गोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gondia District Information In Marathi

Gondia District Information In Marathi गोंदिया हा पूर्वोत्तर विदर्भातील जिल्हा आहे. गोंदिया जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. गोंदिया जिल्ह्यातील भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही गोंदिया जिल्ह्याची  मुख्य नदी आहे.  गोंदिया जिल्ह्यात भाताचे पीक जास्त असल्याने जिल्ह्यात अनेक भात सडण्याचे कारखाने आहेत. तर चला मग पाहूया गोंदिया या जिल्ह्यात विषयी सविस्तर माहिती.

Gondia District Information In Marathi

गोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gondia District Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

गोंदिया जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,431 चौरस किमी. आहे. गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेस मध्यप्रदेश व पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. तसेच जिल्ह्याच्या दक्षिणेस गडचिरोली व पश्चिमेस भंडारा हे जिल्हा आहेत.

लोकसंख्या :

गोंदिया या जिल्‍हयाची एकूण लोकसंख्या 13,22,331 आहे. पुरुष स्‍ंख्‍या 6,62,509 आणि स्‍त्री संख्या 6,59,807 आहे. जिल्‍हयात अनुसूचित जाति लोकसंख्‍या 3,55,484 आणि अनुसूचित जमात लोकसंख्या 3,09,822 आहे. जिल्‍हयाचा साक्षरता दर 76.61% आहे.

संस्कृती :

जिल्ह्यातील आदिवासी समुदायाची स्वतःची संस्कृती आहे. ते ‘पर्सा पेन’ या देवाची उपासना करतात. ते शुभ प्रसंगी आणि नवीन पिके येतात तेव्हा ‘रेला’ हे नृत्य करतात. ‘रेला’ हे नृत्य आदिवासी समुदायात लोकप्रिय नृत्य आहे. ढोल नृत्य हे सुद्धा लोकप्रिय नृत्य आहे. आदिवासींचे मुख्य उत्सव होळी, दशहरा आणि दिवाळी हे मुख्य उत्सव आहेत. आदिवासी घनदाट जंगलात राहतात.

इतिहास :

प्राचीन काळी गोंदिया परिसर गोंडराजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग गोंद आणि लाख आणून गावात विकण्याचा होता.

त्यामुळे या शहराचे नाव गोंदिया पडले, असा उल्लेख इंग्रज काळात आर.व्ही. रसेल यांनी गॅझेटियरमध्ये केला आहे. त्या काळात आजसारखी राज्ये आणि त्यांच्या सीमाही नव्हत्या पण, ठरावीक अंतरावर बदलत जाणारी भाषा होती. त्यामुळे या शहराची ओळख शेजारी राज्यातील सावलीतच वाढत गेली. महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यापूर्वी हा परिसर सी.पी.ॲॅड बेरारमध्ये येत होते.

त्या काळापासूनच गोंदिया शहरचे संबंध शेजारच्या छत्तीसगड व मध्य प्रदेशशी वाढत गेले. ते आजतागायत सुरू आहेत. त्यामुळे या शहराला हिंदी भाषेने ग्रासले असून या शहराची ओळखही महाराष्ट्रातील हिंदीभाषक शहर म्हणूनच आजही कायम आहे.

गोंदियाला अतिप्राचीन अशा हिंदू, बौद्ध, जैन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. वनसंपदेमुळे तेंदूपत्ता संकलन व बिडी उद्योग हा भरभराटीस आलेला मुख्य व्यवसाय.

या शहराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, रोजगार व व्यापारासाठी आलेल्या समूहांना या शहराने कायम आपलेसे केले. त्यांना आश्रयही दिला. म्हणूनच आज या शहराच्या बहुतांश आर्थिक नाडय़ा याच स्थलांतरितांच्या हातात सामावलेल्या आहेत.

शहर छोटे आणि मनमिळाऊ संस्कृतीमुळेच या शहराला कधीही दंगलीचे गालबोट लागले नाही. मोहन महाराज पेढेवाले व लालजी भाईच्या समोस्याचे दुकान, नक्काभाई सोनी, धन्नालाल मोहनलाल तिवारी हे स्टीलचे दुकान, खिल्लुमल तालेवाला, दिल्ली हॉटेल हे एकेकाळी शहरातील प्रसिद्ध ठिकाणे होती. आज यासारखी दुकाने वाढली असली तरी त्यांची महिमा अजूनही जशीच्या तशीच असून ही दुकाने त्यांच्या वारसदारांच्या हाती आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील तालुके :

गोंदिया  जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. गोरेगाव, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, आमगाव, देवरी, गोंदिया, सडक अर्जुनी, सालेकसा.

प्रमुख नद्या व धरणे :

गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा, वाघ, बावनवडी, पांगोली, चुलबंद व गाढवी या नद्या आहेत. या जिल्ह्यात गाढवी नदीवर इटियाडोह हा सर्वात मोठा प्रकल्प व शरपूर, पुजारीटोला, कालिसराड ही धरणे आहेत. याशिवाय मानगड, संग्रामपूर, बोदलकसा इत्यादी ठिकाणी छोटी धरणे आहेत.

गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव असून, नवेगाव बांध हा या जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा तलाव आहे. तसेच माजागड, रेंगोपार, चुलबंद, उमरझरी, रिसपार, बोदलकसा, संग्रामपूर, खळबंदा, चोरखमारा इत्यादी छोटे-मोठे तलाव जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालतात.

रस्ते वाहतूक मार्ग :

मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या शहराजवळून जात असल्यामुळे दळणवळणाच्या पुष्कळ सोयी गोंदिया शहरात उपलब्ध झाल्या. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळत असली तरी अद्यापही हे शहर मागासलेलेच गणले जाते.

गोंदिया रेल्वे स्थानक मुंबई-हावडा मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन असून महाराष्ट्र एक्सप्रेस,  विदर्भ एक्सप्रेस इत्यादी गाड्या येथूनच सुरू होतात. गोंदियाजवळचे बिरसी येथील छोटे विमानतळ स्वातंत्र्यापूर्वीपासून कार्यरत होते.

इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी या धावपट्टीची बांधणी केली. मध्यंतरीच्या काळात, स्वातंत्र्यानंतर या धावपट्टीचा वापर बंद झाला होता. अलीकडे राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे बिरसी धावपट्टीचा विकास करून परीक्षणाचे काम शासनाने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे 1988 पासून 2005 पर्यंत सोपवले होते.

शेती व उद्योगधंदे :

गोंदिया जिल्ह्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गोंदिया जिल्हा हा तांदूळ उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्यात उत्पादित होणारा सुवर्णा, जया इत्यादी जातींचा तांदूळ परदेशात निर्यातही केला जातो.

गोंदिया जिल्ह्यात माडगी येथे मँगनीज शुद्धीकरण कारखाना, गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, मुंडिकोटा येथे धान गिरण्या आणि चंगेरी येथे कागद कारखाना आहे. गोंदिया जिल्ह्यात तलावांची संख्या जास्त असल्याने येथे मत्स्यशेती आणि गोड्या पाण्यातील मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. इटियाडोह व आंभोरा येथे मत्स्यबीज प्रजनन केंद्रे आहेत.

खनिज संपत्ती :

खनिज संपत्तीच्या दृष्टिकोनातून गोंदिया जिल्हा समृद्ध समजला जातो. येथे ग्रेनाईट, मँगनीज, लोह खनिज, क्रोमाईट, कायनाईट, क्वार्टझाईट, सिझियम, व्हॅनडियम ही खनिजे सापडतात.

वाहतूक :

या जिल्ह्याच्या मध्य भागातून हाजिरा, धुळे कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र.6 गेला आहे. तसेच या जिल्ह्यातून मध्य रेल्वेचा मुंबई-कोलकाता लोहमार्ग आणि गोंदिया-जबलपूर लोहमार्ग गेलेला आहे.

  • महात्मा गांधींचे जगप्रसिद्ध सुविचार

पर्यटन स्थळ :

नवेगाव राष्ट्रीय उद्यान :

हे उद्यान गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला वसलेले आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात स्थित असुन 133.78 चौ.कि.मी. क्षेत्रफळ आहे.
या राष्ट्रीय उद्यानात पक्ष्यांच्या 209 प्रजाती, सरपटनाऱ्या प्रणांच्या 9 प्रजाती आणि 26 सस्तन प्रजाती आहेत. यामध्ये वाघ, बिबट्या, जंगली मांजर, स्मॉल इंडिया सिव्हेट, पाम कॅव्हेट, लांडगा इ. यांचा समावेश आहे.

नागझिरा अभयारण्य :

नागझिरा अभयारण्य भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्याच्या मध्यात आहे. साकोलीपासून फक्त 22 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 बॉम्बे कलकत्ता वर आहे. जैव-विविधता संवर्धन या दृष्टिकोणातून देखील या अभयारण्याला अत्यंत महत्व आहे.

कचारगढ :

कचारगढ हे गोंदियापासून 55 कि.मी अंतरावर आहे. येथे प्रसिद्ध 25,000 वर्ष जुन्या नैसर्गिक गुहा असल्यामुळे पर्यटकांचे हे लोकप्रिय स्थळ आहे.

हाजरा फॉल :

गोंदिया जिल्ह्या पासुन हे सालेकसा तालुक्यात 50 किमी अंतरावर आहे. पावसाळ्यात पर्यटक येथील पाण्याच्या झऱ्याचा आनंद घेवु शकतात. सभोवताली घनदाट जंगल, हिरवी वनस्पती असुन हे चांगले कॅम्पिंग साइट सुद्दा आहे. दरेकसा रेल्वे स्थानका पासून फक्त 1 किमी अंतरावर आहे.

कामठा :

जिल्ह्यापासुन 15 किमी अंतरावर ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे. मागील शतकातील कामठा जमीनदारांचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

सूर्यदेव मांडो देवी :

मांडोदेवी आणि सूर्यदेव मंदिर हे जिल्ह्यापासून 26 किमी अंतरावर आहे. ‘मांडोदेवीचे मंदिरात नवरात्र उत्सव’ मध्ये भक्तांतर्फे पुजा केली जाते. याव्यतिरिक्त बरेच आणखीन पर्यटन स्थळ आहेत. तुम्ही या पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

1 thought on “गोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gondia District Information In Marathi”

  1. Hi mahiti kharch khup chan ahe suralitpane srv points Yat dile ahet dhanyvad ashic ankhi kh mahiti det raha

    Reply

Leave a Comment