Algeria Information In Marathi अल्जेरिया या देशाची राजधानी अल्जीर्स हे असून हे एक मोठे शहर व प्रमुख बंदर आहे. हे शहर प्राचीन असून येथे मूरिश व दक्षिण युरोपियन पद्धतीची घरे मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. तसेच या देशाची अर्थव्यवस्था ही शेती व उद्योग धंद्यांवर अवलंबून आहे. तर चला मग पाहुया या देशा विषयी सविस्तर माहिती.
अल्जेरिया देशाची संपूर्ण माहिती Algeria Information In Marathi
अल्जेरिया हा आफ्रिका खंडातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. हा देश खनिज संपत्तीने स्वयंपूर्ण असून येथील लोक शेती व कृषी व्यवसाय करतात.
क्षेत्रफळ व विस्तार :
अल्जेरिया या देशाचे क्षेत्रफळ हे 23,81,743 चौरस किमी. आहे. त्याचा दक्षिणोत्तर विस्तार हा 19° ते 37° उत्तर अंश व पूर्व पश्चिम विस्तार 8°30′ ते 12°20′ पुर्व रेखांश या देशाला उत्तरेकडे 1046 किमी लांबीची मध्य सागराची किनारपट्टी लाभलेली असून पूर्वेकडे ट्युनिशिया व लिबिया तर पश्चिमेकडे मोरोक्को व दक्षिणेकडे नाइजर, माली, मॉरिटानिया व स्पॅनिश व सहारा हे देश आहेत.
भूवर्णन :
अल्जेरिया मधील भूमीचे वर्णन करायचे झाले तर अल्जेरिया या देशाचे दोन भागात विभाजन केले जाते. उत्तरेकडील ॲटलास पर्वताचा व दक्षिणेकडील विस्तीर्ण सहारा मरुभुमीचा असे ते दोन भाग आहेत. ॲटलास पर्वताच्या रांगा किनार्याला समांतर असून त्यात उत्तरेकडील टेल ॲटलास व त्यांच्या शाखा आणि दक्षिणेकडील सहारा ॲटलास यांच्यामध्ये एक हजार मीटर उंचीचा पठारी प्रदेश आहे.
त्यामध्ये खारी सरोवरे आहेत, त्यांची नावे म्हणजे शॉट ऍश शर्गी, शॉर्ट एल गार्बी अशी आहे. ही सरोवरे उन्हाळ्यात कोरडीच असतात तर आंतरदेशीय जलोत्सारणाचा प्रदेश सुद्धा म्हणून ओळखला जातो. उत्तरेकडील टेन एट लोच्या दोन पर्वतरांगा आहेत. त्यांची जास्तीत जास्त उंची ही 2308 मी. आहे.
हवामान :
अंजीर या या देशातील भूमध्य सागरी प्रदेशातील हवामान हे उन्हाळ्यात 26.7° सेल्सिअस व हिवाळ्यात 10°-12° सेल्सिअस पर्यंत असते.
हेच तापमान देशातील अंतर्भागात सरासरी 26.7° सेल्सिअस व 3.9° सेल्सिअस ते 6.1° सेल्सियस आहे. पूर्व पश्चिम भागात असलेल्या ॲटलास पर्वताच्या प्रदेशात तसेच भूमध्य सागरी हवामान अल्जेरिया च्या उत्तर भागापुरते मर्यादित राहते.
तर सहारा प्रदेशातील हवामान हे अत्यंत विषम हवामानाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. तेथे दिवसाचे जास्तीत जास्त तापमान 57.7° सेल्सियस असते तर जमिनीवरील वाळूचे तापमान हे 76.6° सेल्सिअस पर्यंत असते. दिवसाच्या तापमानापेक्षा रात्र ही खूपच थंड असते. हवेतल्या आर्द्रतेमुळे उन्हाळ्यात सुद्धा रात्री दर पडतो भूमध्य सागरावरील आवडता पासून हिवाळ्यात पाऊस पडतो.
खनिज संपत्ती :
अल्जेरिया हा देश खनिज संपन्न देश असून येथे नैसर्गिक वायूचे ही मोठे प्रचंड साठे सापडले आहेत याशिवाय फॉस्फरस विरहित लोखंड हे, तेल व टिंडुफ या भागात आढळते तर फॉस्फेट हे तेवीस पर्वत व इतरत्र आढळते तसेच येथे तेल खानी आढळतात. तसेच शिसे, जस्त, तांबे, चांदी, पारा, अँटिमनी यांची खनिजे व संगमरवरी दगड येथे मोठ्या प्रमाणात सापडतात.
इतिहास :
अल्जेरिया या देशाचा ऐतिहासिक काळाविषयी आपण बोलले तर रोमन साम्राज्याचा भाग असलेला या देशावर सातव्या शतकामध्ये मुस्लिमांनी आपले अधिपत्य मिळवले होते. मध्ययुगातील काळामध्ये येथे अनेक विद्वान व पंडितांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर होते.
सन 1517 साली हा प्रदेश ओस्मानी साम्राज्यामध्ये आणला गेला. त्यानंतर 1900 तका च्या सुरुवातीला अमेरिका व बारबरी या राज्यांमध्ये युद्ध झाले व या दोन देशातील युद्धांमुळे अल्जेरिया ची स्थिती ही कमकुवत झाली होती. या युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन फ्रेंचांनी हा भाग हस्तगत केला.
त्यानंतरच्या काळात देशात न व युवकांचे राष्ट्रीय मुक्ती आघाडी पक्ष विषयीची योजना सुरू झाले व त्यांनी राष्ट्रीय मुक्ती आघाडी हा पक्ष स्थापन केला. यामध्ये मेस्साली हाजशिवाय सर्वजण या पक्षाला मिळाले व या मुक्ती आघाडीने गनिमी युद्ध पुकारले होते.
1954 साली अल्जिरियामध्ये मोठा उठाव झाला परंतु तो उठाव दडपण्यात आला व 1957 मध्ये यातील मुख्य पाच नेत्यांना अटक झाल्यामुळे नवयुवक संतप्त होऊन व पुन्हा उठाव झाला.
1958 साली कैरो येथे स्वतंत्र अल्जेरिया सरकार स्थापन झाले. 1961 मधील सर्व या निर्णयांच्या प्रश्नांबाबत जनतेचे मत एकत्र करून स्वातंत्र्यास अनुकूल असे वातावरण तयार होऊन एकमत झाले. तरीसुद्धा फ्रेंच लोकांच्या गुप्त संघटनेकडून घातपाती कृत्य चालूच होती.
या स्वातंत्र्य संग्रामात कुटुंबामागे कमीत कमी एक तरी माणसाला आपला प्राण गमवावा लागला किंवा मग फ्रेंच याच्या ताब्यात कैद व्हावे लागले. एवढे झाल्यानंतर शेवटी राष्ट्रीय नेते व फळे सरकार यांच्यामध्ये समझोता होऊन 3 जुलै 1962 रोजी अल्जेरिया हा देश स्वतंत्र झाला.
अल्जेरिया या देशामध्ये सद्यस्थितीत अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धतीचे सरकार असून अब्दुलअझीज बुतेफ्लिका हा 1999 सालापासून राष्ट्राध्यक्ष पदावर आहे. अल्जेरिया हा आफ्रिकन संघ संघ संयुक्त राष्ट्रे व ओपेक इत्यादीं आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.
भाषा :
अल्जेरिया या देशात भाषेमध्ये विविधता आढळून येते. येथील लोकांची अरबी ही मुख्य भाषा असून बरेच मुस्लिम ही फ्रेंच भाषा वापरतात. बरोबर हि भाषा एक तृतीयांश मुस्लीम बोलतात. तर ही भाषा हॅमिटिक भाषा समूहाची एक शाखा असून ती प्राचीन काळी न्युमिडियनांनी लिपिबद्ध केली. फ्रेंच या भाषेचा वापर शासनास व शिक्षित समाजात खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते.
लोक व समाज जीवन :
अल्जेरिया या देशातील आदिवासी लोक हे बरोबर व सेमिटिक या वंशाचे आहे. त्यांची वैशिष्ट्ये ग्रीकांसारखीच आहेत ती म्हणजे उंच बांधा, काळसर पिंगट डोळे, सरळ नासिका, आकुंचित हनुवटी, डोक्यावरील व चेहऱ्यावरील काळे व तपकिरी रंगाचे केस तसेच गौरवर्ण असे आहे. यांच्या या वैशिष्ट्यामुळे ते आशियातील अफगान अंशी त्यांचे साम्य दिसते.
बर्बरात अनेक जमाती असून का बिलीया ही जमात प्रामुख्याने शेती व्यवसाय करते. तसंच त्यांची राहण्याचे मुख्य ठिकाण हे अल्जिअर्स व कॉन्स्टँटिन शहराच्या दरम्यान असलेल्या पर्वतीय भागात आहे. सावित्रीच्या मोरुभुमी राहणारा समूहामध्ये ट्यूराग, बिस्कोरा व टुअर या जमाती आढळून येतात.
या देशात मुसलमान सुन्नी पंथाच्या मालकीचे शाखेचे असून या देशात धार्मिक स्वातंत्र्य आहे. अल्पसंख्य मुसलमान हनफी शाखेचे आहेत. येथे त्यांच्या परंपरेचे एक वैशिष्ट्य व ते म्हणजे फकीर व मेराबाऊट व भ्रातृसमाज आहे.
हा समाज शहरांमध्ये कमी तर खेड्या गावांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या समाजापैकी पूर्व अल्जेरियात रेहमानिया, अल्जियरस भागात शाधिलिया, ओरान या भागात तय्यबिया व इतरत्र प्रदेशात कादिरीया येथे असे अनेक समाज अस्तित्वात आहे.
शिक्षण क्षेत्र :
अल्जेरिया या देशाचे शिक्षण पद्धतीचे एक वैशिष्ट्य आहे. येथे स्वतंत्र शाळा असून त्यामध्ये इस्लाम धर्म व संस्कृती व आचरणाचे शिक्षण देण्यात येते. या देशातून फ्रेंच लोक गेल्यामुळे झालेली शिक्षकांची उणीव ही भरून काढण्यासाठी ईजिप्त या देशातून शिक्षक आणण्यात आले होते. 1949 चाली फ्रेंच व मुस्लिम या शाळांचे तेथे एकत्रीकरण झाले.
संगीत व नृत्य :
अल्जेरिया या देशातील गालिचे नयनरम्य हे जगप्रसिद्ध आहे. संगीताच्या बाबतीत नोउबा संगीत व नृत्य तसेच काबिलीया गीते प्रसिद्ध असून बरोबर लोकगीते व रूढा शहरातील अनेक विषय शास्त्रीय अभ्यासाला प्रेरणा देत असतात.
पर्यटन स्थळ :
या देशांमध्ये अनेक ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरील निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे येथे अनेक पर्यटक भेट देत असतात. येथे पाहण्यासारखे टेल व ॲटलास पर्वताची शिखरे व दऱ्या खोऱ्यांनी नटलेला प्रदेश तसेच येथील सौंदर्य त्यामध्ये आणखीनच भर घालते.
देशाची राजधानी अल्जीर्स व कॉन्स्टँटीन हे शहर हे विशेष प्रवाशांचे आकर्षण बनले आहेत. येथील ऐतिहासिक बुद्धीच्या हम्माडाइटचा राजमहल त्याची सजावट व सुंदरता पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.