Madhya Pradesh Information In Marathi भारतातील महत्वाचे असे राज्य म्हणून मध्य प्रदेशाची ओळख आहे. मध्यप्रदेश राज्याची राजधानी भोपाळ आहे. देशातील मध्यवर्ती स्थानामुळे याला मध्य प्रदेश हे नाव पडले. तसेच मध्यप्रदेशला भारताचे हृदय देखील म्हटले जाते. भारतीय हे राज्य, भारतीय द्विरकल्पातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या तापी, नर्मदा, वैनगंगा ,महानदी इ. नद्यांचे उगमस्थान आहे. तर चला मग पाहुया मध्यप्रदेश राज्य विषयीची माहिती.

मध्यप्रदेश राज्याची संपूर्ण माहिती Madhya Pradesh Information In Marathi
विस्तार व क्षेत्रफळ :
राज्याच्या उत्तरेला उत्तर प्रदेश ,ईशान्येला उत्तर प्रदेश व बिहार, पूर्वेला बिहार व ओरिसा, दक्षिणेला आंध्र प्रदेश, नैऋत्येला, महाराष्ट्र, पश्चिमेला गुजरात आणि वायव्येला राजस्थान ही भारतातील घटक राज्ये आहेत. मध्यप्रदेश या राज्याचे क्षेत्रफळ 4,42,841 चौ.किमी. आहे.
मध्य प्रदेश हे भारत देशामधील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे व 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत 6 व्या क्रमांकावर आहे. ह्याला भारताचे ह्रदय देखील म्हटले जाते, कारण ते भारत देशाच्या मध्यावर आहे. मध्य प्रदेशात वाघांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. म्हणून या राज्याला टायगर स्टेट या नावाने सुद्धा ओळखले जाते.
मध्यप्रदेशचा इतिहास :
ऋग्वेदातील दक्षिणापथाचा उल्लेख, आर्यानी विंध्य पर्वत ओलांडल्याचा उल्लेख कात्यायनाने (इ.स.पू. चौथे शतक) या भागाची वर्मिलेली माहिती, सुत्तानिपाठ या पाली भाषेतील बौध्द ग्रंथातील या प्रदेशाचे वर्णन यांवरून याच्या प्राचीन इतिहासाची कल्पना येते.
दोन लाख वर्षापूवी मध्य प्लाइस्टोसीन काळात हुशंगाबाद व नरसिंगपूर यांच्या दरम्यान असलेल्या नर्मदा खोऱ्यात मानव राहत होता, हे थेल-केंब्रिज मोहिमेने सप्रमाण दाखविले आहे.
सिवनी व चंबळ खोऱ्यात जी हत्यारे 1952 नंतर सापडली त्यावरून प्राचीन मानवाचे या भागातही वास्तव्य असावे, असा तर्क आहे. भीमबेटका येथे प्रागैतिहासिक काळातील गुहा सापडल्या आहेत. रेवा, मंदसोर, नरसिंहगढ, भोपाळ, हुशंगाबाद, सागर ,सुरगुजा आणि रायगढ या जिल्हांत सापडलेल्या गुहा आठ हजार वर्षापूर्वीची मानवाची आश्रयस्थाने असावीत असा तर्क आहे.
सागर जिल्ह्यात 1866 मध्ये तर 1867-68 मध्ये रेवाजवळ तसेच उज्जैन, महेश्वर, कायथा, नागदा, एकण इ. ठिकाणी अश्मयुगातील व ताम्रपाषाण युगातील संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.
प्रदेश मधील जिल्हे :
मध्य प्रदेश राज्यात् खालील 48 जिल्हे आहेत ते पुढीलप्रमाणे.
अनुपपुर, अशोकनगर, बालाघाट, बडवानी, बैतूल, भिंड, भोपाळ, बऱ्हाणपूर, छत्रपूर, छिंदवाडा, दमोह, दातिया, देवास, धार, दिंडोरी, गुणा, ग्वाल्हेर, हरदा, होशंगाबाद, इंदूर, जबलपूर, झाबुआ, कटनी, खांडवा (पूर्व निमर), खरगोन (पश्चिम निमर), मंडला, मंदसौर, मोरेना, नरसिंगपूर, नीमच, पन्ना, रेवा, राजगढ, रतलाम, रायसेन, सागर, सतना, सिहोर, शिवनी, शाहडोल, शाजापूर, शिवपूर, शिवपुरी, सिधी, टिकमगढ, उज्जैन, उमरिया, विदीशा.
प्रमुख नद्या :
मध्य प्रदेश राज्य येथील बहुतेक नद्या उत्तरवाहिनी आहेत. तापी, नर्मदा, चंबळ, वैनगंगा, महानदी या येथील प्रमुख नद्या होत. तापी, नर्मदा,या दोन्ही नद्या पश्चिमवाहिनी असून त्या सातपुडा पर्वतरांगांत उगम पावतात. चंबळ, नदी राज्याच्या वायव्य भागात उगम पावून उत्तरेस वहात जाते.
वैनगंगा नदी महादेव डोंगररांगेत उगम पावून दक्षिणेस वाहत जाते व पुढे गोदावरी नदीस जाऊन मिळते. महानदी राज्याच्या आग्नेय भागात उगम पावून प्रथम उत्तरेस व नंतर पूर्वेस ओरिसा राज्यात वहात जाते.
या नद्यांशिवाय राज्याच्या वायव्य भागातून कालीसिंध, पार्वती, उत्तर भागातून बेटचा सिंद, घसान, केन, शोण व पूर्व भागातून हसदेव, रिहांड, पैरी इ. नद्या उत्तरेकडे वहात जातात. याव्यतिरिक्त शबरी इंद्रावती ह्या नद्या आढळतात. या नद्यांशिवाय राज्यात काही नैसर्गिक व कृत्रिम सरोवरेही आहेत. आग्नेय भागातील तंदुला तलाव, ईशान्य भागातील रिहांड धरणाचा जलाशय, वायव्य भागातील चंबळ नदीवरील गांधीसागर इ. जलाशय महत्वाचे आहेत.
लोक व समाजजीवन :
देशातील इतर राज्यांपेक्षा मध्य प्रदेश राज्यात मागासलेल्या जाति-जमातींची संख्या जास्त आहे. आदिवासी जाति-जमातींचे लोक राज्यातील एकूण लोकसंख्येचा 33% असून त्यांची वस्ती राज्याच्या दक्षिण भागात, विशेषतः बस्तर जिल्ह्यात, तसेच सातपुडा पर्वतरांगांत एकवटलेली आहे.
राज्यातील लोकांत मुख्यत्वे दोन वांशिक गट असल्याचे दिसून येते. उत्तर भागात व नर्मदेच्या खोऱ्यात राहणारे लोक आर्यवंशाचे, तर दक्षिण व पूर्व भागांत राहणारे लोक द्रविड आहेत.
द्रविड लोकांत आदिवासी जाति-जमातीपैकी गोंड लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. राज्यात भिल्ल, बैगा, गोंड, कोरकू, कोल, कमार, मुडिया, माडिया या प्रमुख आदिवासी जाती व जमाती आहेत.
यापैकी गोंड, मुडिया, माडिया यांची संख्या बस्तर जिल्ह्यात जास्त असल्याचे दिसून येते. यांशिवाय सुरगुजा जिल्ह्यातील पाओ व कोरवा, जशपूर परिसरातील उराव, बेतूलमधील मुंडा आणि कोरकू, मंडलामधील गोंड व बैगा, छत्तीसगढ जिल्ह्यातील परजा, भात्रा व झाबुआ, भोपाळ व माळव्यातील भिल्ल, भिलाला आणि शिवपूरी भागांतील सहरिया इ. जमाती प्रमुख आहेत.
पोशाख व सण :
ग्रामीण भागातील पुरूष धोतर, शर्ट व डोक्याला टोपी असा पारंपारिक पोषाख वापरतात. तर स्त्रिया पाचवारी साडी नेसतात. काही समारंभप्रसंगी घट्ट पायजमा, शेरवानी घालण्याची प्रथा आहे. मध्यमवर्गीयांच्या व शहरात राहणाऱ्या लोकांच्या पोषाखांत पाश्चात्यांचे अनुकरण असल्याचे दिसून येते. राज्यात महाशिवरात्र, होळी, कृष्णजन्माष्टमी, दसरा, दिवाळी इ. सण मोठ्या उत्सहाने साजरे केले जातात.
भाषा :
मध्यप्रदेश राज्याची प्रमुख भाषा हिंदी ही आहे. हिंदी तेथील बहुसंख्य लोकात प्रचलित आहे. पूर्व-हिंदीच्या अवधी, बाघेली व छत्तीसगढी या बोली प्रामुख्याने बाघेलखंड, सुरगुजा, छत्तीसगढ, जबलपूर आणि मंडला जिल्ह्यात बोलल्या जातात.
पश्चिमी हिंदीची बुंदेली ही बोली प्रामुख्याने राज्याच्या मध्यवर्ती जिल्ह्यांतून बोलली जाते. मालवी ही बोली राज्याच्या पश्चिमेकडील भागात प्रचलित आहे. आदिवासीत भिल्ली, गोंडी, हलवी या भाषा बोलल्या जातात. यांशिवाय मराठी, उर्दू, ओडिया, तमिळ, गुजराती, इंग्रजी, तेलुगू बंगाली या भाषाही बोलल्या जातात.
प्राणी व वनस्पती :
येथील जंगलात वाघ, बिवळ्या, गवा, ठिपक्यांचे हरिण, अस्वल, रानरेडे, सांबर, एण इ. वन्यप्राणी दिसून येतात. यांशिवाय राज्यात अनेक प्रकारचे पक्षीही आहेत. वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी राज्यांत कान्हा, बांधोगढ (रेवा) इ. अभयारण्येही निर्माण करण्यात आली आहेत. कान्हा हे दलदलीतील हरिणांसाठी, तर बांधोगढ हे पांढऱ्या वाघांसाठी प्रसिध्द आहे.
येथील वनस्पती उष्ण कटिबंधीय जंगलप्रकारांतील असून त्यांत साल, ऐन, बिबळा, बिजा, बांबू, साग, सलाई त्याचा उपयोग राळ व औषध निर्मितीसाठी केला जातो. वनस्पतीचा समावेश असतो. साग व सालई हे वृक्ष राज्यांच्या जंगल उत्पन्नाचे महत्वाचे घटक आहेत. येथील सागाच्या लाकडाला देशभर मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येते.
पर्यटन स्थळ :
मध्य प्रदेशातील सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. मध्य प्रदेशात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात.
कान्हा नॅशनल पार्क :
कान्हा अभयारण्य हे जैवविविधता आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. बांबूची जंगले, गवताळ मैदाने, वन्यजीव यामुळे कान्हा अभयारण्य मन जिंकून घेते. या नॅशनल पार्कची स्थापना 1955 मध्ये झाली होती. 1974 मध्ये इथेच कान्हा टायगर रिझर्व्हची स्थापना करण्यात आली होती.
येथील प्रसिद्ध हरणांचे संरक्षण या पार्कमुळे करण्यात येते आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. येथील वाघ प्रसिद्ध आहेत. सध्या कान्हा नॅशनल पार्कमध्ये 1000 पेक्षा जास्त फुलांची झाडे आहेत.
ग्वाल्हेरचा किल्ला :
ग्वाल्हेरचा किल्ला या सौंदर्याचे प्रतिक बनला आहे. येथील वास्तुकला आपल्याला मंत्रमुग्ध करते.
ओरच्छा :
ओरछा स्मारके, मंदिरे, किल्ले, महल आणि अभयारण्य यासाठी प्रसिद्ध आहे. येथील मंदिरे आणि हवेल्या आपल्या भव्यतेमुळे प्रचंड लोकप्रिय आहेत. ओरछा हे मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यातील बेतवा नंदीच्या काठावर वसलेले सुंदर पर्यटन स्थळ आहे.
पंचमढी :
हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. निसर्गरम्य वातावरण, जंगले, ऐतिहासिक ठिकाणे यासाठी हे प्रसिद्ध आहे.
मांडू :
मांडू किंवा मांडवगढ हे इसवीसनापूर्वी सहाव्या शतकातील वास्तुकला, शिल्पकला आणि इतिहास यांचा खजिना आहे. येथील ऐतिहासिक इमारती आपल्याला इतिहासात घेऊन जातात. मांडूच्या राजांच्या समृद्ध आणि भव्य वारशाची ओळख येथे आपल्याला पटते. मध्य प्रदेशातील सुंदर इमारतींपैकी काही इमारती येथे आहेत.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Child Labour Essay In Marathi
- Doordarshan Essay In Marathi
- Essay On Metro Rail In Marathi
- Essay On World Wildlife Day In Marathi
- My Country India Essay In Marathi
- Subhash Chandra Bose Essay In Marathi
- My School Essay In Marathi
- Essay On Makar Sankranti In Marathi
FAQ
मध्य प्रदेश या राज्यांत किती जिल्हे आहेत?
भारताच्या मध्य प्रदेश राज्यात ५१ जिल्हे आहेत.
मध्य प्रदेश कोणत्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे?
मध्य प्रदेश हे भारताचे “टायगर स्टेट ” आहे. मध्य प्रदेशात युनेस्कोच्या तीन जागतिक वारसा स्थळे आहेत: भीमबेटका, सांची आणि खजुराहो. पेंच नॅशनल पार्कने रुडयार्ड किपलिंगच्या ‘द जंगल बुक’ ला प्रेरणा दिली आणि खरा मोगली सिवनीच्या जंगलात सापडला. स्नूकरचा शोध जबलपूर येथे लागला.
मध्य प्रदेशातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
छिंदवाडा हा मध्य प्रदेशातील सर्वात मोठा जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ११,८१५ चौरस किमी आहे.
मध्यप्रदेश राज्याची राजधानी काय आहे?
मध्यप्रदेश राज्याची राजधानी भोपाळ आहे.
मध्य प्रदेशचे चलन कोणते आहे?
मध्य प्रदेश, भारताचे एक राज्य असल्याने, त्याचे अधिकृत चलन म्हणून ‘ भारतीय रुपया ‘ (INR) आहे.