सरकारी योजना Channel Join Now

साने गुरुजींचे 25+प्रसिद्ध विचार Best Sane Guruji Suvichar In Marathi

Sane Guruji Suvichar In Marathi पांडुरंग सदाशिव साने “साने गुरूजी” नावाने प्रसिद्ध, हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. ‘श्यामची आई’, ‘नवा प्रयोग’, ‘सुंदर पत्रे’, ‘हिमालयाची शिखरे’, ‘क्रांती’, ‘समाजधर्म’, ‘आपण सारे भाऊ’ इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे. साने गुरुजींचे मराठी भाषेवर अपार प्रेम होते

Best Sane Guruji Suvichar In Marathi

साने गुरुजींचे प्रसिद्ध विचार Sane Guruji Suvichar In Marathi

आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्या लाही लाजवील, हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानेच होत.

आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत, वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही, मुख्य महत्त्व माणुसकीला आहे.

आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे, मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे.

एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले तरी ते जवळच असतात.

करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे.

कला म्हणजे परमोच्च ऐक्य.

कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन.

कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा हि आजची भाकर आहे.

जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व ज्ञान शोधून काढले आहे असे नाही.

जिकडून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकाता येईल ते आदराने घ्या.

जुन्या जीर्ण शीर्ण रूढी आज कशा चालतील? लहानपणीचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा होईल?

जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते, असत्य असते ते अदृश्य होते.

ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे, वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे, ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान.

ज्यांच्या भावना कशानेही हेलावत नाहीत, ती काय माणसे म्हणायची.

दुसऱ्याला हसणे फार सोपे असते पण दुसऱ्या करिता रडणे फार कठीण असते, त्याला अंत:करण असावे लागते.

ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो.

ध्येय सदैव वाढतच असते.

निर्बालांना रक्षण देणे हीच बळाची खरी सफलता होय.

निसर्गावर प्रेम करा, निसर्ग आपली माता आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दु:ख असते दु:ख गिळून आनंदी राहणे हीच खरी माणुसकी.

प्रेमाचे नाते सर्वात थोर आहे.

भूतकाळातील काही गोष्टी आता चुकीच्या वाटल्या तर त्या दूर न करणे म्हणजे भूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील भ्रामक गोष्टी जर तशाच पुढे चालवू तर ते उचित नाही. तो भूतकाळाचा गौरव नाही. तो पूर्वजांचा गौरव नाही. उलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखे आहे.

भेदावर अभेद हेच औषध आहे.

मेघ सारे पाणी देवून टाकतात, झाडे फळे देवून टाकतात, फुले सुगंध देवून टाकतात, नद्या ओलावा देवून टाकतात, सुर्य चंद्र प्रकाश देतात जे जे आहे ते ते सर्वांनी मिळून उपभोग घेऊ.

मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनीच मनुष्य शोभतो.

सदाचार हा मनुष्याचा खरा अलंकार आहे.

सुधारणा करण्याचे अनेक मार्ग असतात.

सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी.

हृदयात अपार सेवा भरली कि सर्व मित्रच दिसतात.

Sane Guruji Suvichar In Marathi तुम्हाला कसे वाटले याबद्दल आम्हाला जरूर कळवा, धन्यवाद .

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment