लातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Latur District Information In Marathi

Latur District Information In Marathi शिक्षणाकरता लातुर पॅटर्न हे नाव प्रसिध्द आहे. गेल्या काही वर्षांमधे लातुर शिक्षणाच्या नवनवीन क्षेत्रामुळे विध्यार्थ्यांना आकर्षीत करते आहे. महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद विभागात लातुर हा एक महत्वाचा जिल्हा आहे.

Latur District Information In Marathi

लातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Latur District Information In Marathi

लातूर हे जिल्हा मुख्यालय व महाराष्ट्र राज्यातील 16 वे मोठे नगर आहे. जिल्हा प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. एकूण लोकसंख्येच्या 25.47% लोकसंख्या शहरी आहे. पुर्वी राज्य करणारा राष्ट्रकुट राजा दंतीदुर्ग लट्टालुर त्यावरूनच आजचे नाव लातुर असावे.
तर चला मग पाहूया लातूर या जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती.

क्षेत्रफळ व विस्तार :

क्षेत्रफळ 7,372चौ. किमी. असून त्याची पूर्व पश्चिम लांबी सु. 112 किमी. व उत्तर दक्षिण रूंदी 113 किमी. आहे. विस्तार 18° 0.5′ उत्तर ते 19°15′ उत्तर अक्षांश आणि 76° 25′ पूर्व ते 77° 35′ पूर्व रेखांशां दरम्यान आहे.

त्याचा पश्चिमेस उस्मनाबाद, वायव्येस बीड, उत्तरेस परभणी, ईशान्येस नांदेड हे जिल्हे आणि आग्नेयीस कर्नाटक राज्य आहे. हा प्रदेश पूर्वीचा हैदराबाद संस्थानचा भाग असून स्वांतंत्र्योत्तर काळात तालुक्यांची पुर्नरचना करण्यात आली.

लोकसंख्या :

नागरी भागातील 2,13,049 लोकसंख्योपैकी 52.56% लोक लातूर शहरात, 23.73% उदगीर व उर्वरित 23.71 % लोक अहमदपूर, औसा व निलंगा शहरांत राहतात. जिल्ह्यात स्त्री पुरुषांचे नागरी आणि ग्रामीण भागांतील प्रमाण अनुक्रमे 1,000 पुरूषांमागे 971 व 899 होते.

लातूर जिल्ह्याचा इतिहास :

लातूर जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. त्यानंतर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले.

जिल्हा मुख्यालय लातूर हे “लट्टा” वा राष्ट्रकूट राजांचे मूळ निवासस्थान होते. राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष पहिला हा लट्टालूट नगरचा अधिपती “स्वामी” असल्याचे नमूद आहे व त्यानेच हे शहर निर्माण केले.

इ.स. 753 मध्ये बदामीच्या चालुक्यानंतर आलेले राष्ट्रकुट राजे स्वतःला लट्टालूट पूर्वाशिष म्हणजे लट्टालूट निवासी असेच म्हणवून घेत. चालुक्य घराण्यातील “विक्रमादित्य” 6 व्या नंतर त्याचा पुत्र सोमेश्वर तिसरा हा गादीवर आला. त्याने “अभिलाषीतीर्थ” हा ग्रंथ लिहिला, त्यामुळे त्याला “सर्वज्ञ चक्रवर्ती” असे म्हणत.

लातूर जिल्ह्यात त्याचे राज्य असल्याचा व त्याच्या कारकिर्दीची नोंद असलेला कोरीव लेख सापडला आहे. त्यामध्ये लातूर येथील पापविनाशी देवीचे मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. सदर कोरीव लेख शके 1049 (इ.स.1129) मध्ये कोरल्याचा उल्लेख आहे. चालुक्यानंतर हा भाग देवगिरीच्या यादवाच्ंया अधिपत्याखाली आला.

तालुका गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. नगरात येणारे पाणी मांजरा नदीतून येते. 20 व्या व 35 व्या शतकांत प्रदूषणाचा सामना केला.  तावरजा, तिरू,  घरणी, मनार, रेणा या इतर प्रमुख नद्या आहेत. सिंचनासठी व पिण्यासाठी या नद्यांवर धरणे बांधली आहेत.

देनरगण, घरणी, मसलगा, सोलवरील साकोळ, तावरजा व तिरू यांचा मोठ्या धरणांत समावेश होतो.  मन्याड, लेंडी व तिरू या उत्तर पठारावरील 3 प्रमुख नद्या आहेत.

हवामान :

जिल्ह्याचे हवामान सौम्य व कोरडे आहे. साधारणत डिसेंबर-जानेवारी हे थंड महिने तर मे व जून हे सर्वात उष्ण महिने असतात. मात्र विदर्भातील अति – उष्ण हवामान येथे आढळत नाही.

उन्हाळ्यात दैनिक सरासरी कमाल तापमान 40° से. व किमान 25° से. एवढे असते. काही वेळा उन्हाळ्यातील तापमान 45° से. पर्यंत जाते. तर हिवाळ्यात ते 13° से. पर्यंत उतरते. या जिल्ह्यात 90° टक्के पाऊस नैॠत्य मॉन्सूनचा पडतो.

जूनच्या मध्यास पर्जन्यवृष्टीस प्रारंभ होऊन पावसाळा ऑक्टोबरअखेर संपतो. औसा व निलंगा तालुक्यात सरासरी पर्जन्यमान 80 सें मी. असून लातूर, अहमदपूर आणि उदगीर तालुक्यात ते सरासरी 90 सें मी. आहे. एकूण जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 74 सें मी. आढळते. उन्हाळ्यात चक्रवात आणि नैॠत्य मोसमी वाऱ्यांच्या सुरूवातीच्या काळात झंझावत येतात.

तालुके :

अहमदपूर, उदगीर, औसा, चाकूर, जळकोट, देवणी, निलंगा, रेणापूर, लातूर, शिरूर.

प्रमुख नद्या :

मांजरा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी असून तेरणा, तावरजा व धरणी या उपनद्यांसह ती बाला घाट पठारावरून जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहते. तेरणा ही उपनदी औसा तालुक्यातून जिल्ह्याच्या दक्षिणेकडील सरहद्दी वरून वाहत जाते आणि पुढे निलंगा तालुक्यात पूर्व सरहद्दीवर मांजरा नदीस मिळते.

मन्याड व लेंडी या लहान उपनद्या असून मन्याड अहमदपूर तालुक्यात उगम पावते व उत्तरेकडे नांदेड जिल्ह्यात जाते, तर लेंडी अहमदपूर व उदगीर तालुक्यांतून वाहते.

शेती व्यवसाय :

लातूर जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान असून 80 % टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात ते घेतले जाते. दुसोट्याचे क्षेत्र 899 हेक्टर असून त्याची सर्वसाधारण टक्केवारी 30.41 आहे. खरीप हंगामात ज्वारी, कापूस, मूग, तूर, भात, भुईमूग इ. पिके घेतली जातात.

रब्बी हंगामात प्रामुख्याने रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, यांची पिके घेतात. जिल्ह्यात एकूण 6.67 लाख हेक्टर जमीन लागवडीखाली असून त्यापैकी 94% क्षेत्रात 1988 मध्ये पीक लागवड झाली होती.

इतर उद्योग :

भारताच्या सर्वात मोठे सोयाबिनचे व्यापार केन्द्र लातुर आहे. या नगरास महाराष्ट्राचा साखर पट्टा म्हटलं जाते. तालुक्यात 2 साखर कारखाने आहेत, जे त्यास भारताच्या सर्वाधिक साखर उत्पादक तालुक्यांपैकी एक बनवतात.

इथे तेलबिया, विक्रेय वस्तु व फळ मण्डईसुद्धा आहे. लातुर उच्च दर्जाच्या द्राक्षासाठी विख्यात आहे व अनेक खासगी शित साठवण सुविधेची सोय करतो.

लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे :

श्री केशव बालाजी मंदिर :

श्री केशव बालाजी मंदिर महाराष्ट्रतील लातूर जिल्ह्याच्या जवळ औसा शहरामध्ये बांधले आहे. मंदिर डोंगरावर वेढलेले आहे. याच परिसरात भगवान गणेश, भगवान शिव, भगवान विठ्ठल व देवी रूक्मिणी आणि केशवानंद बापूचे चारही मंदिर आहेत.

जगदंबा माता मंदिर :

राष्ट्रकूटच्या कालखंडात गंज गोलाईचे जगदंबामातेचे मंदिर बांधण्यात आले. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरचा एक भाग म्हणून ओळखले जाते. गंज गोलाई देवी मंदिरात दरवर्षी प्रचंड उत्सुकतेने नवरात्री महोत्सव साजरा केला जातो.

तुळजापूर :

तुळजा भवानी मातेच्या मंदिरामुळे तुळजापूर प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज या देवीच्या दर्शनार्थ येत असत.

नळदुर्ग किल्ला :

उस्मानाबाद पासून 46 कि.मी. अंतरावर असलेले नळदुर्ग किल्ल्यातील पाणी महाल प्रेक्षणीय व प्रसिद्ध आहे. हा प्रंचड किल्ला अडीच कि.मी. घेराचा असून अजुनही सुस्थितीत आहे.

उस्मानाबाद लेणी :

उस्मानाबाद शहरापासून अवघ्या 8 कि.मी. अंतरावर एक प्राचीन लेणी आहे. उपलब्ध कागदपत्रावरून ही लेणी 7 व्या शतकातील असावी. पहिली लेणी पश्चिमेला लहान व अपूर्ण अवस्थेत आहे. त्यांच्या बाजूला दुसरी लेणी आहे.

परंडा किल्ला :

कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा हा एक महत्त्वाचा परगणा होता. तेथील किल्ला हा 35 मिटर लांब तेवढाच रुंद आहे. बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने तो बांधला इ.स. 1600 च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 1628 साली शहाजी राजांनी तो ताब्यात घेतला व दोन वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता.

विराट हनुमान मंदिर, लातूर :

हे परिवार गृह संस्था, औसा मार्ग, लातुर इथे स्थित आहे. देवालयाची रचना इतरांपेक्षा बरीच वेगळी आहे. उत्तम उद्यानाने मन्दिर आच्छादित आहे. मुर्ती 28 फुट उंच व सेंदुरी रंगाची आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

Essay On Makar Sankranti In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment