गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gadchiroli District Information In Marathi

Gadchiroli District Information In Marathi महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा हा आदिवासी, मागासलेला, डोंगरदऱ्यांनी व घनदाट जंगलाने व्याप्त असून अविकसित समजला जातो. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. तर चला मग पाहूया या जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती.

Gadchiroli District Information In Marathi

गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gadchiroli District Information In Marathi

संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रम्हपुरी ऐवजी स्वतंत्र गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला.

क्षेत्रफळ विस्तार :

गडचिरोली या जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ 14,412 वर्ग कि.मी. असून ग्रामीण 14,336.76 वर्ग कि.मी आणि शहरी 24 वर्ग कि.मी. आहे. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र पश्चिम ईशान्येला आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमा त्याला लागू आहेत.  हा जिल्हा नक्षल जिल्हा ओळखला.  जिल्हा थेट 76% जंगलाने व्यापलेला घनदाट जंगलात नक्सल लोक आश्रय घेतात.

लोकसंख्या :

जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी 38% लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची असल्याने हा जिल्हा महाराष्ट्रातला आदिवासी जिल्हा समजला जातो. जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या 1,08,824 एवढी असून तिची एकूण टक्केवारी 11.2 होते. आदिवासी जमातींच्या लोकांची संख्या 3,71,696 एवढी असून त्यांचे प्रमाण जिल्ह्यात जास्त आहे.

त्यांची टक्केवारी 38.30% एवढी आहे. अनुसूचित जमातीमध्ये मुख्यत्वे गोंड, कोलाम, माडिया, परधान इत्यादी जमातीचे लोक आहेत. त्यांच्या बोलीभाषा गोंडी, माडिया ह्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये यांशिवाय मराठी, हिंदी, तेलुगू, बंगाली व छत्तीसगडी इत्यादी भाषा बोलल्या जातात.

तालुके :

गडचिरोली, आहेरी, आरमोरी, भामरागड, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, एटापल्ली, कोर्ची, कुरखेडा, मुलचेरा, सिरोंचा.

दळणवळण व्यवस्था :

या जिल्ह्यात सर्वात मोठे आव्हान होते ते दळणवळण सुविधा निर्माण करण्याचे. पावसाळ्यात अनेक भागांचा संपर्क तुटल्याचे चित्र आज आपण बघतो. जिल्ह्याची स्थापना झाली त्यावेळी तर पूर्ण जिल्ह्याचा राज्याशी संपर्क तुटलेला सर्वांनी अनुभवला.

याखेरीज अंतर्गत संपर्काची समस्या निराळीच होती. दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात दळणवळण साधनं व सुविधांवर भर देण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग घोषित केले.

यासोबतच सिरोंचा येथे गोदावरी नदीवरील पुलावरुन वाहतूक सुरु झाल्यामुळे तेलंगाना-महाराष्ट्र आंतरराज्य वाहतुकीची पहाट उजाडली. यासोबतच पातागुडम येथील पुलाच्या कामाला गती देण्यात आली आहे.

यामुळे महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगाना असा आंतरराज्य संपर्क खुला होईल. याचा सर्वाधिक फायदा सिरोंचा तालुक्याला होईल. जिल्ह्यात उत्तर भागात तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या वडसा इथे रेल्वे स्थानक आहे. जिल्ह्यात एकूण रेल्वेमार्ग 16 कि.मी. इतकाच आहे.

इतिहास :

फार प्राचीन काळी ह्या राष्टकूट प्रदेश राज्य होते.  चालू चालुक्य वंशाचे व नंतर देवगिरीचे यादवांचे राज्य आले.  यानंतर गड चिरोलीवर गोंड राजे राज्य केले.  तेराव्या प्रतिबंधात, खंडक्या बल्लाळ शाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली.  त्यांनी आपली राजधानी मूळपूर चंद्रपूर येथे हलविली.

चंद्रपूर प्रदेश हा मराठीत खाली आला. 1853 मध्ये, बेरार हा चंद्रपूर प्रदेशाचा भाग ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या आला.  1854 मध्ये चंद्रपूर हा बेरा या प्रदेशमधला स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला.  ब्रिटीश 1905 मध्ये चंद्रपूर व ह्मणपुरी जमीनदारी व मजबूती करून गड्चिरोली तालुकाची मागणी केली.

राज्याची पुनर्रचना हा भाग 1956 पर्यंत केंद्रीय अधिपत्याखाली होता.  तत्पूर्वी राज्यपुर्व स्थानानुसार चंद्रपूर बॉम्ब स्टेट समाविष्ट करण्यात आले. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण, त्यांत चंद्रपूर हा जिल्हा समाविष्ट झाला.  गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला.

लोकजीवन :

जिल्ह्यातील आदिवासीची विशिष्ट अशी संस्कृती आहे. येथील आदिवासी लोकांचे “पेरसा पेन” हे दैवत आहे. ही लोक शुभकार्यप्रसंगी किवा पिकांचे उत्पादन झाल्यावर रेला नावाचे नृत्य करून आनंद व्यक्त करतात.

ढोल हे सुद्धा त्यांचे आवडीचे नृत्य आहे. होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे मुख्य सण आहेत. आदिवासी जमात ही मुख्यतः जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वास्तव्य करून आहे. जिल्ह्यातील इतर जातीतील लोक त्यांचे गणपती, दसरा, दिवाळी, होळी इत्यादी सण साजरे करतात.

जिल्ह्याच्या काही भागात झाडीपट्टीतील प्रसिद्ध “नाटक, तमाशा” इत्यादी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे दिवाळी ते होळी या कालावधीत झाडीपट्टीतील भागात आयोजन केल्या जाते. या मुळे झाडीपट्टी नाटकासाठी वडसा हे तालुका ठिकाण प्रसिद्ध आहे. गणपती, दसरा, होळी या सणाचे वेळी तसेच शंकरपटाच्या निमित्ताने आयोजन होते.

प्रमुख नद्या व धरणे :

जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम सीमेवर, सिरोंचा जवळ, गोदावरी नदी जिल्ह्यात प्रवेश करते आणि जिल्ह्याच्या दक्षिणेकडील सीमेवर सुमारे 50 किलोमीटर पूर्वेकडे वाहते. इंद्रावतीचा संगम झाल्यानंतर दक्षिण-पूर्व कोनातून गोदावरी दक्षिणकडे आंध्र प्रदेशकडे वळते.

वैनगंगा नदीच्या प्रवाहाद्वारे 225 कि.मी.एवढे अंतर पश्चिम दिशेने सीमा तयार केली आहे, जी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करते. खोब्रागडी, कठाणी आणि मिरगॅडोला या नद्या मोठ्या उपनद्या म्हणून वाहतात.

वैनगंगा आणि वर्धा नद्यांच्या संगमाद्वारे बनविलेल्या प्राणहिता नदी 190 किमी पर्यंत दक्षिण-पश्चिम सीमारेषा तयार करते जी गोदावरी संगमाशी भेटत नाही. दीना नदी ही मुख्य उपनदी आहे.

इंद्रावती नदी भामरागड तालुक्यात कोवंडेजवळील महाराष्ट्रात प्रवेश करते आणि गोदावरीत प्रवेश करण्यापूर्वी 120 किमी अंतरावर दक्षिण-पूर्व सीमारेषा तयार करते. पर्लकोटा, पामुलगौतम आणि बंदिया या प्रमुख उपनद्यांची आहेत.

सिरोंचा येथे वैनगंगा नदीसह गोदावरी नदीचे संगम. गोदावरी आणि इंद्रावती नदीचे सोमनूर येथे संगम व चमोर्शी तालुक्यात चपराला जवळ वर्धा आणि प्राणहिता नदीचे संगम. भामरागड येथे पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती (त्रिवेणी संगम) नदीचे त्रिवेणी संगम आहे.

धरणे :

सद्यस्थितीत खोब्रागडी नदीवर केंद्र सरकारकडून केवळ एक प्रमुख धरण प्रकल्प तुलतुली प्रस्तावित केला आहे आणि काम पूर्णपणे झालेले नाही. याशिवाय 11 मध्यम धरण प्रकल्प प्रस्तावित आहेत. पण काम पूर्ण झालेले नाही.

व्यवसाय :

हा जिल्हा बांबूची झाडे व तेंदूपानांकरिता प्रसिद्ध आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती असून भात हे जिल्ह्याचे मुख्य पीक आहे. याव्यतिरिक्त तूर, गहू, ज्वारी, सोयाबीन, जवस इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात.

  • भगतसिंग चे महान सुविचार

उद्योग :

जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिलचा कारखाना असून इतर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. यामुळे, जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरण्यांची संख्या जास्त आहे.

भातसडीचे उद्योग व कागद कारखाने जिल्ह्यात आहेत पण मोठे उद्योग नाहीत. जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होत असून कोसा उत्पादन केंद्र आरमोरी येथे आहे. जिल्ह्यात फक्त 18.5 कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथे रेल्वेचे स्टेशन आहे.

खनिज, संपत्ती :

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लोह-खनिज साठे आहेत. या लोहखनिजातून तयार लोहापासून ऑटोमोबाईल उद्योगास जो आवश्यक दर्जा आहे त्या दर्जाचे उत्पादन शक्य आहे. सुरजागड येथे लोह-खनिज प्रकल्प सुरु करण्यास आरंभी विरोध झाला असला तरी स्थानिकांना यात रोजगार मिळणार याची खात्री पटल्यावर या प्रकल्पाचा मार्ग खुला झाला.

पर्यटन स्थळ :

गडचिरोली जिल्ह्यात निसर्गरम्य वातावरणामुळे हे धार्मिक स्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. वर्षभर भाविकांची गर्दी असते. गुढीपाडव्याला येथे मोठी यात्रा भरत असल्याने दूरवरुन भाविक येथे दर्शनासाठी येतात.  गडचिरोलीतील बरेच पर्यटनस्थळ जगासमोर येऊ शकले नाही. विदर्भातील नंदनवन म्हणून ओळख असलेल्या चिखलदरा प्रमाणेच गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा मुतनूर येथे हिल स्टेशन आहे.

मार्कंडा,  चपराळा, आलापल्ली, वैरागड, हेमलकसा, कामलापूर. गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील मार्कंडाचे ऐतिहासिक शिवमंदिर व चप्राळा येथील हनुमान मंदिर ही प्रसिद्ध मंदिरे आहेत. कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथून 10 किमी. अंतरावर खोब्रामेंढा देवस्थान असून तेथे खूप मोठी मारुतीची मूर्ती आहे.

ही माहिती तुम्हाला कसे वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment