Nagaland Information In Marathi नागालँड एक प्राकृतिक सौंदर्याने नटलेले राज्य आहे. ज्याला चारही बाजूंनी पर्वतांनी घेरलेले आहे. नागालँड राज्याचा कमीत कमी वीस टक्के भाग जंगलांनी आणि हिरवळीने भरलेला आहे.तर चला मग पाहूया नागालँड या राज्यांविषयी माहिती.
नागालँड राज्याची संपूर्ण माहिती Nagaland Information In Marathi
नागालँड राज्यामध्ये 100 पेक्षा जास्त अधिक जाती-धर्माचे आणि उपजातींचे लोक राहतात. ज्यांची संस्कृती, मान्यता, रीती एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहे. भारताचे एक उत्तर पूर्व राज्य आहे. नागालँडची राजधानी कोहिमा ही आहे. नागालँड 1961 पूर्वी नागा हिल्स त्वेनसांग या नावाने ओळखले जात होते.
क्षेत्रफळ व विस्तार :
नागालँडचे क्षेत्रफळ 16,527चौ. किमी.आहे विस्तार 25°6′ उ. ते 27°4′ उ. आणि 93°20′ पू. ते. 95°15′ पू. यांदरम्यान आहे. राज्याच्या दक्षिणेस मणिपूर, पश्चिमेस मेघालय, मीकीर टेकड्या व आसामचा जोरहाट जिल्हा, उत्तरेस अरुणाचल प्रदेशाचा तिराप जिल्हा आणि पूर्वेस ब्रह्मदेश आहे. बांगला देश आणि चीन हे देश नागालँडपासून जवळच आहेत. राजकीय दृष्ट्या नागालँड हा भारताचा अत्यंत महत्त्वाच्या जागी असलेला प्रदेश आहे.
भौगोलिक हवामान :
नागालँडचे हवामान डोंगराळ भागात हिवाळ्यात थंड व जोमदार असते. दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाश व रात्री दहिवर पडण्याचा पुष्कळदा अनुभव येतो. उन्हाळ्यात कोहीमा येथील तपमान 26.4° से. च्या वर जात नाही.
तथापि वातावरणात आर्द्रता फार असल्याने हवामान निरुत्साही असते. सखल भागात व खोऱ्यांत तर हवामान आरोग्यासाठी घातक असून हिवताप व इतर ज्वरांचा लोकांना त्रास होतो. राज्याचे सर्वसाधारण तपमान हिवाळ्यात 17.5° से. तर उन्हाळ्यात 27.5° से. पर्यंत असते. सरासरी वार्षिक पर्जन्य दक्षिणेत 175 सेंमी. पासून उत्तरेकडे 250 सेंमी. पर्यंत वाढत जातो.
नागालँड इतिहास :
1816 मध्ये म्यानमारच्या बर्मन राजघराण्याने आसामवर आक्रमण केले तेव्हा 1819 मध्ये जुलमी बर्मन राजवटीची स्थापना झाली. 1826 मध्ये आसाममध्ये ब्रिटिश शासन स्थापन होईपर्यंत बर्मन घराण्याने आसामवर राज्य केले.
1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, नागा समुदायाचे लोक आसामच्या एका छोट्या भागात स्थायिक झाले. तर एका मजबूत राष्ट्रीय मोहिमेद्वारे नागा समाजाच्या राजकीय संघटनाचीही मागणी करण्यात आली होती. या मोहिमेमुळे अनेक हिंसक कारवाया झाल्या आणि 1955 मध्ये भारतीय लष्कराला सुव्यवस्था पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले.
सन 1957 मध्ये भारत सरकार आणि नागांचे प्रमुख यांच्यात झालेल्या करारानंतर आसामच्या डोंगराळ भागात राहणारे नाग आणि तुएनसांग फ्रंटियर डिव्हिजनमधील नागांना भारताच्या प्रशासनात एकाच छताखाली आणण्यात आले. संमती असूनही भारत सरकारशी असहकार, कर न भरणे, तोडफोड, लष्करावर हल्ले अशा अनेक घटना घडू लागल्या.
खनिजे :
वेगवेगळ्या रंगछटांचे चुनखडक बांधकामाला उपयुक्त दगड पुरवितात, काही टेकड्यांत लिग्नाइटचा शोध लागला आहे. बोर्जन येथे एक कोळशाची खाण आहे आणि कित्येक ठिकाणी विहिरींच्या खाऱ्या पाण्याचे मीठ बनवण्यात येते. दिखो खोऱ्यात चुन्याचे समृद्ध साठे व खनिज तेलही सापडण्याची चिन्हे दिसली आहेत.
वनस्पती व प्राणी :
नागालँड मधील 1970 च्या नागा हिल्य झूमलँड अॅक्टखाली 2,072 चौ.किमी. क्षेत्र आहे. या उंचीवरचा सदाहरित पावसाळी जंगलाचा वनस्पतिवर्ग खासी टेकड्या व सिक्कीममधील वनस्पतींसारखाच आहे. इमारती लाकडाच्या उपयोगी वृक्ष, झुडुपे, बांबू, वेत, बोरू व इतर जातींची गवते त्यात विपुल आहेत.
वन्य प्राण्यांपैकी हत्ती, रानरेडा, वाघ, चित्ता, अस्वल, सांबर, भुंकणारे हरिण, उडते लेमूर आणि महोका, तित्तिर, रानकोंबडा इ. वनपक्षी दऱ्यांत व निबिड अरण्यांत आढळतात. विविधरंगी फुलपाखरे मात्र सर्वत्र आहेत.
नागालँड मधील मुख्य व्यवसाय व उद्योग :
नागालँडमधील बहुतांश लोक शेतीवर निर्भर आहेत. त्यामध्ये भात, भरडधान्ये व डाळी ही मुख्य पिके असून तेलबिया, कपाशी, ताग, ऊस, बटाटे चालतो. जलाशयांतील मासेमारी, प्रत्येक कुटुंबात कोंबड्या, डुकरे व मिथान नावाचे रानबैल पाळतात. कुक्कुटपालन, वराहपालन व पशुपालन यांची केंद्रे शासनाने चालविली आहेत.
उद्योगांमध्ये विणकाम, कुटिरोद्योग, हस्तव्यवसाय इ. शिकविण्याची व उत्पादनाची केंद्रे कित्येक ठिकाणी उघडण्यात आली असून, रेशीम पैदाशीस सुरुवात झाली आहे. मधमाशा पाळणे, गूळ तयार करणे, साबण व मेणबत्त्या बनविणे अशा लहानलहान धंद्यांना उत्तेजन आहे.
प्लॅस्टिक, ह्यूम पाइप, पॉलिथीन पिशव्या, रबरी पादत्राणे या उद्योगांस परवाने दिले आहेत. दिमापूर येथे औद्योगिक वसाहत योजना मूर्त स्वरूपात येत असून लाकूड रापविणे, कापणे, दारे-खिडक्या बनविणे, छत व तक्तपोशी यांसाठी फळ्या पाडणे, लाकडाच्या भुशापासून हार्डबोर्ड तयार करणे इत्यादींचे कारखाने निघाले आहेत. राज्यात कागद, साखर, दारू गाळणे, प्लायवुड, फळे टिकविणे व डबाबंद करणे हे कारखाने सुरू झाले आहेत.
रस्ते व वाहतूक मार्ग :
दिमापूर हे प्रमुख स्थानक आहे. ईशान्य रेल्वेचा 8.04 किमी. लोहमार्ग राज्याच्या पश्चिम सीमेला स्पर्श करून जातो. 1974-75 मध्ये राज्यरस्ते 1,114 किमी. जिल्हामार्ग 240 किमी. इतर मार्ग 515 किमी. व खेड्यांतील रस्ते 1,812 किमी. होते.
नागालँड मधील लोक व समाजजीवन :
नागांच्या प्रमुख जमाती अंगामी, सेमा, लोथा, रेंगमा, चखेसांग, शंगताम, कोन्याक, चंग, फोम, यिमचुगर, खिएन्मुन्गन, झेलिआंग, कचारी अशा असून त्यांच्यात तिबेटो-ब्रह्मी भाषासमूहांतील 30 पेक्षा जास्त बोली भाषा आहेत. त्यांच्या भाषांना लिपी नाही व सर्वांना सामायिक भाषा असमिया, इंग्रजी वा हिंदीशिवाय दुसरी नाही.
शासकीय कारभाराची आणि शिक्षणासाठी अधिकृत भाषा म्हणून, विधानसभेने 1967 मध्ये ठराव करून इंग्रजी ही अधिकृत भाषा ठरविलेली आहे. नागालोक मंगोलॉइड वंशाचे असले तरी रूपाने, गुणधर्मांनी किंवा चालीरीतींनी एकजिनसी नाहीत. उंच, गोऱ्या, देखण्या नागांप्रमाणेच खुजे, काळे, कुरूप नागाही असतात.
घराची रचना :
नागांची खेडी टेकडीमाथ्यावर पाण्याची सोय पाहून वसलेली असतात. भोवती दगडी किंवा बांबूचे मजबूत कुसू असते. बांबूची घरे जमिनीपासून थोड्या उंचावर बांधून वर गवती छपरे असतात. घराच्या पुढल्या भागात जनावरे, मधल्या भागात माणसांची वस्ती व मागच्या बाजूस शेतीची अवजारे असतात. दर्शनी भाग जनावरांच्या मुंडक्यांनी (पूर्वी माणसांच्या कवट्यांनी) शृंगारलेले असत.
पोशाख व शस्त्र :
वेग-वेगळ्या जमातींचे भिन्नभिन्न पोषाख पुष्कळदा नाममात्रच असून अलंकारांची मात्र रेलचेल असते. शिंपा, कवड्या, पोवळी, काचमणी यांच्या माळा, हस्तिदंत, शिंगे, बांबू, पिसे, हाडे अशा वस्तूंचा साज तसेच परशूसारखे ‘डाओ’, फेकण्याचे भाले, तिरकमठा अशी हत्यारे धारण करून समारंभाला किंवा लढाईला पुरुष जात असत.
अंगावर गोंदवून घेणाऱ्या व विविध प्रकारांनी देह नटविणाऱ्या स्त्रिया सामूहिक नृत्यांनी मन रिझवीत. आता निबिड अरण्यातील जमातींखेरीज शिकलेले नागा स्त्रीपुरुष आधुनिक वेशभूषा करू लागले आहेत. फक्त उत्सवप्रसंगी ते परंपरागत वस्त्राभरणे चढवितात.
नागालँड मधील लोकांचे मुख्य अन्न :
नागांचे अन्न तांदूळ, डाळी, भाजीपाला, कोणत्याही पशूचे मांस, मासे असे सोईस्कर असते. दुभती जनावरे त्यांना माहीत नव्हती, इतकेच नव्हे, तर दूध निषिद्ध असे. आता त्यांना दुधाची ओळख होत आहे. तांदुळापासून बनविलेली बिअरसारखी मधू, झू इ. सौम्य व पोषक दारू ते सेवन करतात.
लग्न व अंत्यविधी :
प्रत्येक खेड्यात तरुण मुलांची व मुलींची वेगवेगळी शेजघरे ‘मोरुंग’ असतात. तेथेच सर्वसमारंभ, निवाडे इ. होतात. त्यांतील शिस्त कडक असते. वयात आलेल्या मुलामुलींची लग्ने आईबाप किंवा पुष्कळदा ते स्वतःच ठरवितात. भिन्न-भिन्न जमातींतील लग्नविधी अगदी मामुली स्वरूपाचे असतात.
त्यांत नातेवाइकांना एक मोठी जेवणावळ हाच मुख्य समारंभ असतो. लग्नानंतर नवराबायको नवीन घर करतात. बहुतेक जमातींत बहुपत्नीकत्व नाही आणि घटस्फोट सुलभ आहे. जाळणे, पुरणे, प्रेत झाडाला टांगणे, तुकडे करून दूर टाकणे अशा वेगवेगळ्या पद्धतींचे अंत्यसंस्कार असतात.
पर्यटन स्थळ :
नागालँड हे भारतातील एक सुंदर राज्य आहे. नागालँडला ‘लँड ऑफ फेस्टिव्हल्स’ या टोपणनावानेही ओळखले जाते. पर्यटनासाठी नागालँड प्रसिध्द राज्य आहे. खोनोमा गाव नागालँडची राजधानी कोहिमापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे.
नागालँडच्या सुंदर दृश्यांमध्ये जुकू घाटी हे पर्यटनासाठीही खास ठिकाण आहे. कोहिमा शहराच्या बाहेरील भागात असलेले नागा हेरिटेज व्हिलेज म्हणून ओळखले जाणारे किसामा गाव हे नागालँडचे एक आकर्षण आहे.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Child Labour Essay In Marathi
- Doordarshan Essay In Marathi
- Essay On Metro Rail In Marathi
- Essay On World Wildlife Day In Marathi
- My Country India Essay In Marathi
- Subhash Chandra Bose Essay In Marathi
- My School Essay In Marathi
- Essay On Makar Sankranti In Marathi
FAQ
नागालँड कशासाठी प्रसिद्ध आहे?
हे सणांची भूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक आदिवासी सण मोठ्या आणि रंगीबेरंगी पारंपारिक पोशाखांनी सजलेला, थाटामाटात आणि आनंदाने साजरा केला जातो. सर्वात उत्साही म्हणजे ‘हॉर्नबिल फेस्टिव्हल’ जेथे प्राचीन नागांची गाणी गुंजतात आणि त्याचे संगीत आदिवासी पुरुषांच्या खऱ्या भावनेत घुमते.
नागालँड कोणते राज्य आहे?
नागालँड राज्याचे औपचारिक उद्घाटन १ डिसेंबर १९६३ रोजी भारतीय संघराज्याचे १६ वे राज्य म्हणून करण्यात आले. पश्चिमेला आसाम, पूर्वेला म्यानमार (ब्रह्मदेश), अरुणाचल प्रदेश आणि उत्तरेस आसामचा काही भाग आणि दक्षिणेस मणिपूर यांनी वेढलेले आहे.
नागालँडमध्ये किती प्रकार आहेत?
वांशिक गट. राज्यात 17 प्रमुख वांशिक गट आहेत – अंगामी, आओ, चकेसांग, चांग, कचारी, खियामनींगन, कोन्याक, कुकी, लोथा, फोम, पोचुरी, रेंगमा, संगतम, सुमी, तिखीर, यिमखिउंग आणि झेमे-लियांगमाई (झेलियांग).
नागालँड पर्यटकांसाठी किती सुरक्षित आहे?
भारतातील इतर प्रसिद्ध पर्यटन स्थळांप्रमाणेच, नागालँड हे एक सुरक्षित ठिकाण आहे . स्थानिक बंडखोर गट या क्षणी निष्क्रिय आहेत, ज्यामुळे ते अभ्यागतांसाठी सुरक्षित आहे.
नागालँडमध्ये कोणत्या जमातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे?
नागांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कोन्याक आहे.