युगांडा देशाची संपूर्ण माहिती Uganda Information In Marathi

Uganda Information In Marathi कांपाला हे देशाच्या राजधानीचे तसेच देशातील सर्वांत मोठे शहर आहे. देशात बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी घडत गेल्या. येथील हवामानातही आपल्याला बदल दिसतो. या देशातही स्त्रियांना पुरुषांच्या समान हक्क दिला जातो. चला मग पाहूया देशा विषयी सविस्तर माहिती.

Uganda Information In Marathi

युगांडा देशाची संपूर्ण माहिती Uganda Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

युगांडा या देशाचे क्षेत्रफळ 2,41,139 चौरस किमी. आहे. या देशाचा विस्तार हा 40°7′ उत्तर ते 10°30′ दक्षिण व 290°33′ ते 350°20′ पूर्व असा असून या देशाच्या उत्तरेस सुदान पश्चिमेस झाईरे, दक्षिणेस रुआंडा, टांझानिया हे देश व व्हिक्टोरिया सरोवर आहेत. पूर्व दिशेला केन्या हा देश आहे.

हवामान :

युगांडा देशाच्या दक्षिण भागातून विषवृत्त जात असल्यामुळे विषुवृत्तीय स्थानावर या देशातील हवामान हे उष्ण असते. देशाच्या हवामानावर भिन्न प्रदेशांचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो येथील हवामान हे उष्ण तर कोठे सौम्य व उबदार आढळते. या देशातील भाग म्हणजेच पर्वत विषुववृत्ताजवळ असूनही येथे बर्फाच्छादित असलेली शिखरे आढळतात.

वर्षभर हवामान असून इतर विषुववृत्तीय प्रदेशात प्रमाणे आभाळ मेघाच्छादित असते. येथे उंचीनुसार तापमानात फरक दिसून येतो. देशाच्या प्रत्येक भागात पर्जन्यवृष्टी अनुकूल प्रमाणात होते. येथील सरासरी पर्जन्यमान हे 100 सेमी आहे.

प्रमुख नद्या व सरोवरे :

या देशात एडवर्ड, जॉर्ज, अल्बर्ट, बीसीना व क्यूगा ही मुख्य सरोवरे असून या देशांमध्ये जलप्रणाली यांची निर्मिती नद्या द्वारे होते. या देशातील मुख्य नद्या आठ आहे. त्या म्हणजे नाईल उत्तर भागातील आस्वा, दोपेथ, पॅगर. वायव्य भागात अल्बर्ट, नाईल उत्तर पश्चिम भागात काफुए, कटोंगा व एमपोंगो ह्या मुख्य मध्ये आहेत.

इतिहास :

युगांडा देशाच्या प्राचीन इतिहासाविषयी अजून कोणतेही पुरावे किंवा कोणतीही माहिती उपलब्ध नाही. परंतु पुरातत्वीय अवशेषांवरून पूर्वी येथे पुराणाश्म व नवाश्मयुग या संस्कृती असल्याचे आढळले. पश्चिमेकडून बांतू भाषिक यांनी 1100 च्या सुमारास नैऋत्य युगांडात स्थलांतर केले.

See also  डोमिनिका देशाची संपूर्ण माहिती Dominica Information In Marathi

हे स्थलांतरित बांतू भाषिक वेगवेगळ्या राज्यात संघटित झाले. याच लोकांनी 1500 च्या सुमारास आग्नेय सुदानमधील नाईलॉटिक भाषिक लोकांनी क्रेझी राज्य जिंकून बुगांदा, बुन्योरो अंकोली राज्याची स्थापना ही केली. त्यानंतरच्या सोळाव्या शतकात लुओ भाषिकांनी उत्तर युगांडा जिंकले व उत्तरेकडील लोकांनी नाइलॉटीक हि भाषा शिकून घेतली.

16-17 व्या शतकात बुलेरो हे दक्षिण व खंडातील प्रभावी असे राज्य होते. तसेच त्यांचे रुआंडा व टांझानियातील प्रदेशावर नियंत्रण होते. या काळात बुगांडाचा राज्य विस्तार झाला. व ते प्रभावी राज्य बनले.

त्यानंतर 1972 मध्ये आर्थिक युद्ध सुरू झाल्याने त्या राजवटीने युगांडाची नागरिक नसलेल्या सर्व आशियाई लोकांना देश सोडून जाण्याचा आदेशही दिला. त्याच काळात 60 हजार लोक देश सोडून गेले. त्यानंतरच्या काळातील बंडाचे रांजणी अशी सिमांविषयी अनेकदा तंटे झाले.

1979 मध्ये शासनाची तात्पुरती स्थापना करून युसूफ लुले यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड केली गेली. लुले यांच्यानंतर गॉडफ्री बिनाइसा हे राष्ट्राध्यक्ष झाले. 1980 मध्ये झालेली निवडणूकीमध्ये काँझर्न्व्हेटिव्ह पार्टी, डेमॉक्रॅटिक पार्टी, नॅशनल लिबरल पार्टी व युगांडा पीपल्स काँग्रेस या चार प्रमुख पक्ष सहभागी झाले. त्यामध्ये युगांडा पीपल्स काँग्रेस पक्षाने बहुमत मिळाले व अपोलो मिल्टन ओबोटे पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनले. त्यानंतर अमीन राजवटीत सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली.

वनस्पती व प्राणी :

युगांडा पावसाचे प्रमाण बरेच पैकी असल्यामुळे येथे वनस्पती अधिक प्रमाणात आढळून येतात व घनदाट जंगले येथे दिसून येतात. येथील जंगलात सॅव्हाना प्रकारच्या वनस्पती चे प्रमाण खूप आहे. मध्य व उत्तर भागात तोरणे पार्क लाईन प्रकारचे गवताळ प्रदेश तसेच दक्षिण भागात बाभूळ वनस्पतीचे जास्त आहे.

याठिकाणी युफोरबिया कॅडेलाब्रा वनस्पती व घनदाट अरण्याचे पट्टे आणि गवताळ प्रदेश दिसून येतो. युगांडाच्या ईशान्य भाग हा सर्वात कोरडा असून तेथे उत्तरेकडील कोरड्या प्रदेशात स्टेप प्रकारचे गवत व वनस्पती हिक्टोरिया सरोवराचा परिसर आणि पश्चिमे कडील भागात गजराज प्रकारचे गवत आढळून येते.

See also  नायजर देशाची संपूर्ण माहिती Niger Information In Marathi

सहाजिकच येथील घनदाट अरण्य असल्यामुळे येथे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. त्यामध्ये नैऋत्य भागात गोरिला, चिंपाजी, लहान हत्ती तर ईशान्य भागात कुरंग, सिंह, चित्ता, इलॅड, हे प्राणी आढळून येतात. याशिवाय देशात हार्ड बेस्ट येलंड,
बुशबक, टोपी या जातींची हरणे आणि जिराफ युगांडा कॉब हे प्राणी मोठ्या आढळतात.

पक्ष्यांमध्ये क्रेन पक्षी, बिव्हर, कावळा, बुलबुल, खाटीक पक्षी, गिनी फाउल, आयबिस, ईग्रेट, बक, हॉर्नबिल, कबूतर, डार्टर, काईट मिशिगन इत्यादी पक्षी खूप मोठ्या प्रमाणात आढळतात.

शेती :

युगांडा या देशातील लोक शेती उत्पादनावर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे या देशामध्ये कापूस, तंबाखू, चहा-कॉफी, ऊस ही पिके प्रामुख्याने घेतली जातात व कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांची ही येथे मोठ्या प्रमाणावर निर्मिती झालेली आहे. 1959 ते 1968 या काळात देशाच्या औद्योगिक विकास झपाट्याने झाला.

वाहतूक :

या देशात अंतर्गत वाहतूक, सागरी वाहतूक व हवाई वाहतूक लोहमार्ग यांचाही मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसून येतो. सागरी वाहतुकीसाठी केल्यावर टांझानिया या देशांवर यांना अवलंबून राहावे लागते. 1977 मध्ये ईस्ट आफ्रिका कम्युनिटी चे कामकाज बंद झाल्यामुळे केन्या टांझानियातील लोहमार्ग व बंदरे वापरणे यावर बंदी आल्यामुळे विमाने रेल्वे इंजिने, डबे त्यांच्या मालकीवर त्यांना सामोरे जावे लागले.

देशात 1280 किमी लांबीचे लोहमार्ग होते. तसेच या देशातील रस्त्यांची एकूण लांबी 27,325 किमी होती. येथे सरोवरं मधून बोटि द्वारे जलवाहतूक चालते. कंपाला पासून 40 किमी विक्टोरिया सरोवराच्या काठावरील एंटेबे येथे असून एयरलाइंस कडून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुरवली जाते.

लोक व समाज व्यवस्था :

या देशातील विक्टोरिया सरोवराच्या उत्तर भागातील बंडा या वंशाचे लोक राहतात. तसेच देशातील सर्वात मोठा वांशिक गट म्हणून हा ओळखला जातो. त्यांची ही ओळख त्यांच्या भाषेवरूनच करते. या देशात बांतू, नाईलॉटिक व नाईलो हॅमाईट ह्या भाषा बोलणारे मुख्य तीन गट आहेत. बांधू ही भाषा बोलणारे दक्षिण पश्चिम व पूर्व भागातील असे 70% लोक आहेत.

See also  ब्राझील देशाची संपूर्ण माहिती Brazil Information In Marathi

तर उत्तर वायव्य व उत्तर मध्य भागात अंकोले व लांगो हे सूदानिक गटातील नाइलॉटीक भाषिक, तर ईशान्य भागात ईटेसो हे नाइलो-हॅमाइट भाषा बोलणारे लोकांचे प्रमाण जास्त आहे. येथील आढळणाऱ्या जमातींमध्ये ब्यान्यनकोली, बुन्योरो, बोटोरो, बासोगा व कारामोजाँग ह्या प्रमुख जमाती आपल्याला दिसून येतात.

युगांडा या देशात स्त्रियांनाही समान हक्क देण्यात आले परंतु परंपरेचा पगडा ही त्यांच्यावर खूपच जड आहे. येथे शासकीय दवाखाने रुग्णालये यांची वैद्यकीय सोय उपलब्ध आहेत तरीसुद्धा आम्हीं राजवटीत या फारच कमी प्रमाणात होत्या. येथील प्रौढांमध्ये गुप्त रोगाचे प्रमाण खूपच आढळते. त्याव्यतिरिक्त लहान मुलांमध्येही अनेक बिमार्यांचे आवरण असते.

देशातील पर्यटन स्थळ :

युगांडा या देशामध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत. त्यापैकी कंपाला हे शहर राजधानीचे असूनही ते एक पर्यटन स्थळ आहे. तसेच देशातील अरण्यमय प्रदेश व त्यातील वन्यप्राणी सरोवरे पर्वतीय प्रदेश हे पाहण्यासाठी पर्यटक विदेशातून येत असतात. येथे परदेशी पर्यटकांना या देशात पारपत्र मिळवण्याची व पितज्वराची लस टोचून घेण्याची सक्ती असते. त्याचबरोबर या नियमांमध्ये वेळोवेळी बदल होत असतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment