Philippines Information In Marathi फिलिपिन्स हा देश पॅसिफिक महासागरातील द्वीप असून प्रजासत्ताक देश आहे. हा देश 7,100 बेटांचा समूह आहे. ही बेटे ज्वालामुखी व प्रवाळद्विप यांपासून बनलेले आहे. त्यामुळे अजूनही या पर्वतरांगांमध्ये भूगर्भातील हालचाली जाणवतात. तर चला मग या देशाविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.
फिलिपिन्स देशाची संपूर्ण माहिती Philippines Information In Marathi
या खडकांची निर्मिती तिसऱ्या-चौथ्या कालखंडात ज्वालामुखी उद्रेककापासून निर्माण झाली. या देशात अनेक पर्यटन स्थळे तसेच ऐतिहासिक स्थळ असून हा देश कला परंपरा जपणारा देश आहे.
क्षेत्रफळ व विस्तार :
फिलिपिन्स या देशाचे क्षेत्रफळ हे 3,00,000 चौरस किमी आहे. या देशाचा विस्तार हा 4° 25′ उत्तर ते 21° 20′ उत्तर अक्षांश व 116° 55′ पूर्व ते 126° 40′ पुर्व रेखांश या दरम्यान आहे.
देशाच्या सीमा :
फिलिपिन्स या देशाच्या पूर्वेला फिलिपिन्स समुद्र व दक्षिणेला से लेबिज समुद्र आणि पश्चिमेस व उत्तरेस चिनी समुद्र असून ही बेटे दक्षिण-उत्तर 1855 किमी. व 1,108 किमी. पूर्व-पश्चिम परिसरात पसरलेले आहेत.
हवामान :
फिलिपिन्स हा देश द्वीपसमूह असल्यामुळे तेथील हवामान उष्णप्रदेशीय सागरी प्रकारचे असले तरी तेथील हवामानात आपल्याला भिन्नता पाहायला मिळते. या भागात जून ते डिसेंबर मध्ये होणारी सगरी वादळे या हवामानातील बदलेला कारणीभूत असतात.
डोंगराळ भागातील तापमान समुद्रसपाटी वरील तापमानापेक्षा कमी असते देशात जास्तीत जास्त 38 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाते. तेच मार्च ते जून इंग्लिश उन्हाळ्यामध्ये देशाचे सरासरी तापमान 30 अंश सेल्सिअस पर्यंत असते. हिवाळ्यामध्ये 16 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येते.
देशातील पावसाचे प्रमाण हे प्रदेशानुसार उंच-सखल प्रदेश व ऋतूनुसार बदलणार्या वाऱ्यांच्या देशांवर अवलंबून असते. देशाच्या पूर्वेकडील भागात वर्षभर पाऊस पडतो. त्याचप्रमाणे ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत त्याचे प्रमाण जास्त असते.
खनिज संपत्ती :
फिलिपिन्स हा देश खनिज संपत्तीच्या बाबतीत समृद्ध देश असून या देशात सोने चांदी ही खनिजे सापडतात. त्याव्यतिरिक्त क्रोमियम, लोह, मॅंगनीज, निकेल, तांबे व शिसे यासारखे औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे धातु कमी-अधिक प्रमाणात आढळून येतात. दगडी कोळश्यामध्ये हलक्या प्रतीचा कोळसा येथे सापडतो. त्या व्यक्तीचा जिप्सम फॉस्फेट ही खनिजे व नैसर्गिक खतही येथे उपलब्ध आहे.
भूवर्णन :
फिलिपिन्स देशाची भूवर्णन करायचे झाले तर उत्तरेकडील ओझोन आणि दक्षिणेकडील मिंदानाओ यामध्ये पसरलेली फडके ही हालचालींमुळे खंडित होऊन शरण झाल्यामुळे समुद्रात बुडालेल्या पर्वतांचा एक भाग आहे. हा देश अनेक द्वीपसमूह मिळून बनलेला आहे. या देशातील मोठ्या 11 बेटांचे तीन समूहामध्ये विभाजन केले जाते.
शेती :
या देशातील बहुसंख्य लोक हे शेती या व्यवसायावर अवलंबून असून येथील जमिनीच्या 34 टक्के जमीन लागवडीखाली आणली गेलेले आहे. येथील लोकांचे मुख्य पीक हे तांदूळ असून त्यांचे मुख्य अन्न सुद्धा तांदुळाचा आहे. याशिवाय तंबाखू सुद्धा येथील महत्त्वाचे पीक आहे असे म्हणण्यास हरकत नाही. त्याव्यतिरिक्त संत्री आंबे पपई सफरचंद केळी फणस यांच्या ही बागा येथे दिसून येतात.
वनस्पती :
फिलिपिन्स या देशातील 60 टक्के भाग हा वनांनी व्यापलेला असून येथील पर्वतमय उंच प्रदेशात फाईन हे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात तर सर्वत्र बांबू व वेत हे वृक्ष आढळतात नारळी कच्छ वनस्पती आणि निपा नावाचे ताळ वृक्ष हे समुद्र किनारी प्रदेशात आढळतात.
वाहतूक व्यवस्था :
फिलिपीन्स या देशात जलवाहतूक ही मुख्य वाहतूक मानली जाते. या देशात सडका व लोहमार्ग सुद्धा आहेत. लोहमार्ग लूझॉन व पानाय या बेटांवर आपल्याला दिसून येतात. रिजन मध्ये 1976 साली 1057 किमी व पाना या बेटावर एकशे पंधरा किमी लांबीचे लोहमार्ग अस्तित्वात होते. लोहमार्ग बरोबरच 1,19,220 किलोमीटर लांबीचे रस्ते असून येथे वाहनांची संख्या बरीच मोठी होती.
बेटावर वाहतुकी मध्ये मोटार सेवाही खूप महत्त्वाचे असून देशात 97 राष्ट्रीय व 502 नगरपालिकेची बंदर होती. येथील आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाचे बंदर ते मानिला आहे. याव्यतिरिक्त इलोइलो, बाकोलोद, सेबू, डाव्हाऊ, लगॅस्पी, सांबोआंगा ही तेथील मोठे बंदरे आहेत. याच बरोबर देशात 79 विमानतळ होते त्यापैकी मानिला येथे व सेबू बेटावरील माक्टान येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.
लोक व समाजव्यवस्था :
फिलिपिन्स या देशांमध्ये सर्वात जास्त ख्रिस्ती लोकसंख्या आहे. या देशातील जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा जास्त आहे. या देशातील लोकसंख्या ही ग्रामीण भागात कमी तर शहरी विभागात जास्त असते. येथील लोकांना फिलिपिनो म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे हे लोक मलेशियन वंशाचे असून आग्नेय आशिया मधून येथे आले असावेत असा अंदाज आहे.
चिनी व फिलिपिनो यांच्या संकराच्या लोकांना मेस्तीसो म्हणतात. त्याचबरोबर फिलिपिनो आणि अमेरिकन यांच्या संकराचेही लोक तेथे आढळतात. येथील लोकांचे तीन गटात विभाजन केले जाते ते म्हणजे पेगन ख्रिस्ती आणि मुस्लिम.
लूझॉन या बेटावर ईफूगाऊ, बान्टाक, कलिंग, ईबलॉई अपायाओ, ईलोंगोट इ. मिंदानाओ या बेटावर मांडाय, मनोबो, बगोबो, बीलान, सूबानून इ. तर पालावानवर बटाक, पालावान ह्या प्रमुख जमाती आढळतात. फिलिपिन्स देशामधील स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान आहे.
येथे एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात असून ग्रामीण भागातील लोक पामची पाने व बांबूपासून बनवलेल्या झोपडीत राहतात. ह्या झोपड्या जमिनीपासून उंचावर बांबूच्या सहाय्याने बांधल्या असतात कारण त्यांचे दरडी पासून संरक्षण व्हावे म्हणून. या झोपडीत जाण्यासाठी शेळी चा उपयोग केला जातो शहरात मात्र आधुनिक इमारती आपल्याला दिसतात. शहरी भागातील पोशाख व ग्रामीण भागातील पोशाख की यामध्ये बराच फरक दिसून येतो.
मुख अन्न :
फिलिपिन्स या देशाचे मुख्य अन्न हे भात असून त्याच्या आहारामध्ये मासे, फळे-भाजीपाला, कोंबडी डुकराचे मास यांचाही समावेश असतो. या आहारामध्ये भरलेले डुकराचे मास व कोंबडी हे त्यांचे विशेष आवडते अन्न आहे. त्याव्यतिरिक्त नारळी पासून टूबा नावाची दारू बनवली जाते.
भाषा :
फिलिपिन्स या देशातील लोक फिलिपीनो नावाने ओळखले जातात. तसेच फिलिपीन्स या देशात मुख्य आठ भाषा बोलल्या जातात. या देशातील मुख्य भाषा ही फिलिपिनो, स्पॅनिश व इंग्रजी अशा तीन आहेत. त्यापैकी फिलिपिनो या भाषेला राष्ट्रीय दर्जा देण्यात आलेला आहे.
कला व खेळ :
या देशातील लोक कला क्षेत्रातही प्राविण्य पूर्ण आहेत. देशात वास्तुकला चित्रकला नृत्य कला यांसारख्या कलांमध्ये वैशिष्ट्य आढळून येते. हे वैशिष्ट्य म्हणजे तेथील स्थानिक परंपरा स्पॅनिश आणि अमेरिकन प्रभावाखाली निर्माण झालेल्या आधुनिक कलांच्या प्रेरणा आणि समृद्ध अशा लोककलांचा वारसा यांचे मिश्रण आहे.
येथील लोक नृत्यामध्ये नुपून आहेत. येथील लोकनृत्य ही संथलयची व विशेष कौशल्यपूर्ण असतात. फँडँगो सा इलॉ या ना त्या डोक्यावर व हातात तेलाचे दिवे घेऊन नाचतात. खेळांमध्ये झाले तर कोंबडीच्या झुंज हा एक रोमांचक खेळ असून बास्केटबॉल सर्वात लोकप्रिय खेळ आहे.
पर्यटन स्थळ :
फिलिपीन्स या देशात अनेक ऐतिहासिक स्थळ असून मानिला ऐतिहासिक व देशाच्या राजधानीचे शहर असून येथे प्रथम क्रमांकाचे बंदर आहे. तसेच त्याला पूर्वेकडील रत्न म्हणून सुद्धा ओळखले जाते हे बंदर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात.
फिलिपीन्सची जुनी राजधानी केसॉन सिटी हे मानीलाचे उपनगर असून येथे फिलिपिन्स हे विद्यालय आहे. फिलीपिन्स देशातील रिसाल उद्यान, पुरातत्वीय व मानव शास्त्रीय राष्ट्रीय संग्रहालय तसेच राष्ट्रीय ग्रंथालय खूपच प्रसिद्ध आहेत. येथील ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी असते.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.