होली सी देशाची संपूर्ण माहिती Holy See Information In Marathi

Holy See Information In Marathi होली सी या देशाला व्हॅटिकन सिटी म्हणून सुद्धा ओडखले जाते. या देशाची लोकसंख्या ही तीन अंकी आहे. आणि तरी त्या जागेला देश म्हणून मान्यता मिळाली आहे. होली सी हा ख्रिश्चन धर्मियांची पंढरी म्हणून ओडखळा जातो. चला तर मित्रांनो आणि विशेष व सविस्तर माहिती आपण या देशा बद्दल जाणून घेऊ या.

Holy See Information In Marathi

होली सी देशाची संपूर्ण माहिती Holy See Information In Marathi

ही तीच जागा आहे जिथून जगभरातील ख्रिश्चन धर्मीय लोकांना धर्मोपदेश दिला जातो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जगातील सर्वात छोटा देश म्हणून सुद्धा ओडख होते. इटली मधील सर्वात लांब तिबर नदीच्या तीरावर वसलेला हा देश अगदीच नयनरम्य आहे.

होली सी हा देश इटली देशातून वेगळा झालेला देश आहे. 11 फेब्रुवारी 1929 रोजी व्हॅटिकन इटलीपासून वेगळा होऊन एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला. होली सी बासिलिका ऑफ सेंट पीटर हे येथील प्रमुख चर्च आहे.

विस्तार व क्षेत्रफळ :

होली सी या देशाचे क्षेत्रफळ एकूण 44 हेक्‍टर एवढे आहे. म्हणजे 3.2 किलोमीटर येवढे तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने या देशाचा क्रमांक 231 वा लागतो. हा जगातील सर्वात लहान देश म्हणून ओळखला जातो. हॉली सी देशाच्या सीमेला लागून इटली हा देश आहे.

लोकसंख्या :

होली सी या देशाची लोकसंख्या जुलै 2009 जनगणनेनुसार 12,826 येवढी आहे. जगात एक असा देश आहे. त्याची लोकसंख्या ही 3 अंकी आहे. आणि तरी त्या जागेला देश म्हणून मान्यता मिळाली आहे. येथे जास्तीत जास्त ख्रिचन समाजाचे लोग राहतात.

आणखी पण वेगळा जाती व धर्माचे लोग इथे राहतात. लोकसंख्याच्या बाबतीत होली सी या देशाचा जगात 230 वा क्रमांक लागतो. होली सी या देशाची व्हॅटिकन सिटी ही राजधानी आहे. 11 फेब्रुवरी 1929 हा येथील स्वातंत्र्य दिवस म्हणून ओळखला जातो.

हवामान :

होली सी या देशाचे हवामान रोमप्रमाणेच आहे. येथे ऑक्टोबर आणि मे च्या महिण्या पर्यंत उष्ण व वातावरण असते. तर हिवाळ्यात अधूनमधून पाऊस पडतो आणि मे ते सप्टेंबर हवामान गरम, पण कोरडे असते. दव आणि धुक्याचेही अस्तित्व असते. महिन्यातील सूर्यप्रकाशाचे सरासरी तापमान हे 37° ते 39° येवढे राहते. आणि येथे पावसाळा मध्ये मोठ्या प्रमाणत पाऊस होतो.

See also  ऑस्ट्रेलिया देशाची संपूर्ण माहिती Australia Information In Marathi

भाषा :

होली सी या देशाची मुख्य भाषा इटालियन आणि लिपी इंग्रजीप्रमाणे रोमन आहे. देशात अधिकृत वेबसाइटमध्ये इटालियन, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिश भाषांचा समावेश आहे. हा देश इटली मधून वेगळा झाला आहे म्हणून येथे जास्तीत जास्त इटालियन भाषा बोलली जाते.

उद्योग व व्यवसाय :

होली सी या देशात अधिका-अधिक भागत 57 ऐकर बागांनी व्यापलेला आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय नसून येथ मुख्यपणे व्यापार केला जातो. कारंजी आणि सुंदर मूर्ती व पुतळ्यांमुळे त्यांची शोभा वाढलेली आहे. पश्चिम आणि दक्षिण-उत्तर उंच दगडी भिंती उभारलेल्या आहेत. राजसत्तेप्रमाणेच, पोपच्या आधिपत्याखाली राजकीय, व्यवस्थापकीय, कायदा सुव्यवस्था यांचा कारभार चालतो.

जगातील सर्व राष्ट्रांपेक्षा व्हॅटिकन मध्ये जास्त वाइन रिचवली जाते. सेंट पीटर बाझिलिका उभारण्यात एकाहून एक जगप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ सहभागी झाले. ब्रामांट मायकलेंजलो, ज्याकोमो डेल पोर्ता आणि बर्निनी यांनी मध्ययुगीन वास्तुकलेचे आदर्श निर्माण केले.

सिस्टीन चॅपेल हे भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. तिथले छत आणि लास्ट जजमेंट यांचा निर्माता मायकलेंजलोच आहे. त्याचे विविध कलांमधील कर्तृत्व इतके अजोड आहे, की त्याचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. लाकूड, दगड, धातू या माध्यमांमधून त्याने सुंदर कलाकृती बनवल्या आहेत.

इतिहास :

होली सी हा देश 11 फेब्रुवारी 1929 मध्ये रोजी इटलीपासून वेगळा होऊन एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला. इ.स. 8 व्या शतकात रोमच्या भोवताली असलेल्या प्रदेशांनी चर्चच्या शासनाचा स्वीकार केला.

त्याला पेपल स्टेट्स असे नाव होते. सन 1870 मध्ये इटलीने हे शासन आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे चर्च आणि इटलीत तणाव निर्माण झाला. रोमन कॅथॉलिक चर्च आपल्या सर्वोच्च धर्मगुरूला येशू ख्रिस्ताचा प्रतिनिधी मानत असे.

See also  अफगानिस्तान देशाची संपूर्ण माहिती Afghanistan Information In Marathi

कुठल्याही राज्याच्या अधिकाराखाली राहणे त्यांना मान्य नव्हते. म्हणूनच सन 1929 ला दोघांच्यात समझोता होऊन, सेंट पीटर चर्चच्या लगतची 109 एकर जागा त्यांना देऊन एका नव्या राष्ट्राची निर्मिती करण्यात आली. अशा रीतीने हॉली सी उदयास आली. तिथूनच जगभरातल्या सर्व कॅथॉलिक चर्चेसचे संचालन केले जाते.

इ. स. 30 ते 64 या काळात पोप म्हणून सेंट पीटरने कार्यभार चालवला. पीटर हा ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी एक आणि पहिला धर्मप्रसारक होता. त्यानंतर सम्राट कॉन्स्टन्टाइनने सेंट पीटरच्या समाधीवर अतिभव्य वास्तू उभारली.

एका लांब-रुंद दिवाणखान्यात दुतर्फा उंच खांबांची रांग आणि त्यावर अर्धवर्तुळाकार घुमट अशी त्याची रचना आहे. 16 व्या शतकात तिथेच पुनर्बांधणी होऊन, ख्रिस्ती धर्मीयांची जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वास्तू बांधण्यात आली. व्हॅटिकन ने लोकांना उपयुक्त अशा स्वतःच्या यंत्रणा उभारलेल्या आहेत.

टेलिफोन केंद्र, पोस्ट ऑफिस, रेडिओ, सार्वजनिक बागा, बँक व्यवस्था, औषधविक्री यांच्याबरोबर पोपच्या सुरक्षेसाठी खास दल उभारलेले आहे. अन्नधान्य, पाणी, वीज आणि गॅस या सगळ्या गोष्टी तिथे आयात कराव्या लागतात. बहुसंख्य रहिवासी हे स्त्री व पुरुष धर्मोपदेशकच आहेत. बाकीचे कार्यालयीन सेवक, व्यावसायिक आणि विविध सेवा पुरवणारे लोक तिथे राहतात.

व्हॅटिकन राज्य ग्रंथालयात सुमारे दीड लाख दुर्मीळ हस्तलिखितांचा खजिना आहे. ख्रिस्तपूर्व आणि इसवी सनाच्या आरंभीच्या काळातील सुमारे 16 लाख छापील पुस्तके तिथे उपलब्ध आहेत.

व्हॅटिकन स्वतःचे दैनिक प्रसिद्ध करते. 1984 मध्ये ‘युनेस्को’ने व्हॅटिकन सिटी ला जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या देशाने तटस्थ भूमिका घेतली. जर्मनीसह सर्व फौजांनी हॉली सी देशाचा चा आदर करून, तिथले काहीही उद्ध्वस्त केले नाही. युद्ध संपल्यानंतर सन 1946 मध्ये ‘पोप पायस 12 ने नव्या 32 कार्डिनल्सची नियुक्ती केली.

चलन :

होली सी या दशाचे चलन युरो आहे. जे भारतीय चलनाच्या तुलनेत 1 युनायटेड स्टेट डॉलर्स समान भारतीय 77.70 रुपया येवढे आहे. जगभरातील 130 कोटी रोमन कॅथॉलिक भक्तांकडून येणाऱ्या ऐच्छिक देणग्यांमधून राज्याचा सर्व खर्च चालतो. ठेवींवरील व्याज, तिकिटे आणि नाण्यांची विक्री, संग्रहालय प्रवेश शुल्क, ग्रंथ प्रकाशन यांमधूनही प्रचंड उत्पन्न होत असते.

See also  पाकिस्तान देशाची संपूर्ण माहिती Pakistan Information In Marathi

खेळ :

होली सी या देशा मध्ये प्रामुख्याने व्हॉलीबॉल हा खेळ जातो. या खेळात जाळ्याच्या दोन्ही बाजूला खेळण्याची जागा असते, तेथून दोन संघांत व्हॉलीबॉलचा सामना खेळला जातो. प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात. या देशात हा खेळ लोकप्रिय आहे.

पर्यटन स्थळ :

होली सी हा देश ख्रिश्चन धर्मियांची पंढरी ही तीच जागा आहे. जिथून जगभरातील ख्रिश्चन धर्मीय लोकांना धर्मोपदेश दिला जातो. येथे एक मोठा बासिलिका ऑफ सेंट पीटर चर्च आहे. जिथे लोग प्रार्थना करण्यासाठी जात असतात.

होली सी हे कलेचे माहेरघर आहे. सेंट पीटर बाझिलिका उभारण्यात एकाहून एक जगप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ सहभागी झाले. हे एक लोकप्रीय ठिकाण आहे.

होली सी ही पुस्तक प्रेमींसाठी पर्वणी आहे. इथे असलेल्या वाचनालयात जगातील सर्वोत्तम पुस्तकं उपलब्ध आहेत. याचा मोठ्या प्रमाणत लोक उपयोग घेत असतात.

व्हॅटिकन सिटी ही अजून एका कारणासाठी लोकप्रिय आहे, ती म्हणजे तिथल्या संग्रहालयासाठी. UNESCO ने वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केलेल्या या संग्रहालयात दरवर्षी लाखो लोक भेट देत असतात.

व्हॅटिकन सिटी ही एखाद्या मोठ्या राजवाड्यासारखी आहे.  राजवाड्यात एकूण 1400 खोल्या आहेत. ज्या खूप प्रसिध्द आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment