रायगड जिल्ह्याची संपूर्ण माहिती Raigad District Information In Marathi

Raigad District Information In Marathi महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पसरलेला रायगड जिल्हा कोकणाचा एक प्रमुख भाग आहे. मुंबई पासून 120 कि.मी.अंतरावर असलेला रायगड जिल्हा कोकण विभागीय महसूल क्षेत्रात येतो. तर चला मग पाहूया रायगड या जिल्हा विषयी सविस्तर माहिती.

Raigad District Information In Marathi

रायगड जिल्ह्याची संपूर्ण माहिती Raigad District Information In Marathi

रायगड जिल्ह्याचे पुर्वीचे नाव कुलाबा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून हे नाव पडले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला या जिल्हयात असल्याने बॅरिस्टर अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी  1981 साली 1 जानेवारीला या जिल्हयाचे नाव बदलुन रायगड असे करण्यात आले. पूर्वीच्या मराठा साम्राज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ल्यावरून जिल्ह्याचे नाव रायगड असे ठेवण्यात आले.

क्षेत्रफळ व विस्तार :

या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7,162 चौरस कि.मी. असून जिल्ह्याच्या वायव्येस मुंबई बंदर, उत्तरेस ठाणे जिल्हा, पूर्वेस पुणे जिल्हा, दक्षिणेस रत्‍नागिरी जिल्हा आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. त्यात मुंबई बंदराच्या अगदी दक्षिणेस असलेल्या पेण-मांडवा या मोठ्या नैसर्गिक बंदराचा समावेश होतो आणि त्यासोबत एकच भूस्वरूप तयार होते. रायगड जिल्हयाला 240 कि.मी. लांबीचा विस्तिर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. किनाऱ्यालगत घारापुरी, कुलाबा, जंजिरा, खांदेरी, उंदेरी, कासा, करंजा अशी बरीच लहान मोठी बेटे आहेत.

लोकसंख्या :

रायगड या जिल्ह्याची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 26,35,200 असून जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण 89 टक्के असून लिंग गुणोत्तर प्रमाण 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण 955 इतके आहे. आगरी जातीचा समाज या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे.

हवामान :

जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणतः सम, उष्ण व दमट आहे. दिवसांच्या व रात्रीच्या तापमानात फारसा फरक नसतो. उन्हाळे खूप उष्ण नसतात व हिवाळेही खूप थंड नसतात. मात्र, सर्वच ऋतूत हवेतील आर्द्रता जाणवण्याजोगी असते.

जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून सरासरी 50 से.मी. इतका पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढत जाते. जिल्ह्यात माथेरान येथे सर्वाधिक पाऊस पडतो, तर अलिबाग येथे किमान पावसाची नोंद होते.

रायगड जिल्ह्यातील तालुके :

रायगड जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत.

(1) अलिबाग (2) उरण (3) पनवेल (4) कर्जत (5) खालापूर (6) पेण (7) सुधागड (पाली) (8) रोहा (9) माणगाव (10)महाड (11) पोलादपूर (12) म्हसळे (13) श्रीवर्धन (14) मुरुड.

रायगड जिल्हा इतिहास :

ठाणे या जिल्ह्यातून 1869 मध्ये कुलाबा जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात भोईर, भगत, पाटील, म्हात्रे, नाईक, ठाकूर ही लोकसंख्येचा एक मोठा भाग प्रसिद्ध आणि मूळ आडनावे आहेत. या टप्प्यावर, आधुनिक रायगड जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग ठाणे जिल्ह्यात कायम ठेवण्यात आला होता.

मुंबईच्या खाडीपलीकडे असलेले पनवेल हे 1883 पर्यंत कुलाबा जिल्ह्यात समाविष्ट नव्हते आणि आधुनिक रायगड जिल्ह्याच्या ईशान्य कोपऱ्यातील कर्जत हे क्षेत्र 1891 पर्यंत कुलाबा जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले नव्हते. कोलाबा जिल्ह्याचे नंतर रायगड जिल्हा असे नामकरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यात पुर्वी काही ठिकाणी बेनेइस्त्रायली ज्यु लोकांनी निवास केला होता. आगरी जातीचा समाज या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे.

प्रमुख नद्या :

रायगड जिल्ह्यात उल्हास, प्राताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, काळ व सावित्री या प्रमुख नद्या आहे. या सर्व नद्या पूर्वेकडील सह्य डोंगररांगांत उगम पावून वळणे घेत घेत पश्चिमेकडे वाहात जाऊन अरबी समुद्रास मिळतात.

उल्हास नदी बोरघाटाच्या उत्तरेस सह्याद्री रांगाम्त उगम पावते व कर्जत तालुक्यातून दक्षिण-उत्तर वाहात जाऊन पुढे ठाणे तालुक्यात प्रवेश करते. पाताळगंगा नदीचा उगम बोरघाटाजवळ होतो, तर भोगावतीचा उगम बोरघाटाच्या दक्षिणेस होतो. या दोन्ही नद्या पश्चिमेकडे वाहात जाऊन धरमरतच्या खाडीत अरबी समुद्रास मिळतात.

शेती व्यवसाय :

शेती व्यवसायात बरेच लोक काम करतात. तांदूळ हे रायगड जिल्ह्याचे मुख्य पीक असून लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ 70% क्षेत्रात हे पीक घेतले जाते. तांदूळ उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. माणगाव, अलिबाग, पेण, पनवेल या तालुक्यात भाताचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

उद्योगधंदे :

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कीटकनाशके बनवणारा आशियातील सर्वात मोठा हिंदुस्थान इन्सेक्टीसाइड्स हा कारखाना आहे. याच तालुक्यात आयुर्वेदीक औषधांची निर्मिती करणारा धूत पापेश्वर हा मोठा कारखाना आहे. महाड येथे हातकागद तयार करण्याचा उद्योग आहे. रोहे व खोपोली येथे पुठ्ठे तयार करण्याचा व्यवसाय चालतो.

वनस्पती व प्राणी :

जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्रावर वने आहेत. पेण, पनवेल, कर्जत, रोहे आणि सुधागड या तालुक्यांमध्ये वनाचे प्रमाण अधिक आहे. या वनांमध्ये साग, ऐन, खैर, आंबा, चिंच यासारखे वृक्ष आहेत.

येथील वनांमध्ये वाघ, कोल्ह्ये, रानडुक्कर, सांबर यांसारखे प्राणी आढळतात. पनवेल तालुक्यात कर्नाळा येथे पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य आहे. उरण तालुक्यात घारापुरी व कर्जत तालुक्यात माथेरान येथे वनोद्याने आहेत. जिल्ह्यातील फणसाड येथील अभयारण्य अतिशय विस्तृत क्षेत्रावर पसरलेले आहे.

पर्यटन स्थळ :

रायगड जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहे. येथे पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. तर चला मग पाहूया या विषयी सविस्तर माहिती.

वाळण कुंड :

हे महाड तालुक्यातील आगळेवेगळे आणि प्रेक्षणीय स्थळ आहे. महाडच्या ईशान्येस 19.31 कि.मी. अंतरावर एस.टी. मार्गावर वाळण बुद्रुक गावाच्या पुढे आहे. कुंडात लहान मोठ्या आकाराचे देव मासे असतात. हा डोह 91 मी. लांब व 10 मी. रुंद आहे.

महाड तालुका :

महाड तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेला किल्ले रायगड मोठ्या दिमाखाने उभा आहे. याखेरीज अन्यही काही पर्यटनस्थळे आहेत.

चवदार तळे :

महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतिक’ म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात.

शिवथरघळ :

समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ जेथे लिहिला ते एक निवांत आणि निसर्गरम्य स्थळ म्हणजे शिवथरघळ. शिवथरघळीतच रामदासांनी दासबोधसारख्या पवित्र ग्रंथाची निर्मिती केली. शिवथरघळ हे महाडच्या पूर्वेस 34 किमी अंतरावर आहे.

माथेरान :

माथेरानला जाताना ‘टॉय ट्रेनने’ होणारा दोन तासाचा प्रवास स्मरणीय असतो. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाला भेट देताना विविध पक्षी, माकडे आणि हिरव्यागार डोंगरांची समृद्धी सभोवती असल्याने हा प्रवास संपूच नये असे वाटते. सोबत पॅनोरमा, गॅरवॅट अलेक्झांडर, वनट्री हील असे विविध पॉईंट पर्यटकांना आकर्षित करतात.

घारापूरची लेणी :

मुंबईहून सात किलोमीटर अंतरावर असलेले उरण तालुक्यातील घारापूरी बेट ‘एलेफंटा केव्हज्’ म्हणून प्रसिद्ध आहे. दगडात कोरलेल्या या गुंफा सातव्या शतकातील आहेत. या गुंफांना जागतिक हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे.

मुरुड-जंजिरा :

जंजिऱ्याच्या सिद्दीची राजधानी म्हणून मुरुडची ओळख आहे. प्राचीन किल्ल्यासोबतच किनाऱ्यावरील नारळी-पोफळीची झाडे परिसराच्या सौंदर्यात भर घालतात. समुद्र लाटांचा सामना करीत मजबुतीने उभी असणारी 40 फूट उंचीची किल्ल्याची तटबंदी खास आकर्षण आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment