वाशिम जिल्ह्याची संपूर्ण माहिती Washim District Information In Marathi

Washim District Information In Marathi वाशिम हा एक महाराष्ट्रातील जिल्हा आहे. 1998 मध्ये अकोला जिल्ह्यातून वेगळा झालेला वाशिम जिल्हा विदर्भातील अनेक जिल्ह्यापैकी एक महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा निर्माण करण्यात आला. वाशिमचे पुरातन नाव वत्सगुल्म असे होते.चला तर मित्रांनो जाणून घेऊया वाशिम या जिल्ह्या विषयी सविस्तर माहिती.

Washim District Information In Marathi

वाशिम जिल्ह्याची संपूर्ण माहिती Washim District Information In Marathi

वस्त ऋषीच्या नावावरून हे नाव आले होते. काही अवशेषावरून वाकाटक साम्राज्याचे संदर्भात, वाशिम सोबत जोडला आहे. या जिल्ह्यातील बराचसा भाग डोंगराळ व पठारी आहे. पैनगंगा ही वाशिम जिल्ह्याचे मुख्य नदी आहे. तर दक्षिणेकडील भाग सकल प्रदेशाचा आहे.

क्षेत्रफळ व विस्तार :

वाशिम जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,150 चौरस किलोमीटर एवढे आहे. वाशीम या जिल्ह्याच्या सीमेला लागून उत्तरेस अकोला व अमरावती जिल्हा आहे. तर दक्षिणेस यवतमाळ व हिंगोली जिल्हा असून पूर्वेस यवतमाळ आणि पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे. वाशीम, जिल्ह्यामध्ये एकूण सहा तालुके आहेत. या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण वाशिम आहे. पैनगंगा ही या जिल्ह्याची प्रमुख नदी आहे.

लोकसंख्या:

वाशिम जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 11,96,714 एवढी आहे. येथे 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 943 आहे. साक्षरतेचे प्रमाण 83.25% आहे. लिंग गुणोत्तर प्रमाण 1.07% आहे. या जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे जाती व जमातीचे लोक राहतात. वाशिम जिल्ह्यामध्ये आंध, गोंड, आणि बंजारा, या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

येथे प्रामुख्याने मराठी बंजारा व हिंदी भाषा बोलल्या जातात. सर्व जाती, धर्माच्या दृष्टीकोनातून धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला हा जिल्हा जैन धर्मियांची काशी म्हणून ओळखला जातो.

हवामान :

वाशिम जिल्ह्यातील हवामान हे उन्हाळ्यात उष्ण व कोरडे असते. तर हिवाळ्यात थंड असते. वाशिम जिल्ह्यातील वार्षिक पर्जन्यमान 750 मिलिमीटर एवढा असतो. या जिल्ह्यामध्ये जून ते जुलै या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. येथील उन्हाळ्यातील वातावरण 37°से ते 40°से.वर जाते.

व्यवसाय व उद्योग :

वाशिम जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. येथील मुख्य पिके सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर व कापूस, ऊस, हळद, ही आहेत. जास्तीत जास्त या जिल्ह्यातील लोकांचे जीवन हे शेती व्यवसायावर अवलंबून आहे.

काही भागात आपल्याला काळी सुपीक मृदा आढळून येते. जिथे डोंगरी भाग आहे किंवा पठारी भागा आहे तिथे मात्र मध्यम प्रतिची मृदा आढळते. कापूस, हे या जिल्ह्यातील मुख्य पीक असून कापसावर आधारित अनेक येथे आहेत.

या जिल्ह्यात हात कामावर कापड विणण्याचा व्यवसाय फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. चरख्यावर सूत कातून खादीचे कापड विणण्याचा व्यवसाय मंगरूळ तालुक्यात केला जातो. कारंजा, तालुक्यातील अडाण प्रकल्प हा जिल्ह्यातील मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. याशिवाय जिल्ह्यात कातडी वस्तू बनवणे, लाकडी सामान व खेळणी बनवणे.

नायलॉन दोरी तयार करणे, तसेच रेशमी निर्मिती दाळ मिक्स तेल गाळणे सिलेंडर गॅस भरण्याचा प्रकल्प रासायनिक खताचा प्रकल्प या जिल्हा मध्ये केला जातो. जिल्ह्यातील जवळच्या सर्व तालुक्यात जिनिंग प्रेसिंग उद्योग केला जातो.

इतिहास :

वाशीम या जिल्ह्याचा इतिहास खूप प्राचीन आहे. वाशिमचे प्राचीन नाव वत्सगुल्म व वात्सुलग्राम आहे. यास बच्छोम, बासम असेही म्हणतात. इ स. पूर्व सुमारे 300 पासून येथे  सातवाहन या राजवंशाची सत्ता होती.

प्राचीन विदर्भात प्रशासकीय सोयीसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या होत्या. ऐक म्हणजे वाशीम व दोन म्हणजे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील नंदिवर्धन सध्याचे नगरधन.

वाशिम येथे वाकाटकांची राजधानी होती. वाकाटकांचे साहित्यातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या काळात ‘वत्सगुल्म’च्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे होती. आजही वाशीमचा बालाजी प्रसिद्ध आहे. येथे पद्मतीर्थ नावाचे तीर्थस्थानही आहे. त्यानंतर चालुक्यांचे राज्य आले.

त्यांनी आपली राजधानी दुसऱ्या ठिकाणी नेली. त्यामुळे या शहराचे महत्त्व कमी झाले. त्यानंतर आलेल्या यादवांच्या राजवटीत पुन्हा या स्थानाचे महत्त्व वाढू लागले.

वाशिम येथे निजामाची टाकसाळ होती. त्यानंतर इंग्रजांच्या राज्यात वऱ्हाड हा मुलूख आल्यावर त्यांनी वाशिमला जिल्ह्याचे ठिकाण केले. परंतु महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या 1905 मध्ये झालेल्या पुनर्रचनेत हा भाग नजीकच्या अकोला जिल्ह्यास जोडण्यात आला. त्यानंतर 26 जानेवारी 1998 मध्ये पुन्हा वाशिम हा जिल्हा घोषित करण्यात आला.

मुगल काळात सन 1530 ते 1757 मध्ये हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारित होते. पुढे मराठे, पेशवे आदी सत्तांनी हा भाग ताब्यात ठेवला.
वाकाटक नृपती दुसरा विंध्यशक्ती याचा ताम्रपट 1939 साली सापडल्यानंतर वाशिम पुन्हा प्रकाशझोतात आले.

हा ताम्रपट ‘वत्सगुल्म’ येथून राजाच्या 37 व्या राज्यवर्धापनवर्षी देण्यात आला होता. वत्सगुल्म, म्हणजेच वाशिम, ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाकाटकांच्या पश्चिम शाखेची राजधानी होती.

जिल्ह्यातील तालुके :

वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण सहा तालुके आहेत. वाशिम, मालेगाव, शिरोड, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, हे सहा तालुके आहेत. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण वाशिम असून येथे मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे. या तालुक्या मध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळ आहेत.

लोकजीवन:

या जिल्हातील सर्वात जास्त लोक हे शेती वर अवलंबून आहे. शेती, हा येथील मुख्य व्यवसाय आहे. तसचं या शहराची लोकसंख्या 62,863 एवढी आहे. या जिल्हा चे वैशिष्ट म्हणजे इथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात. येथील मुख्य बोली भाषा ही मराठी, असून हिंदी, आदिवासी, इतर भाषा बोलला जातात अशा प्रकारचे वाशीम जिल्हातील लोकजीवन आहे.

नद्या व धरणे:

पैनगंगा नदी, ही जिल्हाची प्रमुख नदी आहे. तर कास नदी, अरुणावती नदी, बेंबळा नदी, अराण नदी आणि काटेपूर्णा नदी या काही या जिल्ह्यातील महत्वाच्या नद्या आहेत. वाशिम जिल्ह्यात एकूण 4 धरणे आहेत. यात एकबुर्जी धरण, अदण धरण, अडोल धरण, सोनल धरण आणि वाठोड जलाशय यांचा समावेश होतो.

या धरणा चा मोठया प्रमाणात उपयोग या जिल्हातील लोकांना होतो. वाशिम जिल्ह्यात गणेशपुर, उमरी व सावरगाव तसेच बोरगाव, कळंबा, चिखली, रिसोड, धानोरा हे काही तलाव देखील आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात जलाशय उपलब्ध आहे. नद्या व विहिंरीद्वारे, केल्या जाणार्‍या जलसिंचनाचे प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे.

पर्यटन स्थळ :

वाशिममध्ये रिसोड तालूक्यामध्ये ऋषिवट येथे श्री पिंगलाक्षी देवीचे सुंदर मंदिर प्रसिध्द आहे. एका तळ्याच्या शेजारी हे मंदिर आहे.
तांदळा, स्वरूपात असलेली ही देवी भक्तांच्या नवसाला पावते असे हे भक्त सांगतात तसेच वाशीम या जिल्ह्यामध्ये पद्मावती तलाव, तसेच मध्येश्वर मंदिर आणि बालाजी मंदिर, खूप प्रसिद्ध आहे.

वाशीम जिल्हा, मध्ये गणपती बाप्पा आणि पार्वती माता यांचे एकाच ठिकाणी असलेले हे एकमेव मंदिर आहे. जे खूप लोकप्रिय स्थळ आहे. तन्हाळा या गावात पठाण लोकांचे पवित्र स्थळ मंदिर प्रसिद्ध आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा या तालुक्यात नरसिंह सरस्वती चे जन्मस्थान आहे. येथील जैन मंदिर खूप प्रेक्षणिय आहे. येथे मोठ्या प्रमाणात लोक जात असतात.

शिरोडा, गावामध्ये अमरदासबाबांची मंदिर प्रसिद्ध आहे. मानोरा, तालुक्यात श्री क्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजातील लोकांनासाठी काशी म्हणून प्रसिद्ध आहे.

इथे जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. सेवालाल महाराज, हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत. वेदांग, ज्योतिषाकरता श्रीलंका ते मेरूपर्वतपर्यंत एक रेषा कल्पकतेने आखलेली होती. त्याच्या अगदी मध्यभागी ऋषींनी मध्यमेश्वराची स्थापना केली.

या ठिकाणी मध्यमेश्वराचे खूप मोठे शिवालय होते. मुघली आक्रमणात मंदिर नष्ट झाले. पण तसे काही अवशेष आता सापडले आहे. त्यामुळे पुन्हा मध्यमेश्वराची स्थापना केली.कारंजा सोहोळ येथील हे अभयारण्य काळवीट प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment