जपान देशाची संपूर्ण माहिती Japan Information In Marathi

Japan Information In Marathi जपान हा औद्योगिकदृष्ट्या विकसित देश असून त्याची राजधानी टोकियो ही आहे. जपान हा देश जवळजवळ 6852 मिळून बनलेला आहे. जपान असा देश आहे, जेथे 10 वर्षाचे मुल होईपर्यंत कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही. जपान हा उगवत्या सूर्याचा देश मानला जातो कारण येथे सर्वप्रथम सूर्योदय होतो. तर चला मग या देशाविषयी सविस्तर माहिती पाहूया.

Japan Information In Marathi

जपान देशाची संपूर्ण माहिती Japan Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

जपानचे क्षेत्रफळ हे 3,77,389 चौरस किमी. असून त्याचा विस्तार हा 24° से उत्तर ते 46° उत्तर व 123° पूर्व ते 147° पूर्व असा आहे.

जपानच्या सीमा :

जपानच्या पश्चिमेस जपानी समुद्र असून त्याची जास्तीत जास्त पूर्व-पश्चिम रुंदी 885 किमी. तसेच देशाच्या नैऋत्य टोकाकडे क्युशू बेटाचा उत्तर किनारा असून तसेच दक्षिणेकडे पूर्व चिनी समुद्र आणि पूर्वेस उत्तर पॅसिफिक महासागर आहे. तर उत्तरेस रशियन मुख्य भूमीपासून होक्काइडो हे बेट आहे.

हवामान :

जपानमधील हिवाळ्यातील तापमान हे गोठणबिंदू च्या खाली उतरते तर तेथील ध्रुवीय प्रदेशातील थंड हवेचा दाट थर जमिनीवर निर्माण होतो त्यामुळे वातावरणात वायू भारा चे प्रमाण वाढते.

पॅसिफिक महासागराचा वरील हवाही उपदार असून तेथील वायुभार यांच्या तुलनेने खूप कमी असतो. या स्थितीमध्ये जपानच्या समुद्रावरून पूर्वेस जपानकडे वारे वाहू लागतात व हे वारे समुद्रावरील बाष्प धारण करून जपानच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील प्रदेशात हवामानात बदल घडवून आणतात. यामुळेच तापमान खाली उतरून तिथे हिवाळी पाऊस पडतो.

अशाप्रकारे जपानमध्ये वाऱ्याचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे समुद्रावरून वाहणारे वारे व दुसरे म्हणजे जमिनीवरून वाहणारे वारे. या दोन्ही वाहणार्‍या वार्‍यांमुळे हवामानात बदल पडतो. जपानचे हवामान दमट असून येथील पर्जन्यमान 25 सेमी ते 250 सेमी पर्यंत आपल्याला दिसून येते.

लोकसंख्या व समाज :

जपान देशाची लोकसंख्या दोन हजार वीस च्या जनगणने प्रमाणे 12.63 करोड आहे. तसेच जपान मधील लोकांची राष्ट्रीय भाषा ही जपानी असून जपानी लोक आपल्या मातृभाषेचे विषयी खूप प्रामाणिक आहे. तेथील सर्व लोक आपली मातृभाषा जपानी मध्ये शिक्षण घेत असून जपान मधील वैज्ञानिक सुद्धा आपल्या मातृभाषेचा शोध लावत असतात.

तेथील चलन जपानी येन आहे. जपान मधील लोक धर्माला जास्त महत्त्व देत नाहीत. तसेच वेळेच्या बाबतीत खूपच पक्के आहेत. चीन नंतर जपानमध्ये सर्वात जास्त ज्या धर्माचे पालन होते. तो धर्म म्हणजे बौद्ध धर्म आहे. येथील 96 टक्के लोक बौद्ध धर्माचे पालन करतात.

जपानचा इतिहास :

जपानचा इतिहास खूप प्राचीन इतिहास आहे कारण जपानी बेटांवर जेव्हा पुरातत्वीय उत्खनन करण्यात आले तेव्हा मानवाच्या हत्ती आणि अश्मायुधे तेथील उत्खननात सापडलेली आहे. यावरूनच आपल्या लक्षात येते की तेथे कोणत्यातरी स्वरूपात मानवी वस्ती असावी.

मात्र तेथील समाज व्यवस्था कशी होती कोणत्या प्रकारची होती हे मात्र पुरावे सापडले नाहीत. तेथे सापडलेल्या पुराव्यांमुळे सात ते आठ हजार वर्षांपूर्वीचा कालखंड आपण त्याला समजू शकतो.

त्या उत्खननात वैशिष्ट्यद्योतक दगडांची व हाडांची आयुधे, जनावरांची शिंगे, मृत्पात्रे त्याचप्रमाणे शिंपल्यांचे मोठे ठिकाणी राहत्या घराचे काही औषध नाही तेथे सापडले. यावरून असे लक्षात येते की, त्या काळातील माणूस आपली उपजीविका शिकार आणि मासेमारी यांच्या सहाय्याने करीत असावा.

जपानच्या आधुनिक इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर आधुनिक कालखंडात तोकुगावा शोगूनने सत्तेचा त्याग केला, तेव्हा सम्राट मेजी केवळ सोळा वर्षाचा होता. त्यामुळे नव्या कारभारावर दरबारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिले व अधिकाऱ्यांमध्ये सांजो सानेमी व इवाकुरा तोमोमी या व्यतिरिक्त आणखीन काही व्यक्तींचा समावेश होता.

त्यांनी देशाचा आधुनिक राष्ट्र म्हणून विकास करणे व सरंजामशाही नष्ट करणे, प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीने स्थान मिळवणे हे उद्दिष्ट ठेवून नव्या शासनाने अनेक प्रभावी अंमलात आणल्या.

पहिल्या महायुद्धात म्हणजे 1914 मध्ये इंग्लंडची मैत्रीच्या तहानुसार हात पुढे करून जर्मनी बरोबर युद्ध केले व चीनमधील जर्मनीच्या पट्टेदारीने मिळवलेल्या प्रदेशामध्ये आपले पाय घट्ट केले. तसेच जर्मनीतील अनेक बेटे सुद्धा त्यांनी हस्तगत केले.

1921 व 130 या साली झालेल्या परिषदांमध्ये ही जपानने भाग घेतला. 1937 मध्ये जपानने चीनशी युद्ध सुरू केली आणि चीनचे अनेक प्रदेश व्यापले 1939 मध्ये जागतिक दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली.

जपानी सैन्याने फ्रेंच व इंडोचायना वर हल्ला करून तो प्रदेश हस्तगत केला. परंतु चीन ब्रिटन अमेरिका व नेदरलँड यांनी जपानची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी याला प्रत्युत्तर म्हणून 1945 मध्ये जपानी आरमाराच्या मदतीने जपानी हवाईदलाने पर्ल हार्बरवर हल्ले चढवले. परंतु जपानी सैन्याने खूप मोठे क्षेत्र आपल्या ताब्यात जिंकले.

याचे प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ऑगस्टमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अनुभव टाकले. यामध्ये जपानला खूप मोठे नुकसान झाले. 1951 मध्ये एक शांतता परिषद भरवण्यात आली त्यामध्ये जपान अमेरिकेच्या सुरक्षिततेच्या करारावर सह्या करण्यात आल्या.

या महायुद्धानंतर काही कालावधीतच जपानची अर्थव्यवस्था पुन्हा सावरली. व 1956 पर्यंत खनिज संपत्ती औद्योगिक निर्मितीस युद्धपूर्व काळाच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली तेव्हापासून अर्थव्यवस्थेचा विकास वेग हा जपानने सातत्यपूर्वक टिकवून ठेवलेला आहे.

वनस्पती व प्राणी :

जपानमध्ये पावसाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे तेथे वनस्पतींची वाढ फार मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते. आजही जपानच्या एकूण क्षेत्रफळापैकी 60.3% क्षेत्र हे वने आपल्याला दिसते. जपानमध्ये वनांविषयी बोलायचे झाले तर येथील वनांचे तीन प्रकार पडतात 1) मिश्र जातीची वने, 2) उपोष्ण कटिबंधांतील रुंदपर्णी सदाहरित वने आणि 3) सूचिपर्णी वृक्षांची वने.

मिश्र जातीच्या अरण्यामध्ये मॅपल, पॉपलर, सीडार, एस्पेन ओक आणि पाईन ही वृक्ष आढळतात. सूचिपर्णी वनांमध्ये प्रूस, बर्च आणि लार्ज ही रुक्ष आढळतात. तर उपोष्ण कटिबंधीय अरण्यात लॉरेल, कर्पूर, मॅगोलिया, पाइन व बांबू इत्यादी झाडे.

जपानमध्ये वनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेथील जंगलांमध्ये जपानी बकरे काळवीट अस्वले, उत्तर होन्शूमध्ये काळी अस्वले व माकडे, कोल्हे व बँजर, या व्यतिरिक्त आणखीन बरेच प्राणी आढळतात त्याशिवाय रानडुक्कर ऑटर खारी व ससे यांचीही संख्या किती मोठ्या प्रमाणात दिसून येते.

तेथील पर्वतीय प्रदेशात बगळे करकोचे हंस बदक पक्षी आणि घारी गिधाडे ससाने व कीड कबूत्री घुबडे अशा प्राण्यांच्या 450 जाती तेथे दिसून येतात. सरपटणार्‍या प्राण्यांमधील बेंडूक, सर्प, सरडे व अनेक प्रकारचे कीटक आढळून येतात.

जपानमधील नद्या :

जपानमध्ये मुख्य तीन नद्या असून त्यामधील पहिली व मोठी शीनानोखावा ही प्रमुख नदी असून तिची लांबी 367 किमी आहे. तसेच या नदीचे उगम स्थान निइगताकेन येथे आहे.

तोनेगावा ही जपानमधील दुसऱ्या नंबरची मोठी नदी आहे. तिचे उगमस्थान हे चिबाकेन व इबाराकी केन येथे आहे. तिसऱ्या नंबरची मोठी नदी म्हणजे इशिखारिगावा ही असून तिची लांबी 268 किमी आहे. नदीचे उगम स्थान माऊंट शिखारी इथे आहे.

खनिज संपत्ती :

जपान मध्ये कोळसा तांबे गंधक ही खनिजे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्या व्यतिरिक्त अधातू खनिजामध्ये चुनखडीचे खडक, इमारतीचे दगड आणि जिप्सम ही खनिजे मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

शेती :

पूर्वी शेती हा जपानमधील प्रमुख व्यवसाय असला तरी त्यामागे आता तो कमी कमी होत चालला आहे. जपानमधील दक्षिण पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेथे वर्षातून दोन पिके काढण्यात येतात उन्हाळ्यात भाताचे तर हिवाळ्यामध्ये गव्हाचे पीक काढतात. शेती करण्यासाठी जमीन हे निकृष्ट असल्याने येथे जास्तीत जास्त रसायनिक खतांचा वापर केला जातो.

पर्यटन स्थळ :

जपानमध्ये अनेक पाहण्यासारखे स्थळ आहेत, त्यामध्ये प्राचीन क्योटो, हिमेजी किल्ला, नाराच्या एतिहासिक वास्तू तसेच चेरीच्या झाडांचा बहर येथे प्रसिद्ध असून बरेच पर्यटक याचा आनंद घेण्यासाठी येतात. जपान मधील पुरातन राजवाडे हे देखील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

जपान देशाची राजधानी काय आहे

जपान देशाची राजधानी टोकियो ही आहे.

जपान कुठे आहे?

पॅसिफिक महासागरातील द्वीपसमूह असलेला जपान आशियाच्या पूर्व भागात आहे. जपानच्या पश्चिमेस ओखोत्स्कचा समुद्र व पूर्व चीन समुद्र आहेत.

 जपानचे चलन काय आहे?

जपानी येन 

 जपानचे भाषा काय आहे?

जपानी ही या देशाची प्रमुख भाषा आहे.

जपानमधील मुख्य संस्कृती काय आहे?

जपानच्या अद्वितीय शिंटो धर्म आणि पारंपारिक कृषी जीवनशैलीमध्ये खोलवर रुजलेला, जपान हा एक दोलायमान “मात्सुरी” संस्कृती असलेला देश आहे. मात्सुरी हा सणासाठी जपानी शब्द आहे.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment