धुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती Dhule District Information In Marathi

Dhule District Information In Marathi: महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून धुळे हा जिल्हा ओळखला जातो. शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध असा हा धुळे जिल्हा आहे. धुळे हे धुळे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर तसेच खान्देशाची राजधानी आहे. तर चला मग धुळे या जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Dhule District Information In Marathi

धुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती Dhule District Information In Marathi

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे एकमेव असे शहर आहे ज्या ठिकाणी मक्यापासून ग्लुकोज साखर व खाद्य तेल असे पदार्थ तयार केले जातात.

क्षेत्रफळ व विस्तार :

धुळे जिल्ह्याचे क्षेत्रफळ 8,063 चौ. किमी असून याच्या नैर्ऋत्येस पश्चिमेस व वायव्येस गुजरात राज्याचे सुरत, डांग व भडोच जिल्हे, उत्तरेस मध्य प्रदेश राज्याचा नेमाड जिल्हा, पूर्वेस महाराष्ट्राचा जळगाव जिल्हा व दक्षिणेस नासिक जिल्हा हे आहेत.

जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिण सीमांवरील बराचसा भाग डोंगराळ असला, तरी मध्यभाग तापी नदीच्या खोऱ्यात मोडत असल्यामुळे काहीसा सपाट आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ राज्याच्या क्षेत्रफळाच्या 4.10% असून लोकसंख्या राज्याच्या लोकसंख्येच्या 3.2% आहे.

लोकसंख्या :

धुळे जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा अहिराणी, खान्देशी भाषेचे माहेर आहे. 2017 जनगणनेनुसार धुळे शहराची लोकसंख्या 6,24,358 आहे.

धुळे जिल्हा इतिहास :

प्राचीन ग्रंथांमध्ये धुळ्याचा उल्लेख धुलिकापट्टनम असा आहे. धनगर गवळी समाजाच्या धूळोबा ह्या श्रद्धास्थानावरुन धुळे नाव पडले असावे अशी एक मान्यता असून पेशव्यांनी त्यांच्या एका ताळेबंदांत धुळे म्हणजेच महमदपुर असे म्हटले आहे.

पूर्वी धुळ्याचे 3 भाग होते ते म्हणजे देवपुर, जुने धुळे आणि मोगलाई.  लुटालूट, दुष्काळ, लढाई ह्यामुले धुळे त्रासले होते. 1804 ला सरदार विंचुरकर यांनी बाळाजी बळवंत ह्या सरदारास  धुळेचा कारभार दिला.

1818 ला इंग्रजांनी मराठ्यांना हरवून धुळे ताब्यात घेतले. कॅप्टन ब्रिग्ज़ हा धुळे गावामध्ये आला.  त्याने दंडकग्राम पद्धत वापरून धुळ्याची नगररचना करवून घेतली. कौटिल्याने नगररचनेच्या 8 मुख़्य आणि 8 उप पद्धती सांगितल्या आहेत.

काटकोनात एकमेकांना छेद देणारे समान उभे आणि आडवे मुख्य रस्ते आणि तेवढेच उपरस्ते हे ह्या नगर रचनेचे वैशिष्ट्य.  धुळ्याची तुलना नगररचनेच्या बाबतीत जयपूरशी केली जाते.

हवामान :

जिल्ह्याचे हवामान सामान्यत: उष्ण व कोरडे आहे. मे महिन्यात तापमान 43° से.ची कमाल मर्यादा गाठते तर डिसेंबरमध्ये तापमान 4° से. पर्यत खाली येते. उन्हाळ्यातील सरासरी तापमान 30° ते 35° से. इतके असते हिवाळयातील सरासरी तापमान 18° ते 23° से. इतके असते.

जिल्ह्यातील उत्तर व पश्चिम भागाची समुद्रसपाटीपासून उंची अधिक असल्याने तुलनात्मकदृष्टया तेथील उन्हाळे अधिक सुसह्य असतात. जिल्ह्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान 60 से. मी. इतके आहे.

बीड जिल्ह्यातील तालुके :

धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर या चार तालुक्यांचा समावेश आहे. धुळे आणि शिरपूर हे प्रशासकीय उपविभाग आहेत.

शेती :

शेती हाच जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. धुळे जिल्ह्यात, मिरची, ज्वारी, कापूस, बाजरी, भात, ऊस, मिरची, केळी, द्राक्ष ह्यांच्या उत्पादनाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. दोंडाईचा या ठिकाणी उत्पादित केली जाणारी  संकेश्वरी आणि इतर जातीची लालमिरची सर्वत्र सुप्रसिद्ध आहे.

नद्या :
धुळे जिल्ह्याची तापी नदी ही प्रमुख नदी आहे. त्या व्यतिरिक्त धुळे जिल्ह्यात पांझरा, कान, अरुणावती, अमरावती, अनेर, बुराई, बोरी या नद्या वाहतात.

वनस्पती व प्राणी :

धुळे जिल्ह्यातील वनांमध्ये झाडांचे अनेक प्रकार आढळत असले तरी आर्थिक दृष्ट्या साग, सादडा, खैर, शिसव, पळस, सलाई, अंजन, ऐन, धावडा, बांबू इ. झाडे महत्त्वाची आहेत. धुळे, साक्री, पिंपळनेर यांजवळच्या प्रदेशात गवताळ कुरणे व काटेरी झुडुपे आढळतात.

येथे होणाऱ्या गवताच्या अनेक प्रकारांपैकी ‘रोशा’ हे गवत औषधीसाठी आणि सुंगधी मालासाठी महत्त्वाचे आहे. डिंक, मध, मेण, राळ, लाख, चारोळ्या, मोहाची फुले इ. इतर जंगली पदार्थ या जिल्ह्यात मिळतात. निंबू, आंबा, जांभूळ, निर्गुडी, करंजबी, चिंच, बाभूळ इ. उपयुक्त झाडेही आहेत.

जंगलामध्ये सध्या वाघ, चित्ता, तरस, लांडगा, सांबर, ससा, कोल्हा, हरिण, अस्वल, माकड, वानर, रानडुक्कर, चितळ, काळवीट, चिंकारा, नीलगाय इ. अनेक प्रकारचे प्राणी येथे आढळतात. मात्र जंगलतोड व शिकार या कारणामुळे प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

जिल्ह्यात कावळा, चिमणी, कोकिळ, मैना, निळकंठ, तितर, पिंगळा, लाव्हा, शिंपोण, मोर, खंड्या, टिटवी, घुबड, वटवाघूळ, ससाणा, घार, गिधाड, सुतार इ. विविध प्रकारचे पक्षी, नाग, साप, फुरसे इ. सरपटणारे प्राणी व अनेक प्रकारचे कीटक आढळतात. जिल्ह्यातील नद्यांत व तलावात रोहू, मृगळ, सालपे, बोदाड, कटला, तेंग्रा इ. मासे सापडतात.

वाहतूक व्यवस्था :

जिल्ह्यातील वाहतुकीच्या अनेक मार्गांपैकी भुसावळ-सुरत आणि चाळीसगाव-धुळे हे मार्ग मिळून 171.61 किमी. लोहमार्ग आणि मुंबई-आग्रा, सुरत-नागपूर, अंकलेश्वर-इंदूर इ. रस्त्यांचा जिल्ह्यात येणारा भाग हे महत्त्वाचे मार्ग आहेत. त्यांत 149.10 किमी. राष्ट्रीय महामार्ग 582.60 किमी. राज्यमार्ग 1,621.63किमी. जिल्हामार्ग 1,926.59 किमी. ग्रामीण मार्ग मिळून 4,279.92 किमी. रस्ते आहेत.

त्यांतील 686.10 किमी. डांबरी 1,308.38 किमी. खडीचे व 2,85.44 किमी. निकृष्ट आहेत. हे रस्ते व लोहमार्ग तापीला अगर तिच्या उपनद्यांना समांतर धावतात व मंद उताराचा फायदा घेतात.

रस्ते व लोहमार्ग यांच्या लगतचे भाग प्रगतिशील आहेत. डोंगराळ भागात वाहतुकीच्या सोयी फारशा नाहीत व त्यामुळे हे भाग मागासलेले आहेत. मात्र आता सरकारी योजनेने हाती घेतलेल्या कामाला गती मिळाली असून तेथे नवीन रस्ते निर्मितीचे कार्य सुरू आहे.

समाज जीवन :

धुळे जिल्ह्यात 91.25 % लोक हिंदू, 5.93% मुस्लिम, 0.26% ख्रिस्ती, 0.04% शीख, 1.74% बौध्द व 0.78%जैन आहेत. डोंगराळ भागात आदिवासी लोक राहत असून मावची, पावरे, भिल्ल, धनका, कातकरी या प्रमुख आदिवासी जमाती होत. जिल्ह्यात अनुसूचीत जातीचे 3.7% व अनुसूचित जमातींचे 37% लोक आहेत.

धुळे या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता 127 चौरस किमी. अशी असून ती तापीच्या खोऱ्यात सार्वाधिक व डोंगराळ भागात कमी होत जाते. खोऱ्यातील सुपीक भागातील शेतकरी काहीसे पुढारलेले असून तेथील घरबांधणीमध्ये चुना, विटा, दगड इत्यादींचा उपयोग केल्याचे आढळते. सुखवस्तू शेतकऱ्यांची घरे दुमजली असतात. भाकरी/पोळी, डाळीचे वरण, भाज्या, दूध व तूप हे जेवणातील मुख्य पदार्थ होत.

आदिवासी खेडी 5-6 वाडे मिळून तयार होतात. घरे झोपडीवजा असतात. बांबू, पाने व जंगली लाकूड या स्थानिक उपलब्ध वस्तूंचा उपयोग घरबांधणीत विशेषकरून आढळतो. भाकरी, मिरचीची चटणी, डाळीचे कालवण हे आदिवासींच्या जेवणातील मुख्य पदार्थ, शिकार मिळाल्यास कधीकधी मटणही असते.

पोशाख :

आदिवासींचा पोशाख म्हणजे गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात कुडते व फेटा जंगलातील आदिवासींजवळ धोतरही नसते. त्यांना लंगोटीवरच भागवावे लागते. स्त्रिया लुगडे व चोळी वापरतात.

गळ्यात मणी, कवड्या यांचे दागिने व हातात सामान्यतः कथलाची कडी घालतात. याशिवाय जिल्ह्यात बैलांचा व्यापार करणारे भटके वंजारी, मेंढपाळी करणारे ठेलारी आणि शिकार करणारे फासेपारधी लोकही आढळतात.

खेळ :

धुळे जिल्ह्यातील लहान मुलांच्या खेळांमध्ये विविध खेळ खेळले जातात. त्यामध्ये मुलांचे व मुलींचे रप्पारप्पी, विटीदांडू, शिवाशिवी, खोखो, हुतुतू, आट्यापाट्या, सूरपारंब्या, फुगड्या, झिम्मा, पिंगा इ. खेळ ग्रामीण भागात व काही शहरी भागातही खेळतात.

तथापि अलीकडे खोखो, आट्यापाट्या, हुतुतू, लंगडी वगैरे देशी व क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, टेनिस इ. विदेशी खेळ शाळा-महाविद्यालयातून खेळले जातात.

पर्यटन स्थळ :

अनेर चे धरण आणि अभयारण्य. शिरपुर तालुक्यातील हे ठिकाण असुन अनेर नदीवर धरण बांधण्यात आले आहे.हा संपुर्ण परिसरच अत्यंत हिरवागार आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आपल्याला पहायला मिळतो.

या परिसरात धरणाजवळच साधारणतः 83 वर्ग कि.मी. विस्तीर्ण अश्या परिसरात अनेर अभयारण्य हे अनेक पशु पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे.

या परिसरात पर्यटनाकरता आल्यास अनेक पशु पक्ष्यांचे दर्शन आपल्याला घडते,अस्वल, रानडुक्कर, तडस, कोल्हा, लांडगा, भेकर, ससा या प्राण्यांसह गिधाड, तितर बटेर, मैना, सायाळ, सुतारपक्षी, पाणकोंबडे, हाॅर्नबिल, बगळे असे पक्षी आपल्या दृष्टीस पडतात.

संपुर्ण दिवस या अभयारण्यात कसा निघुन जातो ते कळत देखील नाही. शहरी वातावरणाला कंटाळलेले जीव निखळ आनंदाच्या शोधात या ठिकाणी भेट द्यायला येतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment