Maharashtra Information In Marathi महाराष्ट्र राज्य हे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या पावन भूमीवर अनेक जातींच्या- धर्माच्या लोकांनी आश्रय घेतला. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. तर चला मग मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्र राज्या विषयी माहिती.

महाराष्ट्र राज्याची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi
विस्तार व क्षेत्रफळ :
महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे.
राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची 720 कि.मी.ची किनारपट्टी आहे. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.किमी आहे. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. या शिखराची उंची 1646 मीटर आहे.
महाराष्ट्राची लोकसंख्या :
महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीयन किंवा मराठी माणूस असे संबोधतात. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,72,972 आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.
मराठी बोलणाऱ्यांची संख्या 62,481,681 आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ 11 देश आहेत. लोकसंख्येची घनता 370 चौ.कि.मी. इतकी आहे. लोकसंख्येपैकी 5.83 कोटी पुरुष व 5.40 कोटी स्त्रिया आहेत.
महाराष्ट्राची भाषा :
महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी प्रामुख्याने बोलली जाते. इंग्रजी सुद्धा शहरी भागात काही प्रमाणात बोलली जाते.
वायव्य महाराष्ट्रात अहिराणी, बोलीभाषा तर दक्षिण कोकणात कोळी, कोंकणी, मालवणी व विदर्भात वऱ्हाडी आणि झाडीबोली या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.
महाराष्ट्र राज्याचा इतिहास :
महाराष्ट्राचा इतिहास खूप प्राचीन इतिहास आहे. महाराष्ट्रातील विविध स्थळांचा नदी, पर्वत, स्थळ इ. रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. उपलब्ध ऐतिहासिक साधनातून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते.
महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडांत व्यापले होते.
महाराष्ट्राची स्थापना :
15 ऑगस्ट, 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना प्रक्रियेत भाषावार प्रांतरचनेच्या विचाराचे वर्चस्व होते. तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पावित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात 105 व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले.
आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली. अखेर 1 मे, 1960 ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. 1960 च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले. परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही.
महाराष्ट्रातील जिल्हे :
महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्हे आहे, त्यांची नावे पुढील प्रमाणे.
ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, नाशिक, नागपूर, अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, मुंबई शहर, सातारा, अमरावती, सांगली, यवतमाळ, रायगड, बिड, लातूर, चंद्रपूर, धुळे, जालना, परभणी, अकोला, बुलढाणा, उस्मानाबाद, नंदुरबार, रत्नागिरी, गोंदिया, वर्धा, भंडारा, वाशिम, हिंगोली, गडचिरोली, सिंधुदुर्ग, पालघर.
शेती व उद्योग :
महाराष्ट्र राज्य शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.
आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये ही महाराष्ट्रातील महत्वाची पिके आहेत. शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड व तंबाखू ही महाराष्ट्रातील महत्वाची नगदी पिके आहेत.
रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलियम आणि तत्सम उद्योग हे महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग धंदे आहेत. कोळसानिर्मिती व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो.
महाराष्ट्राची संस्कृती :
मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते.
कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात वापरले जातात. संमिश्र अन्न अनेक जणांना आवडते.
महाराष्ट्राची संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. महाराष्ट्रातील काही मंदिरे अनेक शतके जुनी आहेत. मंदिरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो.
मंदिरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबादजवळील अजिंठा व वेरुळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बीबी का मकबरा येथे पहायला मिळते.
महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारुड अभंग आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारताच्या अग्रगण्य असे असून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, पु.ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगूळकर हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात.
खेळ व सण :
भारताच्या इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डीसुद्धा खेळली जाते. लहान मुलांत विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ लोकप्रिय आहेत.
दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव, होळी हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यांपैकी गणेशोत्सव सर्वांत मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण बुद्धी व विद्येचे दैवत असणाऱ्या गणपतीचा आहे. त्याचबरोबर शिवजयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा इ. सण देखील साजरे केले जातात.
वाहतूक :
भारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागांना मध्य रेल्वे सेवा पुरवते. कोकण भागात कोकण रेल्वे तर इतर काही भागांना पश्चिम रेल्वे सेवा देते. सध्या मुंबई शहरात मोनोरेल व पुणे शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहरे व खेड्यांत उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषतः ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी बससेवाही असतात.
महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई असे एकूण पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. नागपूर व पुणे विमानतळांवर देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील होतात.
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ :
माळशेज घाट : महाराष्ट्रातील माळशेज घाट अप्रतीम निसर्गसौंदर्याचे प्रतिक आहे.
लोणावळा :
घाटमाथ्यावरचं हे ठिकाण वनश्रीने अत्यंत संपन्न असुन पावसाच्या दिवसांत उंच उंच डोंगरावरून खाली पडणारे धबधबे हे पर्यटकांचे मन मोहून घेतात.
अंबोली :
सह्याद्रीच्या दक्षिण डोंगररांगांमध्ये 690 मीटर उंचीवर अंबोली हे ठिकाण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेले हे अंबोली थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
पेंच अभयारण्य, गोरेवाडा प्राणिसंग्रहालय : विदर्भात ताडोबा, पेंच, उमरेड करांडलासारखी अभायारण्ये आहेत. या अभयारण्यांना भेट देण्यासाठी देश-विदेशांतून हजारो पर्यटक नागपूरला येतात.
कोल्हापूर :
कोल्हापूरपासून दहा-बारा कि.मी.वर असलेल कणेरीमठ या ठिकाणाची सहल ग्रामीण जीवनशैलीची सुंदर ओळख करून देते.
गणपतीपुळे :
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेले गणपतीपुळे या ठिकाणास नेत्रदीपक समुद्रकिनारा लाभला आहे.
महाबळेश्वर :
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. उंच शिखरे, खोल दऱ्या, हिरवागार निसर्ग, थंड उत्साहवर्धक असे हे ठिकाण आहे.
हरिश्चंद्रगड : अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड म्हणजे ऐतिहासिक पुरावे असणारा किल्ला होय. चांगदेवांच्या अस्तित्वाचा शिलालेख, प्राचीन लेणी व गुहा मंदिरे, श्रीहरिश्चंद्रेश्वराचे शिल्पसमृद्ध मंदिर व अनेक जुनी हत्यारे या किल्ल्यावर पाहायला मिळतात.
याव्यतिरिक्त अजिंठा-वेरूळ, चिखलदरा, लोणार सरोवर बुलढाणा, किल्ले, गढ, शनिवार वाडा इत्यादी पर्यटन स्थळ महाराष्ट्रात आहेत.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Child Labour Essay In Marathi
- Doordarshan Essay In Marathi
- Essay On Metro Rail In Marathi
- Essay On World Wildlife Day In Marathi
- My Country India Essay In Marathi
- Subhash Chandra Bose Essay In Marathi
- My School Essay In Marathi
- Essay On Makar Sankranti In Marathi
FAQ
1. महाराष्ट्राला दोन राजधान्या का आहेत?
मुंबई ही महाराष्ट्राची मुख्य राजधानी आहे. नागपूर ही महाराष्ट्राची हिवाळी राजधानी आहे. मुंबई विदर्भापासून सुमारे 1000 किमी अंतरावर असल्याने या भागातील जनतेला विदर्भात न्याय्य वागणूक आणि विकास होईल की नाही अशी भीती होती. त्यामुळे दुसरी राजधानी म्हणून नागपूरची निवड करण्यात आली.
2. महाराष्ट्राला राज्य का म्हणतात?
एका व्याख्येनुसार, हे नाव महारथी (महान रथ चालक) या शब्दावरून आले आहे, ज्याचा संदर्भ कुशल उत्तरेकडील लढाऊ शक्ती आहे जो दक्षिणेकडे या भागात स्थलांतरित झाला होता.
3. महाराष्ट्रात कोणता सण प्रसिद्ध आहे?
गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा सण आहे. हा सण आद्य देवता गणेशाच्या जन्माचा उत्सव आहे. साधारणपणे ऑगस्टच्या सुरुवातीला तयारी सुरू होते. गुढी पाडवा किंवा चैत्र प्रतिपदा हा महाराष्ट्राचा सुगीचा सण आहे.
4. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अन्न कोणते आहे?
पुरणपोळी, भजी, वडा पाव, मिसळपाव आणि पावभाजी हे सर्वात लोकप्रिय प्रकार आहेत. साबुदाणा खिचडी, पोहे, उपमा, शिरा आणि पाणीपुरी हे अधिक-पारंपारिक पदार्थ आहेत. बहुतेक मराठी फास्ट फूड आणि स्नॅक्स हे लैक्टो-व्हेज आहेत.
5. महाराष्ट्राचा पेहराव कोणता?
स्त्रियांचा पारंपरिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे.