कोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Kolhapur District Information In Marathi

Kolhapur District Information In Marathi कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले आणि सह्याद्री पर्वत रांगा सभोवताली आहेत.  हे ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि पूर्व रॉयल्सच्या राजेशाही ठिकाणांसाठी प्रसिद्ध शहर आहे. तर चला मग पाहुया कोल्हापूर या जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती.

 Kolhapur District Information In Marathi

कोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Kolhapur District Information In Marathi

भारताची वैभवता आणि भव्यता शोधण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. भारतीय हस्तकलेच्या चामड्यांचे चप्पल, कोल्हापुरी चप्पल आणि तिच्या खासगी स्थानिक दागिन्यांसाठी विशेष प्रसिद्ध हार कोल्हापुरी साज म्हणून ओळखला जातो.

क्षेत्रफळ व विस्तार :

क्षेत्रफळ 8,135 चौ. किमी असून जिल्ह्याचा विस्तार हा 15° 43′ उ. ते 17° 10′ उ. आणि 73° 17′ पू. ते 74° 42′ पू. यांदरम्यानच्या या जिल्ह्याची दक्षिणोत्तर लांबी 160 किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी सरासरी 60 किमी. आहे. याच्या पश्चिमेस रत्नागिरी, उत्तरेस सांगली आणि पूर्व व दक्षिण बाजूंस कर्नाटक राज्यातील बेळगाव हे जिल्हे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास :

कोल्हापूरच्या इतिहासाचे वर्णन देवी गीतेमध्येही आले आहे, आणि एक अध्याय देवी भागवत पुराणातही आहे, ज्यात कोल्हापूर राज्याचे वर्णन आहे, जर आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहिला तर आपल्याला कळेल की इ.स. 940 ते 1212 ए.डी., कोल्हापूर शिलाहार राजवंश ही मध्यवर्ती सत्ता होती, त्यावर काही काळ भोजा प्रथम, चालुक्य, चोल इत्यादी राजवंशांनीही राज्य केले.

येथे भगवान शिव यांना समर्पित कोपेश्वराचे मंदिर 1109 ते 1178 एडी दरम्यान अहिल्हारा राजांनी बांधले होते, ज्यात गंडारदित्य चोल, विजयादित्य आणि भोज द्वितीय प्रमुख आहेत, 1707 मध्ये ताराबाईंनी कोल्हापूर राज्याची पायाभरणी केली, जे 19 व्या शतकात ब्रिटिशांनी स्थापन केले.ते पकडले गेले, पण 1947 मध्ये हे संस्थान भारतीय प्रजासत्ताकातही सामील झाले.

पौराणिक हिंदू धर्मशास्त्रानुसार केशी या राक्षसाचा मुलगा कोल्हासूर प्राचीन काळी येथे राज्य करत होता. त्याने राज्याला व्यभिचाराने आणि सर्वांना त्रास दिला होता, म्हणून देवांच्या विनंतीवरून महालक्ष्मी त्यांच्याशी लढली.

हे युद्ध नऊ दिवस चालले आणि अश्विन शुद्ध पंचमीला महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला. त्या वेळी, कोल्हासूर महालक्ष्मीकडे गेला आणि वरदान मागितले की तिच्या शहराचे नाव कोल्हापूर आणि करवीर देवीला जसे आहे तसे ठेवा.

हवामान :

कोल्हापूर जिल्ह्याचे सरासरी तपमान उन्हाळ्यात कमीत कमी 29° से. आणि जास्तीत जास्त 41.5° से. पर्यंत जाते आणि हिवाळ्यात कमीत कमी 14° से. पर्यंत उतरते आणि जास्तीत जास्त 21° से. पर्यंत जाते. पावसाळ्यात ते 17° से.पेक्षा कमी होत नाही. गगनबावडा, आजरा, चंदगड, राधानगरी व शाहूवाडी या तालुक्यांत पाऊस 200 सेंमी. पेक्षा जास्त पडतो.

गगनबावडा येथे तो 700 सेंमी. पेक्षाही जास्त पडतो. भुदरगड व पन्हाळा या तालुक्यांत 120 सेंमी. ते 200 सेंमी. पर्यंत पडतो. गडहिंग्लज आणि करवीर तालुक्यांत 90 सेंमी. ते 120 सेंमी., तर कागल तालुक्यांत तो 65 सेंमी. ते 95 सेंमी. पडतो. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत मात्र 65 सेंमी. पेक्षा कमी पाऊस पडतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके :

कोल्हापूर जिल्ह्यात बारा तालुके आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले आणि शिरोळ हे तालुके उत्तरेस गगनबावडा, राधानगरी, भुदरगड व कागल मध्यभागी आणि आजरा, गडहिंग्लज व चंदगड हे तालुके दक्षिणेस आहेत.

शेती व्यवसाय :

कोल्हापूर जिल्ह्यातील बरीच लोकं शेतीवर निर्भर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पाण्याच्या मुबलक पुरवठा असल्यामुळे बाराही महिने वेगवेगळी पिके घेतली जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य पीक ऊस हे आहे व तेथे साखर कारखाने ही उपलब्ध आहेत. त्याव्यतिरिक्त येथे तांदूळ, भुईमूग, सोयाबीन नाचणी, ज्वारी गहू आणि तूर ही पिकेही घेतली जातात.

उद्योग :

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कताई मिल्स, साखर उद्योग, कापड मिल्स आणि अभियांत्रिकी सामान, पोल्ट्री, फाऊंड्री, केमिकल्स इत्यादि क्षेत्रातील उद्योगांद्वारे समर्थित आहेत ज्यामुळे कोल्हापूर आणि त्याच्या आसपास लाखो लोकांना रोजगार मिळतो.

खनिज संपत्ती :

जिल्ह्यात सर्वत्र बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आढळतो. चंदगड, राधानगरी वगैरे काही भागांत मात्र कुरुंदाचा दगड मिळतो. शाहूवाडी, पन्हाळा व आजरा या तालुक्यांत बॉक्साइटाचे मोठे साठे आहेत.

कर्नाटक व महाराष्ट्र येथे निघणाऱ्या ॲल्युमिनियमच्या कारखान्यांस त्यांचा पुरवठा होईल. भुदरगड तालुक्यात जिप्सम सापडते.

नद्या :

कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा ही मुख्य नदी असून तिच्या उपनद्या वारणा, पंचगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी व घटप्रभा या येथील प्रमुख नद्या होत. घटप्रभेला मिळणारी मलप्रभा व ताम्रपर्णी याही या जिल्ह्यातून वाहतात. कृष्णा ईशान्य सरहद्दीवरून 60 किमी. वाहते.

वारणा उत्तर सरहद्दीवरून वाहते. कुंभी, कासारी, तुळशी व भोगावती या चार नद्या व सरस्वती ही पाचवी गुप्त नदी मिळून झालेली पंचगंगा नरसोबाच्या वाडीजवळ कृष्णेला मिळते. तिचे खोरे संपूर्णपणे या जिल्ह्यात आहे. बाकीच्या नद्यांच्या खोऱ्यांचा फक्त काही भागच या जिल्ह्यात आहे.

वनक्षेत्र वनस्पती व प्राणी :

जिल्ह्याचा सु. 18.8 % भाग वनाच्छादित आहे. तो मुख्यत: पश्चिमेकडील डोंगराळ भागातच आहे. त्यात जांभूळ, हिरडा, फणस, आंबा, कोकम, अंजन, सावर, शिसव, किंजळ, चंदन इ. सदापर्णी साग, धावडा, ऐन, हेद, बाभूळ खैर इ. ऋतुपर्णी व कुडा, वाकेरी, भारंग, वावडिंग, बेडकी, बिब्बा, बाहवा इ. औषधी वनस्पती आहेत. साग, काजू व सावर यांच्या लागवडी मुद्दाम केल्या आहेत. इमारती व जळाऊ लाकूड, कोळसा, चंदन, मध, मेण, हिरडा, काजू, शिकेकाई, चराऊ गवत यांचे चांगले उत्पन्न होते.

गवा, वाघ, चित्ता, बिबट्या, सांबर, भेकर, अस्वल, रानडुक्कर, तरस, चितळ, ससा, लांडगा, रानकोंबडा इ. प्राणी जंगलात आढळतात. कावळा, चिमणी, पोपट, मोर, तित्तिर, घुबड वगैरे नेहमीचे पक्षी येथेही आहेत.

साप, अजगर वगैरे सरपटणारे प्राणी व अनेक प्रकारचे कीटक, फुलपाखरे वगैरे आहेत. राधानगरी तालुक्यात गवा अभयारण्य स्थापन झालेले असून जंगली प्राणी नैसर्गिक अवस्थेत पाहण्याची सोय येथे केलेली आहे.

दळणवळण साधने :

कोल्हापूर हे जिल्ह्याचे ठिकाण तालुक्यांच्या ठिकाणांशी व शेजारील जिल्ह्यांशी सडकांनी जोडलेले आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय हमरस्ता कोल्हापूर व कागल शहरांवरून जातो. त्याची या जिल्ह्यातील लांबी 44 किमी. आहे. 1970 साली जिल्ह्यात राज्यरस्ते 419 किमी., मोठे जिल्हारस्ते 438 किमी., इतर जिल्हा रस्ते 571 किमी. व खेड्यांचे रस्ते 956 किमी. होते.

एकूण 56 किमी. रस्ते सिमेंटकाँक्रीटचे व 355 किमी. डांबरी होते. पुणे, मंबई, बेळगाव, निपाणी, रत्नागिरी, सावंतवाडी या बाजूंस प्रवासी गाड्यांची व मालमोटारींची सतत वाहतूक चालू असते. कोल्हापूर ही मोठी व्यापारपेठ असल्याने साहजिकच मालवाहतुकीचे ते महत्त्वाचे केंद्र बनले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 440 गाड्या कोल्हापूर विभागात धावत होत्या.

समाज व जीवन :

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांची राहणी मराठमोळा पद्धतीची आहे. धोतर, कुडते, मुंडासे व वहाणा आणि खांद्यावर कांबळे हा सर्वसाधारण खेडुतांचा वेश असतो, तर लुगडे व चोळी हा स्त्रियांचा वेश असतो.

अलीकडे शहरी संपर्काने यात बराच फरक पडत आहे. तथापि कोल्हापूरी फेटा, कोल्हापूरी वहाणा, कोल्हापूरी रगेल व रंगेल भाषा यांचा प्रभाव जाणवतो.

खेड्यांतील शहरांतील घरे महाराष्ट्राच्या इतर भागाप्रमाणेच दगडामातीची, कौलारू किंवा पत्र्याच्या छपराची, तर शहरांतून आधुनिक बांधणीची व काही भागांत केवळ गवती छपराच्या झोपड्यांच्या स्वरूपात आहेत.

लोकांचे मुख्य अन्न जोंधळा व नाचणी, त्याच्या जोडीला भाजी, कांदा, आमटी, परवडेल तेव्हा भात, मांस व मासे असे परंतु झणझणीत असते. तमाशा व कुस्ती हे लोकांचे आवडते शौक आहेत. कोल्हापूर हे तर कुस्तीगीरांचे माहेरच आहे.

पर्यटन स्थळ :

कोल्हापूर जिल्ह्यात प्राचीन मंदिर, तसेच ऐतिहासिक लाभलेला असा हा जिल्हा आहे. येथे श्री अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, रंकाळा तलाव, नवीन राजवाडा, पंचगंगा घाट, राजारामपुरी येथील मांडरे चित्रदालन, शिवाजी विद्यापीठ, शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान, दूध कट्टा, जोतिबा तीर्थक्षेत्र, किल्ले पन्हाळा, कणेरी मठ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, खिद्रापूरचे पुरातन मंदिर, गगनबावडा येथील रामलिंग पर्यटकांनी पाहण्यासारखे आहे.
मित्रांनो, जर तुम्ही कोल्हापूरला गेले तर नक्कीच या क्षेत्रांना भेट द्या व सहलीचा आनंद घ्या.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

Essay On Makar Sankranti In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment