नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण माहिती Nandurbar District Information In Marathi

Nandurbar District Information In Marathi महाराष्ट्राच्या खानदेश प्रदेशात नंदुरबार हा जिल्हा येतो. सातपुडा पर्वतांच्या रांगेत हा जिल्हा वसलेला आहे. नंदुरबार महाराष्ट्र अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे.  नंदुरबार वास्तविक 66 पेक्षा जास्त आदिवासी समुदाय करत आहे.  1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. तर चला मग नंदुरबार या जिल्ह्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.

Nandurbar District Information In Marathi

नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण माहिती Nandurbar District Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,035 चौरस कि.मी. असून नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्वेला मध्यप्रदेश व धुळे जिल्हा, दक्षिणेला धुळे जिल्हा आणि पश्चिमेला गुजरात राज्य आहे.

जिल्ह्याच्या उत्तर भागात सातपुड्याची पर्वतरांग असून या पर्वतरांगांमुळे नंदुरबार, मध्यप्रदेश व गुजरात राज्यांपासून वेगळा झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तालुके :

अक्कलकुवा, अक्राणी महल (धडगाव), तळोदा, नंदुरबार, नवापूर, शहादा.

लोकसंख्या :

नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या 16,48,295 एवढी असून जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,955 वर्ग कि.मी. इतके आहे. जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण 64.68% एवढे आहे. 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 975 असे आहे. नंदुरबार जिल्ह्यात अनेक जमाती पाहण्यास मिळतात.

हवामान :

नंदुरबार जिल्ह्याचे हवामान सामान्यतः उष्ण व कोरडे असते. जिल्ह्याच्या पश्चिम व उत्तर भागात पावसाचे प्रमाण जास्त असून पूर्व ते दक्षिण भागात हेच प्रमाण कमी आहे. पावसाळ्यात जिल्ह्यातील तापमान अधिक दमट असते.

नंदुरबार जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ऋतूं आहेत. उन्हाळा, पावसाळा / हिवाळा आणि हिवाळी हंगाम. उन्हाळा मार्चपासून मध्य जूनपर्यंत असतो. उन्हाळा बहुतेकदा गरम आणि कोरडा असतो. मे महिन्याच्या दरम्यान उन्हाळ्याच्या शिखरावर असतो. ग्रीष्मकालीन शिखरांमध्ये तापमान 45° सेल्सियस पर्यंत जाते.

जूनच्या मध्य किंवा अखेरीस मान्सून सेट करतो. या हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते. उत्तर व पश्चिम भागामध्ये उर्वरित भागापेक्षा जास्तीत जास्त पाऊस पडतो. जिल्ह्यात सरासरी पाऊस 767 मि.मी. हिवाळी नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत असते. हिवाळा सौम्यपणे थंड परंतु कोरडी आहेत.

इतिहास :

नंदुरबार भागात पूर्वी नंदराज राजाचे राज्य होते. त्यामुळे हे शहर एकेकाळी नंद्रनगरी म्हणून ओळखले जात असे. येथील प्रमुख आदिवासी जमातींचा मोठा इतिहास नंदुरबार ला लाभलेला आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात इथे 1942 साली शिरीशकुमार नावाचा युवक पोलिसांची गोळी लागून हुतात्मा झाला. त्याच्या नावाने शहरात हुतात्मा चौक आहे. नंदुरबार शहराच्या जवळ चौपाळे नावाचे एक खेडेगाव आहे.

या गावात संत दगाजी बापू यांचा जन्म झाला. आजन्म ब्रह्मचारी राहून त्यांनी नंदुरबारला भक्तीचा मार्ग दर्शविला. येथील लोक त्यांना बापू म्हणून ओळखत.  खान्देशामधले फार प्राचीन शहर म्हणुन नंदुरबार या शहराची ओळख आपल्याला सांगता येईल पुर्वीचे नंदीगृह होते. अर्थात यादवांच्या काळात नंदीगृह म्हणुन ओळखले जाणारे आजचे नंदुरबार होय.

नद्या :

तापी आणि नर्मदा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. उदाई, गोमाई, पाताळगंगा, रंगवली, शिवण या इतर काही नद्या आहेत. नंदुरबार हा सातपुड्यातील तापी खोऱ्यात वसलेला महाराष्ट्र राज्यातील अति उत्तरेकडील जिल्हा आहे.

शेती :

नंदुरबार जिल्ह्यातील शेती हा व्यवसाय मुख्य असून येथे उद्योग धंदेही चालतात. नंदुरबार व नवापूर या तालुक्यात मिरची प्रामुख्याने पिकवली जाते. त्याचबरोबर तांदुळ, भुईमुग, ज्वारी, बाजरी, हरभरा, गहु ही येथील मुख्य पिकं, येथील सर्वच तालुक्यांमधे आणि दोनही हंगामामधे घेतले जाणारे पिक म्हणजे ज्वारी होय.

येथील दादर ज्वारी प्रसिध्द असुन ते पीक रब्बी हंगामात या ठिकाणी घेतले जाते. मिरची व तूरडाळीसाठी महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या या जिल्ह्यात कांदा, कापूस, ऊस, केळी व बोर यांचे उत्पादनही बर्‍याच प्रमाणात घेतले जाते.

उद्योगधंदे :

जिल्ह्यात प्रामुख्याने कृषि-आधारित छोटे उद्योग चालतात. रोशा गवतापासून औषधे व सुगंधी तेल बनवण्याचा उद्योग जिल्ह्यात चालतो. एकमेव अशी या जिल्हयातील उद्योग वसाहत तळोदे या ठिकाणी आहे. जिनिंग प्रेसिंगचे उद्योग आणि शहादा या ठिकाणी आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत तळोदे येथे आहे. जिनिंग व प्रेसिंगचे कारखाने नंदूरबार व शहादे येथे आहेत. तळोदे येथील सागाच्या लाकडाची बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूत गिरणी नंदुरबार व जवाहर सहकारी सूत गिरणी या सूत गिरण्यांसह जिल्ह्यात शहादे तालुक्यात लोणखेडे येथे सूत गिरणी आहे.

समाजजीवन :

हा भाग आदिवासी बहुल असून निसर्गाच्या वैविध्याने परिपूर्ण असा आहे. येथे होळी हा प्रमुख सण मानला जातो. प्रामुख्याने काठीच्या आदिवासी संस्कृतीतली होळी ही मोठ्या स्वरूपात होत असून तेथे भरणाऱ्या बाजारास भोंगऱ्या बाजार असे म्हणतात.

भिल्ल, पावरा, तडवी, वळवी, वसावे, पाडवी, राऊत, पराडके, कोकणा-कोकणी, गावित, मावची, धानका, इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आहेत. नंदुरबार जिल्ह्यात येणारया सातपुडा पर्वतरांगांमधे आदिवासी लोक मोठ्या संख्येने राहातात.

गोमित, पारधी आणि भिल्ल हे लोक जास्त संख्येने असुन त्यांच्या खालोखाल कोकणा, पावरे, गावीत आणि धनका या जमातीचे लोक देखील येथे आहेत आणि ते आपल्या परंपरा, लोककला, लोकसंस्कृती, राहणीमान आजही टिकवुन आहेत.

भाषा :

नंदुरबार जिल्ह्यातील अहिराणी ही प्रमुख भाषा असून तेथे खानदेशी, मराठी, गुजराती आणि हिंदी या भाषा ही बोलल्या जातात.

वाहतूक :

महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा लोहमार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जातो. गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांत कडे जाणारे रस्ते नंदुरबार जिल्ह्यातून जातात. चांदसेली घाट व तोरणमाळ घाट हे महत्त्वाचे घाट या जिल्ह्यात आहेत.

जिल्हयातील महत्वाची रेल्वेस्थानकं म्हणजे नंदुरबार, नवापुर आणि चिंचपाडा रनाळे ही होय. रेल्वे मार्ग आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सेवा सुरळीत सुरू असल्याने नंदुरबार शहर इतर शहरांशी चांगल्या तऱ्हेने जोडल्या गेले आहे.

पर्यटन स्थळ :

नंदुरबार जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत, जे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. अशाच काही पर्यटक स्थळांची आपण माहिती पाहूया.

उनपदेव :

उनपदेव येथील गरम पाण्याचे झरे हे अडावाद या गावापासून 6 किलोमीटर अंतरावर शहादा या तालुक्यात आहेत. इथे असलेल्या मंदिरातील प्रमुख झरा हा गरम पाण्याचा झरा आहे. इथे असलेल्या गोमुखातून वर्षभर गोड पाणी वाहते.

कृष्णकमळ तलाव :

कृष्णकमळ हा नैसर्गिक तलाव असून यात असंख्य कमळे आहेत. तोरणमाळ परिसरातील आदिवासी जीवनही अनुभवण्यासारखे असून येथे नागार्जून मंदिर व सीताखाई ही ठिकाणे आहेत. श्रीराम व सीता रथातून या भागातून जात असताना, रथामुळे गुहा निर्माण झाली असे मानले जाते.

तोरणमाळ :

हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण होय. येथे यशवंत तलाव, सीता खायी म्हणजेच दरी, हिरवेगार निसर्गसौंदर्य आणि धबधबे अशी अनेक वैशिष्ट्य बघायला मिळतात.

श्री दत्त मंदिर :

सांगरखेड येथील दत्त मंदिर शहादा तालुक्यातील सारंगखेड येथील दत्त मंदिर प्रसिद्ध असून येथील दत्त जयंती यात्रेला महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात येथून भाविक दर्शनासाठी येतात. जिल्ह्यातील तळोदा येथील कालिका देवीचे मंदिर व तेथील यात्राही प्रसिद्ध आहे.

मोलगी :

मोलगी येथील डाब हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण नयनरम्य आहे. दंडापेश्वर पार्क, हुतात्मा गार्डनपाहण्यासारखे ठिकाण आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment