नाशिक जिल्ह्याची संपूर्ण माहिती Nashik District Information In Marathi

Nashik District Information In Marathi: महाराष्ट्रात सर्वात जास्त द्राक्षाचे उत्पादन नाशिक जिल्हयात होते येथील द्राक्ष विदेशात देखील पाठवली जातात. नाशिक जिल्हा दारू च्या उत्पादनाकरता देखील ओळखला जातो त्यामुळे याला “भारताची वाईन कॅपीटल” म्हणुनही संबोधतात.तर चला मग पाहूया नाशिक या जिल्ह्याविषयी आणखीन सविस्तर माहिती.

Nashik District Information In Marathi

नाशिक जिल्ह्याची संपूर्ण माहिती Nashik District Information In Marathi

सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर व ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांची ही कर्मभूमी आहे.

क्षेत्रफळ व विस्तार :

नाशिक या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 15,350 चौरस किमी असून या जिल्ह्याच्या उत्तरेला- धुळे जिल्हा, पूर्वेला- जळगाव जिल्हा, अग्नेयेला – औरंगाबाद जिल्हा, दक्षिणेला- अहमदनगर जिल्हा, नैऋत्येला – ठाणे जिल्हा, पश्चिमेला – नवसारी जिल्हा, वलसाड जिल्हा, वायव्येला- डांग जिल्हा आहे.

लोकसंख्या :

नाशिक या जिल्ह्याची 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 61,09,052 होती. जिल्ह्यात 20 शहरे आणि 1,628 वस्तीची आणि 4 ओसाड गावे आहेत.

नाशिक जिल्ह्यातील तालुके :

सटाणा, सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, नाशिक, निफाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, कळवण, त्र्यंबकेश्वर.

नाशिक जिल्ह्याचा इतिहास :

नाशिक जिल्ह्याचा इतिहास हा खूप प्राचीन इतिहास म्हणून ओळखला जातो. नाशिक हें पौराणिक शहर असून येथें मंदिरे बरींच आहेत. बौद्ध व जैन गुहाहि पहाण्यासारख्या आहेत. गोविंदेश्वर येथें जी देवळें आहेत तीं सर्वांत उत्तम आहेत.

बागलाणमध्यें कळवण येथील जोगेश्वर देवळांतील नकशीकाम फार सुरेख आहे. इ.स. 1906 त येथें सत्रप वंशाच्या वेळचीं बरींच नाणीं सांपडलीं. या जिल्ह्यांत एकंदर 38 डोंगरी किल्ले असून यांचे दोन प्रकार आहेत.

सह्याद्रीवर असणारे व मध्यभागाच्या चांदवड पहाडावर असणारे. सह्याद्रीवर एकंदर 23 किल्ले आहेत. पैकीं मुख्य गलन, अंजनेरी, त्रिबक, कुलंग, अलंग व कळसुबाई हे होत.

राम, लक्ष्मण व सिता आपल्या वनवासाच्या काळात गोदावरी काठच्या वनातच वास्तव्याला होते. असे म्हटले जाते. येथेच लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले, अशी आख्यायिका आहे. संस्कृतमध्ये नाकास ‘नासिका’ असे म्हटले जाते, त्यावरून ‘नाशिक’ हे नाव पडले असावे.

याच ठिकाणी इसवी सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे रूपांतर पुढे 1904 मध्ये जोसेफ मॅझिनीच्या ‘यंग इटली’च्या धर्तीवरील ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संघटनेत केले गेले.

क्रांतीकारकांचे जणू तिर्थक्षेत्र ठरलेल्या या शहरातील विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या महाराष्ट्राच्या सुपुत्राने कलेक्टर जॅक्सनचा वध केला व पुढे हौतात्म्य पत्करले.

प्रमुख नद्या :

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या पश्चिमेस वाहणाऱ्या, तापीच्या खोऱ्यातील व गोदावरी खोऱ्यातील नद्या असे नद्यांचे तीन प्रमुख भाग आहेत. कोकणात किंवा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून वाहणाऱ्या नद्यांत चोंदी, कावेरी, सासू किंवा तान, मान किंवा बामती, नार, पार, बारीक, दमणगंगा, वाल, वैतरणा व भीमा या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी काही नद्या जिल्ह्यांच्या किंवा राज्याच्या सीमेवरून काही अंतर वाहतात. त्या तीव्र उताराच्या आणि बऱ्याच लहान आहेत.

तापीच्या खोऱ्यातून ईशान्य दिशेस वाहणाऱ्या नद्यांत गिरणा व बोरी या नद्या प्रमुख आहेत व त्या स्वतंत्रपणे तापीस मिळतात. गिरणा नदी सह्याद्रीमध्ये हातगडपासून 8 किमी. नैऋत्येस, चेराई गावाच्या दक्षिणेस उगम पावते व कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यांतून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात शिरते.

नासिक जिल्ह्यात गिरणेस तांबडी, पुनंद, आराम, मोसम वपांझण या प्रमुख उपनद्या मिळतात. मन्याड ही गिरणेची उपनदी या जिल्ह्यात उगम पावते आणि गिरणेस जळगाव जिल्ह्यात मिळते. दारणेस वाकी, उंदुलोह व वालदेवी या प्रमुख उपनद्या मिळतात व त्यांसह दारणा निफाड तालुक्यात गोदावरीस मिळते.

वनक्षेत्र, वनस्पती व प्राणी :

नाशिक जिल्ह्यातील एकूण क्षेत्रफळापैकी 22.13% भागावर वन प्रदेश असून त्याचे क्षेत्रफळ 3,446.28 चौरस किमी. आहे. त्यापैकी 2,920.07 चौरस किमी. जंगले राखीव आहेत व 245.45 चौरस किमी जमला संरक्षित आहेत. या भागात पाऊस भरपूर व प्रदेश दुर्गम असल्यामुळे लोकसंख्या खूप कमी आहे.

त्यामुळे जंगले अधिक प्रमाणात वाढली आहेत व टिकून आहेत. साग ही प्रमुख महत्त्वाची वनस्पती असून सालई, ऐन, बांबू, हळदू, कळंब, शिसवी, खैर, तिवस, हिरडा, बाभूळ, बिबळा, धावडा, आंबा, जांभूळ, मोहवा ह्या महत्त्वाच्या अन्य वनस्पती आहेत. सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील भागात साद, सादडा, काकड, सालई, मोदल, ह्या प्रमुख वनस्पती आहेत.

पूर्वेकडील जास्त वस्तीच्या प्रदेशात खुरटी झुडुपे, काटेरी झाडे असून सालई, धावडा आणि बाभूळ ही इंधनोपयोगी महत्त्वाची झाडे आहेत. काही भागांत अंजन, खैर व तुरळक ठिकाणी चंदनाचीही झाडे आहेत. रोशा गवत, हिरडे व विडीची पाने ही महत्त्वाची अन्य उत्पादने आहेत.

नाशिक या जिल्ह्यातील जंगलात वाघ, चित्ता, रानडुक्कर, अस्वल, सांबर यांसारखे हिंस्त्र प्राणी, तसेच नीलगाय, चितळ, भेकर इ. प्राणी 1880 पूर्वी विपुल होते

पण जंगले विरळ झाल्याने व बेबंद शिकारीमुळे आज बिबळ्या, लांडगा, खोकड, तरस, सांबर, माकड, मुंगूस, धार्डिया (भुंकणारे हरिण), रानडुक्कर, कोल्हा हेच प्राणी मुख्यतः आढळतात. काळवीट, चिंकारा, चौशिंगा व नीलगाय हे क्वचित आढळतात.

शेती व उद्योग :

नाशिकमध्ये कांदा, द्राक्ष, डाळिंब, बाजरी, ज्वारी, हरभरा, मका, गहू, ऊस, पेरू, कापूस, भात, नाचणी, वरई, मूग, मठ, कुळीद, उडीद, तूर, फूलशेती याशिवाय भाजीपालाही मोठ्या प्रमाणात घेतला जातो. कांदा, द्राक्ष व टोमॅटो निर्यातही केले जाते.

जिल्ह्यात मालेगाव व येवले ही हातमाग कापडउद्योग केंद्रे असून तेथे सुती आणि रेशमी कापड, लुगडी, जरीच्या पैठण्या, पितांबर इ. विणले जातात.

ओझरजवळच किर्लोस्कर कंपनीचा ट्रॅक्टरचा कारखाना आहे. पिंपळगाव बसवंतजवळ द्राक्षापासून ‘पिबोला’पेये बनविण्याचा कारखाना आहे. विड्या वळण्याचा कुटीरोद्योगही महत्त्वाचा असून त्यात सु.7,000 लोकांस रोजगार मिळत असे.

वाहतूक व्यवस्था :

नाशिक जिल्ह्यातील आंतरराज्य वाहतुकीची मक्तेदारी राज्यमार्ग-परिवहन महामंडळाकडेच आहे. 1972-73 साली जिल्ह्यात 414 मार्गांवर वाहतूक चाले त्यांची एकूण लांबी 19,301 किमी. होती.

त्यासाठी 332 बसगाड्या वापरल्या जात व दररोज सरासरी 1,20,757 प्रवासी प्रवास करीत असत. नासिक येथे सर्व सोईंनी युक्त बसस्थानक असून इतरत्र 21 ठिकाणी बसथांबे आहेत.

भाषा :

जिल्ह्यातील 87.7% लोक मराठी भाषिक असून त्याखालोखाल उर्दू व हिंदी भाषिक होते. शिवाय अल्प प्रमाणात गुजराती, कानडी, तमिळ, तेलुगू, पंजाबी व इतर भाषा बोलणारे लोक होते.

समाज :

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी, नासिक या तालुक्यांत आदिवासी जास्त होते, तर येवले तालुक्यात ते सर्वांत कमी 8,200 होते. नांदगाव, चांदवड, सिन्नर या अन्य तालुक्यांत त्यांची संख्या कमी होती. आदिवासींमध्ये महादेव कोळी संख्येने सर्वांत जास्त होते व त्याखालोखाल कोकणा, भिल्ल संख्येने जास्त होते.

एकूण आदिवासींपैकी 90% आदिवासी महादेव कोळी, कोकणा, भिल्ल हेच होते. शिवाय बारली, ठाकूर, गोंड, काथोडी हे आदिवासी काही प्रमाणात आहेत. आदिवासींचे वैशाखात ‘अरवाजा’, आश्विनात ‘वाघ वारशी’ व फाल्गुनात ‘शिमगा’ हे महत्त्वाचे सण आहेत. तसेच कुस्ती, कबड्डी, खोखो इ. खेळ जिल्ह्यात लोकप्रिय आहेत.

नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळे :

श्री त्रंबकेश्वर शिव ज्योतिर्लिंग मंदिर :

त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर नाशिक पासून 28 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

रामकुंड :

रामकुंड नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात आहे. ते मध्यवर्ती बसस्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे.

श्री सोमेश्वर मंदिर  :

हे मंदिर नाशिक मध्यवर्ती बसस्थानकापासून 8 किलोमीटर अंतरावर गंगापूर रस्त्यावर आहे.

श्री सप्तशृंगी गड :

सप्तशृंगी गड नाशिक पासून  60 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे.

दूध सागर धबधबा :

नाशिक पासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावरील सोमेश्वर येथे आहे.

दुगारवाडी धबधबा :

त्रंबकेश्वर जवळ रोडवर त्रंबकेश्वर पासून 10 किलोमीटर अंतरावर दुगारवाडी धबधबा आहे.

पांडवलेणी :

नाशिक नवीन बस स्थानकापासून 5 किलोमीटर व महामार्ग बस स्थानकापासून 4 किलोमीटर अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

1 thought on “नाशिक जिल्ह्याची संपूर्ण माहिती Nashik District Information In Marathi”

Leave a Comment