Russia Information In Marathi रशिया या देशाची राजधानी मॉस्को सीटी ही आहे. हा देश आशिया खंडातील उत्तर भागातील प्रदेश असून रूबल हे रशियाचे चलन आहे. येथील लोकांचा धर्म म्हणजे ख्रिश्चन व काही निधर्मी असे दोन धर्म येथे आढळून येतात. तर चला मग पाहुया रशिया या देशाविषयी माहिती.
रशिया देशाची संपूर्ण माहिती Russia Information In Marathi
क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा 9 वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या 14,29,05,200 एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे.
क्षेत्रफळ व विस्तार :
आपल्याला माहित आहे रशियाचे क्षेत्रफळ हे जगातील सर्वात मोठे क्षेत्रफळ आहे. रशियाचे एकूण क्षेत्रफळ 1,70,75,400 चौ.किमी. आहे. रशियात 23 जागतिक वारसा स्थळे व 40 राष्ट्रीय उद्याने आहेत. देशाचा अक्षवृत्तीय विस्तार 35°8′ ते 81°50’उ. व रेखावृत्तीय विस्तार 19°38′ पू. ते 169°4′ प. यांदरम्यान आहे. या देशाचा पूर्व-पश्चिम विस्तार जास्त असल्यामुळे जगातील एकूण 24 कालपट्टांपैकी 11 कालपट्ट रशियात आहेत.
रशियाच्या सीमा :
रशियाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागर त्यातील बॅरेंट्स, कारा, लॅपटेव्ह, पूर्व सायबीरियन व चुकची हे समुद्र, पूर्वेस बेरिंग, ओखोट्स्क व जपानचा समुद्र, दक्षिणेस उत्तर कोरिया, चीन, मंगोलिया, अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान, कॅस्पियन समुद्र, व काळा समुद्र, तर पश्चिमेस रूमानिया, हंगेरी, चेकोस्लोव्हाकिया, पोलंड, फिनलंड, नॉर्वे हे देश व बाल्टिक समुद्र आहे.
भाषा :
रशियाची प्रमुख भाषा रशियन असून रशियन मातृभाषा असणाऱ्या भाषकांची जगभरातील संख्या धरता एकूण भाषकसंख्या जगभरात 27.8 कोटी आहे. म्हणजेच येथील भाषा बोलणाऱ्यांची संख्या खूप आहे.
हवामान :
रशिया या देशात हवामान वेगवेगळ्या प्रकारचे आढळून येते. अतिउत्तरेकडील प्रदेश म्हणजेच आर्क्टिक महासागरातील, बेटांवर आर्क्टिक प्रकारचे हवामान आढळते. नैऋत्य सायबीरिया हा रशियातील सर्वांत थंड हवामानाचा प्रदेश आहे. तेथील जानेवारीचे सरासरी तपमान -46° से, असून ते -68° से. पर्यंतही खाली जाते.
ईशान्य सायबीरियातील व्हर्कोयान्स्क येथील जानेवारीचे तपमान -50 इतके येथे -70° से. इतके असते. जुलैचे कमाल तपमान 15° से. असते. काही वेळा ते 38° से. पर्यंतही वाढते. वस्ती असलेल्या ठिकाणांमध्ये येथील वार्षिक तपमानकक्षा ही जगात सर्वांत जास्त आहे.
मे ते सप्टेंबर असे पाच महिने व्हर्कोयान्स्कचे तपमान शून्य अंश से. पेक्षा अधिक असते. येथील वार्षिक सरासरी वृष्टिमान 10.2 सेंमी. असून त्यातील दोन-तृतीयांश वृष्टी जून ते ऑगस्ट दरम्यान होते.
इतिहास :
रशियन साम्राज्याचा उदय इ.स. 1721 साली, पीटर द ग्रेट यांनी केला. इ.स. 1682 ते 1725 या काळात पीटरचे रशियावर राज्य होते. त्याने उत्तरेकडच्या महान युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले. रशियाला समुद्रातून व्यापार करणे सोयीचे ठरले कारण ज्या देशांची व्यापार होणार होता ते देश समुद्रालगत होते.
बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग ही राजधानी उभारली. पीटर द ग्रेटची मुलगी एलिझाबेथ ही पीटरनंतर गादीवर बसली. तिच्या कारकिर्दीत रशियाने सात वर्षीय युद्धात भाग घेतला व पूर्व प्रशिया जिंकून घेतले.
परंतु एलिझाबेथच्या मृत्यूनंतर तिसरा प्योत्र याने हे सर्व विभाग प्रशियाच्या ताब्यात घेतला. कॅथेरिन दुसरी किंवा महान कॅथेरिन हिने रशियावर इ.स. 1762- 96 या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.
खनिज संपत्ती :
रशिया हा खनिज संपत्ती व नैसर्गिक वायू ने संपूर्ण असा देश आहे. नैसर्गिक वायू, लोहधातुक, कोळसा, खनिज तेल, मँगॅनीज तांबे, शिसे, जस्त, निकेल, बॉक्साइट, टंगस्टन, पारा, अभ्रक पोटॅश या खनिजसाठ्यांबाबत रशिया जगात प्रसिद्ध आहे. यांशिवाय फॉस्फेट, टिटॅनियम, युरेनियम, गंधक, मॉलिब्डेनम इत्यादींचेही साठे भरपूर आहेत. जगाच्या 20 % कोळसा साठे रशियात आहेत.
मृदा :
रशिया नैसर्गिक साधनसंपदेच्या बाबतीत समृद्ध देश आहे. टंड्रा प्रकारची मृदा, पॉडझॉल, तांबूस-करडी मृदा, चेर्नोंसेम, चेस्टनट, वाळवंटी मृदा, तांबडी व पिवळी मृदा, पर्वतीय मृदा हे रशियातील प्रमुख मृदाप्रकार आहेत. पर्जन्यमान कमी असले, तरी बाष्पीभवनाचे प्रमाण कमी असल्यामुळे येथील मातीत ओलसरपणा टिकून राहतो व पाण्याचा निचरा खूप कमी होतो.
प्रमुख नद्या व सरोवरे :
व्होल्गा, नीपर, नीस्तर, डॉन, नेमन, उत्तर द्वीना व पश्चिम द्वीना ह्या यूरोपीय रशियातील तर ओब, इर्तिश, येनिसे, अंगारा, लीना, अमूर ह्या आशियाई भागातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत.
पॅसिफिक व आर्क्टिक महासागर तसेच बाल्टिक व काळा समुद्र यांना मिळणाऱ्या नद्या आणि अंतर्गत अशा देशातील पाच प्रमुख नदीप्रणाल्या आहेत. बहुसंख्य नद्या उत्तरेस आर्क्टिक महासागराकडे वाहत असून त्या 58% भूमीचे जलवाहन करतात.
येथे 2,70,000 सरोवरे असून त्यांत कॅस्पियन, अरल, बैकल, बालकाश व लॅडोगा ही जगातील सर्वात मोठ्या सरोवरांपैकी आहेत. त्या प्रत्येकाचे क्षेत्रफळ 10,000 चौ. किमी. पेक्षा अधिक आहे. कॅस्पियन समुद्र 3,98,821 चौ. किमी. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून तो जगातील सर्वात मोठा खंडांतर्गत जलसाठा आहे.
वनस्पती व प्राणी :
या देशात 17,000 जातीचे वेगवेगळे मोठे वृक्ष आहेत. आर्क्टिक बेटावर तसेच तैमीर द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील निम्म्या प्रदेशात शेवाळे, दगडफूल वनस्पती व विविध प्रकारचे गवत आढळते. याच्या दक्षिणेकडील झुडुपमय टंड्रा प्रदेशात शेवाळे, दगडफूल, फुलझाडे, भूर्ज, वाळुंज, दलदलीच्या भागात वाढणारी स्फॅग्नम वनस्पती व इतर खुरट्या वनस्पती आढळतात.
उत्तरेकडील आर्क्टिक विभागात प्राणिजीवन फारच कमी आहे. तेथे मुख्यतः ध्रुवीय अस्वल, हिमससा, सील, वॉलरस, आयडर, लग, लून इ. प्राणी व पक्षी आढळतात. रशियाच्या तैगा अरण्यमय प्रदेशात उदी रंगाची अस्वले, सेवल, हरिण, सांवर, लिंक्स, हिमससा व रेनडिअर हे प्राणी क्रॉसबिल, नट क्रॅकर, कोकिळ, घुबड, सुतारपक्षी इ. पक्षी व काही सरपटणारे प्राणी आढळतात. मिश्र अरण्यांत रानडुक्कर, हरिण, मिंक इ. प्राणी हॉफिंच, ऑरिओल, घुबड, बुलबुल इ. पक्षी विविध प्रकारचे साप, सरडे, कासव इ. सरपटणारे प्राणी सापडतात.
लोक व समाजजीवन :
रशियातील समाजामध्ये भिन्नता पाहायला मिळते. वेगवेगळ्या ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या विविध वांशिक गटांनी तो बनलेला असून असे 104 अधिकृत मान्यता असलेले समाज देशात आहेत. खेडी व ग्रामीण वस्त्या यांचे आधुनिकीकरण करण्याची तरतूद आहे. त्या दृष्टींनी खेड्यांचा कायापालट घडून येत आहे. रशियन खेड्यांतील परंपरागत अशा एका खोलीच्या घराला ‘इझ्बा’ म्हणतात.
शेती व्यवसाय :
रशियातील 80% लोक ज्या शेती व्यवसायावर अवलंबून होते. रशियातील महत्त्वाची धान्यपिफे म्हणजे गहू, सातू, ओट, राय व मका ही होत. तर महत्त्वाच्या पिकांमध्ये वटाटे, साखरवीट, कापूस, अल्पाल्फा गवत, तंवाखू, फळफळावळ, पालेभाज्या, तेलबिया इत्यादींचा अंतर्भाव होतो.
वाहतूक मार्ग :
देशात रेल्वेचे जाळे 1,45,292 किमी. एवढे पसरले असून त्यांपैकी 49,300 किमी. लोहमार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. ट्रान्स-सायबीरियन रेल्वेवरील माल व प्रवासी वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने टाइशेट ते कोम्सोमोल्स्कऑन- अमूर येथपर्यंत पसरलेला आहे.
पर्यटन स्थळ :
कामचटका मधील गीझर्सची दरी :
ही दरी पर्यटकांना आकर्षित करत असून ही दुसऱ्या ग्रहावरून हस्तांतरित झाल्यासारखी भासते. जगातील गिझर असलेला हा सर्वात मोठा प्रदेश आहे आणि संपूर्ण रशियातील प्रसिद्ध आहे.
बैकल सरोवर :
प्रत्येक शाळकरी मुलास माहित आहे की बैकल ग्रहावरील सर्वात जास्त खोली साठी ओळखला जातो.
मॉस्को क्रेमलिन आणि रेड स्क्वेअर :
क्रेमलिन केवळ एक आश्चर्यकारक ऐतिहासिक संरचना नाही तर रशियन सामर्थ्याचे प्रतीक देखील आहे.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.