Pakistan Information In Marathi 14 ऑगस्ट 1947 रोजी भारताची फाळणी होऊन पाकिस्तान हे राष्ट्र अस्तित्वात आले. इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी तर कराची ही सर्वात मोठे शहर आहे. तर चला मग पाहुया पाकिस्तान या देशाविषयी माहिती.
पाकिस्तान देशाची संपूर्ण माहिती Pakistan Information In Marathi
पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे 16 कोटी असून लोकसंख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा सहावा क्रमांक लागतो. इंडोनेशिया पाठोपाठ जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते. बोलीभाषा, वंश, भूगोल, वन्यप्राणी यात प्रचंड विविधता पाकिस्तानात आढळते.
पाकिस्तानचे क्षेत्रफळ व विस्तार :
पाकिस्तानचे क्षेत्रफळ 7,96,095 असून नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने 24° उ. 37° उ. व 61° पू. ते 75°30′ पू. यांदरम्यान पसरला आहे. याच्या पूर्वेस भारत, पश्चिमेस इराण, वायव्येस व उत्तरेस अफगाणिस्तान हे देश आणि दक्षिणेस अरबी समुद्र आहे.
पाकिस्तानची लोकसंख्या :
पाकिस्तानची लोकसंख्या जुलै 2015 च्या जनगणनेनुसार 19,90,85,847 एवढी असून जगात पाकिस्तानचा लोकसंख्येच्या बाबतीत सहावा क्रमांक लागतो.
हवामान :
पाकिस्तानचे हवामान उष्ण कटिबंधीय खंडीय स्वरूपाचे आहे. तापमान विषम असून उन्हाळ्यात जुलैचे तापमान 25° ते 30° से. च्या दरम्यान आढळते, तर हिवाळ्यात जानेवारी महिन्यात 4° सें. पर्यंत खाली येते. जून-जुलैमध्ये लाहोरच्या दक्षिणेस दैनिक कमाल तापमान 45°से. पेक्षा जास्त असते.
पाकिस्तानमध्ये सरासरी 51 सेंमी. वृष्टी होते, पण वायव्येकडील व उत्तरेकडील डोंगराळ भागांत वार्षिक प्रमाण 75 ते 90 सेंमी. इतके जास्त आढळते, तर लाहोरच्या दक्षिणेकडील भागात ते 10 सेंमी. पेक्षाही कमी आहे.
पूर्वेस व दक्षिणेस उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण जास्त आहे, तर वायव्येस व उत्तरेस भूमध्य समुद्रावरून पश्चिमेकडून येणाऱ्या आवर्तांमुळे जास्त वृष्टी होते.
भाषा :
पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय, प्रादेशिक भाषा मोठ्या प्रमाणात आहेत, इंग्रजी ही काऱ्यालाईन भाषा असून उर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा आहे, या व्यतिरिक्त पंजाबी, सिंधी, बलूची, काश्मिरी, बाहूर्या, सिना, बाल्ठि, खोवर, भटकी, मारवाडी इत्यादी प्रादेशिक भाषा मानल्या जातात.
पाकिस्तानातील नद्या :
पाकिस्तान पूर्णतः सिंधू नदीच्या जलप्रणालिवर अवलंबून आहे. मकरानच्या किनाऱ्यावरील पोराली, हिंगोल यांसारख्या छोट्या नद्या सोडल्या, तर पाकिस्तानमधील जलवहन सिंधू व तिच्या उपनद्यांद्वारे होते. सिंधू गिलगिटच्या दक्षिणेस पाकिस्तानमध्ये प्रवेश करते व दक्षिण नैर्ऋत्य दिशेस वाहून अरबी समुद्रास मिळते.
तिला अटकजवळ काबूल व डेरा इस्माइलखानजवळ गुमल या नद्या पश्चिमेकडून मिळतात. झेलम, चिनाब, रावी आणि सतलज या इतर प्रमुख नद्या असून यांचा संयुक्त प्रवाह मिठानकोटजवळ पूर्वेकडून सिंधूस मिळतो. हैदराबादपासून दक्षिणेस सिंधूचा त्रिभुज प्रदेश सुरू होतो.
शेती :
भारताप्रमाणे पाकिस्तानमध्येही शेती हाच मुख्य व्यवसाय असून त्यामध्ये गहू, तांदूळ, कापूस आणि ऊस ही मुख्य पिके घेतली जातात.
सामाजिक संस्कृती जीवन पद्धती :
पाकिस्तानमधील सामाजिक रचनेचा, संस्कृतीचा अभ्यास करताना प्रामुख्याने भाषा तेथील वांशिक गट, धार्मिक संप्रदायिक गट, धार्मिक अल्पसंख्याकच्या अशा स्वरुपात पहावे लागते पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक विविधता आढळून येते.
पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान मुहाजिर पंजाबी रस्थून्स आणि सिंधी तसेच लहान गट जसे धार्मिक आणि संप्रदाएक गट आहे अहमदिस ख्रिस्ती हिंदू कलश फारशी शीख आणि रशियन मुस्लिम पंथ ismailis and bohars यांचा समावेश आहे.
आधुनिक राष्ट्र म्हणून पाकिस्तानचा इतिहास जवळ जवळ आर्धा लष्करी नियम पळणारा आहे . एकूणच पाकिस्तानमध्ये धार्मिक सांप्रदायिक ethno भाषिक विविधता आढळून येते.
पाकिस्तानचा इतिहास :
कालानुक्रमे भारतातील साम्राज्ये, हखामनी साम्राज्य, खिलाफत, मंगोल, मुघल, मराठा साम्राज्य, दुराणी साम्राज्य, शीख आणि ब्रिटिश वसाहत यांची पाकिस्तानावर सत्ता होती. इ.स. 1947 मध्ये पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली झाली.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या शेवटी ब्रिटिश भारताची फाळणी होऊन पाकिस्तान या मुस्लिमबहुल स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली. भारताच्या वायव्येला पश्चिम पाकिस्तान आणि पूर्वेला पूर्व पाकिस्तान यांचा मिळून पाकिस्तान देश बनला.
हे दोन्ही विभाग भौगोलिकदृष्ट्या मध्ये असलेल्या भारतामुळे विलग झाले होते. इ.स. 1965 मध्ये पाकिस्तानच्या राज्यघटनेला जनमान्यता मिळाल्यानंतर पाकिस्तान हे इस्लामी प्रजासत्ताक झाले. इ.स. 1972 मध्ये सशस्त्र क्रांतीनंतर पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली.
वनस्पती व प्राणी :
पाकिस्तानात पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे तेथील जंगले खूपच विरळ आहे. उत्तरेकडे व वायव्येस 1,000 मी. पेक्षा जास्त उंचीच्या चित्रळ, दीर या भागांत स्प्रूस, फर, देवदार ही सूचिपर्णी व ओक, चेस्टनट, अक्रोड ही कठीण लाकडाची झाडे आहेत.
बलुचिस्तानमध्ये काही भागांत पाइन व जूनिपरची जंगले आहेत. नदीकाठी मैदानी प्रदेशात व विशेषतः सिंधुकाठी शिसव व बाभूळ झाडांचे जंगल असून त्याला ‘बेला’ म्हणतात. वाळवंटी व ओसाड प्रदेशांत जांद, करील, बकीन ही झुडुपे आढळतात, त्यांस ‘राख’ जंगले म्हणतात .
जंगलांचा अभाव असल्यामुळे पाकिस्तानातील प्राणिजीवनही फारसे समृद्ध नाही. भारतात असणारे वाळवंटी हरिण, अस्वल, लांडगे, वाघ, क्वचित पांढरे वाघ व उत्तरेस सायबीरियन आयबेक्स हे प्राणी आढळतात. सिंधूच्या त्रिभुज प्रदेशात रानडुक्कर, अजगर, सुसर इ. प्राणी असून पाणकोंबडे, खोकड, रानमांजर, कोल्हा हे प्राणीही आढळतात.
लष्कर :
जगात पाकिस्तानी लष्कराचा सातवा क्रमांक लागतो. पायदळ, नौसेना आणि वायुदल हे प्रमुख विभाग असून अंतर्गत सुरक्षा आणि सीमावर्ती टेहाळणीसाठी निमलष्करी दलाचा वापर केला जातो. नॅशनल कमांड ऑथोरिटी ही संस्था लष्करभरती, प्रशिक्षण, आण्विक शस्त्रनिर्मिती करणाऱ्या संस्थांचा विकास तसेच पाकिस्तानी आण्विक कार्यक्रम यांच्या नियोजनासाठी जबाबदार आहे.
खेळ :
पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ हॉकी असून क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. इ.स. 1992 मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला, इ.स. 1999 मध्ये पाकिस्तानने दुसरे स्थान पटकावले.
इ.स. 1987 आणि इ.स. 1996 मध्ये पाकिस्तानने यजमानपद भूषविले. इ.स. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रथमच खेळल्या गेलेल्या आयसीसी ट्वेंटी-20 विश्वकरंडकामध्ये उपविजतेपद पटकावले, इ.स. 2009 मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी ट्वेंटी-20 विश्वकरंडकामध्ये पाकिस्तान विजेते ठरले.
पर्यटन स्थळ :
पाकिस्तानच्या निसर्गरम्य ठिकाणाचे जगभरातून कौतुक होत आहे. पाकिस्तानमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, जी खूप प्रसिद्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही ठिकाणांबद्दल जे खूप प्रसिद्ध आहेत.
नीलम व्हॅली :
नीलम व्हॅली हे अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि या देशातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. निलन व्हॅली काश्मीरमध्ये आहे आणि सुमारे 240 किमी लांबीमध्ये पसरलेली आहे. नीलम व्हॅलीजवळही अनेक महत्त्वाची प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. ही दरी हिरव्यागार पर्वतांनी वेढलेली आहे आणि या ठिकाणी अनेक पाण्याचे झरे वाहतात.
गोजल व्हॅली :
गोजल व्हॅली हे पाकिस्तानच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. ही दरी चीन आणि अफगाणिस्तान देशाच्या सीमेजवळ आहे आणि या ठिकाणाहून अतिशय सुंदर नैसर्गिक दृश्ये दिसतात. या दऱ्या समुद्रसपाटीपासून सुमारे 15,397 फूट उंचीवर आहेत आणि बहुतेक वेळा या ठिकाणी बर्फ पडतो. या ठिकाणी अनेक नद्या आणि तलाव आहेत जे गोजल व्हॅलीचे सौंदर्य आणखी वाढवतात.
व्हाईट पॅलेस स्वात :
व्हाइट पॅलेस हे स्वात पाकिस्तानला भेट द्यायलाच हवे अशा ठिकाणांपैकी एक आहे. हा राजवाडा पाकिस्तानमधील मिंगोरा शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. व्हाईट पॅलेस 1941 मध्ये स्वातचा पहिला राजा मियांगुल अब्दुल वदूद यांनी बांधला होता.
राम गवताचे मैदान :
राम ग्रासकादन हे राम गावाजवळ आहे आणि हे ठिकाण पिकनिकसाठी योग्य आहे. या मैदानाला राम कुरण असेही म्हणतात. या मैदानावरून अनेक पर्वतरांगाही दिसतात. या व्यतिरिक्त अजून बरेच पर्यटन स्थळ आहेत.
मोहेंजोदारो :
मोहेंजोदारो हे पुरातत्व स्थळ आहे. हे ठिकाण 1980 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केले होते. मोहेंजोदारो ही सिंधू संस्कृतीची सर्वात मोठी वस्ती होती आणि जगातील सर्वात जुन्या प्रमुख शहरांपैकी एक आहे.
बादशाही मज्जित :
पाकिस्तानच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये बादशाही मशीद खूप प्रसिद्ध ही मुघल मशीद लाहोरमध्ये आहे. बादशाह मशीद 1671 मध्ये सम्राट औरंगजेबने बांधली आणि ही मशीद 1673 मध्ये पूर्ण झाली. या व्यतिरिक्त पाकिस्तानात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामध्ये जहांगीरची कबर, राणीकोट किल्ला, हिरण टॉवर आहेत.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.