Wardha District Information In Marathi : वर्धा या शहराचे पूर्वीचे नाव पालकवाडी असे होते. पालकवडी नावाच्या छोट्या वस्तीत नियोजनबध्द विकास होऊन ते आजचे वर्धा शहर अस्तित्वात आले. वर्धा हे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर वर्धा याच नावाच्या नदीकाठावर वसले आहे. महाराष्ट्रात वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र कार्यरत आहे. वर्धा या जिल्ह्याची स्थापना 1866 मध्ये झालेली आहे. तर चला मित्रांनो आपण जाणून घेऊया वर्धा जिल्हा विषयी माहिती.

वर्धा जिल्ह्याची संपूर्ण माहिती Wardha District Information In Marathi
क्षेत्रफळ व विस्तार :
वर्धा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 6311 चौरस किलोमीटर आहे. आकाराने सामान्यपणे त्रिकोणी असलेला हा जिल्हा दक्षिणेस व नैर्ऋत्येस यवतमाळ, पश्चिमेस अमरावती, उत्तरेस व ईशान्येस नागपूर आणि पूर्वेस व आग्नेयीस चंद्रपूर या जिल्ह्यांनी वेढलेला आहे.
ऐतिहासिक घटनांविषयी जिल्हा प्रसिद्ध आहे. जिल्ह्याची उत्तर, पश्चिम व नैर्ऋत्य सरहद्द वर्धा नदीने बनलेली असून वर्धा व वेणा या प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांनी जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग व्यापला आहे.
वर्धा जिल्ह्यातील तालुके :
प्रशासनाच्या सोयीसाठी आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, वर्धा, समुद्रपूर, सेलू व हिंगणघाट या आठ तालुक्यांत जिल्ह्याची विभागणी करण्यात आली असून वर्धा शहर हे जिल्ह्याचे मुख्य ठाणे आहे. वर्धा जिल्ह्याचा बहुतांश भूप्रदेश म्हणजे नागपूर पठाराचा पश्चिम भाग आहे.
वर्धा जिल्ह्याचे हवामान :
जिल्ह्यात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 109 सेंमी. असून उंचीनुसार पावसाच्या प्रमाणात 90 ते 140 सेंमी. पर्यंत फरक दिसून येतो. हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र चढ-उतार होण्याचे प्रसंग वर्षभरात अनेक वेळा घडतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील तफावत जास्त असते.
या काळात दिवस अती उष्ण, तर त्यामानाने रात्री जलद थंड होतात. ऐन उन्हाच्या वेळी येणाऱ्या सौम्य झुळुकांमुळे अथवा मेघगर्जनेसह क्वचित पडणाऱ्या पर्जन्यामुळे उन्हाळा थोडा सुसह्य होतो. मे हा अती उष्णतेचा, तर जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो.
मे महिन्यातील दैनिक कमाल तापमान 43° से. तर किमान 27° से. असते. कधीकधी दिवसाचे तापमान 47°से. पर्यंतही जात असतात. एकाच दिवशी तापमानात तर हिवाळ्यात दैनंदिन सरासरी तापमान स्थलपरत्वे 130 ते 290 से. पर्यंत असते. काही वेळा ते रात्रीचे 50° से. पर्यंत खाली येते.
इतिहास :
वर्धा शहराचा इतिहास खूप प्राचीन आहे. वर्धा शहराच्या ईशान्येस आठ किमीवर पवनार येथे नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्वीय विभागाने 1967 मध्ये उत्खनन केले. त्यात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे काही अवशेष मिळाले. त्यांवरून येथील लोक दगडाच्या हत्यारांबरोबरच काही प्रमाणात तांब्याची हत्यारे वापरीत असावेत आणि त्यांची वस्ती प्रामुख्याने नदीकाठी लहान खेड्यांतून होती. ते पशुपालन, शिकार व कृषीच्या प्राथमिक अवस्थेत असावेत. हे लोक उत्तरेकडून आलेल्या आर्य टोळ्यांपैकी असावेत, असा काही विद्वानांचा कयास आहे.
नंदिवर्धन येथून वर्धा जिल्ह्यातील प्रवरपूर येथे हलविण्यात आली. प्रभावती-गुप्ताचे दोन ताम्रपट उपलब्ध असून त्यांपैकी एक वर्धा जिल्ह्यातील आहे. त्यात विद्यमान हिंगणघाट तालुक्यातील डंगुण खेड्यातील एका ब्राह्मणाला दान दिल्याचा उल्लेख आहे. यात चतुःसीमांचा उल्लेख असून वर्धा जिल्ह्यातील आसपासच्या अनेक विद्यमान गावांचे संदर्भ मिळतात.
यादव काळाच्या अखेरीस महाराष्ट्रावर उत्तरेकडून मुसलमानांची आक्रमणे झाली. कुत्बुद्दीन मुबारक शाह याने हरपालदेवला ठार मारून यादव साम्राज्य नष्ट केले. 1731-55 याने गोंडवन राज्य खालसा करून गाविलगढ, नरनाळा व माणिकदुर्ग हे महत्त्वाचे किल्ले काबीज केले.
पुढे पेशवाईच्या अस्तानंतर इ स 1818. मध्ये नागपूर संस्थानात ईस्ट इंडिया कंपनीचा रेसिडेंट राहू लागला आणि त्यानंतर संस्थानात गादीसाठी अंतर्गत कलह झाला आणि इंग्रजांनी 1854 मध्ये दत्तक वारसा नामंजूर करून नागपूर संस्थान खालसा केले. नागपूर राज्य इंग्रजांनी घेतल्यावर नागपूर जिल्ह्यातील हिंगणघाट, वर्धा व आर्वी हे तालुके बाजूला काढून 1862 साली वर्धा या स्वतंत्र जिल्ह्याची स्थापना केली.
सुरुवातीस पुलगाव येथे जिल्हा मुख्यालय होते पुढे ते पालकवाडी येथे हलविण्यात आले आणि वर्धा नदीवरून त्यास वर्धा जिल्हा हे नाव प्राप्त झाले. स्वातंत्र्यापर्यंत वर्धा जिल्हा ब्रिटिशांच्या अंमलाखाली होता. 1956 च्या राज्य पुनर्रचनेनंतर हा जिल्हा मध्य प्रदेश राज्यातून मुंबई राज्यात व पुढे 1 मे 1960 रोजी नवनिर्मित महाराष्ट्र राज्यात अंतर्भूत झाला.
लोकसंख्या :-
वर्धा या जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणने नुसार 1,296,157. ऐवढी असून सरासरी साक्षरता दर 80% आहे. जो देशाच्या राष्ट्रीय सरासरी 59.5% पेक्षा जास्त आहे.
पुरुष साक्षरता 83% आणि महिला साक्षरता दर 76% आहे. वर्ध्यामध्ये, 11% लोकसंख्या सहा वर्षाखालील आहे. वर्धा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर आहे. शहराच्या लोकसंख्येत प्रामुख्याने हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक आहेत. ह्याशिवाय मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धार्मिक सुद्धा अल्पसंख्यक समुदायाने आहेत.
वनक्षेत्र :
वर्धा जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मोठी जंगले नाहीत. जिल्ह्यात एकूण वनक्षेत्र 875 चौ. किमी. असून जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ते 14% आहे. मुख्यत्वे आर्वी, कारंजा, आष्टी, समुद्रपूर व सेलू या तालुक्यांत वनांचा विस्तार दिसून येतो. हिंगणघाट तालुक्यात तुरळक वनक्षेत्र आहे. जिल्ह्यातील एकूण वनव्याप्त प्रदेशापैकी 60% राखीव, 37% असंरक्षित व 3% अवर्गीकृत वनक्षेत्र आहे.
आर्वी व हिंगणी परिसरात उत्तम दर्जाच्या सागवानाची वने आढळतात. येथील जंगलात धावडा, सालई, तेंदू, मोवई या वनस्पतींचे प्रमाण जास्त असून त्यांशिवाय ऐन, वेल, कळंब, पळस, मोह, बेहडा इत्यादि वनस्पतींबरोबरच कुरूड, घोनळ, मुशाम, मारवेल, शेळा इ. प्रकारचे गवतही आढळते. येथील वनोत्पादनांमध्ये मुख्यत्वे साग, इमारती व जळाऊ लाकूड, बांबू, गवत, बिडी पत्ता, डिंक इत्यादींचा समावेश असतो. वनांच्या वाढीसाठी जिल्ह्यात अनेक वनविकास योजना राबविल्या जात आहेत.
व्यवसाय :
वर्धा जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील एकूण 6,29,000 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी लागवडीलायक क्षेत्र 74%, कायम गावरान व इतर चराऊ जमीन यांखालील क्षेत्र 7%, शेतीला उपलब्ध नसलेले क्षेत्र 7% व जंगलाखालील क्षेत्र 12% होते.
जास्तीत जास्त शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. खरीप व रब्बी अशी दोन्ही पिके घेण्यात येतात.
कापूस, ज्वारी, मूग, तूर, जवस, तीळ, भुईमूग, ऊस, हळद, गहू, हरभरा, वाटाणा, मिरची ही पिके होतात.मुख्य पीक ज्वारीचे असते. संकरित व जादा उत्पादन देणाऱ्या पिकांमध्ये प्रामुख्याने ज्वारी, तूर, गहू, कापूस, भुईमूग या पिकांचा समावेश होतो. संत्र्याचे पीक मुख्यतः कारंजा व आर्वी तालुक्यांत, तर केळीचे उत्पादन सेलू तालुक्यात घेतले जाते.
पर्यटन स्थळ :
वर्धा येथे सुंदर शिल्पकाम केलेले मल्हारी मार्तंडाचे जुने मंदिर आहे. विदर्भातील जैन मंदिरांपैकी महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले येथील जैन मंदिरआहे.
संत गाडगे महाराजांच्या स्मरणार्थ मार्गशीर्षमध्ये येथे मोठी यात्रा भरते. शहरात दोन दर्गे व तीन मशिदी असून येथे मोठा उरूसही भरतो.आर्वी हे ‘संतांची आर्वी’ म्हणून प्रसिद्ध असलेले शहर वर्ध्याच्या वायव्येस 54.75 किमी. वर असून कापसाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय चळवळीत या शहराचा मोठा वाटा होता.
शहरात राम, कृष्ण, लक्ष्मीनारायण यांची सुंदर मंदिरे असून संत मायबाईचा मठ आहे. आष्टी (8050) हे वर्ध्याच्या उत्तरेला 76.86 किमी. वर असून पीर वजित या मुसलमान अवलियाची येथील कबर प्रसिद्ध आहे. दरवर्षी तेथे मोठा उरूस भरतो. हिंदूही याचे भक्त आहेत.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Importance Of Cleanliness In Marathi
Essay On Save Electricity In Marathi
My Best Friend Essay In Marathi
My Country India Essay In Marathi