त्रिपुरा राज्याची संपूर्ण माहिती Tripura Information In Marathi

Tripura Information In Marathi त्रिपुरा हे भारतातले लहान राज्य आहे. यात अनेक हिंदू आदिवासी राहतात. इथले उत्सव पाहण्यासारखे असतात. खारची नावाचा त्रिपुरातला लोकप्रिय उत्सव जवळजवळ संपूर्ण आठवडाभर साजरा केला जातो. या उत्सव पूजेमागे खूप दंतकथा सांगितल्या जातात. तर चला मग पाहुया आणखीन त्रिपुरा या राज्याविषयीची माहिती.

Tripura Information In Marathi

त्रिपुरा राज्याची संपूर्ण माहिती Tripura Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

क्षेत्रफळ 10,496 चौरस किमी असून राजधानी अगरतळा हे शहर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 3,671,032 इतकी आहे. उत्तरपूर्व राज्य म्हणून या राज्याची ओळख आहे. 21 जानेवारी 1972 ला या राज्याची स्थापना झाली.

त्रिपुराचा संस्कृत अर्थ तीन शहरे असा होतो. राज्याची साक्षरता 87.75 टक्के इतकी आहे. राज्यात चार जिल्हे समाविष्ट आहेत.  विस्तार 22° 56′ उ. ते 24° 32′ उ. आणि 19° 10′ पू. ते 92° 22′ पू. यांदरम्यान असून हे उत्तर, पश्चिम व दक्षिणेकडून बांगला देशाने वेढलेले असून फक्त ईशान्येस भारतातील आसाम व मिझोराम राज्ये आहेत.

त्रिपुरा राज्याचा इतिहास :

त्रिपुराचा इतिहास मुस्लीम इतिहासकारांनी व ‘राजमाला’ इतिहासकाराने लिहून ठेवलेला आहे. महाभारत व पुराणातही त्रिपुराचे संदर्भ सापडतात. अशोक सम्राटाच्या काळात सापडलेल्या अनेक धार्मिक पुराण आणि शिलालेखांमध्ये त्रिपुराचा उल्लेख आहे.

प्राचीन काळी त्रिपुराला किरत देश असे म्हणत कारण एके काळी येथे करत राज्य होते. बऱ्याच शतकापर्यंत येथे त्वीप्रा राज्याचे शासन होते, परंतु कोणत्या काळात याबद्दल कोणालाही माहित नाही. 15 व्या शतकात त्रिपुरी राजांनी प्रथम लिहिलेल्या राजमालाच्या पुस्तकात त्यातील 179 राजांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

1919 पर्यंत मध्यवर्ती ब्रिटिश सत्तेला व नंतर 1936 पर्यंत ईस्टर्न स्टेट्‌स एजन्सीला अंकित असलेले त्रिपुरा राज्य 1949 मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाले. प्रथम ‘पार्ट सी’ राज्याचा त्याचा दर्जा 1957 च्या राज्यपुनर्रचनेत बदलून तो केंद्रशासित प्रदेश झाला. 1963 मध्ये त्याला विधिमंडळ व राज्यांतर्गत शासनाधिकार प्राप्त झाले. 21 जानेवारी 1972 रोजी त्रिपुराला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

भाषा :

त्रिपुरा राज्याच्या कोकबरोक आणि बंगाली या अधिकृत भाषा आहेत. परंतु या व्यतिरिक्त इतर भाषा देखील येथे बोलल्या जातात लोक अधिकृत कामांसाठी इंग्रजी भाषेचा उपयोग करतात. राज्याच्यातील बंगाली लोकांच्या वर्चस्वामुळे बंगाली हि सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.

पुढील भाषा कोणती जमाती बोलते याचा आपण आढावा घेऊया.

भिल्ली- भिल. गारो- गारो. हलम- हलम,कैपेंग, मोलसोम. खारिया- खारिया. खासी- खासी.
लुशाइ- मिझो, लुशाइ. मुंडा-मुंडा. मिझो- मिझो-राल्ते. संताली-संताल.

त्रिपुरा राज्यातील शेती :

शेतीसंलग्न उद्योगधंदे आणि पशुपालन हाच त्रिपुरावासीयांचा प्राथमिक उदरनिर्वाहाचा मार्ग आहे. अननस, भात आणि फणस ही मुख्य पिके, याशिवाय रबर, चहा ही नगदी पिके आहेत. येथील अननस हे पीक इतर राज्यांत लागवड केल्या जाणाऱ्या अननसापेक्षा काही बाबतीत खास आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.

संगीत व नृत्य :

नृत्य हे कोणत्याही संस्कृतीचे महत्त्वाचे भाग आहेत. येथे सुमुई नावाचे एक वाद्य वापरले जाते, जे बासुरीसारखे दिसते. इथले लोक खाम वापरतात ज्याला ढोल देखील म्हणतात. सारिंडा आणि चोंगप्रांग यांसारखे वाद्य संगीत आणि नृत्य दरम्यान लोक वापरतात. इथल्या लोकांची स्वतःची वेगळी परंपरा आहे आणि ते ती त्यांच्या गाण्यांद्वारे, नृत्याद्वारे जतन करण्याचा प्रयत्न करतात.

विवाह, धार्मिक विधी आणि सणांच्या वेळी ते गाणी आणि नृत्याद्वारे त्यांचा आनंद व्यक्त करतात.  त्रिपुरी लोकांचे गरिया नृत्य हे एक प्रकारचे धार्मिक नृत्य आहे. रिंग लोकांचे होजगिरी नृत्य खूप प्रसिद्ध आहे आणि त्या नृत्यात मुली मडक्यावरती नाचतात. या राज्यात अनेक प्रक्चे नृत्य पहायला मिळतात, जसे कि त्रिपुरी लोकांचे लेबंग नृत्य, चमका लोकांचे बिझू नृत्य, गारो लोकांचे वांगला नृत्य, हलम कुकी लोकांचे हैहक नृत्य आणि मोग लोकांचे ओवा नृत्य.

त्रिपुरातील सण व उत्सव :

त्रिपुरा राज्यामध्ये तिर्थमुखला आणि उनाकोटी येथील मकर संक्रांत, होली उत्सव, उनाकोटीची अशोक अष्टमी, ब्रम्हपूरचा सण, मोहनपूरचा राश सण, बोटेरस, मंसामंगल सण, केर व खुर्ची सण, सरद सण, जामपूरीतील ख्रिसमस, बुद्धपौर्णिमा सुद्धा साजरी करण्यात येते.

त्रिपुरा राज्यातील पोशाख :

त्रिपुरातील पुरुषांचा पारंपारिक पोशाख एक टॉवेल आहे, ज्याला रिकुटू गचा म्हणून ओळखले जाते. कुबाई हा एक प्रकारचा शर्ट आहे. पुरुष कुकूबरोबर रिकुटू गचा घालतात.  उन्हाळ्यात तीव्र उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी त्रिपुरा पुरुष डोक्यावर फेटा किंवा पगडी घालतात.

येथेही पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव असलेले लोक, विशेषत: तरुण पिढी जीन्स, पायजमा, शर्ट आणि टी-शर्ट आणि विविध प्रकारचे आधुनिक जीवनशैलीचे पोशाख घालण्यास उत्सुक आहेत. त्रिपुरातील महिलांच्या कपड्यांबद्दल सांगायचे तर, त्रिपुरातील महिलांचा पोशाख हा एका मोठ्या कपड्यासारखा असतो, जो स्त्रिया कंबरेपासून पायापर्यंत किंवा गुडघ्यापर्यंत गुंडाळतात.  हे कापड सुंदर हँड आर्ट एम्ब्रॉयडरीने सजवलेले आहे.  ज्याला खाकलू म्हणतात.

प्रमुख नद्या :

त्रिपुरा राज्यात धालाइ, फेनी, गोमती, खोबाई हाओरा, जुरी, कहोवाइ, लोंगाइ, मनू, मुहुरी, सुमली या नद्या त्रिपुरातून वाहतात. राज्याच्या दक्षिणार्धातील सोनामुरा, उदयपूर, अमरपूर, बेलोनिया व साब्रूम या पाच उपविभागांत वाहणाऱ्‍या अनेक नद्यांपैकी सर्वांत मोठ्या गुमतीला बरेच दक्षिणवाही नाले ओढे मिळतात व ती डोंगररांगा तोडून खोल दरीतून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत राधाकिशोरपूरजवळ सपाट प्रदेशात उतरते व शेवटी मेघनेला मिळते. तर डोंगराच्या त्रिपुरा रांगांचा पर्वत लक्ष वेधून घेतो.

त्रिपुरा हवामान :

त्रिपूरा राज्याचे सर्वसाधारण तापमान 20° ते 30° से. असून हवामान समशीतोष्ण व आरोग्यपोषक आहे. वार्षिक पर्जन्य एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत 190 सेमी. आढळतो.

वनस्पती व प्राणी :

त्रिपुरा राज्याची 62% भूमी वनाच्छादित असून या वनातीत शाल, गरजन, आर्द–पानझडी व सदाहरित वृक्ष, बांबू हे वृक्ष आढळतात तर मैदानी गवत यांचा समावेश होतो. वन्य पशू मुख्यतः हत्ती, रानरेडा, गेंडा, वाघ, चित्ता, कोल्हा, गवा, अजगर हे आढळतात.

त्रिपुरा राज्यातील पर्यटन स्थळ :

त्रिपुरा हे राज्य पर्यटकांसाठी अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे तर आपण जाणून घेऊया त्रिपुरा मधील काही पर्यटन स्थळ.

उजवंत पॅलेस :

उजवंत पॅलेस त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे आहे.  हे शहराच्या मध्यभागी वसलेले असून एक किलोमीटरच्या त्रिज्येत पसरलेले आहे.  त्याची पायाभरणी महाराजा राधा किशोर माणिक बहादूर यांनी 1899 -1901दरम्यान केली होती.  सध्या राज्यात विधानसभा आहे.

कुंज भवन :

कुंज भवन 1917 मध्ये महाराजा बिरेंद्र किशोर माणिक बहादूर यांनी बांधले होते.  रवींद्रनाथ टागोर 1926 मध्ये आगरतळाला गेले तेव्हा ते कुंज भवनात राहिले.  हे सध्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान म्हणून वापरले जाते.

जगन्नाथ मंदिर त्रिपुरा :

हे मंदिर स्थापत्यकलेचा अतुलनीय नमुना आहे.  ते पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक आगरतळ्यात येतात.

राज्य संग्रहालय

या संग्रहालयात आगरतळ्याच्या प्राचीन इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित दुर्मिळ वस्तू अगदी जवळून पाहता येतील.  त्रिपुरा पर्यटनाच्या सहलीला येणारे बहुतेक पर्यटक येथे नक्कीच येतात.

ब्रह्मकुंड :

आगरतळ्यापासून उत्तरेस 45 किमी अंतरावर ब्रह्मकुंड आहे.  येथे दरवर्षी मार्च, एप्रिल आणि नोव्हेंबर महिन्यात जत्रा भरते.

कमला सागर तलाव :

कमलासागर हा अतिशय सुंदर तलाव आहे.  येथील एका टेकडीवर काली मातेचे मंदिर आहे.  जिथे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात जत्रा भरवली जाते.

त्रिपुरा सुंदरी मंदिर :

हे मंदिर त्रिपुरा पर्यटनातील त्रिपुराचे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे.  हिंदू धर्मात त्रिपुरा सुंदरीला खूप महत्त्व मानले जाते.  51 शक्तीपीठांपैकी एक असल्यामुळे त्याचे महत्त्व अधिक आहे.  देवी सतीच्या शरीराचा उजवा पाय येथे पडला होता असे मानले जाते.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

त्रिपुरामध्ये काय खास आहे?

रबर आणि चहा ही राज्यातील महत्त्वाची नगदी पिके आहेत. देशातील नैसर्गिक रबर उत्पादनात त्रिपुरा केरळनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे राज्य हस्तकला, ​​विशेषतः हाताने विणलेले सूती कापड, लाकूड कोरीव काम आणि बांबू उत्पादनांसाठी ओळखले जाते .

त्रिपुरा राज्यात किती जिल्हे आहेत?

त्रिपुरामध्ये पश्चिम त्रिपुरा, उत्तर त्रिपुरा, दक्षिण त्रिपुरा, धलाई, उनाकोटी, खोवाई, सिपाहिजाला आणि गोमती असे 08 जिल्हे आहेत. त्रिपुरा देशाच्या इतर भागाशी रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने जोडलेले आहे.

त्रिपुरा राज्याची स्थापना कधी झाली?

21 जानेवारी 1972 ला या राज्याची स्थापना झाली.

त्रिपुरा कोणत्या राज्याची राजधानी आहे?

आगरतळा हे त्रिपुराची राजधानी आहे. हे भारताच्या ईशान्येकडील प्रदेशात वसलेले एक लहान, पण सुंदर राज्य आहे.

त्रिपुराचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मातीने व्यापले आहे?

त्रिपुरातील उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले मोठ्या प्रमाणात वालुकामय जमिनीत वाढतात परंतु डोंगराळ जंगलातील झाडे स्पष्टपणे तोडल्याने या मृदा संसाधनांची गंभीर धूप समस्या उद्भवू शकते. लालसर पिवळी तपकिरी वालुकामय माती सात मातीची मालिका बनलेली असते.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

1 thought on “त्रिपुरा राज्याची संपूर्ण माहिती Tripura Information In Marathi”

Leave a Comment