Kerala Information In Marathi केरळ हे सुंदर किनारे, उत्कृष्ट पर्यटन आणि निर्सगाने परिपूर्ण असलेले एक राज्य आहे. केरळ संपूर्ण भारतभर एक प्रसिद्ध ठिकाण असून येथे लाखो पर्यटक भेट देत असतात. तसेच केरळमध्ये सांस्कृतिक आणि पारंपारिक उत्सव साजरे करण्यात देखील प्रसिध्द आहे.
केरळ राज्याची संपूर्ण माहिती Kerala Information In Marathi
भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी आहे. तर चला मग पाहूया केरळ या राज्य विषयी माहिती.
विस्तार व क्षेत्रफळ :
केरळ हे राज्य भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. राज्यातील कोची व कोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. भारताचे क्षेत्रफळ 38,863 चौ.किमी आहे.
तापमान :
विषुववृत्तीय हवामान भारतात जास्तीत जास्त प्रमाणात केरळचेच आहे. कमाल तपमान 32.2° से. च्या वर क्वचितच जाते व किमान तपमान 21.1° से. च्या खाली सामान्यतः येत नाही.
पाऊस उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत येतो, तो कोझिकोडे येथे 297 सेंमी. तर त्रिवेंद्रमला 160 सेंमी. असतो. पर्वतप्रदेशात मात्र पर्जन्यवर्षाव 450 सेंमी. पर्यंत होतो. दक्षिण भागातला पाऊस वर्षभर थोडाथोडा पडत राहतो कारण त्या भागाला पावसाळ्याच्या दोन्ही मोसमांचा फायदा मिळतो.
केरळचा इतिहास :
केरळ राज्याचा असा अतिप्राचीन मानवी वस्ती बद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. केरळ व तमिळनाडू हे एकेकाळी सांस्कृतिक व भाषिक दृष्ट्या एकच होते व एकत्रित भूभागाचे नाव तमिळक्कम असे होते.
केरळच्या बाबतीतील पहिला उल्लेख अशोकाच्या शिलालेखात केरळ पुत्रम असा आढळतो. इसवी सनापूर्वीच्या मौर्य साम्राज्या नंतर च्या काळात केरळ प्रांतावर चेरा घराण्याचे राज्य होते. ते द्रविडांतील विल्लवर या समाजातील होते.
त्यांची राजभाषा मल्याळी-तमिळ मिश्रित होती.
चीन, अरबी तसेच रोमन साम्राज्यातील व्यापाऱ्याचे चेरांशी संबध होते असे दिसते. संगम साहित्यांमध्ये रोमन साम्राज्यातील सोन्यांनी भरून येणाऱ्या जहाजांचे वर्णन आहे. ही जहाजे मसाल्यांच्या व्यापारासाठी येत.
रोमन साम्राज्यातील नोंदीनुसार केरळ हे ज्ञातजगाचे पूर्वेकडचे टोक होते. इस्लामी व्यापारी मलिक इब्न दिनार हे 8 व्या शतकात केरळमध्ये स्थायिक झाले व त्यांनी भारतात सर्वात प्रथम इस्लाम आणल्याचे मानले जाते.
भाषा व संस्कृती :
केरळची भाषा मल्याळम आहे जी द्रविड कुटुंबातील एक भाषा आहे. मल्याळम ही केरळची मुख्य भाषा असली तरी येथे अनेक भाषा बोलल्या जातात. केरळमध्ये इंग्रजीला मोठे स्थान आहे. मल्याळमप्रमाणेच इंग्रजी हे शिक्षणाचे मुख्य माध्यम आहे. तमिळ आणि कन्नड भाषांना अल्पसंख्याक भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
केरळमध्ये विविध भाषिक समाज राहतात. केरळमध्ये राहणाऱ्या विविध भाषा समाजांमध्ये खालील भाषा मातृभाषा म्हणून बोलल्या जातात. आदिवासी भाषा, तमिळ, कन्नड, तेलगू, तुळू, कोकणी, गुजराती, मराठी, उर्दू, पंजाबी इ. अरबी, रशियन, सिरीयक, जर्मन, इटालियन, फ्रेंच इत्यादी भाषांचा अभ्यास-अध्यापनही येथे केला जातो.
केरळची संस्कृती संमिश्र आणि विश्वव्यापी आहे आणि ती भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. हे आर्यन आणि द्रविड संस्कृतींचे संश्लेषण आहे. त्याच्या पुरातनपणामुळे आणि मलायली लोकांनी टिकवलेल्या सेंद्रिय निरंतरतेद्वारे परिभाषित. हे शेजारच्या आणि परदेशी संस्कृतीत शतकानुशतके झालेल्या संपर्कात तपशीलवार वर्णन केले गेले होते.
मुख्य पिके :
केरळमधील सर्व भूमी उपयोगात आणलेली असूनही लोकसंख्येच्या भारामुळे राज्य अन्नधान्यांच्या बाबत स्वयंपूर्ण नाही. अन्नधान्य, बव्हंशी, तांदूळ, राज्याला आयात करावा लागतो. भात हेच राज्याचे मुख्य पीक असून त्याखाली तिसरा हिस्सा शेतजमीन आहे. पावसाच्या आणि कालव्यांच्या पाण्यावर वर्षातून दोन पिके काढण्यात येतात. 1965-66 मध्ये हेक्टरी 860 किग्रॅ. उत्पादनाचे प्रमाण पडले.
नारळ, टॅपिओका अथवा कॅसावा (कंद) कच्ची आणि पक्की केळी, सुपाऱ्या, काजूगर, ऊस, शेंगदाणा, काळी मिरी, डाळी, सुंठ, वेलदोडे, रबर, चहा व कॉफी या मालाचेही बरेच उत्पादन झाले. त्याखेरीज इतर धान्ये, हळद, तीळ, कपाशी व तंबाखू ही पिके अल्प प्रमाणात निघतात. 1970 मध्ये राज्यात रबराचे 1,05,932 व कॉफीचे 20,689 आणि चहाचे 2,527 मळे होते.
उद्योग :
केरळमध्ये दहा लाखांवर लोकांना पूर्ण किंवा काही वेळ काम मिळते. चहापत्ती, रबरसंचय, विटा व कौले, काजू भाजून व सोलून डबाबंद करणे, कापीव लाकूड, तांदूळ कांडणे, हातमाग व हस्तव्यवसाय हे आहेत. कारखानदारी उत्पादन रबरी माल, लाकूडतक्ते, खते, रसायने, काच, कागद, ॲल्युमिनियम, साखर, सिमेंट, कापड, साबण, शार्क लिव्हर तेल, दुर्मिळ मृदांचे क्षार, सायकलच्या लोखंडी धावा, चिनी मातीची भांडी, भट्टीच्या विटा, तारेचे दोर, वीज उत्पादनाची सामग्री, पेट्रोलियमजन्य पदार्थ, कृत्रिम धाग्यांसाठी लगदा, कृत्रिम धागे, शेतीची व यंत्रकामाची अवजारे असे विविध स्वरूपाचे आहे. शासकीय क्षेत्रात साबण, खाद्यतेल, चिनी मातीचा माल, रबर व सूत गिरण्या या उद्योगांना विशेष प्राधान्य देण्यात आले असून खाजगी क्षेत्रातही नवीन उद्योगधंदे काढण्यात राज्य उद्योग विकास महामंडळाने प्रोत्साहन दिले आहे.
केरळ मधील खानपान :
केरळ राज्यात शाकाहारी व मांसाहारी दोन्ही अन्न प्रकारांचा समावेश होतो. मासे,कोंबडी आणि अन्य मांसप्रकार येथे खाल्ले जातात. मसाल्यांच्या पदार्थांचा वापर अन्न प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर केला जातो.
भात हा अन्नाचा महत्वाचा घटक असून दिवसाच्या कोणत्याही वेली ते खाला जातो. न्यःरीचे मुख्य पदार्थ तांदळापासून केले जातात. ज्यामध्ये इडली, पुत्तू, अप्पम, इडीअप्पम, वडा यांचा समावेश होतो. चटणी, कडल, पायसम, चिकन करी, माशांची आमटी, रस्सम यासारख्या पदार्थांचा आस्वाद या जोडीने घेतला जातो.
सध्या हा शाकाहारी भोजनाचा प्रकार असून ते केळीच्या पानावर वाढले जाते. या जेवणाच्या शेवटी गोड खीर म्हणजे पायसम खाल्ली जाते. मधल्या वेळच्या खाण्याच्या चटकदार पदार्थात केळ्याचे वेफर्स यासारखे पदार्थ येतात. मांसाहारी पदार्थांमध्येही येथे वैविध्य आढळते. चहासोबत केळीपासून तयार केलेली भजी आस्वादाने खाल्ली जातात. चहाचे मळे उत्तम प्रतीचे आहेत.
सण व उत्सव :
केरळमध्ये कोडुंगल्लूर भरणीचा उत्सव तीन दिवस चालतो. या तीन दिवसांत अनेक ठिकाणी जत्रा राहतात. हा सण भद्रकाली दारिका नावाच्या राक्षसावर विजय मिळवणीला म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. मार्च ते एप्रिल दरम्यान होणाऱ्या या उत्साहात स्थानिक विविध पौष्टिक पदार्थांचा नैवद्य दाखवून पुजा करतात.
तसेच गटगीते तसेच नृत्य सादर करतात. केरळ बोट महोत्सवकेरळ बोट महोत्सव हा सवर्त्र प्रसिध्द सण आहे. या सणामध्ये दक्षिण भारत आणि उत्तर, पूर्व इत्यादी भागातून थरारक बोटीच्या शर्यती होतात. हा उत्सव पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक केरळला प्रमुखपणे भेट देतात. बोटी दरम्यानचे गाणी आकर्षणाचे केंद्र आहे.
जुलै ते सप्टेंबर दरम्यान हा सण साजरा केला जातो. विषुव उत्सवउत्तर भारतातील लोक पहिल्या जानेवारीला नवीन वर्ष म्हणून मानतात. नवीन वर्षाची सुरुवात विष्णू उत्सवापासून होते. ओणम उत्सवानंतर केरळने दुसर्या क्रमांकाचा उत्सव म्हणून घेतला आहे.
या दिवशी पुरुष आणि स्त्रिया पारंपारिक कपडे घालतात आणि एकमेकांना मिठी मारून नमस्कार करतात. या दिवशी घरासमोर रांगोळीही तयार केली जाते आणि फटाक्यांची आतषबाजीही केली जाते.
पर्यटन स्थळ :
केरळमधील अलेप्पीला पूर्वेकडील व्हेनिस म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच व्हेनिसच्या सौंदर्या प्रमाणेच अलेप्पी देखील अतिशय सुंदर आणि पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे. अलेप्पीचा समुद्र किनारा, तलाव आणि हाऊसबोट खूप प्रसिद्ध आहे.
ट्रॅकर्स, निसर्ग सौंदर्याचे चाहते, पशू प्रेमी आणि सहलीची आवड असणाऱ्यांसाठी केरळमधील थेककडी देखील स्वर्गापेक्षा कमी नाही.
मुन्नार येथील उंचच उंच हिरवळीनं नटलेले डोंगर ढगांना स्पर्श करतानाचं दृश्य मनमोहून टाकणारं आहे.
चहा उत्पादनासाठी देखील मुन्नार प्रसिद्ध आहे. चहाच्या मळ्याचा सुगंध आणि निसर्गाचं देखणं रुप पाहण्यासाठी पर्यटक इथं येतात.
वायनाड हे केरळमधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक ठिकाण आहे. प्रदुषणमुक्त वायनाड हे पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण ठरतं.
माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Metro Rail In Marathi
Essay On World Wildlife Day In Marathi
My Country India Essay In Marathi