Punjab Information In Marathi पंजाब राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 या दिवशी करण्यात आली. राज्यात सर्वात मोठे शहर लुधियाना हे आहे. पंजाब हे राज्य पाकिस्तानच्या सीमेलगत आहे. पंजाब राज्याची राजधानी चंदिगड ही आहे. तर चला मग मित्रांनो पाहूया पंजाब या राज्याविषयी माहिती.

पंजाब राज्याची संपूर्ण माहिती Punjab Information In Marathi
क्षेत्रफळ व विस्तार :
पंजाबचे क्षेत्रफळ 50,362 आहे. उत्तर-पश्चिम भारतातील एक राज्य आहे जे मोठ्या पंजाब प्रदेशाचा एक भाग बनते. त्याचा दुसरा भाग पाकिस्तानात आहे. पंजाब प्रदेशातील इतर भाग हरियाणा आणि हिमाचल प्रदेश राज्यांमध्ये आहेत.
याच्या पश्चिमेला पाकिस्तानी पंजाब, उत्तरेला जम्मू आणि काश्मीर , ईशान्येला हिमाचल प्रदेश, दक्षिण आणि आग्नेयेला हरियाणा व चंदीगडचा केंद्रशासित प्रदेश आणि नैऋत्येला राजस्थान आहे. चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश पंजाबची राजधानी आहे आणि हरियाणा राज्याचीही राजधानी आहे. अमृतसर, लुधियाना, जालंधर, पटियाला आणि भटिंडा ही पंजाबमधील प्रमुख शहरे आहेत .
लोकसंख्या :
पंजाबची लोकसंख्या 10,38,04,637 एवढी आहे. पंजाबी ही पंजाबची प्रमुख भाषा आहे.
पंजाब चा इतिहास :
प्राचीन सिंध प्रदेशाचा पंजाब एक भाग आहे. नंतरच्या काळात मौर्य, बॅक्ट्रीयानस, ग्रीक, शक, कुशान व गुप्त इत्यादींचे राज्य होते. मध्ययुगीन पंजाबमध्ये मुस्लिमांचे प्राबल्य राहिले आहे. गझनवीच्या पाठोपाठ घोरी, खिलजी, तुघलक, लोधी आणि मोगल आले. 15 व 16 व्या शतकात गुरुनानक यांच्या शिकवणीतून पंजाबच्या इतिहासाला भक्तीमार्गाकडे वळण मिळाले.
धर्म आणि समाजातील वाईट गोष्टी हटविण्याकडे त्यांचा कल होता. गुरुगोविंदसिंह यांनी शिखांचे दहावे गुरू म्हणून खालसा पंथाची स्थापना करून कित्येक शतकापासून चालत आलेल्या जुलुमशाही व गुलामगिरीला आव्हान दिले आणि सर्वधर्मसमभाव व देशप्रेमावर आधारित नव्या पंजाबची स्थापना केली.
रणजित सिंगांच्या काळात नंदनवन असलेले पंजाब दुफळी व ब्रिटीशांच्या कारस्थानामुळे दोन लढायांनंतर 1849 मध्ये ब्रिटीश साम्राज्यात सामील झाले. महात्मा गांधींच्या लढ्यापूर्वी ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढ्याला पंजाबात सुरूवात झाली.
अनुशासन आणि स्वराज्य या तत्वांवर नामधारी संप्रदायाने हा लढा सुरु केला. त्यानंतर लाला लाजपतराय यांनी स्वातंत्र्य संग्रामात मुख्य भूमिका बजावली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत पंजाबचा मोठा पुढाकार होता.
पंजाब मधील जिल्हे :
पंजाब मध्ये 22 जिल्हे असून 23 वा जिल्हा मालेरकोटला आहे हा नवनिर्मिती जिल्हा आहे. अमृतसर जिल्हा, भटिंडा जिल्हा, फिरोजपूर जिल्हा, फरीदकोट जिल्हा, फतेहगढ साहिब जिल्हा, गुरुदासपूर जिल्हा, पठाणकोट जिल्हा, होशियारपूर जिल्हा, जालंधर जिल्हा, कपूरथळा जिल्हा, लुधियाना जिल्हा, मानसा जिल्हा, मोगा जिल्हा, मुक्तसर जिल्हा, शहीद भगतसिंगनगर जिल्हा, पटियाला जिल्हा, रुपनगर जिल्हा, संगरूर जिल्हा, तरन तारण साहिब जिल्हा, बर्नाळा जिल्हा, मोहाली जिल्हा, फाजिल्का जिल्हा.
पंजाब मधील प्रमुख नद्या :
राज्यात शिवालिक पर्वतांची रांग आहे. पाच नद्यांचे राज्य म्हणून पंजाब ओळखले जाते. झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि बियास या त्या पाच नद्या. चिनाब ही मोठी नदी आहे. या व्यतिरिक्त मार्कंडा, घग्गर या नद्याही पंजाब राज्यातून वाहतात. असे हे समृद्ध राज्य देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते.
पंजाबचा मुख्य व्यवसाय :
पंजाब मधील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. पंजाब हे कृषीप्रधान राज्य आहे. येथे सर्वाधिक गव्हाची पेरणी केली जाते. इतर मुख्य पिकांमध्ये भात, कापूस, ऊस, बाजरी, मका, हरभरा आणि फळे यांचा समावेश होतो. प्रमुख उद्योगांमध्ये कापड आणि पीठ यांचा समावेश होतो.
पंजाब हा पृथ्वीवरील सर्वात सुपीक प्रदेश आहे. गहू उत्पादनासाठी हे एक आदर्श क्षेत्र आहे. तांदूळ, ऊस, भाजीपाला, फळे यांचेही येथे उत्पादन होते. भारतीय पंजाबला भारताचे ग्रॅन-स्टोअर म्हटले जाते.
भारताच्या एकूण गहू उत्पादनापैकी 60% आणि तांदूळ उत्पादनात 40% वाटा आहे. जागतिक लँडस्केपमध्ये, ही पिके जगाच्या एकूण उत्पादनात 1/30 वा किंवा 3% योगदान देतात. भारतीय पंजाबमधील पायाभूत सुविधा संपूर्ण भारतातील सर्वोत्तम आहेत. येथील रहिवासी सरासरी आधारावर भारतातील सर्वात श्रीमंत लोक आहेत.
पंजाब मधील उद्योग :
राज्यात जवळपास 202 लाख लघुउद्योग आहेत. ज्यात सायकलचे सुटे भाग, सिलाई मशीन, हस्त उपकरणे, यंत्र व वाहनांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, विणलेले कपडे, नटबोल्ट, वस्त्र, साखर, गोडेतेल आदी तयार केले जाते.
पंजाबचे हवामान :
पंजाबी या राज्याचे तापमान उन्हाळ्यात 34.5° से. व हिवाळ्यात 11.8° से. असते. उन्हाळ्यात दुपारी तपमान 41° से. पर्यंत वाढते. ऑक्टोबरपासून तापमान कमी होत असून फेब्रुवारी पर्यंत 20° से. पेक्षा कमी असते. जानेवारीमध्ये 11.8° ते 14.2° से. च्या दरम्यान आढळते. संपूर्ण राज्यात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात तपमान जवळजवळ सारखेच असते.
पंजाबमध्ये आग्नेय मान्सून अथवा बंगालवरून येणाऱ्या मान्सून शाखेमुळे जुलै-सप्टेंबर या काळात पाऊस पडतो, तर जानेवारी-फेब्रुवारी या काळात पश्चिमेकडून येणाऱ्या आवर्तापासूनही अल्पवृष्टी होते.
ईशान्येकडील उच्छ प्रदेशात वार्षिक सरासरी पाऊस 75 सेंमी. पर्यंत पडतो व तो नैर्ऋत्येस 30 सेंमी. पर्यंत कमी होतो. वार्षिक जलवायूचा विचार करता नोव्हेंबर ते मार्च थंड व उत्साही हवा, एप्रिल ते जून कडक उन्हाळा, जुलै से सप्टेंबर पावसाळा असे हवामान आढळते. ऑक्टोबर महिन्यात हवामान बदलते असते.
पंजाब राज्यातील सण, उत्सव :
राज्यात दसरा, दिवाळी, होळीसह इतर बैसाखी, होला, मोहाला, माघी मेला हे सण साजरे केले जातात. त्या व्यतिरिक्त लोहरी, बसंत पतंग उत्सव, माघी, तियान, राखरी इत्यादी सण सुद्धा साजरे केले जातात.
पंजाब मधील भाषा व आदिवासी जाती :
राज्याची बहुतांश लोकसंख्या शिख धर्मीय असली तरी राज्यात काही आदिवासी जातीदेखील आढळतात. त्यांच्या काही बोली भाषाही आहेत. अधमीँ, बाल्मीकी, चुरा, बंगाली, बरार, बुरार, बेरार, बटवाल, बरवाला, बौरिया, बाजिगर, बंजारा, जातिया, रेहगर, रायगर, रामदासी, रविदासी, रामदासिया, रविदासिया, चानल, दागी, दाराइन, देहा, धाया, धेया, धनाक, ढोगरी, धांगरी, सिग्गी, दुमना, महाशा, दोम, गागरा, गांधीला, गांदील, गोंडोला, कबीरपंथी, जुलाहा, खाटीक, कोरी, कोली, मरीजा, मारेचा, मजहबी, मेघ, नाट, ओड, पासी, पेरना, पेहरेरा, सनहाई, सन्हाल, सानसी, भेडकुट, मनेश, सांसोई, सपेला, सरेरा, सिकलीगर, सिरकीबंद, मोची, महातम आदी आदिवासी जाती पंजाबात वास्तव्य करतात.
नृत्य व संगीत :
राज्यातील भांगडा संगीत आणि भांगडा लोकनृत्य संपूर्ण भारतभर लोकप्रिय आहे. हे संगीत आणि नाच हे पारंपरिक आहेत. पंजाब घराणे आणि पतियाला घराणे हे अभिजात संगीतासाठी ओळखले जातात.
पंजाबीतल्या अनेक बोलीभाषांमध्ये लोकगीते आणि लोकसंगीत आहे. अनेक लोककथा या बोलींमध्ये सापडतात. मिर्जा साहिबान, हीर रांझा, सोहनी महिवाल, सासी पुन्नुन, जग्गा जाट, दुल्ला भट्टी आदींच्या लोककथा पंजाबात खूप लोकप्रिय आहेत. या लोककथा गीतात गायल्या जातात.
भांगरा नृत्य करताना अभिजात पंजाबी पेहराव केला जातो. या नृत्यासाठी ढोल, चिमटा, अलगोझा आदी लोकवाद्य वाजवली जातात. भांगरा नृत्य अलिकडे कोणत्याही उत्सवात आणि लग्नविधीतही केले जाते. लोकसाहित्यात शहामुखी आणि गुरूमुखी लिपीतील साहित्य सापडते.
पंजाब मधील पर्यटन स्थळ :
पंजाब पर्यटन विकास संस्थेची एकूण 32 पर्यटन संकुल व विश्रामगृहे आहेत. राज्यात तखत केशवाड साहिब, भाकरा धरण, हरिके पट्टण, पुरातत्व, छतबीर प्राणीसंग्रहालय, मुघलांचे बाग व अफगाणी राज्यकर्त्यांच्या कबरी, जालंधरमध्ये सोडल मंदिर आणि रामतीर्थांच्या स्मृत्यर्थ महर्षी वाल्मिकी हेरीटेज, राष्ट्रीय उत्सवाचे स्थान इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. निलोन हे निसर्गरम्य ठिकाण. पठानकोट हे काश्मीर व कांगडा खोऱ्यांचे प्रवेशद्वार व पतियाळा हे ऐतिहासिक शहर आहे. फरिदकोट किल्ला.
भटिंडा हे शहर व किल्ला असून रजिया सुलताना हीस तिथे बंदी करून ठेवले होते. रूपनगर हे प्रसिद्ध शहर आहे. राज्यात हडप्पा संस्कृतीचे अवशेष देखील आढळतात.
लुधियाना हे प्रमुख औद्योगिक शहर असून सरहिंद हे मोगलकालीन ऐतिहासिक वारसा दाखविणारे शहर आहे. हुसैनिवाला येथे भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचे स्मारक आहे. होशियारपूर हे वैदिक संस्कृतीचे प्रमुख संशोधन केंद्र आहे. मित्रांनो तुम्ही जर पंजाब मध्ये गेले तर नक्कीच या ठिकाणांना भेट द्या. अशी अनेक पर्यटन स्थळे पंजाबात आहेत.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Child Labour Essay In Marathi
- Doordarshan Essay In Marathi
- Essay On Metro Rail In Marathi
- Essay On World Wildlife Day In Marathi
- My Country India Essay In Marathi
- Subhash Chandra Bose Essay In Marathi
- My School Essay In Marathi
FAQ
पंजाब मध्ये काय प्रसिद्ध आहे?
जगतजीत पॅलेस, जगतजीत क्लब, एलिसी पॅलेस, पंज मंदिर, कांजली, वेटलँड, शालीमार गार्डन, निहाल पॅलेस, स्टेट गुरुद्वारा आणि मूरीश मस्जिद इत्यादी येथे भेट देण्याची खास ठिकाणे आहेत. सरहिंद फतेहगढ हे पंजाबमधील एक शहर आहे. ज्याचा इतिहासाशी विशेष संबंध आहे. त्याचे धार्मिक महत्त्व खूप प्रसिद्ध आहे.
पंजाब राज्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
पंजाब ही नेहमीच महान संत आणि सेनानींची भूमी राहिली आहे. पर्यटन स्थळे – पंजाब हे शीख धर्माचे ठिकाण आहे. शीख मंदिरांपैकी सर्वात पवित्र, श्री हरमंदिर साहिब (किंवा सुवर्ण मंदिर), अमृतसर शहरात आहे. शीख धर्मातील पाच तख्त (धार्मिक अधिकाराची तात्पुरती जागा), तीन पंजाबमध्ये आहेत.
पंजाबची ओळख कशी करायची?
पंजाब हे भारताच्या वायव्य प्रदेशातील एक राज्य आहे आणि सर्वात समृद्ध राज्यांपैकी एक आहे. पंजाब हे नाव पुंज (पाच) + आब (पाणी) म्हणजे पाच नद्यांची जमीन या दोन शब्दांपासून बनले आहे . पंजाबच्या या पाच नद्या म्हणजे सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम. आजच्या पंजाबमध्ये फक्त सतलज, रावी आणि बियास नद्या वाहतात.
पंजाब कधी अस्तित्वात आला?
भारतीय पंजाब राज्याची निर्मिती 1947 मध्ये झाली, जेव्हा भारताच्या फाळणीने पंजाबचा पूर्वीचा राज प्रांत भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागला गेला.
पंजाबी भारतीय की पाकिस्तानी?
पंजाबी (पंजाबी: پنجابی (शाहमुखी); ਪੰਜਾਬੀ (गुरमुखी); पंजाबी म्हणून रोमनीकृत), हा पूर्व पाकिस्तान आणि वायव्य भारतातील भागांचा समावेश असलेल्या पंजाब प्रदेशाशी संबंधित एक इंडो-आर्यन वांशिक भाषिक गट आहे. ते साधारणपणे प्रमाणित पंजाबी किंवा दोन्ही बाजूंच्या विविध पंजाबी बोली बोलतात.
पंजाबची जीवनशैली कशी आहे?
ते सर्वांचे मनापासून स्वागत करतात (आणि अर्थातच एक ग्लास लस्सी आणि टिपिकल पंजाबी खाद्यपदार्थ). ते त्यांचे सण मोठ्या उत्साहाने आणि उत्साहाने, उत्तम भोजन, संगीत, नृत्य आणि आनंदाने साजरे करतात.