Ethiopia Information In Marathi इथिओपिया हा एक लोकशाही प्रजासत्ताक देश आहे. या देशाचे पूर्वीचे नाव अँबिसीनिया असे होते. इथियोपिया हा एक असा देश आहे ज्या देशाच्या एका वर्षामध्ये 13 महिन्यांचा समावेश आपल्याला दिसतो. तर चला मग पाहुया या देशाविषयी सविस्तर माहिती.
इथिओपिया देशाची संपूर्ण माहिती Ethiopia Information In Marathi
त्यांची नवे वर्ष हे 11 सप्टेंबरला सुरू होते. तसेच बारा महिन्यांमध्ये 30 दिवसांचा समावेश असून त्यांच्या एका वर्षात एक महिना शिल्लकचा असतो. त्या शिल्लकच्या वर्षाला प्यागुमे म्हणतात आणि या महिन्यात पाच किंवा सहा दिवस जास्तीचे असतात. पूर्ण वर्षामध्ये या दिवसांना मोजल्या जात नसून त्यासाठी एक नवीन जास्तीचा महिना बनवला जातो.
क्षेत्रफळ व विस्तार :
इथिओपिया या देशाचे क्षेत्रफळ 12,21,900 चौकिमी असून या देशाचा विस्तार हा 3°30′ उत्तर ते 18° उत्तर व 33° पूर्व ते 48° पूर्व असा आहे. या देशाच्या उत्तरेला इरिट्रिया पश्चिमेला सुदान दक्षिणेला केण्या पूर्वेला सोमालियात तर ईशान्येला जिबूती हे देश आहेत. अबासबाबा हे इथिओपियाचे राजधानीचे सर्वात मोठे शहर आहे.
हवामान :
येथील हवामान हे उंच-सखल प्रदेशावर अवलंबून असते म्हणून येथील हवामानात भिन्नता पाहायला मिळते. अति उंच पठारावरील किंवा टेकड्यांवरील हवामान हे स म व सौम्य असून तेथील सरासरी तापमान 16° सेल्सिअस असते. त्यापेक्षा कमी उंचीच्याप्रदेशातील सरासरी तापमान 22° सेल्सिअस तर समुद्र सपाटी व वाळवंटी प्रदेशातील सरासरी तापमान 26° पेक्षा जास्त असते.
तेथील या सखल उंच व ती उंच भागांना अनुक्रमे नावे आहेत ते म्हणजे डेगा, वोइना-डेगा आणि कोल्ला आहे. या तीनही प्रदेशात अनुक्रमे पावसाचे प्रमाण डेगा या प्रदेशात 50 सेमी पेक्षा कमी तर वोईना-डेगा या प्रदेशात 50 ते 150 सेमी आणि कोल्ला या प्रदेशात 125 ते 175 सेमी पडतो. या देशात पावसाळा हे जून ते सप्टेंबर हे असून त्यानंतरच्या ऋतूत मार्च-एप्रिलमध्ये थोडा पाऊस पडतो अति उंच भागात बऱ्याच वेळा ही वृष्टी सुद्धा होते.
भौगोलिक वर्णन :
इथिओपिया हा प्रदेश डोंगराळ विलीकरण आणि विभंग झालेल्या स्फटिकी खडकांनी पासून तयार झालेला आहे. येथील जमिनीच्या थरांमध्ये स्तरित खडक, चुनखडक वालुकाश्म आणि लावा पासून बनलेले जाडीचे खडक आहेत. हा प्रदेश मध्ये नूतन कालखंडात तयार झाल्यामुळे अजूनही तेथे स्थिरता आलेली नाही अनेक ज्वालामुखी आणि भूकंप येथे होत असतात अनेक ठिकाणी उष्णोदकाचे झरे व सरोवरे सुद्धा आढळून येतात.
भाषा :
इथिओपिया या देशातील भाषेबद्दल बोलायचे झाले तर या देशात नव्वद भाषा वापरल्या जात असून आम्हारिक ही राष्ट्रीय भाषा आहे. 90 भाषांपैकी बऱ्याच भाषा ह्या आफ्रो अशियन अशा समूहातील आहेत. या भाषेत त्यांचे लोक साहित्य सुद्धा प्रकाशित आहेत.
लोकसंख्या :
इथिओपिया या देशाची लोकसंख्या जवळजवळ 11.40 करोड आहे. आफ्रिकेमधील नायजेरिया नंतर सर्वात जास्त लोकसंख्येचा हा देश ओळखला जातो या देशाला आफ्रिकेचा हॉर्न ऑफ म्हणून सुद्धा ओळखले जाते.
इतिहास :
इथिओपिया या देशाचा इतिहास खूपच प्राचीन असल्याचे मानले जाते कारण 25 लक्ष वर्षापूर्वी अवशेष या देशातील ओव्या नदीच्या खोऱ्यात सापडले आहेत. तीन हजार वर्षापासून येथे कॉपी याविषयीची माहिती मिळते. इथिओपिया या देशातील प्राचीन काळातील लोकांना पुंट लोकांचा देश म्हणून ओळखले जात असे.
इजिप्त आणि इथिओपिया यांचा संबंध अनेक शतके टिकून राहिला त्यानंतरची माहिती मत्शाफा नेगास्त या राजांचा ग्रंथ व केब्रा नेगास्त राजवैभवाचा ग्रंथ यांमध्ये पाहायला मिळते.
येथील इतिहासामध्ये जेरुसमेलचा राजाच्या प्रेम कहानीचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी दिसून आलेला आहे. राजाचे नाव सॉलोमन व शिबाची राणी मेकेडा असून त्यांची नावे होते. त्यांना एक पुत्र प्राप्त झाला होता. त्याचे नाव पहिला मेनेलीक असे होते. हा काळ सुमारे 975 ते 950 असा होता. तेव्हापासून आजपर्यंत सॉलोमनचे घराणे येथे राज्य करीत आहे.
पहिल्या मेनेलिकपासून सॉलोमन घराण्याची सुरुवात झाली ते 259 राजांनी राज्य केल्यानंतर म्हणजेच एक 927 ते 1260 पर्यंतचा काळात खंड पडला. या काळात झाग्वे राजघराण्यातील अकरा राजांनी 333 वर्ष राज्य केल्यानंतर 1260 मध्ये येकुनो आम्लाक राजाने पुन्हा सालोमन घराण्याची प्राणप्रतिष्ठा केली. व तेव्हापासून आजपर्यंत 65 राज्यांनी राज्य केले. सध्या बादशाह हायली सेलॅसी हे 66 राजे होते.
शेती :
इतर देशांप्रमाणे इथिओपिया हा देश सुद्धा कृषिप्रधान देश असून येथील 90 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. राष्ट्रीय उत्पन्नापैकी 60 टक्के उत्पन्न हे शेतीतूनच निघते. इथिओपियाची
लावाजन्य जमीन फारच सुपीक व कसदार आहे. येथील बराच जमिनीचा भाग हा पर्वतमय व दऱ्याखोऱ्यात यांनी व्यापलेला आहे. उंच प्रदेशात कुरणे आहेत.
लोक व समाज :
इथिओपिया या देशातील लोक हे सेमेटिक आहेत परंतु येथील गल्ला लोक कुशायटीक कुळात मोडले जातात तर काही निग्रो वंशाचे लोक सुविधांच्या सीमेजवळ वसलेले असून येथे लहानसा ज्यू धर्मीय समाज सुद्धा आहे. त्या व्यतिरिक्त देशात आम्हारा, गाल्ला, सिठामा, आफरसाहो, गुरोगे, फलाशा, व निग्रो या जाती आहेत.
या देशात आम्हारा जातीचे वर्चस्व असून इथिओपियाचे राजे आम्हारा या जातीचे आहेत. त्याचबरोबर या देशात ख्रिश्चन व मुस्लिम धर्मीय सुद्धा आढळतात. या देशातील येझाना राजाने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यापासून मोनो फिजाईट हा ख्रिश्चन धर्म इथिओपियाचा राजधर्म म्हणून ओळखला जातो.
ख्रिश्चन धर्माच्या आधी येथे ज्यू धर्म मूर्तिपूजा आणि सर्व पूजा वगैरे अशा रिती प्रचलित होत्या. अनेक धार्मिक शब्द व विधी हिब्रूमधून आलेले आहेत. आठव्या दिवशी सुलता करण्याची ही पद्धत इथिओपियातील ख्रिश्चन लोकं पाडतात. येथील काही जातीतील लोकांचा अजूनही भुताखेतांवर विश्वास असल्यामुळे ते 52 दिवसांचा उपवास करतात त्यावेळी मास, दूध, तूप हे त्यांना वर्ज्य असते.
परंतु त्या काळात मासे हे खाऊ शकतात. तसेच तेथील आठवड्यातील दर बुधवार व शुक्रवार हे उपासाचे दिवस म्हणून पाळले जातात. अशी त्यांची संस्कृती आहे. साधुसंतांचे दिवसही उत्सवासाठी पाडतात शिष्टाचाराच्या कल्पना बऱ्याचदा भारतीय कल्पनांशी मिळत्याजुळत्या आपल्याला दिसून येतात.
कला व खेळ :
कला व खेळामध्ये पुरातन वास्तुशिल्पे धार्मिक आहेत. आक्सूम येथील एक सुच्याकार सूर्यस्तंभ 24 मी. उंच आहे. 1937 मध्ये 33 मी. उंचीचा स्तंभ इटालियनांनी रोमला नेला. गुंडा येथील बांधलेले किल्ले हे खूप प्रशंसनीय आहेत. लालीबेला जवळ राजे लालीबेला यांनी उभारलेल्याअकरा मोठांपैकी मधाने आलम हा मठ सर्वात मोठा आहे. तसेच येथील पुरातन भिंती चित्रे ही खूपच वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामध्ये सजीवपण आहे.
संगीताच्या बाबतीतही हा देश मागे नाही बायबलच्या चालीवर म्हटले जाणारे गीत डेग्वा व झेमा हे आहे. संगीत व नृत्याशिवाय इथिओपियन लोक जगू शकत नाही. येथील लोकांचे नृत्य म्हणजे आपल्याकडील भांगडा. एक्झाम नृत्यामध्ये तरुण मंडळी जास्तीत जास्त भाग घेतात.
राजधानीच्या ठिकाणी राष्ट्रीय नाट्यगृहाची स्थापना केली असून त्यामध्ये नाटके व संगीत असते. इथिओपिया या देशाचा राष्ट्रीय खेळ फुटबॉल हा आहे. फुटबॉल च्या व्यतिरिक्त येथे बास्केट वॉल टेनिस टेबल असे अनेक खेळ खेळले जातात.
पर्यटन स्थळ :
इथिओपिया या देशाला आफ्रिका खंडातील स्विझर्लंड मानले जाते. येथे अनेक पर्यटन स्थळ सरोवरे, उष्ण पाण्याचे झरे व धबधबे आहेत. यांना भेटी देण्यासाठी पर्यटक दरवर्षी येथे येतात व सहलीचा आनंद घेतात.
इथियोपीया हा देश पर्यटनाच्या बाबतीत फार जागृत देश आहे. येथे सुख सोयीच्या योजनाही वेळोवेळी आखल्या जातात. गोंडार हे पुरातन किल्ल्यासाठी तसेच लालीबेला हे पुरातन मठांसाठी प्रसिद्ध आहे.
येथील चर्च सर्वात जुने असून ते पाहण्यासाठी बरेच पर्यटक येत असतात. जगातील सर्वात मोठे स्तंभ इथिओपिया या देशांमध्ये आहे ते एक पर्यटकांचे आकर्षणंच आहे.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Child Labour Essay In Marathi
- Doordarshan Essay In Marathi
- Essay On Metro Rail In Marathi
- Essay On World Wildlife Day In Marathi
- My Country India Essay In Marathi
- Subhash Chandra Bose Essay In Marathi
- My School Essay In Marathi
- Essay On Makar Sankranti In Marathi
FAQ
इथिओपिया कोणत्या देशात आहे?
इथिओपियाचे फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक आफ्रिकेच्या उत्तर-पूर्व भागात स्थित आहे ज्याला सामान्यतः हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणून ओळखले जाते. हे मध्य पूर्व आणि युरोपच्या धोरणात्मकदृष्ट्या जवळ आहे, या प्रदेशातील प्रमुख बंदरांमध्ये सहज प्रवेश केल्यामुळे, त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढतो.
इथिओपिया हे नाव कोठून आले?
इंग्रजी नाव “इथिओपिया” हे ग्रीक शब्द Αἰθιοπία Aithopia, Αἰθίοψ Aithiops ‘an Ethiopian’ वरून आलेले आहे असे मानले जाते, ग्रीक शब्दांवरून व्युत्पन्न केले आहे ज्याचा अर्थ “जळलेल्या ( αιθ-) visage (ὄ.ψ)” आहे.
इथिओपियाची स्थापना कोणी केली?
केब्रा नागस्टच्या मते, मेनेलिक प्रथमने 10 व्या शतकात इथिओपियन साम्राज्याची स्थापना केली. चौथ्या शतकात, Axum च्या राजा एझानाच्या अंतर्गत, राज्याने ख्रिश्चन धर्म हा राज्य धर्म म्हणून स्वीकारला जो ऑर्थोडॉक्स तेवाहेडो (इथिओपियन ऑर्थोडॉक्स आणि एरिट्रियन ऑर्थोडॉक्स) संप्रदाय चर्चमध्ये विकसित झाला.
भारताचे इथिओपिया कोणत्या राज्याला म्हणतात?
MP हा भारताचा इथिओपिया का आहे.
इथिओपियन साम्राज्याची सुरुवात कशी झाली?
1270 हे वर्ष इथिओपियाच्या साम्राज्याची सुरुवात होते. त्या वर्षी, येकुनो अमलाक नावाच्या बंडखोराने उत्तर इथिओपियावर राज्य करणाऱ्या झाग्वे राज्याविरुद्ध बंड पुकारले . अनेक वर्षांच्या संघर्षानंतर येकुनो अमलाकने स्वतःचे साम्राज्य स्थापन केले.