मिझोराम राज्याची संपूर्ण माहिती Mizoram Information In Marathi

Mizoram Information In Marathi  मिझोराममधील ‘मि’ याचा अर्थ माणूस व ‘झो’ म्हणजे डोंगर. डोंगर-प्रदेशात राहणारे लोक असा त्याचा अर्थ होतो. मिझोराममधील 94.20% लोक हे आदिवासी जमातीचे आहेत. येथिल अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेल्या दऱ्याखोऱ्या पर्यटकांच्या मनाला भुरळ घालतात. तर चला मग पाहुया मिझोराम या राज्याविषयीची माहिती.

Mizoram Information In Marathi

मिझोराम राज्याची संपूर्ण माहिती Mizoram Information In Marathi

विस्तार व क्षेत्रफळ :

या प्रदेशाच्या पश्चिमेस बांगला देश व भारतातील त्रिपुरा राज्य,उत्तरेस आसाम व मणिपूर राज्य आणि पूर्वेस व दक्षिणेस ब्रह्मदेश असून, ऐजाल ही या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. मिझोरम राज्याची स्थापना 1987 साली आसाम राज्याला विभागून केली आहे.

मिझोराम हे उत्तरपूर्व राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 21,087 चौरस किमी असून राजधानीचे शहर ऐझवाल हे आहे.

मिझोराम मधील जिल्हे:

मिझोरम मध्ये एकूण 11 जिल्हे आहेत.
आयझॉल, कोलासिब, लॉंगटलाय, लुंगले, ममित, सायहा, सरचिप, चंफई, न्हहथियाल, खवजवल, सैच्युअल.

इतिहास :

मिझोरामचा इतिहास 16 व्या शतकात अस्तित्वात आला.  18व्या आणि 19व्या शतकात मिझोराममध्ये अनेक आदिवासी युद्धे झाली.  1891 मध्ये मिझोराम ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. काही वर्षांनंतर, उत्तरेकडील लुशाई पर्वतीय प्रदेश आसामच्या आणि अर्धा दक्षिणेकडील बंगालच्या ताब्यात राहिला.

1898 च्या मध्यात, मिझोरामची दोन्ही राज्ये एक जिल्हा बनवलम त्यच नाओ-लुशाई हिल्स जिल्हा प्रशासन पुन्हा आसामच्या ताब्यात आली. 1972 च्या मध्यात, ईशान्य प्रदेश पुनर्रचना कायदा लागू झाला आणि त्यानंतर मिझोराम राज्य केंद्रशासित प्रदेश बनले.

लोकसंख्या :

राज्याची प्रमुख भाषा मिझो व इंग्रजी असून 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 1,091,014 इतकी आहे. राज्याची साक्षरता 91.58 टक्के इतकी आहे. राज्यात आठ जिल्हे आहेत. मिझोरम नावाला तीन भागांमध्ये वेगळे करून नावाचा अर्थ लावला गेला आहे. मि म्हणजे लोक, झो म्हणजे पर्वत आणि रम म्हणजे प्रदेश आणि याला जोडून याचा अर्थ होतो पर्वतीय लोकांचा प्रदेश किंवा पर्वतीय लोकांची भूमी.

भूरचना :

मिझोराम हा टेकड्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. बहुतेक टेकड्यांच्या रांगा एकमेकीला समांतर अशा उत्तर-दक्षिण पसरलेल्या असून त्यांचे उतार तीव्र आहेत. नद्यांच्या खननामुळे या टेकड्यांमध्ये अनेक खोल दऱ्या तयार झालेल्या आहेत. टेकड्यांदरम्यान लहानलहान मैदानी द्रोणी प्रदेश असून त्यांतील सुपीक मृदेमध्ये भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

मिझोरामाच्या मध्यातून उत्तर- दिशेने मिझो टेकड्या पसरलेल्या आहेत. या तीव्र उताराच्या टेकड्यांची सरासरी उंची 900 मी. असून ती मध्यभागी जास्त आहे. दक्षिण भागातील ब्लू मौंटन हे या टेकड्यांमधील सर्वोच्च (2265मी.) शिखर आहे. मिझोरामच्या पूर्व व दक्षिण सरहद्दींवर चिन टेकड्या व ब्रह्मदेशातील आराकान पर्वतरांगेचा विस्तारित भाग असून पश्चिम सरहद्दीवर बांगला देशातील चितगाँग टेकड्यांची रांग आहे.

नद्या व सरोवरे :

मिझोराम मधील डोंगराळ भागातील खोल दऱ्यांमधून उत्तरेकडे अथवा दक्षिणेकडे हे नदीप्रवाह वाहत जातात. ढालेश्वरी, सोनई व तुइव्हावल या नद्या मध्यवर्ती डोंगराळ प्रदेशात उगम पावून उत्तरेस वाहत जाऊन आसामच्या काचार जिल्ह्यात बऱ्‍राक नदीला मिळतात, तर कर्णफुली ही नदी प्रदेशाच्या दक्षिण टोकापासून उत्तरेस साधारण मध्यभागापर्यंत वाहत जाते व तेथून पुढे ती पश्चिमेस बांगला देशात प्रवेश करते.

तेथेच तिच्यावर प्रचंड जलविद्युत्‌ प्रकल्प उभारला गेला आहे. कलदन ही नदी ब्रह्मदेशातून मिझोराममध्ये वाहत जाते. द्रोणी प्रदेशात अनेक सरोवरेही निर्माण झालेली दिसून येतात. दक्षिण भागातील पालक हे सर्वांत मोठे सरोवर असून त्याशिवाय ताम्‌डिल, रुंग्‌डिल इ. सरोवरेही महत्त्वाची आहेत.

मिझोराम मधील हवामान :

हिवाळ्यातील तापमान 11° से. ते 24° से. यांदरम्यान,तर उन्हाळ्यातील तापमान 18° से. 29°से. यांदरम्यान असते. खोलगट द्रोणी प्रदेशात किंवा दऱ्याखोऱ्यां मधील हवामान उष्ण व दमट असते परंतु त्यामानाने डोंगरमाथ्यावरील हवामान जवळजवळ वर्षभर थंड असते. बहुधा याच कारणामुळे मिझो लोकांनी आपल्या वसाहती अथवा गावे डोंगरमाथ्यावर वसविलेली दिसून येतात.

या प्रदेशात मार्च ते एप्रिल या काळात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होते. हिवाळ्यात पाऊस पडत नाही तसेच आकाशही निरभ्र असते. स्वच्छ व निळे आकाश आणि सकाळी पडणारे धुके यांमुळे या डोंगराळ प्रदेशांचे हिवाळ्यातील सृष्टिसौंदर्य विशेष विलोभनीय असते.

शेती व मुख्य पिके :

लागवडीखालील क्षेत्राच्या फक्त 17% क्षेत्रालाच जलसिंचनाचा फायदा मिळतो. झूम शेतजमिनी वैयक्तिक मालकीच्या नसून गावठाणाच्या मालकीच्या आहेत. स्थिर पायऱ्यापायऱ्यांची शेतजमीन मात्र शेतकऱ्यांना वाटून दिलेली असते.

डोंगरउताराच्या शेतीत प्रामुख्याने मका व भात ही पिके घेतली जातात. यांशिवाय कडधान्ये, कापूस, तंबाखू, चहा व जलसिंचनाची सोय असलेल्या प्रदेशांत ऊस, मिरची, आले, हळद, बटाटे, केळी, अननस, संत्री, तीळ, कागदी लिंबू इ. पैशाची पिकेही घेतली जातात. कॉफी,रबर,काजू,वेलदोडे यांच्या लागवडीचेही प्रयत्न सुरू आहेत. आले व तीळ यांच्या उत्पादनात चांगली प्रगती दिसून येत आहे.

भाषा :

राज्याच्या प्रमुख भाषा मिझो व इंग्रजी असल्या तरी अजून काही घटक बोली राज्यात बोलल्या जातात.

नृत्य व संगीत :

मिझो पारंपरिक संगीत साधे सोपे आहे. स्थानिक लोक रात्रभर गाणे गात नाचतात. गिटार हे मिझोरामचे लोकप्रिय वाद्य आहे. चर्चच्या प्रार्थनेवेळी जे वाद्य वाजवले जाते त्याला खुआंग नावाने ओळखतात. ते ढोल सारखेच असते.

खुआंग हे वाद्य लाकडापासून आणि प्राण्यांच्या कातडीपासून बनवतात. मिझो लोक हे कोणत्याही वाद्याशिवाय आपले नृत्य करतात. यावेळी गाताना आपल्या तोंडातून ते काही हुंकार काढतात, हाताने टाळ्या वाजवतात. अशा अनौपचारिक संगीताला ते छपचेर म्हणतात.

चेराव नावाचे लोकनृत्य खूप प्रचलित असून या नृत्यावेळी पुरूष जमिनीवर बांबू धरून ठेवतात. दोन्ही हातांनी ते बांबू जवळ घेतात आणि दूर करतात. त्या उघडझाप करणाऱ्या बांबूमध्ये महिला पायांचे ठेके धरून नाचतात. यावेळी महिलांनी आपला पारंपरिक रंगीबेरंगी वेश परिधान केलेला असतो.

स्त्री-पुरूष मिळून एक नाच केला जातो याला खुआल्लाम असे म्हणतात. छेइहलाम व छाइ या नावाचेही मिझो लोकनृत्य आहेत.

वनस्पती व प्राणी:

या प्रदेशात समृद्ध वनस्पतिजीवन आढळते. विविध प्रकारची झाडे, झुडपे व गवत तसेच बाबूंची वने सर्वत्र आहेत. डोंगराळ प्रदेशातील टेकड्या नेहमी हिरव्यागार दिसतात. अलीकडे पाइन वनस्पतींची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. वन्य प्राणी अभयारण्याच्या दृष्टीने येथील वनस्पतिजीवन व हवामान फारच अनुकूल आहे, परंतु मोठ्या प्रमाणावरील शिकारीमुळे प्राण्यांचे व पक्ष्यांचे प्रमाण खूप घटले आहे.

अलीकडे मात्र त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने बंदुकीच्या वापरावर, प्राणी-पक्षी यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने बंदुकीच्या वापरावर, प्राणी-पक्षी यांच्या शिकारीवर कडक निर्बंध घातले आहेत. हत्ती, वाघ, बिबळ्या, अस्वल, रानटी कुत्रे, शेळ्या, विविध प्रकारची माकडे, रानगवा, हरिण, रानडुक्कर इ. प्राणी येथे पुष्कळ प्रमाणात आहेत. यांचा पिकांना मात्र उपद्रव होतो. जंगली फाउल, धनेश, फेझंट, होले इ. पक्षी या प्रदेशात सर्वत्र दिसतात.  मिझोराममधील 32% क्षेत्र जंगलांनी व्यापलेले असून त्यापैकी 15,935 चौ. किमी. क्षेत्र राखीव जंगलांखाली आहे. डांपा वन्य प्राणी अभयारण्याखाली 572 चौ. किमी. आणि तावी वन्य प्राणी अभयारण्याखाली 210 चौ. किमी. क्षेत्र आहे.

मिझोराम मधील पर्यटन स्थळ :

मिझोराम हे एक सुंदर ठिकाण आहे तेथे हवामान अल्हाददायक असते म्हणून ते पर्यटनाच्या मनाला भुरळ घालते. आयझॉल, बारा बाजार, मिझोराम राज्य संग्रहालय, रेईक टुरिस्ट रिसॉर्ट, मुर्लेन नॅशनल पार्क, थेनझॉल.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment