Chandrapur District Information In Marathi चंद्रपूर जिल्हा हा नागपूर विभागातील महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात आहे आणि ‘विदर्भ’ या भागाचा पूर्व भाग बनतो. हा महाराष्ट्र राज्याचा पूर्वेकडील जिल्हा आहे. तर चला मग पाहूया चंद्रपूर या जिल्ह्या विषयी माहिती.
चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Chandrapur District Information In Marathi
गोंड राजाच्या काळात हा जिल्हा ‘चांदा’ या नावाने ओळखला जात असे. त्याआधी चंद्रपूर हा जिल्हा लोकापुरा व त्यानंतर इंद्रपूर या नावांनी ओळखला जात असे. सन 1964 मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले. सन 1982 पर्यंत हा जिल्हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. सन 1982 मध्ये या जिल्ह्याचा काही भाग वेगळा करून गडचिरोली हा वेगळा जिल्हा निर्माण करण्यात आला.
क्षेत्रफळ व विस्तार :
जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,490 चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या 20,71,101 इतकी आहे. मराठी भाषेबरोबरच गोंडी, कोलामी व हिंदी भाषा या भाषा देखिल प्रचलीत आहेत.
जिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा व वर्धा जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस गडचिरोली जिल्हा, दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश) आहे. हा जिल्हा वैनगंगा व वर्धा नदीच्या पात्रांदरम्यान वसला आहे, ह्या त्या जिल्ह्याच्या पूर्व व पश्चिम सीमा बनतात.
हवामान :
महाराष्ट्रातील अतिशय विषम हवामानाचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. मे-जून महिन्यांत येथील तपमान 45° से. असते, तर डिसेंबरमध्ये 8° से. असते. मुख्यतः नैर्ऋत्य मान्सूनपासून जिल्ह्याला पाऊस मिळतो.
गडचिरोली, सिरोंचा, ब्रह्मपूरी या तालुक्यांतील डोंगरांमुळे येथे सु. 152 सेंमी. पाऊस पडतो, तर चंद्रपूर-राजुरा तालुक्यांत 130 सेंमी. व पश्चिमेकडे 114 सेंमी. पाऊस पडतो. जिल्ह्याचे हवामान उष्ण असून मुख्यत: तीन ऋतु आहेत. उन्हाळा पावसाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो.
चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके :
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण सहा तालुके आहे.
ब्रह्मपुरी, वरोडा, गडचिरोली, चंद्रपूर, राजुरा आणि सिरोंचा अशी त्यांची नावे आहेत. महाराष्ट्राच्या 8.53 % क्षेत्रफळ व 3.2 % लोकसंख्या या जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण चंद्रपूर आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास :
चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासाविषयी बोलायचं झालं तर पूर्वी हिंदू आणि बौद्ध राजांनी या प्रदेशावर बराच काळ राज्य केले. 1854 मध्ये चंद्रपूरने स्वतंत्र जिल्हा स्थापन केला आणि 1874 मध्ये मूल, वरोरा आणि ब्रम्हपुरी या तीन तहसीलांचा समावेश करण्यात आला.
1905 मध्ये ब्रम्हपुरी व चंद्रपूर तहसीलमधून जमींदारी वसाहत हस्तांतरित करून गडचिरोली येथील मुख्यालय असलेली नवीन तहसील तयार केली गेली.
1907 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एक लहान जमींदारी मार्ग नव्याने निर्माण झालेल्या जिल्ह्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर मध्य प्रांत हे मध्य प्रदेशचे नवे भारतीय राज्य बनले. 1911 ते 1955 दरम्यान जिल्ह्याच्या हद्दीत किंवा त्याच्या तहसीलांमध्ये कोणतेही मोठे बदल झाले नाहीत.
मात्र 1956 मध्ये, राज्यांच्या भाषिक पुनर्रचनेच्या काळात चंद्रपूर जिल्हा मराठी भाषिकांचा जिल्हा मध्य प्रदेशातून बॉम्बे राज्याचा भाग होण्यासाठी बदलण्यात आला. हैदराबाद राज्यातील आदिलाबाद जिल्ह्याचा एक भाग असलेल्या राजुरा तहसीलची नांदेड जिल्ह्यात बदली झाली आणि त्यानंतर 1959 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा बदली झाली.
त्यानंतर मे 1960 मध्ये चंद्रपूर जिल्हा निर्मिती झाल्यापासून हा जिल्हा महाराष्ट्राचा भाग झाला. प्रशासकीय ओझे कमी करण्यासाठी 1981 मध्ये जिल्हा पुन्हा चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये विभागला गेला. चंद्रपूर जिल्ह्यात आता चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मूल, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सावली, राजुरा, कोरपना, जिवती आणि बल्हारपूर तहसील आहेत.
प्रमुख नद्या व धरणे :
चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी या प्रमुख नद्या आहेत. वर्धा नदीला वैनगंगा व एराई नद्या मिळतात. त्यानंतर तिला प्राणहिता नाव मिळाले आहे. प्राणहिता पुढे सिरोंचाजवळ गोदावरीला मिळते. जिल्ह्याच्या आग्नेय सीमेवर इंद्रावती गोदावरीस मिळते.
वैनगंगा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते, ती जिल्ह्याचे दोन विषम भाग करते. या जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात आसोलामेंढा, नागभीड तालुक्यात नळेश्वर व घोडेझरी व तसेच राजुरा तालुक्यात अमलनाला येथे धरणे आहेत.
तलावाच्या बाबतीत या जिल्ह्याचा भंडारा जिल्ह्यानंतर दुसरा क्रमांक लागतो. या जिल्ह्यात ताडोबा हा सर्वात मोठा तलाव असून, घोडेझरी तलाव व आसोलामेंढा तलाव प्रसिद्ध आहेत.
वाहतूक :
चंद्रपूर जिल्ह्यातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नाही. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून दिल्ली-चेन्नई हा लोहमार्ग जातो. या चंद्रपूर, नागभीड, तडळी व मांजरी ही रेल्वेस्थानके आहेत.
वनस्पती व प्राणी :
महाराष्ट्रातील जंगलांपैकी 20% जंगल या जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा 56% भाग जंगलयुक्त असून त्यापैकी 31% राखीव आणि 59% संरक्षित आहे. साग, बिजा, ऐन, धावडा, हळदू, कळंब, शिसवे, अंजन, सेमल, मोवई, सेलाई इ. महत्त्वाची झाडे या जंगलांतून आढळतात.
दारूसाठी व खाण्याकरिता मोहाची फळे व फुले, विड्यासाठी तेंदूची पाने गोंदासाठी कडई व धावडा लाखेसाठी पळस कातासाठी खैर कातडी कमाविण्यासाठी हेरा, हिरडा, बेहडा कागदासाठी बांबू काड्यापेट्यांसाठी सेमल लाकडी खोक्यांसाठी मोवई व सेलाई इमारती लाकडांसाठी कळंब आणि मिरा अशी महत्त्वाची जंगल उत्पन्ने जिल्ह्यात होतात.
चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्गरम्य आजचे वातावरण जंगले लाभल्यामुळे शासनाने ताडोबा तलावाजवळ 116 चौ.किमी.चे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे अभयारण्य निर्माण केले असून, पर्यटकांना आवश्यक अशा सोई येथे केल्या आहेत.
पट्ट्यांचे वाघ, चित्ता, हरिण, अस्वल, नीलगाय, गवा, काळवीट, लांडगा, कोल्हा, तरस वगैरे वन्य पशू सरपटणारे प्राणी आणि अनेक प्रकारचे पक्षी जिल्ह्यात आढळतात. नद्या व सरोवरांत अनेक जातींचे मासे मिळतात.
शेती व उद्योग
शेती हा या जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे. भात (धान), ज्वारी, तूर आणि कापूस ही खरीपातील प्रमुख पिके तर गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील प्रमुख पिके होत. जिल्ह्यात बाजरी, डाळी, ऊस, भुईमूग, तीळ, जवस, तंबाखू, मिरची, हळद इ. पिके होतात.
घुगुस, तेलवासा, चंद्रपूर, बल्लारपूर, माजरी या भागातील कोळशाच्या अनेक खाणीं व्यतिरिक्त कागद, काच, मातीची भांडी आणि तेल तयार करणारे चार मोठे निर्मिती उद्योगधंदे जिल्ह्यात आहेत. लाकूड कापणे, भात सडणे, पोहे तयार करणे, विड्या, कापूस पिंजणी व दाबणी, कौले, साबण, अभियांत्रिकी कामे, काच, लाकूडकाम, बांबूकाम, बर्फ, हातमाग कापड इत्यांदीचे अनेक छोटे उद्योग जिल्ह्यात चालतात.
प्रेक्षणीय स्थळे :
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक निसर्गसुंदर डोळ्याचे पारणे फेडणारे असे पर्यटन स्थळे आहेत त्यामध्ये निसर्गसुंदर अरण्ये, वनराजीने वेष्ठिलेले तलाव, वन्य श्वापदे, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले आदिवासी यांमुळे चंद्रपूर जिल्ह्याला आगळे महत्त्व आहे.
ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान ताडोबा तलावाकाठी असून, त्यात अनेकविध वन्य श्वापदांचे निरीक्षण करता येते. चंद्रपूर-नागभीड रस्त्यावरील आसोलमेंढा, घोडाझरी यांसारखे विस्तीर्ण वनराजीने वेष्ठिलेले तलाव असून तीन राज्यांच्या सरहद्दींवर भामरागड, सोमनूर ही निसर्गसुंदर गिरिस्थाने आहेत.
मुल-चार्मोशी मार्गावर मार्कंडा देव येथे हेमाडपंथी शिल्पातील कलाकुसरपूर्ण शिवाचे मंदिर आहे. चंद्रपूर व बल्लारपूर या गोंड राजांच्या राजधान्या असल्याने तेथील प्राचीन वास्तू प्रसिद्ध आहेत.
चंद्रपूर जवळील भद्रावती हे जैनांचे तीर्थस्थान असून येथील प्राचीन इतिहास अद्याप पूर्ण उपलब्ध नाही. परंतु या सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बाबा आमटे यांनी सुरू केलेले वरोड्यापासून चार किमी. वरील आनंदवन हे महारोग्यांसाठी असलेले केंद्र होय.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Importance Of Cleanliness In Marathi
Essay On Save Electricity In Marathi
My Best Friend Essay In Marathi
My Country India Essay In Marathi