China Information In Marathi चीन हा आशिया खंडातील सर्वांत मोठा व प्राचीन देश असून लोकसंख्येच्या बाबतीतही जगात पहिला क्रमांक चीनचा लागतो. चीनचे पूर्ण नाव ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ आहे, हा पूर्व आशियामध्ये स्थित असून राजधानी बीजिंग आहे.तर चला मग पाहूया चीन या देशाविषयी सविस्तर माहिती.

चीन देशाची संपूर्ण माहिती China Information In Marathi
चीनच्या मँचुरिया, इनर मंगोलिया, सिंक्यांग-ऊईगुर, तैवान व तिबेट या विभागांस मिळून बाह्य चीन किंवा महाचीन व बाकीच्या प्रदेशास मुख्य चीन असे संबोधण्याची परंपरा आहे.
राजकीय दृष्ट्या तैवान-व्यतिरिक्त सर्व विभाग चिनी प्रजासत्ताकात समाविष्ट आहेत. तथापि तैवान आपलाच एक भाग असल्याचे चीन मानतो. 1949 पासून तैवान हा चीनपासून विभक्त होऊन स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला.
क्षेत्रफळ व विस्तार :
चीनचे क्षेत्रफळ 78,60,58,000 असून चीनचा पूर्वपश्चिम विस्तार 73° पू. ते 135° पू. 4,800 किमी. व दक्षिणोत्तर विस्तार 18°20′ उ. ते 53°52′ उ. 4,000 किमी. आहे. चीनच्या उत्तरेस मंगोलिया प्रजासत्ताक व रशिया, ईशान्येस रशिया व उत्तर कोरिया, पूर्वेस पीत व पूर्व चिनी समुद्र, दक्षिणेस दक्षिण चिनी समुद्र, उत्तर व्हिएटनाम, लाओस, ब्रह्मदेश, भारत, भूतान, नेपाळ आणि पश्चिमेस भारत, अफगाणिस्तान व रशिया हे देश आहेत. चीनचे समुद्र आणि पश्चिम पॅसिफिक यांदरम्यान कूरील, जपान, रिऊक्यू, तैवान, फिलिपीन्स या बेटांची रांग आहे.
हवामान :
या देशात सामान्यतः मोसमी हवामान आढळते. मात्र देशाचा विस्तार फार मोठा असल्याने या हवामानाचे स्वरूप सर्वत्र अगदी सारखे नाही. चीनचा बराचसा प्रदेश कर्कवृत्ताच्या उत्तरेस असल्याने तेथे समशीतोष्ण मोसमी हवामान आढळते, तर कर्कवृत्ताच्या दक्षिणेस म्हणजेच दक्षिण चीनमध्ये उष्ण मोसमी हवामान असते.
उत्तर चीनमध्ये तपमान 0° से. पेक्षा कमी असते व उत्तर मँचुरियात ते -18° सें.असते. या भागात हिवाळा प्रदीर्घ व कडक असतो. जानेवारी महिन्यात पूर्व किनाऱ्यावर पीकिंग 5.6° सें., शांघाय 3.3° सें. व हाँगकाँग (फेब्रुवारी) 14.5° सें. असे तपमान आढळते. चिनलिंग पर्वताच्या दक्षिणेस तपमान 0° सें. पेक्षा अधिक असते. कारण उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना या पर्वताचा अडथळा होतो.
खनिज संपत्ती :
खनिज संपत्तीच्या बाबतीत चीनजवळ कोळसा व कच्चे लोखंड यांचे भरपूर साठे आहेत. कथील, शिसे, मँगॅनीज, बॉक्साइट, अँटिमनी व टंगस्टन इ. धातूंचेही आणि पेट्रोलचे साठे परंतु त्या मानाने तांबे आधुनिक औद्योगिकीकरणाच्या गरजांना अपुरे असावे असा अंदाज आहे.
अणुशस्त्रांसाठी व वीजउत्पादनासाठी युरेनियमचा साठाही भरपूर असावा असा अंदाज आहे. सोने फार नाही, पण चांदीचा साठा पुरेसा असावा. जलविद्युत् उत्पादनात पुष्कळच वाढ करता येणे शक्य आहे. मिठाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
चीनचा इतिहास :
चीनी संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. त्याचा चार हजार वर्षांपूर्वीचा लिखित इतिहास आहे. विविध प्रकारचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ग्रंथ आणि प्राचीन संस्कृतीचे अवशेष येथे सापडले आहेत. जगातील इतर राष्ट्रांप्रमाणेच चिनी राष्ट्र देखील आपल्या विकासा दरम्यान आदिम समाज, गुलाम समाज आणि सरंजामशाही समाजाच्या कालखंडातून गेले.
प्राचीन काळी चिनी रेशमी कापड भारतात प्रसिद्ध होते. महाभारतात सभापर्व, कीतज आणि पट्टज कापडाचा चीनच्या संबंधात उल्लेख आहे. वायव्य प्रदेशातील या प्रकारच्या कपड्यांतील अनेक रहिवाशांनी साक, तुषार, कंका, रोमाश इ. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाला भेट म्हणून हे वस्त्र आणले होते.
चीनचा पहिला थेट राजवंश शांग राजवंश होता, जो 18 व्या ते 12 व्या शतकापूर्वी पूर्व चीनमधील पिवळ्या नदीकाठी स्थायिक झाला. त्यानंतर 221 ई.स.पूर्वमध्ये किन राजांनी चीनला प्रथमच एकत्र केले. त्याने राजाचे कार्यालय स्थापन केले आणि चीनी भाषेचे प्रमाणीकरण केले.
1965 मध्ये चीनने तिबेटला स्वायत्त प्रांत म्हणून घोषित केले. 1978 मध्ये आर्थिक सुधारणा सुरू झाल्यापासून, चीन जगातील सर्वात वेगाने विकसित देशांपैकी एक बनला. कम्युनिस्ट पक्षाने सुधारणावादी वृत्ती स्वीकारली आणि पाश्चात्य तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्यांवर भर दिला.
लोक व समाजजीवन :
चीन हा जगातील एक प्राचीनतम देश असून त्यात मूळ एकाच मानववंशाच्या शाखोपशाखांच्या गटांचे राष्ट्र विकसित झाले, असे अलीकडच्या काळापर्यंत मानले जात असे.
परंतु चीनमध्ये पीतवर्णी हानवंशीय (हान साम्राज्यावरून चिनी लोक स्वत:ला हानवंशीय मानतात) लोकांची फार मोठी संख्या असली तरी मंगोल, तुर्की इ. भिन्न मानववंशांतील लोक तसेच ‘ज्वांग’, ‘व्है ई’ ‘म्याव’, ‘फू ई’, ‘थांइ’ इ. आदिवासी जमाती चीनमध्ये आहेत. त्यामुळे चीन हा अनेक मानवगटांचा आणि राष्ट्रीयत्वांचा देश आहे, असे यथार्थतेने म्हणता येते.
चीनमध्ये हान गटाबाहेरील 6% लोक आहेत. पारंपारिक चिनमध्ये बालविवाहाची प्रथा होती परंतु ती या शतकात हळूहळू बंद झाली. चिनी खेडी सर्वसाधारण एकाच आडनावाच्या कुटुबांची असल्यामुळे लग्ने एकाच खेड्यातील दोन कुटुंबांमध्ये होत नाहीत.
चीन शेती व्यवसाय :
चीन हा कृषिप्रधान देश आहे. bयेथे शेती व्यवसाय वर्षानुवर्षे चालत आला आहे व चीनचे आर्थिक जीवन विकसित होत गेले आहे. एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ 75% लोक कृषिव्यवसाय करतात. जमीन सुपीक असल्याने गहू व तांदूळ ही मुख्य पिके व चहा, सोयाबीन, भाजीपाला, तंबाखू, भूईमूग, कापूस यांसारखी इतर पिके समाधानकारक असत.
उद्योग धंदे :
चीनमधील पुरातन उद्योगधंदे कलाकुसरीचे काम करणारे कारागीर घरगुती पद्धतीने चालवीत. दरबारासाठी किंवा श्रीमंत उमराव कुटुंबांना वापरण्यासाठी लागणाऱ्या चैनीच्या वस्तू कारागीर तयार करीत. सामान्य लोकांना लागणारे कापड, फर्निचर व घरगुती वापराच्या वस्तू शेतकरी आपापल्या घरांतच बनवीत.
सरकारी क्षेत्रात मीठ उत्पादनाचा व्यवसाय चाले व धातूंचे उत्पादनही अल्पप्रमाणात होत असे. शिवाय निरनिराळे कुटीरोद्योग खेडोपाडी चालत असत. विणकाम, बुरूडकाम, चिनी मातीची भांडी करणे इ. व्यवसाय अनेक कुटुंबांतूनच चालत.
नद्या :
चीनमधील सर्व मोठ्या नद्या पूर्वेस पॅसिफिक महासागरास मिळतात. मँचुरियाच्या उत्तर आणि पूर्व सरहद्दींवरून अमूर व तिची उपनदी उसुरी या वाहतात. अमूर 4,320 किमी. लांब असून तिला चिनी प्रदेशातून सुंगारी येऊन मिळते. या तिन्ही नद्या जलवाहतुकीस उपयुक्त आहेत. दक्षिण मँचुरियात लिआओ हो ही नदी वाहते.
उत्तर चीनमधील सर्वांत महत्त्वाची नदी ह्वांग हो ही होय. तिची एकूण लांबी 4’640 किमी. असून तिला फेन हो आणि वे हो (वे श्वे) या महत्त्वाच्या उपनद्या मिळतात. यांगत्सीकिअँग ही नदीसर्वात लांब नदी आहे. यालुंग, मिन, जीआलिंग, हान या उत्तरेकडील व शीआंग आणि गान या तिच्या दक्षिणेकडील प्रमुख उपनद्या होत. शेवटच्या दोन तुंगतिंग आणि पोयांग या सरोवरातून वाहत जाऊन यांगत्सी नदीला मिळतात.
सरोवरे :
आग्नेय मध्य भागात तुंगतिंग व पोयांग, पूर्व भागात ताई व हुंगत्से, चिंगहाई किंवा कोकोनॉर, लॉपनॉर ही तिबेट आणि सिक्यांग-ऊईगुरमधील अनेक लहानमोठी सरोवरे चीनमध्ये आहेत. चीनला एकूण 11,000 किमी. लांबीचा समुद्रकिनारा प्राप्त झाला असून त्या जवळपास लहान मोठी 3,400 बेटे आहेत.
वनस्पती व प्राणी :
चीनच्या ईशान्येकडील अरण्यांत लार्च, फर, स्प्रूस, स्थानिक पाइन, बर्च, ॲस्पेन इ. सूचिपर्णी व रुंंदपर्णी वृक्ष आढळतात. या भागातील विशेष प्राणी म्हणजे चिनी मूस, रेनडिअर, हिमससा, आर्क्टिक खोकड, लेमिंग व मोठ्या शिंगांच्या विविध प्रकारच्या मेंढ्या होत. याच्या दक्षिणेस व चीनच्या उत्तर भागात ओक, मॅपल, लिंडेन, बर्च, एल्म, ॲश, अक्रोड, पाइन, जुनिपर, इ. वृक्ष आहेत.
तर हरिण, अस्वल या बरोबरच सेबल, आर्मिन, मिंक, मार्टेन, खोकड, ऑटर इ. फरधारी प्राणी सापडतात. पीकिंगच्या उत्तरेस माकडेही आहेत. यांगत्सीच्या खोऱ्यात विपुल वनसंपत्ती आहे. गिंगो, विशिष्ट जातीचे पाइन, हॉर्सचेस्टनट, बीच, ॲश, मॅग्नोलिया, टुपेलो, ट्युलिप, ससाफ्रा या व अन्य वनस्पती आणि उपोष्ण कटिबंधीय अनेक प्राण्यांबरोबरच मोठा व छोटा पंडा हे विशिष्ट प्राणी आहेत.
पर्यटन स्थळ :
चीनमधील कॅंटन, चुंगकिंग, वूहू तिन्त्सिन, मूकडेन, आनशान, चिंगडाऊ, नानकिंग, हांगजो, फूजो इ. बहुतेक मोठी शहरे पूर्व भागातील समृद्ध प्रदेशात आहेत, गतवैभवाची साक्ष देणाऱ्या कित्येक वास्तू, वैशिष्ट्यपूर्ण पॅगोडा अद्यापही काही शहरांतून पहावयास मिळतात. प्राचीन रेशीम मार्गावरील कॅश्गार, यार्कंद, खोतान, गार्टोक ही शहरे, तिबेटची राजधानी ल्हासा, मंगोलिया भागातील शहरे ही प्रवाशांसाठी पर्यटन स्थळे आहेत.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Essay On Election In Marathi
- Essay On Yoga In Marathi
- Child Labour Essay In Marathi
- Doordarshan Essay In Marathi
- Essay On Metro Rail In Marathi
- Essay On World Wildlife Day In Marathi
- My Country India Essay In Marathi
FAQ
चीन सर्वात प्रसिद्ध कशासाठी आहे?
निःसंशयपणे चीन ज्यासाठी प्रसिद्ध आहे ती सर्वात प्रसिद्ध खूण म्हणजे द ग्रेट वॉल , पृथ्वी आणि दगडांनी बनलेली 13,170 मैलांची प्रचंड तटबंदी. जगातील सात आश्चर्यांचा हा अधिकृत भाग आहे. नेत्रदीपक भिंत 2,500 वर्षांच्या कालावधीत बांधली गेली आणि अखेरीस 220 BC मध्ये बांधकाम पूर्ण झाले.
चीन मध्ये किती राज्य आहेत?
चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग खालीलप्रमाणे आहेत : प्रांत : आंह्वी, गान्सू, ग्वांगदोंग, ग्वीचौ, चेज्यांग, छिंघाय, ज्यांग्सू, ज्यांग्शी, जीलिन, फूज्यान, वुहान, ल्याओनिंग, सिच्वान, शाआंशी, शांदोंग, शांशी, हनान, हबै, हाइनान, हूनान, हूपै, हैलोंगच्यांग.
चीनमध्ये किती देश आहेत?
प्रशासकीयदृष्ट्या, चीन 16 23 प्रांतांमध्ये, 5 स्वायत्त प्रदेशांमध्ये (आतील मंगोलिया, गुआंगशी, तिबेट, निंग्जिया, झिनजियांग), 4 नगरपालिका (बीजिंग, टियांजिन, शांघाय, चोंगकिंग) आणि 2 विशेष प्रशासकीय प्रदेश (हाँगकाँग, मकाओ) मध्ये विभागलेला आहे.
चीनचे जुने नाव काय आहे?
टियांचाओ आणि टियांक्सिया टियांचाओ (天朝; पिनयिन: Tiāncháo), “स्वर्गीय राजवंश” किंवा “स्वर्गीय साम्राज्य;” म्हणून अनुवादित आणि Tianxia (天下; पिनयिन: Tiānxià) “स्वर्गाखाली” म्हणून भाषांतरित केलेले दोन्ही वाक्ये चीनचा संदर्भ देण्यासाठी वापरली गेली आहेत.
चीनची राजधानी काय आहे?
बीजिंग
Khup chan mahiti hoti …
Thank You