, घोरपड, करडी, खार, विविध प्रकारचे साप हे प्राणी व हळदी, सुतारपक्षी, मोर, ग्राउझ, करडे तितर, हिरवे कबूतर, लावा, होला इ. पक्षी अरण्यात, तर बदक, टील, पाणकोळी, करकोचा, बक इ. तलावांचा व तलाव परिसरात आढळतात.

पर्यटन स्थळ :

भंडारा या जिल्ह्यातील अंबागड किल्ला, कोरांबी देवीचे मंदिर, इंदिरा सागर प्रकल्प, श्री हनुमान मंदिर चांदपुर मंदिर , गायमुख, पवनी किल्ला, पांडे महाल भंडारा, गरुड खांब पवनी, गोसे धरण, मोहाडी देवीचे मंदिर, माडगी येथील वैनगंगा नदीवरील यात्रा, सिन्द्पुरि येथील बौद्ध विहार, लाखांदूर तालुक्यातील झरी तलाव, चप्रालचि पहाडी हे पर्यटनस्थळ असून पर्यटकांना आकर्षित करतात. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment