सिक्किम राज्याची संपूर्ण माहिती Sikkim Information In Marathi

Sikkim Information In Marathi सिक्किम राज्य त्याच्या जैवविविधतेमुळे देशभर ओळखले जाते. उष्णकटिबंधीय वातावरणामुळे हे राज्य देशभर प्रसिद्ध आहे. या राज्यात दरवर्षी मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय फुल महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये साधारणत: राज्यभरातून सुमारे 5000 प्रकारच्या फुलांची झाडे, प्रजाती दिसून येतात.चला मग पाहूया सिक्कीम या राज्याविषयी आणखीन माहिती.

Sikkim Information In Marathi

सिक्किम राज्याची संपूर्ण माहिती Sikkim Information In Marathi

भारत सरकारकडून दिला जाणारा 2011-12 चा स्वच्छ राज्य पुरस्कार हा पुरस्कार सिक्कीमला जाहीर झाला होता. सिक्कीम हे भारतातील असे एक राज्य आहे. तिथे स्थानिक लोक इतर देशांची निवासी आहेत. या राज्यात राहणारे बहुतेक लोक हे नेपाळचे आहेत.

क्षेत्रफळ व विस्तार :

सिक्कीमचे भौगोलिक क्षेत्रफळ 7096 चौरस किमी असून राजधानी गंगटोक आहे.  सिक्कीम हे भारतातील देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. हिमालय पर्वतरांगेमध्ये वसलेल्या सिक्कीमच्या दक्षिणेला भारताचे पश्चिम बंगाल हे राज्य, पूर्वेस भूतान, पश्चिमेस नेपाळ तर उत्तरेस चीन देशाचा तिबेट स्वायत्त प्रदेश आहेत.

सिक्कीम लोकसंख्या :

2011 च्या जनगणनेनुसार सिक्कीमची लोकसंख्या 6,07,688 इतकी आहे. राज्यात साक्षरतेचे प्रमाण 82.20 टक्के इतके आहे. राज्यात चार जिल्हे आहेत.

हवामान :

सिक्कीमच्या हवामानात उंचीनुसार प्रदेशपरत्वे विविधता आढळते. सखल खोऱ्यात उष्णकटिबंधीय, 1,000 मी. पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात समशीतोष्ण कटिबंधीय, तर उंच पर्वतीय प्रदेशातील माथ्याच्या भागात अल्पाइन किंवा आर्क्टिक प्रकारचे शीत हवामान आढळते.

उंच पर्वतीय माथे कायम हिमाच्छादित असून तेथील बर्फाच्या थरांची जाडी 30 मी. पर्यंत आढळते. हिमालयातील सर्वाधिक आर्द्र प्रदेशांपैकी हा एक प्रदेश आहे. वार्षिक पर्जन्यमान 127 ते 508 सेंमी. यांदरम्यान असून ते प्रामुख्याने नैर्ऋत्य मान्सून वाऱ्याच्या काळात मे-ऑक्टोबर या महिन्यांत असते. पर्जन्यमानात उंचीनुसार तफावत आढळते.

वनस्पती व प्राणी :

सिक्कीम या राज्यात विविध प्रकारचे ओक, पाइन, फर, स्प्रूस, सिमल, साल, बांबू, प्रिम्यूला इ. वनस्पती प्रकार येथे आढळतात. मोठ्या वृक्षांखाली अनेक परोपजीवी वनस्पती वाढतात. उत्तर भागात विरळ गवताळ प्रदेश आहे. राज्यात 500 पेक्षा अधिक जातीचे प्राणी व पक्षी आढळतात.

See also  गुजरात राज्याची संपूर्ण माहिती Gujarat Information In Marathi

50 जातीचे उभयचर प्राणी, 80 प्रकारचे सरीसृप, 600 जातीचे रंगीबेरंगी पक्षी, 150 प्रकारचे सस्तन प्राणी, 700 पेक्षा अधिक जातींची फुलपाखरे व 48 जातीचे मासे येथे आहेत. अरण्यांमध्ये अस्वल, तांबडा पंडक, रुपेरी कोल्हा, वाघ, लांडगा, चित्ता, खवल्या मांजर, कस्तुरी मृग, काळवीट, याक, सरपटणारे प्राणी इ. प्राणी पहावयास मिळतात. दुर्मिळ व जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला हिमचित्ता येथे आढळतो.

सिक्कीम राज्याचा इतिहास :

18 व्या शतकाच्या मध्य काळात,नेपाळने सिक्कीमवर स्वारी केले आणि सिक्कीम मध्ये 40 पेक्षा अधिक वर्षे गोरखा राज्य होते. 1775 ते 1815 दरम्यान, जवळजवळ 1,80,000 वांशिक नेपाळी पूर्व आणि मध्य नेपाळहून सिक्कीममध्ये स्थानांतरित झाले.  भारताच्या ब्रिटीश वसाहतनंतर, सिक्किमने ब्रिटीश भारताशी संबंध ठेवला कारण त्यांचा एक समान शत्रू नेपाळ होता.  संतप्त नेपाळ्यांनी सूडबुद्धीने सिक्किमवर हल्ला केला आणि तराईसह बहुतांश प्रदेश पादाक्रांत केला.

या घटनेने ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी 1814 मध्ये नेपाळवर आक्रमण करण्यास प्रवृत्त झाली, परिणामी इंग्रज-नेपाळी युद्ध झाले.  ब्रिटन आणि नेपाळ यांच्यात सुगौली करारामुळे आणि सिक्किम आणि ब्रिटीश भारत यांच्यातील तितालिया करारामुळे नेपाळला प्रादेशिक सवलती मिळाली ज्यामुळे सिक्कीमला ब्रिटीश भारताला अभयारपीत करण्यात आले.

सिक्कीम राज्याची स्थापना :

सिक्कीम हे राज्य 16 मे 1975 ला भारताचा अविभाज्य भाग झाले असून सिक्कीमचे सर्वात मोठे शहर गंगटोक हे आहे. सिक्कीम हे हिमालय डोंगररांगात वसलेले राज्य आहे. पश्चिमेला नेपाळ, उत्तरेला तिबेट, पूर्वेला भूतान हे देश तर दक्षिणेला पश्चिम बंगाल हे भारतीय राज्य. सिक्किम हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे लहान राज्य आहे.

सिक्किम मधील प्रमुख भाषा :

सिक्किम राज्यात अकरा भाषांसाठी राजमान्यता आहे. नेपाळी, सिक्कीमीज, हिंदी, लेप्चा, तमांग, नेवारी, राइ, गुरूंग, मगार, सनवार आणि इंग्रजी इतक्या भाषा सिक्कीमला बोलल्या जातात. राजमान्यता नसली तरी लिंबू, शेरपा, भोटीया, कागती, रोंग, तिबेटन या बोलीभाषाही बोलल्या जातात. राज्यात काही आदिवासी लोक राहतात. त्या आपल्या घटक बोली-मायबोली बोलतात.

सिक्किम मधील शेती व्यवसाय :

सिक्कीम राज्याची कृषिप्रधान अर्थव्यवस्था आहे. येथे मका, भात, गहू, बटाटे. विलायची, मसाला, आले व संत्री ही प्रमुख पिके घेतली जातात. देशातील विलायचीचे देशात सर्वात जास्त उत्पादन येथे होते. बटाटे, आले, संत्री व बिगर हंगामी भाजीपाला ही इतर नगदी पिके आहेत. सिक्कीममध्ये सेंद्रीय शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

See also  थायलंड देशाची संपूर्ण माहिती Thailand Information In Marathi

सिक्किम मधील नद्या :

सिक्कीम हे राज्य छोटे असले तरी राज्यामधून बऱ्याच नद्या वाहतात. धरला, जालधका, लाचेन, लाचुंग, ल्होनाक, ताकचांग, रांगीत, रांगपो चू, रानीखोला, राटे चू, रेल्ली, रोरा चू, तालुंग, तिस्ता या नद्या सिक्कीम मधून वाहतात. राज्यात हिमालय पर्वत आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर सिक्कीममध्ये आहे. कांचनगंगा असे या हिमालय शिखराचे नाव आहे.

संगीत व नृत्य :

राज्यातील संगीत व नृत्य खूप प्रसिद्ध आहेत त्यामध्ये भोटिया, चुंबीपा, दोपथापा, दुकपा, कगाटे, शेरपा, तिबेटन, ट्रोमोपा, योलमो, लेप्चा आदी ‍आदिवासीही सिक्कीममध्ये राहतात. पाश्चिमात्य रॉक संगीत, भारतीय पॉप संगीत, नेपाळी रॉक आणि लेप्चा संगीतही सिक्कीम मध्ये लोकप्रिय आहे.

सिंघी छाम हे मुखवटा नृत्य सिक्कीममध्ये खूप लोकप्रिय आहे. सिक्कीममध्ये बर्फाचा सिंह हे सांस्कृतिक प्रतिक मानले जाते. म्हणून सिक्कीमच्या लोकनृत्यात सिंहाची प्रतिकृतीही नाचवली जाते. सिंहाचा बाह्य भाग हा कापडाने तयार केलेला असतो आणि त्यात दोन पुरूष आतून सिंहाकार देऊन नृत्य करतात. सुरीया नावाचे लोकवाद्य सिक्कीममध्ये खूप लोकप्रिय आहे. हे वाद्य हवेच्या दाबाने वाजते. म्हणजे तोंडाने हवा फुंकून आणि त्यांच्या छिद्रांवर बोट फिरवून ते विविध आवाजाने संगीत निर्माण करते. लोकगितांच्या चालीवर हे वाद्य वाजवले जाते.

सांस्कृतिक धर्म :

संस्कृती आणि धर्मात, सिक्किमचा तिबेटशी आणि भूतानशी जवळचा संबंध होता, आणि सिक्कीमचा पहिला राजा तिबेटहून स्थलांतरित झाला. सिक्कीमची भूतानसोबत सीमा देखील आहे. येथे, प्रामुख्याने पूर्व आणि मध्य नेपाळमधील नेपाळी लोकांच्या मोठ्या सांख्येची उपस्थिती देखील नेपाळशी सांस्कृतिक संबंध निर्माण करते.

सिक्कीम मधील सण :

सिक्किममध्ये सर्व नागरिक सर्व हिंदू सण साजरे करतात. यामध्ये दिवाळी, दसरा इत्यादी सण साजरी करतात. परंतु तिबेटीयन यांचे नववर्ष लोसर हे मोठ्या उत्साहाने साजरे करतात. जे डिसेंबरच्या मध्यला येते.

See also  बिहार राज्याची संपूर्ण माहिती Bihar Information In Marathi

भुतिया, लेपचा, आइम, नेपाळी वांशिक जमातीची मिळून सिक्कीमची लोकसंख्या असल्याने माघ संक्रांती, दुर्गा पूजा, लक्ष्मी पूजा, आणि चैते दासाई ह्या नेपाळी सणांसोबत भुतिया जमातीचे पांग-ल्हाबसोल लोसूंग आणि लोसार हे सण मोठ्या उत्सवात साजरे केले जातात.

लेपचा लोकांचे नामसंघ, तेडाँग, हलो रूम फात हे सण साजरे होतात. सिक्कीम मधील नेपाळी लोक हिंदू सण साजरे करतात. स्थानिक सण म्हणता येतील असे काही सण आहेत. भीमसेन पूजा, सागा दावा, ल्हाबाब दुइचेन, द्रुपका तेशी, भूमचू आदी सण सिक्कीम मध्ये साजरी होतात.

सिक्कीम मधील पर्यटन स्थळ :

सिक्किम मध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत जेथे आपण भेट देऊ शकता.

कांगचेनजंगा :

कांगचेनजंगा हे नाव जगभर प्रसिद्ध आहे. हे जगातील तिसरे सर्वात उंच शिखर आहे, येथील निसर्ग अद्भूत असा आहे. नेपाळ, सिक्कीम आणि तिबेटने वेढलेले हे शिखर आहे.

गंगटोक :

गंगटोक हे सिक्कीम राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. येथे निसर्गरम्य वातावरण असून डोळ्याचे पारणे फेडणारा हा परिसर आहे.

ताशी व्ह्यू पॉइंट :

ताशी व्ह्यू पॉइंट हा मध्य गंगटोकपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर आहे. हे एक अतिशय प्रेक्षणीय ठिकाण आहे, जिथून प्रवाशांना माऊंट सानिलोच आणि कांचनजंगा पर्वताचे दर्शन होते.

रेशीमधील गरम पाण्याचा झरा :

गंगटोक पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या रेशीमध्ये एक गरम पाण्याचा झरा आहे. सिक्कीम फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे हा झरा खास आकर्षण असतो.

त्सोंगमो सरोवर :

जर तुम्ही गंगटोकला भेट देणार असाल, तर भारत-चीन सीमेवर असलेल्या त्सोंगमो सरोवराला आवश्य भेट द्या.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

Leave a Comment