Argentina Information In Marathi अर्जेटिना हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने दक्षिण अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा व जगातील आठव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. या देशातील मुख्य धर्म हा ख्रिश्चन असून येथे स्पॅनिश व इटालियन भाषा बोलल्या जातात. या देशाचा केप हॉर्न व बोलिव्हियामध्ये 3700 किमी.चा विस्तार आहे. तर चला मग पाहूया अर्जंट ला या देशाविषयी सविस्तर माहिती.
अर्जेंटिना देशाची संपूर्ण माहिती Argentina Information In Marathi
क्षेत्रफळ व विस्तार :
अर्जेंटिना या देशाचे क्षेत्रफळ 27,77,815 चौरस किमी एवढे आहे. तसेच या देशाच्या अक्षांश 22 अंश ते 55 अंश दक्षिण व रेखांश 54° 20′ ते 73° पश्चिम असा आहे. या देशांच्या सीमा आपण पाहिले तर याच्या उत्तरेस बोलिव्हिया, ईशान्य दिशेला पॅराग्वाय पूर्वेस ब्राझील यूरग्वाय आणि अटलांटिक महासागर तर दक्षिणेस अटलांटिक महासागर आणि पश्चिम दिशेला चिली हा देश आहे.
चलन :
अर्जेंटिना या देशाचे नाणे हे पेसो असून एका पेसोचे शंभर सेंतावो होतात.
इतिहास :
अर्जेटिना या देशाचा प्राचीन इतिहासाविषयी पाहिजे तेवढी माहिती उपलब्ध नाही, तरीसुद्धा येथे पूर्वी इंडियन लोक राहत होते, असा अंदाज आहे. दोन हजार वर्षांपूर्वी अमेरिकन इंडियन लोक आशियातून येथे आले असावेत.
15 व्या शतकामध्ये अर्जेटिना या देशातील निरनिराळ्या जमातीचे व वेगवेगळ्या बोली भाषा बोलणारे तीन लाख इंडियन लोक येथे राहत होते. त्यांच्यावर इंका या साम्राज्याचे वर्चस्व होते. लोक शिकार पशुपालन व काही प्रमाणात शेती यावर अवलंबून असत.
1501-02 या काळात व्हेसपूची पुढची याने रिओ द ला प्लाताचा शोध लावला. त्यामुळेच स्पॅनिश या लोकांना स्फूर्ती मिळाली. वान दीआय दे सोलीस या स्पॅनिश खलाशाने 1516 मध्ये अर्जेंटिना या देशात सर्वप्रथम प्रवेश केला पण त्याला येथील इंडियन लोकांनी ठार मारले. 1939 मध्ये आसूनसॉन हे गाव वसविले ते आज मोठे शहर आहे तसेच ते पहिले स्पॅनिश शहर म्हणूनही ओळखले जाते.
त्यानंतरच्या काळात म्हणजे 1573 मध्ये व्हान दे गाराई याने पॅराग्वाय नदीवर सांता फे हे बंदर तयार केले व 1580 मध्ये ब्वेनस एअरीझ या शहराची निर्मिती केली. या शहरापासून स्पेनच्या वसाहतींची झपाट्याने वाढ होऊ लागले व सर्व वसाहतींवर वसाहतींवर आसूनस्यॉनचे वर्चस्व व पेरू येथील राज्यप्रतिनिधींच्या निगराणी असे. त्यानंतरच्या काळात येथे स्पेनचे व्यापारी कायदे लागू झाले त्यामुळे वसाहतींची फारशी प्रगती झाली नाही.
त्याव्यतिरिक्त ब्रिटन व पोर्तुगाल यांचा येथे चोरटा व्यापार वाढीस लागला. यांचा हा चोरटा व्यापार बंद करण्यासाठी स्पेनने 1776 मध्ये प्लाता हा स्वतंत्र प्रांत निर्माण करून त्यावर राज्यपालाची नेमणूक केली. त्या प्रांतांमध्ये अर्जेटिना, पॅराग्वाय, बोलिव्हिया व यूरग्वाय काही भाग असे प्रदेश समाविष्ट होते. त्यावेळेस त्यांची राजधानी ब्वेनस एअरीझ ही होती.
शेती :
येथील शेत जमिनी कृषी क्षेत्रा खाली असून येथील तीन कोटी हेक्टर जमीन कृषी क्षेत्रात आहे. येथील शेतकरी हा लघु उद्योग व शेती उद्योग व्यवसायांवर अवलंबून आहे. अर्जेटिनामध्ये अन्नधान्य आणि पैकी गव्हाचे उत्पादन हे 10 टक्के आहे.
हा देश गव्हाच्या निर्यातीत अग्रेसर देश ओळखला जातो. त्याव्यतिरिक्त बार्ली, राय व ओट हे पीके येथे मोठ्या प्रमाणात घेतली जातात. याशिवाय येथे जवस, ऑलिव्ह, व सूर्यफूल ही तेल देणारी पिके घेतली जातात. याशिवाय भात, तंबाखू, कापूस, ऊस यांची ही पिके मोठी प्रमाणात होतात.
येथे फड भाज्यांमध्ये देशा स्वयंपूर्ण असून मेंदोसा या प्रांतात विविध मध्ये तयार केली जातात. अर्जेटिनामध्ये नऊ कोटी हेक्टर जमीन ही वनांखाली असून येथे कठीण लाकूड मोठ्या प्रमाणावर निघतो. त्यामुळे यापासूनही त्यांना उत्पन्न मिळते व दुग्धोत्पादन, कोंबड्या व डुकरे यांचा हि लघु उद्योग येथे मोठ्या प्रमाणावर चालतो.
इतर उद्योगधंदे
या देशांमध्ये परदेशी मालावर जकात कर बसवून देश उद्योगाला प्राधान्य संरक्षण दिले गेले आहेत. मोठ्या उद्योगांमध्ये ही पोलाद व लोखंडाचे कारखाने येथे आहेत परंतु खनिजसंपत्ती येथे मोठ्या प्रमाणावर नसल्यामुळे त्यांच्यासमोर हा एक प्रश्न उभा आहे. तरीही थोड्याफार प्रमाणात गंधक, कथील सोने-चांदी अस्फाल्ट व पेट्रोलियम ही खनिजे सापडतात.
अर्जेटिनामध्ये वाहने, लहान विमाने, जहाज बांधणी, आगगाड्यांची उपकरणे, रसायने, डबाबंद मास व क्वेब्राचोपासून टॅनिन, येर्बामाते, साखर-शुद्धी, पीठ, मद्ये, सुती व लोकरी कापड, कागदलगदा, प्लॅस्टिक, औषधी व रंग तयार करण्याचे कारखाने आहेत. त्या व्यतिरिक्त कातडी सामान ट्रॅक्टर व शेतीच्या अवजारांचे कारखानेही येथे उत्कृष्ट आहेत.
वाहतूक व्यवस्था :
अर्जेटिना या देशांमध्ये लोहमार्गाची लांबी हि 44,466 किमी आहे. परंतु दक्षिण अर्जेटिना मध्ये लोहमार्ग नाही. बरेच मार्ग हे ब्वेनस एअरीझपासून पंख्याप्रमाणे पसरले असून यांतील 60 टक्के मार्ग हे राष्ट्रीय करण्यापूर्वीच ब्रिटिश यांच्या मालकीचे होते.
हे लोहमार्ग चिली, बेलिव्हिया, पॅराग्वाय व यूरग्वाय येथून जातात तसेच ब्वेनेस एअरीझमध्ये भुयारी लोहमार्ग सुद्धा आहेत. रस्त्यांची लांबी ही 9,39,498 किमी. आहे. तसेच येथे अंतर्देशीय व आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुविधा उपलब्ध आहे. देशातील तेल व मास वाहतुकीसाठी येथे बोटिंगची सेवा उपलब्ध आहे.
कला व खेळ :
अर्जेंटीनामध्ये शिल्पकला, चित्रकला व वास्तुकला त्याव्यतिरिक्त संगीत, नृत्य व नाट्यकला यावरही मोठ्या प्रमाणात भर दिल्या जातो. तसेच येथे फ्रेंच व अमेरिकन ग्रंथांचा व प्रवाहांचा प्रभाव असलेला दिसून येतो. येथे वेगवेगळे नृत्यप्रकार लोकप्रिय असून कॅंगो हा त्यातील खास नृत्य आहे.
गिटार हे तंतुवाद्य सार्वत्रिक प्रिय आहे. क्रिकेट सोडून सर्व आधुनिक खेड येथे खेळल्या जातात. खेळांमध्ये फुटबॉलचा असा एक प्रकार म्हणजे सॉकर हा अत्यंत लोकप्रिय आहे याशिवाय हाई आलाई व पुर्तो हे खेळ प्रसिद्ध आहेत. अर्जेटिनाचे घोडे व घोडेस्वार प्रसिद्ध आहे.
लोक व समाज जीवन :
अर्जेटिना मध्ये 1960 च्या जनकाने प्रमाणे 2,00,09,000एवढी लोकसंख्या होती. ज्यामध्ये 13 टक्के परकीयदेशी सुद्धा होते. अर्जेंटिना या देशाची मुख्य भाषा ही स्पॅनिश असून येथील संस्कृती फ्रेंच वृत्ती जर्मन आहेत. यानंतर आता त्यामध्ये फरक दिसू लागला आहे. येथील लोक वस्ती ही देशभर वेगवेगळ्या प्रमाणात पसरलेली आहे. पॅपास या 27% भूप्रदेशात 60% लोक राहतात.
अर्जेटिनामध्ये कॅथलिक हा राजधर्म असून इतर धर्मासहि आपला धर्म व पंथ पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. कॅथलिक या धर्मपिठाच्या बाबतीत राष्ट्रपतीस विशेष अधिकार व देशाचे वैशिष्ट आहे. धर्मगुरूंची ही नेमणूक सेनेच्या सल्ल्याने राष्ट्रपती आणि पोपचे धार्मिक आदेश त्यांची संमती मिळाल्यावरच देशात कार्यान्वित होतात.
येथील कौटुंबिक जीवनाविषयी आपण पाहिले तर जवळ जवळ भारतीयसारखेच यांची जीवन आहे असे वाटते. कारण कौटुंबिक जीवनात मोठी कुटुंबे वडीलधाऱ्यांचा आदर व अधिकार सार्वजनिकरीत्या गौण पण कौटुंबिक अधिकार मोठा असेही स्त्रियांचे स्थान आहे ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. ईव्हा पेरॉनमुळे ह्या स्त्रिया सार्वजनिक कामात व जीवनातही पुरुषांच्या बरोबरीने पुढे येऊ लागल्या आहेत.
आरोग्य विषयक :
अर्जेटिना या देशातील आरोग्य व्यवस्था लॅटिन अमेरिकेतील उत्तम समजली जाते. देवी, मलेरिया व घटसर्प यांचे जवळजवळ येथे निर्मूलन झालेले दिसते. येथे क्षयरोग व कुष्ठरोगाचे प्रमाण खूपच कमी झाले असून सामाजिक सुरक्षा योजनांचे प्रमाणही मोठे असून अनाथ, अपंग वृद्धांना मदत तसेच बेकारांना भत्ता, नुकसानभरपाई, प्रस्तुती आरोग्यकेंद्र, व आरोग्य विमा यांच्या सवलती त्यांना मिळतात.
पर्यटन स्थळ :
अर्जेंटीनामध्ये ऐतिहासिक स्थळ, सरोवरे अरण्य उंचावरून पडणारे धबधबे हे मुख्य पर्यटकांचे आकर्षण आहे. दक्षिण अटलांटिक वरील मार देल प्लाता व अँडीज मधील सरोवरातील स्विज, सान कार्लोस हे अतिशय रमणीय ठिकाण आहेत.
त्याव्यतिरिक्त ईशान्य सीमेवरील नायगाराहून उंच धबधबा व पॅपास ही पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. तेथे ऐतिहासिक शहरांमध्ये मेंदोसा, तूकुमान व कोर्दोव्हा व ब्वेनस एअरीझ ही राजधानी सुद्धा प्रेक्षणीय आहे. जर तुम्हीही येथे गेलात तर नक्की या स्थळांना भेट द्या.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Child Labour Essay In Marathi
- Doordarshan Essay In Marathi
- Essay On Metro Rail In Marathi
- Essay On World Wildlife Day In Marathi
- My Country India Essay In Marathi
- Subhash Chandra Bose Essay In Marathi
- My School Essay In Marathi
- Essay On Makar Sankranti In Marathi
FAQ
अर्जेंटिना हा कोणत्या प्रकारचा देश आहे?
देश एक संघराज्य प्रजासत्ताक आहे. अनेक वर्षांच्या राजकीय गोंधळानंतर लोकशाही पद्धतीने अनेक राष्ट्रपती निवडून आले आहेत. राष्ट्रीय काँग्रेस 72 जागांसह सिनेट आणि एकूण 257 जागांसह चेंबर ऑफ डेप्युटीजची बनलेली आहे.
अर्जेंटिना कशासाठी प्रसिद्ध आहे?
अर्जेंटिना फुटबॉलची आवड, मेट संस्कृती आणि टँगोवरील प्रेम यासाठी ओळखले जाते. पॅटागोनियामधील आश्चर्यकारक नैसर्गिक लँडस्केप ते ब्यूनस आयर्समधील दोलायमान शहरी जीवनासह, हा देश प्रवाशांसाठी एक अनोखा अनुभव देतो. अर्जेंटिना त्याच्या दर्जेदार वाइन, स्वादिष्ट अन्न आणि जगप्रसिद्ध खुणा यासाठी देखील प्रसिद्ध आहे.
अर्जेंटिना मध्ये किती देश आहेत?
अर्जेंटिना हे तेवीस प्रांत (स्पॅनिश: provincias, एकवचन provincia) आणि एक स्वायत्त शहर (ciudad autonooma), ब्यूनस आयर्स यांचा महासंघ आहे. प्रांत आणि राजधानी संघराज्य प्रणालीमध्ये अस्तित्वात आहेत परंतु त्यांची स्वतःची घटना आहे. ब्यूनस आयर्सचे स्वायत्त शहर (Ciudad Autónoma de Buenos Aires; “CABA”).
अर्जेंटिना किती वेळा वर्ल्ड कप फायनल खेळला?
1902 मध्ये त्यांच्या स्थापनेपासून, अर्जेंटिना राष्ट्रीय संघ सहा फिफा विश्वचषक फायनलमध्ये दिसला आहे.
अर्जेंटिना फ्रान्सचा सामना किती वेळा करतो?
अर्जेंटिनाने (ARG) फ्रान्सविरुद्ध खेळलेल्या 12 पैकी सहा फुटबॉल सामने जिंकले आहेत, ज्यांनी तीन वेळा विजय मिळवला आहे .