सांगली जिल्ह्याची संपूर्ण माहिती Sangli District Information In Marathi

Sangli District Information In Marathi सांगली जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. मराठी माणसाच्या जीवनातील अढळ स्थान असलेला मराठी नाटकांचा जिल्हा म्हणून सांगली जिल्ह्याला ओळखले जाते. चला मग सांगली या जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

Sangli District Information In Marathi

सांगली जिल्ह्याची संपूर्ण माहिती Sangli District Information In Marathi

1 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्ह्याचे विभाजन करुन उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. नंतर 23 नोव्हेंबर 1960 ला फेरफार करून दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात करण्यात आले.

सांगली जिल्ह्याची कलावंतांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळख होते. सातारा जिल्ह्यामध्ये विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर यांचे ठिकाण सादर केलं. तसेच मसाल्याचे पीक म्हणून ओळखली जाणारी हळद अधिक प्रमाणात उत्पादित होते. या पुर्वी सांगली या शहराचे नाव सहगल्ली अशे होते.

विस्तार व क्षेत्रफळ :

सांगली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 8,578. चौरस किलोमीटर एवढे आहे. सांगली जिल्ह्याच्या सीमेला लागून उत्तरेस व ईशान्य सोलापूर जिल्हा आहे. तसेच उत्तरेस व वायव्येस सातारा जिल्हा आहे. तसेच पूर्वेस कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा व पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा तसेच दक्षिणेस कोल्हापूर जिल्हा असून दक्षिणेस कोल्हापूरपर्यत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा आहे.

लोकसंख्या :

सांगली जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 28,20,575. ऐवढी आहे. सांगली जिल्हा मध्ये 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 973 येवढे आहे. येथील साक्षरता प्रमाण 82.41% येवढं आहे. तर लिंग गुणोत्तर प्रमाण 8.02% येवढे आहे. या जिल्हा मध्ये विविध जाती व धर्माचे लोक राहतात.

जिल्ह्यातील तालुके :

सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 10 तालुके आहेत. या जिल्हात मिरज, वाळवा, जाठ, तासगांव, खानपुर, पलूस, शिराळा, कवठे महाकाळ, कडेगांव, अटपडी हे तालुके आहेत. यातील काही जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध किल्ले व मंदिरे आहेत.

इतिहास :

सांगली जिल्ह्याचा इतिहास प्राचीन व ऐतिहासिक आहे. 1 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्ह्याचे विभाजन करुन उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. त्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून 23 नोवेंबर 1960 ला सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात करण्यात आले.

स्वातंत्र्योत्तर काळात संस्थानांचे विलिनीकरण करतेवेळी सांगली, मिरज व जत ही संस्थाने सातारा जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आल्याने तो जिल्हा आकारमानाने मोठा आणि प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा बनला होता.

या प्रदेशाने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, बहमनी, आदिलशाही, मोगल, मराठे आणि पटवर्धन संस्थानिक इत्यादींच्या राजवटी अनुभवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरनोबत नेताजी पालकर यांनी 1669 साली आदिलशहा कडून सांगली, मिरज व ब्रह्मनाळ जिंकून घेतले.

थोरल्या माधवराव पेशव्यांनी 1772 मध्ये गोविंदराव पटवर्धनांना मिरजेचा किल्ला आणि आजूबाजूचा बराच प्रदेश जहागीर म्हणून दिला. त्यावेळी सांगलीच्या जवळ असलेले हरिपूर हे सांगलीपेक्षाही मोठे गाव होते.

सांगलीच्या आसपासचा परिसर कुंडल चालुक्यांची राजधानी होती. कुंडल हे इ स. 1600 वर्ष जुने प्राचीन गाव आहे. कौंडण्यपूर कर्नाटकचा एक भाग होता. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता.

पूर्वीच्या सातवाहन घराण्यातील सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या कारकीर्दीमधील काही नाणी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे सापडली आहेत. ब्रिटिशांचे राज्य होते तेव्हा सांगली हे मराठ्यांचे संस्थान होते.

पटवर्धन संस्थानिक होते. आज त्यांचे वंशज विजयसिंगराव माधवराव पटवर्धन इथले राजे आहेत. 1930-32 मधील सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील शिराळा तालुक्यातील बिळाशीचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे.

हवामान :

सांगली जिल्ह्यात हवामान हे सामान्यपणे उष्ण व कोरडे आहे. येथील डोंगराळ भागातील हवामान थंड असून जिल्ह्याच्या पूर्व भागात तापमान जास्त असते तसेच डोंगराळ भागात पाऊस जास्त पडतो. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते. येथील वातावरण उन्हाळा मध्ये अती उष्ण असते. येथील सरासरी तापमान 36° ते 40° येवढे राहते.

व्यवसाय व उद्योग :

सांगली जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. येथील गहू हे पीक मुख्य पीक आहे. हे सर्व भागात घेतले जाते तसेच या जिल्ह्यामध्ये सूर्यफूल, ऊस, हळद, हरभरा, सोयाबीन, भुईमूग, ही पिकेही घेतली जातात. जास्तीत जास्त लोक येथे शेती या व्यवसाय वर अवलंबून आहेत. येते खरीप व रब्बी हे दोन्ही पिके घेतली जातात.

सांगली जिल्हा हळदीसाठी प्रसिद्ध आहे. हळद व बेदाणा उत्पादनात सांगली जिल्हा अग्रेसर आहे. या जिल्ह्यात द्राक्षे, डाळिंबे, पपई, पेरू बोरे, लिंबू, केळी, चिकू, आंबा इत्यादी फळांचे उत्पादने घेतली जातात. अलिकडे द्राक्षे उत्पादनासाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध झाला आहे.

तासगाव तालुका द्राक्ष उत्पादनात आघाडीवर आहे. मिरज तालुक्यातील विड्याची पाने प्रसिद्ध आहेत. भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते. अलिकडील काळात फुलांची शेतीही केली जाते. काही भागात नदीकाठच्या प्रदेशात तंबाखुचे पीक घेतले जाते. जे पूर्ण जग भर प्रसिध्द आहे व या पिकाचा मोठा प्रमाणात उद्योग केला जातो.

सांगली जिल्हा मध्ये उद्योग मोठ्या प्रमाणत केले जातात. सूत गिरण्या, लोखंडी अवजारे तयार करण्याचे कारखाने देखील याच जिल्ह्यात आहेत. सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे शेतीची लोखंडी औजारे तयार करण्याचा कारखाना आहेत.

या जिल्हा मध्ये ऊस व द्राक्षे ही महत्त्वाची पिके आहेत. या जिल्ह्यात साखर कारखाने व मनुका तयार करणे हे महत्त्वाचे उद्योग आहेत. आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे द्राक्षांपासून मनुके तयार करण्याचा उद्योग चालतो.

नद्या:

सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी येरळा ही सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख नदी आहे. तसेच कृष्णा, वारणा, येरळा, माण, अग्रणी व बोर या सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. ह्या सर्व नद्या डोंगराळ भागातून वाहतात. सांगली हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कृष्णा नदीकाठी वसले आहे. याशिवाय बहे, औदुंबर, नरसिंगपूर ही पवित्र स्थळे कृष्णा नदीच्याकाठी वसली आहेत.

जंगली प्राणी व पक्षी :

सांगली जिल्ह्यात 420. चौरस किलो मीटर इतके वनक्षेत्र आहे. या जिल्हा मध्ये वेगवेगळ्या प्रकाचे प्राणी पाहायला मिळतात. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असून या ठिकाणी दाट वने आहेत. वनामध्ये साग, खैर, करंज, हिवर, बेहडा इत्यादी वृक्ष आढळतात.

जिल्ह्यातील वनांमध्ये हरिण, ससा, माकड, साळिंदर, साप, बिबट्या, तरस, कोल्हे इत्यादी प्रकारचे प्राणी तसेच पोपट, मोर, ससाणा, कोकीळ इत्यादी प्रकारचे पक्षीही आढळतात. चांदोली आणि कोयना अभयारण्याचा भाग मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्यात आला.

पर्यटन स्थळ :

सांगली जिल्ह्यातील मध्ये कृष्णा व येरळा संगमावरील ब्रम्हनाळ ठिकाणे प्रसिद्ध आहेत. हे एक लोक प्रसिध्द ठिकाण आहे.

औंदुंबर या गावात दत्तात्रेय मंदिर असून हे मंदिर नरसिंह सरस्वती यांच्या स्मरणार्थ बांधलेले आहे. हे एक धार्मिक स्थळ आहे. येथे मोठ्या संख्येने लोक दर्शनाला येत असतात.

सांगलीपासून जवळच हरिपूर येथे कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम झाला असून येथील संगमेश्र्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणत लोक दर्शनाला जात असतात.

सांगली जिल्हा मध्ये बहे येथील रामलिंग मंदिर प्रसिद्ध आहे. येथेच समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मारुती पैकी एक दास मारुती हे हनुमानाचे मंदिर आहे.

सांगली या जिल्हा मध्ये देवराष्ट्र या ठिकाणी खानापूर तालुक्यात असून स्वर्ग से सुंदर चव्हाण यांच्या भूमी या गावांमध्ये प्राचीन लेण्या प्रसिद्ध आहे. या जिल्हा मध्ये कसबे डिग्रज हे गाव मिरज तालुक्यातील 5 हिंदू मंदिरे व 2 जैन मंदिर साठी प्रसिद्ध आहे.

येथे लोक दर्शनाला येतात. हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. शिराळा या तालुक्यात ठिकाणी देश विदेशातील लोक नागपंचमी उत्सव साजरा करण्यासाठी येत असतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment