तामिळनाडू राज्याची संपूर्ण माहिती Tamil Nadu Information In Marathi

Tamil Nadu Information In Marathi एकूण लोकसंख्येपैकी बहुतांशी लोक तमिळ भाषा बोलणारे आहेत. तमिळ ही राज्यभाषा आहे. याशिवाय तेलुगू, मल्याळम्, कन्नड, उर्दू आणि इंग्रजी या भाषाही या राज्यात प्रचलित आहेत. तर चला मग पाहूया तामिळनाडू या राज्य विषयी माहिती.

Tamil Nadu Information In Marathi

तामिळनाडू राज्याची संपूर्ण माहिती Tamil Nadu Information In Marathi

तमिळनाडूत वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या वंशांचे लोक या राज्यात स्थायिक झाल्यामुळे या राज्यातील लोकांच्या सामाजिक जीवनावर भिन्न भिन्न वंशांच्या लोकांचा परिणाम झालेला दिसतो.

क्षेत्रफळ व विस्तार :

तमिळनाडू या राज्याचे क्षेत्रफळ 1,30,069 चौ. किमी असून ते भारतीय द्वीपकल्पाच्या आग्नेय भागातील राज्य आहे. याच्या पश्चिमेस केरळ राज्य, उत्तरेस आंध्र प्रदेश राज्य व कर्नाटक राज्य, पूर्वेस बंगालचा उपसागर आणि दक्षिणेस हिंदी महासागर व आग्नेय किनारा आणि श्रीलंका यांदरम्यान त्याचे पाल्कची सामुद्रधुनी व मानारचे आखात हे भाग आहेत.

लोकसंख्या :

लोकसंख्या 7,21,38,958 एवढी आहे. तमिळ ही येथील प्रमुख भाषा आहे. तामिळनाडूची  साक्षरता 80.33 टक्के आहे.  चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आणि सर्वात  मोठे शहर  आहे.

हवामान :

विषुववृत्तापासून जवळ असल्याने हवामान उष्ण आहे. उन्हाळ्यात मे महिन्याचे सरासरी तापमान 21° से. व जास्तीत जास्त तपमान 43° सें. आणि हिवाळ्यात जानेवारी महिन्याचे सरासरी तपमान 24° सें. व कमीत कमी तपमान 18° से. असते. किमान मासिक सरासरी तपमान डिसेंबर वेल्लोरला 13.4° सें. व सेलमला 16°सें. असते.

वार्षिक पर्जन्यमान स्थलपरत्वे 70 सेंमी ते 150 सेंमी असून किनारी प्रदेशात परतीच्या मोसमी वाऱ्यांपासून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे पावसाचे प्रमाण जून ते सप्टेंबरच्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसापेक्षा जास्त असते. तमिळनाडू डोंगरांवर 60 सेंमीपर्यंत तर पालघाट खिंडीजवळच्या प्रदेशात 120 सेंमी. पाऊस पडतो. रामनाथपुरम् व तिरुनेलवेली जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अगदी कमी असते.

तमिळनाडूचा इतिहास :

प्राचिन काळापासून तामिळनाडूचा प्रदेश कायम मानवी वस्तीत आहे आणि तामिळनाडूचा इतिहास आणि तामिळ लोकांची संस्कृती जगातील सर्वात प्राचीन आहे. त्याच्या संपूर्ण इतिहासामध्ये, पॅलीओलिथिक युगाच्या सुरुवातीच्या काळापासून आधुनिक काळापर्यंत हा प्रदेश विविध बाह्य संस्कृतींसह अस्तित्वात आहे.

See also  आंध्रप्रदेश राज्याची संपूर्ण माहिती Andhra Pradesh Information In Marathi

पुराणाश्मयुगापासून नवाश्मयुगापयर्यंतच्या काळातील अवशेष तमिळनाडूत आढळतात. अगस्त्य ऋषींना तमिळ देशाचा पिता आणि तमिळ व्याकरणाचा पहिला लेखक मानतात. दंतकथेप्रमाणे चेर, चोल व पांड्य ही राज्ये कोरकाई येथे राहणाऱ्या तीन भावांनी स्थापन केली.

अशोकाच्या कोरीव लेखात पांड्य, चोल व चेर यांचा उल्लेख मौर्य राज्याच्या शेजारची मित्र राज्ये म्हणून आढळतो. चोल राजा पहिला आदित्य याने पल्लव राजा अपराजित याचा पराभव करून दक्षिण अर्काटचा प्रदेश चोलांच्या सत्तेखाली आणला. आदित्याचे वडील विजयालय हा तंजावर येथील चोल घराण्याचा संस्थापक होता.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या होमरूल चळवळीपासून तमिळनाडूत राजकीय आंदोलने सुरू झाली. सर्व चळवळीत मद्रासच्या रहिवाशांनी भाग घेतला. ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मद्रासचा गव्हर्नर मद्रास इलाख्याचा राज्यकारभार कौन्सिलच्या मदतीने करी. या काळात रयतवारीचे एक मोठे बंड झाले आणि ब्रिटिश सरकारने रयतांवरील कराचा बोजा सकृतदर्शनी कमी केला.

विसाव्या शतकात लो. टिळक व म. गांधी यांच्या चळवळींस इथे काहीसा प्रतिसाद मिळाला, तरी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत तमिळनाडू राज्याने विशेष अशी काहीच भरीव कामगिरी केली नाही. राजाजी, कामराज, सुब्रह्मण्यम् वगैरे काही थोड्या व्यक्ती सोडल्या असता नाव घेण्यासारख्या व्यक्ती तमिळनाडू राज्यात झाल्या नाहीत. तथापि मद्रास इलाख्यामधील आंध्र प्रदेशाने व विशेषतः रामानंदतीर्थ यांनी सिंहांचा वाटा उचलला.

कला व नृत्य :

भरतनाट्यम हा एक प्रमुख नृत्यप्रकार मानला जातो. तमिळनाडूत या नृत्याचा विशेष विकास आणि प्रसार घडून आला. भरतनाट्यम् या नृत्यात विशिष्ट मुद्रा आणि अभिनय यांचा सुंदर मेळ पहावयास मिळतो.

या नृत्याचे शास्त्रीय स्वरूप गती, स्वर, ताल, लय आणि राग यावर आधारलेले आहे. या नृत्यात मनोरम पदलालित्य व मान, हात, डोळे, ओठ, भुवया यांच्या हालचाली यांचे कलात्मक दर्शन घडते.

जिल्हे :

तमिळनाडू राज्यात एकूण 32 जिल्हे आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे :

See also  मिझोराम राज्याची संपूर्ण माहिती Mizoram Information In Marathi

अरियालूर, चेन्नई, कोइंबतूर, कडलूर, धर्मपुरी, दिंडुक्कल, इरोड, कांचीपुरम, कन्याकुमारी जिल्हा, करुर, कृष्णगिरी, मदुरै, नामक्कल, नामक्कल, निलगिरी, पेरंबळूर, पुदुकट्टै, रामनाथपुरम, सेलम, शिवगंगै, तंजावुर, तेनी, तूतुकुडी, तिरुचिरापल्ली, तिरुनलवेली, तिरुपूर, तिरूवल्लूर, तिरुवनमलाई, तिरुवरुर, वेल्लूर, विलुप्पुरम, विरुधु नगर.

तमिळनाडूतील प्रमुख नद्या :

तामिळनाडूतील कावेरी नदी, पालर नदी व वैगई नदी या प्रमुख नद्या आहेत.

शेती व्यवसाय :

तमिळनाडूमधील शेती हा मुख्य व्यवसाय असून त्याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात उद्योग धंदे आहेत. शेतीपासून तांदूळ, कापूस, तंबाखू, ऊस, भुईमूग आणि कॉफी ही महत्त्वाची पिके असून भरड धान्ये थोड्याफार प्रमाणात होतात. पावसाचे पाणी नद्यानाल्यांतून वाहून जाताना ते ठिकठिकाणी लहानमोठ्या तळ्यांत साठविलेले असते.

त्यासाठी जरूरीपुरते मातीचे उंच बांध घातलेले असतात. या पाण्यावर ताडामाडांच्या बागा, तांदूळ, ज्वारी, कापूस, भुईमूग, तीळ व इतर तेलबिया, रागी, कुंबू इ. अनेक पिके काढतात. त्याव्यतिरिक्त सुतीवस्त्र उद्योग, साखर उद्योग, सिमेंट उद्योग आणि यांत्रिक उद्योग, काड्यापेट्या तयार करण्याचा उद्योग हे प्रमुख उद्योग आहेत. यांशिवाय हस्तव्यवसायावर आधारित बरेच उद्योग या राज्यात चालतात.

तामिळनाडू मधील वनस्पती :

तमिळनाडू या राज्याचा पूर्वी 15.5% प्रदेश वनाच्छादित होता. पर्वतीय प्रदेशात दाट अरण्ये आहेत. सागवान, रोझवुड, निलगिरी व चंदनाची झाडे जास्त आढळतात. कोईमतूर व निलगिरी पर्वत भागांत सागवानाची दाट जंगले आहेत.

तसेच पर्वत भागात बांबूची वने आढळतात. रबराची झाडेही येऊ शकतात. नेली, एली, अगस्ती, नारळ, सुपारी, ताड, आंबा, फणस, वड, पिंपळ. इ. झाडे तमिळनाडूत आढळतात.

प्राणी व पक्षी :

तमिळनाडूच्या निलगिरी भागात व पर्वतप्रदेशात रानटी हत्ती, गवा, हरिण, चित्ता, अस्वल, सांबर, रानडुक्कर, वाघ इ. वन्य प्राणी आढळतात. तसेच कावेरी त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिण टोकावरील पॉइंट कॅलिमियर येथे पाणपक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. तेथे स्थलांतरी हंसक येतात. गिंडी येथील राजभवनात काळवीट, चितळ व इतर छोट्या प्राण्यांसाठी राखीव उद्यान आहे.

पुलिकत सरोवरावरही स्थलांतरी हंसक, बगळे, क्वाक, बदके, करकोचे इ. पाणपक्षी दिसतात. मद्रासच्या दक्षिणेस वेडंतंगल येथे पक्ष्यांसाठी अभयारण्ये आहे. तेथे पांढरा आयबेक्स क्वाक, स्पूनबिल, उघड्या चोचीचा बलाक, पाणबुडा, ढोक, बगळा, पाणकावळा इ. पक्षी विशेष आढळतात.

See also  त्रिपुरा राज्याची संपूर्ण माहिती Tripura Information In Marathi

तामिळनाडू पर्यटन स्थळ :

कांचीपुरम :

‘हजारोंच्या शहराचे शहर’ म्हणून ओळखले जाते, कांचीपुरम फक्त त्याच्या विशिष्ट रेशीम साड्यासाठी प्रसिद्ध नाही तर ते पल्लव राजवंशाची राजधानी होती. आज, केवळ 100 किंवा त्यापेक्षा जास्त मंदिरे तिथे आहेत, त्यातील अनेकांना अद्वितीय वास्तुशिल्प सौंदर्य आहे.

चेन्नई  :

तामिळनाडु राजधानी, दक्षिण भारत प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते ही एक प्रचंड आणि व्यस्त, तरीही पुराणमतवादी, खोल परंपरा व संस्कृती असलेले शहर आहे. शहराचे मुख्य आकर्षण म्हणजे समुद्रकिनारा, मंदिरे, संग्रहालये आणि गॅलरी, जुनी पोर्तुगीजची शैली चर्च आणि करमणूक उद्यान.

कोवलम :

कोवलम समुद्री तट हे चेन्नईपासून 40 किमी दूर महाबलीपूरमच्या मार्गात एक छोटंसं गाव आहे जे कोवेलॉंग नावाने ओळखले जाते.

महाबलीपूरम : महाबलीपुरम समुद्रकिनारा चेन्नईपासून  58 कि.मी. दूर दक्षिणेस आहे. येथील भव्य आणि सुंदर किनाऱ्या व्यतिरिक्त पल्लव घराण्याच्या काळाची  स्मारके आणि प्राचीन लेण्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत.

कन्याकुमारी :

कन्याकुमारीच्या किनार्‍यावर हिंद महागर,अरेबिन आणि बंगालचा खाड्यांचे संगम येथे होतात.  हे हिंदूंचे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. कन्याकुमारी सूर्योदय, सूर्यास्त आणि पौर्णिमेच्या चंद्रमाला बघण्यासाठी प्रसिद्ध आहे. बहुरंगी वाळूसह,येथे समुद्र आणि आकाशीय दृश्य बघण्याजोगते आहे.

पूम्पुहर :

पूम्पुहर समुद्री तट हे तमिळ महाकाव्य सिलापथिकरम मध्ये उपलब्ध माहितीच्या आधारे केवरिपूम्पात्तिनमच्या स्मरणार्थ बांधले गेले एक बेट आहे.

रामेश्वरम :

रामेश्वरमचा समुद्री तट चेन्नईपासून 572 किमी दूर आहे. हे हिंदूंचे पवित्र स्थळ आहे. इथे 12 ज्योतिर्लिंगात येणारे भगवान शिवाचे मोठे आणि प्राचीन मंदिर आहे. भगवान श्रीरामाने हे शिवलिंग स्थापित केल्याने या स्थानाचे नाव रामेश्वर आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment