अरनॉल्ड श्वार्झनेगर यांचे मराठी सुविचार Arnold Schwarzenegger Suvichar In Marathi

Arnold Schwarzenegger Suvichar In Marathi अरनॉल्ड श्वार्झनेगर हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर आहेत. राज्याचे गव्हर्नर या पेक्षाही ऍक्शन चित्रपटातील भूमिका व शरीरसैष्ठव या खेळ प्रकारातील कारकीर्दीसाठी त्यांचे संपूर्ण जगभर त्यांचे चाहते आहेत. शरीरसैष्ठवातील निर्विवाद बादशहा म्हणून आजही ओळखले जातात. १९६० व ७० च्या दशकात अरनॉल्ड यांनी अनेक शरीर सैष्ठव स्पर्धा जिंकल्या व सर्वात मानाचे मि.ऑलिंपीया हा किताब सलग ७ ते ८ वर्षे जिंकला. असे म्हणतात की मिस्टर युनिव्हर्स च्या अकादमीने त्यांना इतर स्पर्धकांना जिंकून येण्यासाठी स्पर्धेत भाग न घेण्यासाठी विनंती केली.

Arnold Schwarzenegger Suvichar In Marathi

अरनॉल्ड श्वार्झनेगर यांचे मराठी सुविचार Arnold Schwarzenegger Suvichar In Marathi

शरीर सैष्ठ्व उमेदीच्या काळात अरनॉल्ड ऑस्ट्रियन ओक या टोपणनावाने ओळखले जात. शरीर सैष्ठ्व मधून लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी हॉलिवूडमध्ये आपल्या पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत अनेक चित्रपटात भूमिका केल्या त्यांच्या बहुतेक भूमिका ऍक्शन चित्रपटातील आहेत.

कसलेले अभिनेता व जबरदस्त अभिनय नसला तरी बहुतेक सर्व चित्रपटातून आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव पाडला व बहुतेक सर्वच चित्रपटांना आपार लोकप्रियता मिळवून दिली. कोनॅन द बार्बारियन, कमांडो, टर्मिनेटर , द प्रिडेटर , रेड हॉट, ट्रू लाईज या चित्रपटातील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.

वयानुसार आपले क्षेत्र बदलण्यात हातखंडा असलेल्या अरनॉल्ड यांनी राजकारणात पूर्ण वेळ सक्रिय होण्याचा निर्णय घेतला, सन २००३ मध्ये ते कॅलिफोर्निया राज्याच्या गव्हर्नर पदी निवडून आले व अजूनही त्याच पदावर आहेत. राजकारणात ते रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात.

पराभव हा पर्याय असुच शकत नाही इथे प्रत्येकाला यशस्वी व्हावच लागेल

यशाचे नियम तेव्हाच काम करतात जेव्हा तुम्ही प्रयत्न सुरु करता

जर तुम्ही इतरांसारखेच बनणार असाल तर तुमचा पृथ्वीवर येण्याच उद्धिष्ठ काय ?

सकारात्मक विचार हे संसर्गजन्य असतात जर तुम्ही यशस्वी माणसाच्या सहवासात राहिलात तरच तुम्ही यश मिळवाल

सामर्थ्य हे जिंकण्यातून मिळत नसते ते संघर्षातून निर्माण होत असते

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment