पालघर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Palghar District Information In Marathi

Palghar District Information In Marathi कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पूर्वेकडे असणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राची किनारपट्टी या दरम्यान पसरला आहे.  सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन, त्यामधून वेगळा झालेला पालघर हा महाराष्ट्र राज्यातला 36 वा जिल्हा 1आॅगस्ट, 2014 रोजी अस्तित्वात आला. पालघरचे साधारण तीन विभाग पडतात. तर चला मग पालघर या जिल्हा विषयावर सविस्तर माहिती पाहूया.

Palghar District Information In Marathi

पालघर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Palghar District Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

पालघर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ असेल 5,344 चौरस किलोमीटर पालघर जिल्ह्याच्या उत्तरेला गुजरात आहे. ईशान्येला नाशिक आहे. दक्षिणेला ठाणे, पश्चिम बाजूला अरबी समुद्र आपल्याला दिसतो आणि वायव्य दिशेला दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे.

लोकसंख्या :

2011 च्या जनगणनेनुसार आता जिल्ह्याचा समावेश असलेल्या तालुक्यांची लोकसंख्या 2,990,116 आहे. पालघरची शहरी लोकसंख्या 1,435,210 आहे, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 48% शहरी भागात राहतात.

पूर्व व ईशान्य दिशेस ठाणे व नाशिक जिल्हा असून, गुजरात राज्यातील वलसाड जिल्हा व दादरा व नगर हवेली व उत्तरेकडील दमण व दीव केंद्र शासित प्रदेश हे जिल्हा वसलेले आहे. अरबी समुद्राची पश्चिम सीमा बनते, तर वसई-विरार, पालघर-बोईसर, डहाणू हे मुंबई  महानगर प्रदेशाचे भाग आहेत.

पालघर जिल्ह्यातील तालुके :

पालघर, वडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी आणि वसई-विरार हे तालुके आहेत.

पालघर जिल्हा इतिहास :

पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. वसई तालुक्यावर पूर्वी पोर्तुगीजांचा कब्जा होता. त्यावेळी त्या काळामध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांचे हे साम्राज्य उध्वस्त करून लावत जवळपास पावणे 300 वर्षांपूर्वी मराठी झेंडा वसईमध्ये रोवला. तर जव्हार येथील मुकणे राजे हे खूप प्रसिद्ध राजे होते, त्याच्या राज्याला शिवाजी महाराजांनी सुद्धा भेट दिली होती.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1942 च्या ‘चले जाओ’ या आंदोलनामध्ये पालघर हे सर्वात महत्त्वाचे केंद्र होते. ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात 14 ऑगस्ट 1942 रोजी उठाव झाला होता. त्यात पालघर हे उठावाचे मुख्य केंद्र होते.

या उठावामध्ये पालघर तालुक्यातील पाचजण शहीद झाले. सातपाटीचे काशिनाथ हरी पागधरे, नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर, पालघरचे रामचंद्र भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, सालवडचे सुकुर गोविंद मोरे हे पाचजण स्वातंत्र्यासाठी इंग्रजाशी लढा देताना शहीद झाले.

या शहिदांची स्मृती म्हणून पालघर शहरामध्ये हुतात्मा चौक उभारलेला आहे. इसवी सन 1930 चा मिठाचा सत्याग्रह सुरू झाला तेव्हा पालघर तालुक्यातील वडराई ते सातपाटी पासून अनेक कार्यकर्ते या सत्याग्रहात सामील झाले होते. त्यावेळी सातपाटी येथे परदेशी वस्तूंची होळी करण्यात आली होती. जव्हार येथे राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान होते. तेथील संस्थानाचा प्रसिद्ध राजवाडा आजही सुस्थितीत आहे.

वाहतूक व्यवस्था :

पालघर शहर रेल्वे रस्ते व समुद्रमार्गाने मुंबई आणि गुजरात राज्याशी जोडलेले आहे. मुंबई शहरापासून जवळ असल्यामुळे शैक्षणिक, औद्योगिक आणि शहरी प्रगतीस खूप वाव आहे. पालघर येथून महाराष्ट्रातील उर्वरित भागासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस आहेत.

पालघर शहराभोवती असलेल्या कमारे, काटाळे, केळवे,  कोकणेर, खारेकुरण, दापोली, नागझरी, माहीम, वडराई, वाकसई, शिरगाव, सातपाटी तसेच बाहेरगांवी जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.

संस्कृती :

जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोळी महादेव, कातकरी, कोळी मल्हार, कोकणा-कोकणी, दुबळा, धोडिया, टोकरे-कोळी वारली इत्यादी आदिवासी जमाती आहेत. या आदिवासी समाजाने आपला सांस्कृतिक वारसा जपून ठेवला असून त्यामधील वारली चित्रकला व तारपा नृत्य ही त्यांच्या समाजजीवनाची ओळख आहे.

वारली चित्रकारी आदिम काळापासून म्हणजे जेव्हा मनुष्य वास्तव्य करीत होता, त्या काळापासून म्हणजे साधारपणे 1100 वर्षापासून जतन केलेली आहे. या चित्रकलेमधे आदिवासी समाजाच्या विविध चालीरीती तसेच दैनंदिन होणाऱ्या घडामोडी, आदिवासींच्या दैनंदिन जीवनात होणारे प्रसंग उदा. लग्न, नृत्य, विविध सण, निसर्गातील घडामोडी अशा प्रकारचे प्रसंग उत्तम प्रकारे चित्ररूपाने दाखवले जातात.

ही चित्रे कुठल्याही प्रकारचा रासायनिक रंग न वापरता निसर्गापासून मिळणाऱ्या वस्तू, उदा. माती, तांदळाचे पीठ, वनस्पतीजन्य रंग व बांबूच्या काड्यांचे ब्रश वापरून काढली जातात.

ही कला आदिवासींच्या जीवनशैलीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी चित्रकला असून या चित्रकलेला भारतात तसेच परदेशात खूप मागाणी आहे. श्री. जीव्या सोमा म्हसे हे वैशिट्यपूर्ण वारली चित्रकला शैलीचे चित्रकार म्हणून आज प्रसिद्ध असून ते आजच्या नवीन वारली चित्रकरांचे आदर्श आहेत. त्यांच्या वारली चित्रकलेतील योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने 2011 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले आहे.

शेती :

पालघर जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय शेती असून त्याचबरोबर उद्योग धंदेही चालतात. शेती मधील मुख्य पिकामध्य भात, कडधान्य, आंबा, मका, मिरची, उडीद, डहाणूचा चिकू, वसईची केळी ही पिके उत्पादने येथे होतात तसेच सातपाटी येथून पापलेट व कोळंबी या माशांची निर्यात केली जाते.

जिल्हयातील सपाट पठारी प्रदेशामध्ये औद्योगिक पट्टे अस्तित्वात आहेत. यामध्ये मुख्यतः कापड उद्योग, रासायनिक कारखाने, अभियांत्रिकी उद्योग, स्टील उद्योग इ. चा समावेश आहे.

जिल्ह्यातील नद्या :

पालघर जिल्ह्यातील मुख्य नदी वैतरणा आहे. नदीला अनेक उपनद्या आहेत. त्यातील बारवी आणि भातसा, पिंजाल, सूर्य, दहेरजा आणि तानसा या महत्त्वाच्या नद्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर डोंगरात गोदावरीच्या उगमस्थानासमोर कोकण नद्यांचा सर्वात मोठा वैतरणाचा उगम आहे.

ही नदी शहापूर, वाडा आणि पालघर तालुक्यातून वाहते आणि अर्नाळाच्या एका विस्तृत मोहिमेद्वारे अरबी समुद्रात प्रवेश करते.  वैतरणा नदी 154 कि.मी. लांबीची असून ड्रेनेजचे क्षेत्र आहे. जे जिल्ह्याच्या संपूर्ण उत्तरेकडील भागात व्यापते. अरबी समुद्राला वाहणारी उल्हास नदी म्हणजे वसई खाडी, जिल्ह्याची दक्षिणेकडील सीमा असून अर्नाळा बेट वसई तालुक्यात वैतरणा वस्तीच्या प्रवेशद्वाराजवळ आहे.

पर्यटन स्थळ :

पालघर ही पालघर जिल्ह्याची प्रशासकीय राजधानी आहे, हे अभियांत्रिकी, औषधनिर्माण, प्लास्टिक आणि कापड यासारख्या अनेक व्यवसाय आणि उद्योगांचे माहेरघर आहे. काही किल्ले आणि धार्मिक स्थळे आर्किटेक्चरची एक वेगळी पोर्तुगीज शैली दाखवतात.

येथे अनेक पर्यटक दरवर्षी अनेक पर्यटक येथील पर्यटनस्थळांना किल्ल्यांना आणि धार्मिक स्थळांना भेट देत असतात तर आपण जाणून घेऊया कोणकोणती ती स्थळे आहेत.

वाघोबा खिंड, केळवे समुद्र किनारा, मोरेकुरन-कोळगाव शीवेवरील वनराई बधांरा,मौजे दापोली (पालघर जिल्हा) येथील वनीकरण क्षेत्र,
लक्ष्मी नारायण मंदिर, शिरगावचा समुद्र किनारा, शीतलादेवीचे केळवे येथील पुरातन मंदिर, सातपाटी समुद्र किनारा, हुतात्मा स्तंभ.

दाभोसा धबधबा :

दाभोसा हा काही मोजक्या धबधब्यांपैकी एक आहे जो बारमाही आहे. ते प्रत्येक हंगामात वाहतात. याशिवाय, हा महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे.

पलुचा धबधबा विक्रमगड :

सुमारे 300 फूट उंचीवरुन उडणारा हा धबधबा लेंद्री नदीमध्ये आहे. या धबधब्याला भेट देण्यासाठी पावसाळा हा सर्वोत्तम हंगाम आहे. हा धबधबा एक मुख्य पर्यटन स्थळ आहे, ज्याला पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.

हिरडपाडा धबधबा :

हिरडपाडा हे जव्हारमधील 109 गावांपैकी एक आहे. हे गाव धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे, जे गावापासून फक्त अर्धा किमी अंतरावर आहे. मूळ आदिवासींचे अनोखे ढोल नृत्य, तारपा नृत्य आणि वारली चित्रकलेसाठीही गावाला लोकप्रियता मिळाली आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment