Satara District Information In Marathi सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. देशासाठी बलिदान देण्यासाठी या जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात वाटा आहे तसेच या जिल्ह्याला शहीदांच्या जिल्हा म्हणून सुद्धा ओळखले जाते.तर चला मग जिल्ह्याविषयी आणखी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
सातारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती Satara District Information In Marathi
या जिल्ह्याच्या भोवती 7 किल्ले असल्यामुळे या जिल्ह्याचे नाव सातारा असे पडले तसेच सातारा जिल्हा मराठी राज्याची राजधानी होती. सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1999 मध्ये कराड तालुक्यात धरण्यात शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक शूरवीरांचा जिल्हा म्हणून मराठा काळापासून या जिल्ह्याची लष्करी परंपरा लाभली आहे. तसेच या राज्यांमध्ये छत्रपती शाहूंचा राज्याभिषेक 1708 मध्ये येथे झाला होता.
विस्तार व क्षेत्रफळ :
सातारा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 10,475. चौरस किलोमीटर एवढे असून या जिल्ह्याच्या सीमेला लागून उत्तरेस पुणे जिल्हा व पूर्वेस सोलापूर जिल्हा आणि पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा व दक्षिणेस सांगली जिल्हा असून वायव्येस रायगड जिल्हा आहे.
लोकसंख्या :
सातारा जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 30,03,922 एवढी आहे. या जिल्ह्यामध्ये 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 988 आहे. येथील साक्षरता प्रमाण 78.52% एवढा असून येथील लिंग गुणोत्तर प्रमाण 1.05% येवढे आहे. या जिल्हा मध्ये विविध जाती व धर्माचे लोक राहतात.
हवामान :
सातारा जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. सह्याद्री पर्वत व इतर डोंगरांमुळे जिल्ह्याचा पश्चिम भाग जास्त उंचीचा डोंगराळ आहे. येथील हवामान थंड असते. याच भागात महाबळेश्वर, पाचगणी यासारखी थंड हवेची ठिकाणे आहेत. जिल्ह्याच्या काही भागात तापमान जास्त असते. येथील तापमान 35॰ ते 37॰ पर्यत राहते.
जिल्ह्यातील तालुके :
सातारा जिल्ह्यामध्ये एकूण अकरा 11 आहेत. या जिल्ह्यात सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण, खटाव, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर हे तालुके आहेत. येथील सर्वात प्रसिध्द असा तालुका म्हणजे महाबळेश्वर आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठा तालुका माण व क्षेत्रफळाने सर्वात लहान तालुका महाबळेश्वर हा आहे.
सातारा जिल्ह्याचा इतिहास :
सातारा जिल्हाचा इतिहास खूप प्राचीन आहे. या जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचा अज्ञान गंगेचा उदय झाला. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1999 मध्ये कराड तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली व पुढे ते कार्यालय सातारा येथे आणण्यात आले.
सातारा पुर्वी शाहुमहाराजांच्या वंशजांची राजधानी होते, मराठा साम्राज्याची सत्ता पेशव्यांच्या हाती जाईपर्यंत त्यांचीच सत्ता या भागात होती पुढे मात्र इ.स. 1818 मधे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या पराजयानंतर इंग्रजांनी या ठिकाणी सत्ता काबीत केली.
जिल्ह्यावर पूर्वी मौर्य, सातवाहन यांच्यानंतर काही शतके मुस्लीम राज्यकर्त्यांनीही राज्य केले. सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी सातारा आपल्या ताब्यात घेतला. राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने घेतलेला सातारा परशुराम पंतप्रतिनिधींनी पुन्हा मिळविला. इ.स. 1698 साली छत्रपती राजारामांनी साताऱ्याला राजगादीची स्थापना केली.
राजारामाच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी साताऱ्यातून छत्रपतींची गादी सांभाळली. पुढे औरंगजेबाने शाहुंची सुटका केल्यानंतर साताऱ्यावर शाहुंच्या पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली. ताराबाईंनी कोल्हापुरात स्वतंत्र गादी स्थापन केली.
मराठा काळात सातारा प्रदेशात मोठे सरदार उदयास आले होते. यामध्ये जावळीचे चंद्रराव मोरे, मलवडीचे घाटगे, फलटणचे निंबाळकर, कापशीचे घोरपडे इत्यादी प्रमुख होते. इंग्रज कालखंडात साताऱ्याच्या गादीच्या संरक्षणासाठी रंगो बापूजी इंग्लंडमध्ये गेले.
स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्हा दक्षिणेकडील वारणा नदीपासून ते उत्तरेकडील नीरा नदीपर्यंत पसरला होता. स्वातंत्र्यानंतर प्रशासकीय कामकाज आणि सोयीच्या दृष्टीने सातारा जिल्ह्याचे विभाजन होऊन दक्षिण सातारा व उत्तर सातारा अशा दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली. पुढे दक्षिण सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्हा तयार झाला तर उत्तर सातारा जिल्ह्यातून सध्याचा सातारा जिल्हा उदयास आला. सातारा जिल्ह्याला सैनिकांचा जिल्हा म्हटले जाते.
शेती व्यवसाय :
येथील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. सातारा जिल्हा कृषिप्रधान असून येथे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांतील पिके घेतली जातात. बाजरी, तांदूळ, भुईमूग, घेवडा ही जिल्ह्यातील प्रमुख खरीप पिके असून, गहू व हरभरा ही रब्बी पिके आहेत. ज्वारीचे पीक दोन्ही हंगामांत घेतले जाते.
मेंढीपालन हा माण, खटाव, फलटण आणि खंडाळा या कमी पावसाच्या तालुक्यातील एक प्रमुख कृषिपूरक व्यवसाय आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसायास महत्त्व प्राप्त झाले आहे. दुधाच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून संकरित गाई पाळल्या जातात.
कराड, सातारा, फलटण, कोरेगाव व वाई या तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकरित गाई पाळण्याच्या व्यवसायाकडे वळले आहेत. संकलनासाठी दुग्धव्यवसाय सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत.
उद्योगधंदे :
सातारा तालुक्यात सातारा रोड येथे कूपर कंपनीचा डीझेल एंजिन निर्मितीचा देशातील पहिला कारखाना असून याच तालुक्यात जरंडेश्वर येथे भारत फोर्ज कंपनीचा लोखंडी सामग्री निर्मितीचा कारखाना आहे. युनिव्हर्सल लगेज या कंपनीचा बॅगा बनविण्याचा उद्योगही सातारा येथे आहे.
सातारा जिल्हा मध्ये खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्र आहे तसेच महाबळेश्वर येथे गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. याच जिल्हा मध्ये कराड येथील एकदल व गळितांच्या पिकांच्या जातीवर संशोधन करणारे केंद्र रहिमतपूर येथील आले संशोधन केंद्र ही जिल्ह्यातील प्रमुख कृषिशिक्षण व संशोधन केंद्रे आहेत. अशा अनेक उद्योग या जिल्हा मध्ये केले जातात.
या जिल्ह्यात सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने आहेत. पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प हा राज्यातील सर्वांत मोठ्या पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पांपैकी एक आहे. जिल्ह्यात इतरत्रही पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. लोह खनिजाचे साठे आहेत. इमारतीचा दगड, चुनखडी व विटेसाठी उपयुक्त माती ही अन्य खनिजे जिल्ह्यात उपलब्ध आहेत.
जंगली प्राणी :
सातारा जिल्ह्यामध्ये एकूण वनक्षेत्र 1,592,35. चौ. कि.मी. इतके आहे. या अभयारण्यात व एकूणच जिल्ह्यातील दाट वनांमध्ये बिबळ्या, गवा, रानडुकरे, अस्वल, सांबर इत्यादी प्राणी आहेत. अशी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी येथे आढळून येतात. या वनांत साग, धावडा, बांबू, जांभूळ इत्यादी वृक्ष आढळतात.
सातारा जिल्ह्यातील प्रमुख नद्या :
कृष्णा नदी ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. सातारा जिल्हा हे प्रामुख्याने कृष्णा नदीचे जलवाहन क्षेत्र असून येथे कृष्णा, येरळा, माणगंगा, नीरा ही प्रमुख चार नदीखोरी आहेत. क्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या नद्यांचे उगम-झरे दाखविले आहेत. या नद्या महाबळेश्वर पासून वेगवेगळ्या दिशांना वाहत जातात.
कृष्णा नदीवर वाई तालुक्यात धोम गावाजवळ धोम धरण बांधण्यात आलेले आहे. कोयना ही कृष्णेची जिल्ह्यातील सर्वांत मोठी उपनदी आहे. कोयना धरण वीजनिर्मितीसाठी विशेष प्रसिद्घ आहे. येथील नद्या ह्या जग प्रसिध्द नद्या आहेत.
पर्यटन स्थळ :
सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळ आहे. तेथे पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने भेट देत असतात तर चला मग पाहूयात या विषयी माहिती. सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या काठावर वसलेले वाई हे शहर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. येथे शंभरावर असलेली मंदिरे, विशेष म्हणजे महागणपती मंदिर, नदीकाठावरील सुंदर घाट ही पर्यटकांची प्रमुख व आवडाते ठीकान आहेत.
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर हे थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. महाबळेश्वराचे महादेवाचे देऊळ हे यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले. अफझलखानच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते.
या जिल्ह्यामध्ये धोम या गावातील नृसिंह आणि शिवमंदिर तसेच कृष्णा नदीवरील धोम धरण इत्यादी ठिकाणे प्रसिद्घ आहेत. महाबळेश्वरवरून घाटमार्गे कोकणात पोलादपूरला जाण्याच्या मार्गावर प्रतापगड किल्ला आहे.
खटाव तालुक्यात यमाई देवीचे मंदिर आणि वस्तुसंग्रहालय विशेष प्रसिद्घ आहे. वडूजजवळील प्रसिद्ध मायणी पक्षी अभयारण्य हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.