नागपूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Nagpur District Information In Marathi

Nagpur District Information In Marathi भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून आणि दुसरे हरित शहर म्हणून नागपूरला मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असल्याने महाराष्ट्राच्या विदर्भातील व्यावसायिक आणि राजकीय हालचालींचे प्रमुख केंद्र अशीही नागपूरची ओळख आहे.तर चला मग नागपूर या जिल्ह्या विषयी सविस्तर माहिती पाहूया.

Nagpur District Information In Marathi

नागपूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Nagpur District Information In Marathi

विदर्भात विशेषत: नागपूर जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने या शहरातून देशभरात संत्र्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असतो. यामुळेच संपूर्ण देशात नागपूरची ओळख संत्रा नगरी अशीही आहे.

क्षेत्रफळ व विस्तार :

नागपूर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 9,928 चौ. किमी 20° 35′ उ. ते 21° 44′ उ. व 78° 15′ पू. ते 79° 40′ पू. यांदरम्यान विस्तारलेल्या या जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी 150 किमी. व दक्षिणोत्तर रुंदी 131 किमी. आहे.

याच्या पूर्वेस भंडारा, आग्नेयीस व दक्षिणेस चंद्रपूर, नैर्ऋत्येस व पश्चिमेस वर्धा, वायव्येस अमरावती हे महाराष्ट्रातील जिल्हे असून, उत्तरेस व ईशान्येस मध्य प्रदेशातील अनुक्रमे छिंदवाडा व सिवनी हे जिल्हे आहेत.

लोकसंख्या :

नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 46,53,171 एवढे असून साक्षरतेचे प्रमाण 89.5% लिंग गुणोत्तर प्रमाण 1000 पुरुषामागे 948 एवढ्या स्त्रिया आहेत. नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता 470 आहे. मुख्य मातृभाषा मराठी असुन हिंदी देखील मोठया प्रमाणात बोलली जाते.

हवामान :

देशातील मध्यवर्ती स्थानामुळे नागपूर जिल्ह्याचे हवामान सामान्यपणे कोरडे व अतिशय विषम आहे. मे महिन्यात कमाल सरासरी तपमान 42.7° से. असते. दिवसाचे कमाल तपमान 47.7° से. पर्यंत नोंदलेले आहे.

जानेवारी महिन्यात किमान तपमान 3.9° से. पर्यंत उतरल्याची नोंद आहे. संक्रांत झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून उष्णता वाढू लागते आणि मे महिन्यापर्यंत उष्ण हवामान असते. मे महिना सर्वांत जास्त तपमानाचा असतो.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणारा पाऊस सप्टेंबर अखेरपर्यंत चालू असतो व वातावरणात दमटपणा आढळतो. दिवाळीपासून संक्रांतीपर्यंत ऑक्टोबर ते जानेवारी हिवाळ्याचे दिवस असतात. हिवाळ्याचा कालावधी अल्प असला, तरी त्या काळात हवामान आल्हाददायक असते. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी तपमान 26.8° से. आहे.

See also  परभणी जिल्ह्याची संपूर्ण माहिती Parbhani District Information In Marathi

नागपूर जिल्ह्यातील तालुके :

नागपूर जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. नागपुर, नागपुर ग्रामीण, उमरेड, कळमेश्वर, काटोल, कामठी, कुही, नरखेड, पारशिवणी, भिवापुर, मौदा, रामटेक, सावनेर, हिंगणा.

खनिज संपत्ती :

खनिज संपत्तीच्या दृष्टीने नागपूर जिल्हा समृद्ध आहे. बोखारा, कामठी व उमरेड येथे दगडी कोळसा रामडोंगरी, कोदेगव्हाण, मनसर, कांद्री, खापा, गुमगाव, पारशिवनी येथे मंगल कोराडी येथे अभ्रक भिवापूर येथे लोखंड कांद्री, पटगौरी, देवलापार येथे चुनखडी चोरखैरी, खैरी, खापरी, बाजारगाव येथे चिकण माती यांखेरीज फेल्स्पार, गारगोटी, टंगस्टन, अँटिमनी वगैरे खनिजेही मिळतात.

नागपूर जिल्ह्याचा इतिहास :

नागपूर शहराचा पहिला संदर्भ दहाव्या शतकात शेजारील वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे आढळून आलेल्या ताम्रपटावर उल्लेखित आहे. 862 मध्ये राष्ट्रकुटचे राजे कृष्णा यांच्या काळात नागपूर आणि नंदीवर्धनाच्या विसाया जिल्ह्यात असलेल्या गावात हा उल्लेख अजूनही आहे. तिसऱ्या शतकाच्या अखेरीस राजे वाकाटाका घराण्याचे राजे विद्याशक्ती यांनी नागपूरवर राज्य केले असल्याचे म्हटले जाते.

चोथ्या शतकात वाकाटाका साम्राज्याचे नागपूर प्रांत आणि आसपासच्या परिसरावर राज्य होते. त्यांचे गुप्ता साम्राज्यासोबत चांगले संबंध होते. वाकाटाका साम्राच्याचे राजे पृथ्वीसेन नागपूरपासून 28 किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरधन असे नाव असलेल्या आपल्या राजधानीकडे वळले.

वाकाटाका साम्राज्यानंतर हा प्रांत बदामीचे चालुक्य,राष्ट्रकुट यांच्या अधिकारात आले आणि त्यानंतर या प्रांतावर यादवांचे साम्राज्य आले. इ.सनपूर्व 1296 मध्ये अलाउद्दिन खिल्जीने यादव साम्राज्यावर आक्रमण केले आणि देवगिरीवर ताबा मिळविला.

यानंतर 1317 मध्ये तुघलक साम्राज्य सत्तेत आले. सतराव्या शतकात मुघलांनी या प्रांतावर आपले राज्य प्रस्थापित केले. तथापि, प्रांतीय प्रशासनाची सूत्रे मध्यप्रदेशच्या छिदवाडा जिल्ह्यातील देवगड नागपूरच्या गोंड राजांकडेच होती.

See also  चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Chandrapur District Information In Marathi

वनस्पती व प्राणी :

नागपूर जिल्ह्यातील सावनेर व रामटेक तालुक्यांत दाट जंगले आहेत, तर काटोल व उमरेड तालुक्यांत विरळ आहेत. त्या भागांत गवती कुरणेही आहेत. जिल्ह्यातील जंगलात साग, ऐन, शिसव, सालई, बाभूळ, धावडा, खैर, बोर, बांबू, पळस, मोह, टेंबुर्णी, बेल इ. वनस्पती आहेत.

रामटेक तालुक्यातील साग उधई न लागणारे म्हणून, लाकडी सामानाकरिता उपयोगी आहे. सालईच्या लाकडाची खोकी संत्री रवाना करण्यासाठी वापरतात. रंग, लाख, चारोळी, डिंक, मध, गुंजा वगैरे वस्तू व जळाऊ लाकूड आणि कोळसा, जंगलातील वनस्पतींपासून मिळतो. टेंबुर्णीची पाने विड्यांसाठी उपयोगी पडतात.

जिल्ह्यातील तलावांत अनेक प्रकारचे मासे मिळतात. काही ठिकाणी मत्स्यसंवर्धन केंद्रे आहेत. जंगलात वाघ, चित्ता, तरस, अस्वल, बारशिंगा, चितळ, सांबर, काळवीट, चिंकारा, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, ससा, साळिंदर इ. वन्यपशू, अनेक प्रकारचे पक्षी व सर्प आहेत. वन्यप्राणि संरक्षणासाठी पेंच राष्ट्रीय उद्यान हे अभयारण्य राखलेले आहे.

नद्या व जलस्त्रोत :

जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर काही भागात वर्धा नदी वाहते, तर पूर्व सरहद्दीवर थोड्या भागात वैनगंगा नदीचा प्रवाह आहे. काटोल तालुक्यातील जाम नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन वर्धेस मिळते. वुन्ना नदी नागपूर व उमरेड तालुक्यांतून वाहत येऊन वर्धेलाच मिळते. दक्षिणेकडील नंद नदी वर्धेला मिळते.

जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागांतील सुर, आंब, पेंच, कन्हान, कोलार, चंद्रभागा, सांड, नाग व ईशान्य सीमेवरील बावनथरी वगैरे प्रमुख नद्या वैनगंगेच्या उपनद्या किंवा उपोपनद्या आहेत. पेंच, कन्हान, कोलार आणि वुन्ना या जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत.

सुर नदीवरील रामसागर हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा तलाव आहे. त्याशिवाय नागपूर शहराला पाणी पुरवठा करणारे अंबाझरी तलाव व गोरेवाडा तलाव हे महत्त्वाचे जलाशय आहेत. वुन्ना नदीवरही बांध घालून तलाव निर्माण केलेला आहे. यांशिवाय अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याने भरणारे उमरेड, कुही, भिवापूर, मांढळ, पांढरबोडी, मनसर इ. लहानमोठे तलाव आढळतात.

See also  हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती Hingoli District Information In Marathi

वाहतूक व्यवस्था :

नागपूर जिल्ह्यातून हजिरा-धुळे-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6, वाराणसी-कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 7, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 69 आणि नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 204 गेलेला आहे.

शेती व व्यवसाय :

नागपूर जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय शेती असून ज्वारी हे पीक सर्व तालुक्यांत होते, पण प्रामुख्याने काटोल, सावनेर व नागपूर तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर होते तर गहू रामटेक, नागपूर व उमरेड तालुक्यांत होते.

कापूस हा प्रामुख्याने काटोल, सावनेर, नागपूर तालुक्यांत व धान-रामटेक व उमरेड येथे होते. ज्वारी, तूर, कापूस, भुईमूग व धान ही खरीप पिके आहेत तर गहू, हरभरा, जवस, वाटाणा ही रब्बी पिके आहेत.

उद्योग :

या जिल्ह्यात सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने आहेत. वाडी, अंबाझरी येथे संरक्षण साहित्य म निर्मितीचा कारखाना आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हान, कामठी, नरखेड, कळमेश्वर, उमरेड, बुटीबोरी, रामटेक या सात ठिकाणी औद्योगिक वसाहती असून, बुटी बोरी येथे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. नागपूर जिल्ह्यात मिहान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उदयास येत आहे.

नागपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ :

नागपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पुढीलप्रमाणे आहेत.

‘लेक गार्डन’, सक्करदरा, गांधीसागर तलाव, सातपुडा बॉटनिकल गार्डन,  खेकरा नाला तलाव, नागपूर, खिंडसी तलाव, तालुका रामटेक, नागपूर, तोतलाडोह, रामटेक तालुका, नवेगाव बांध, तालुका पारशिवनी, गोरेवाडा तलाव, सेमिनरी हिल, फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव, ‘लेक गार्डन’, सक्करदरा .

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

Essay On Makar Sankranti In Marathi

Leave a Comment