राजस्थान राज्याची संपूर्ण माहिती Rajasthan Information In Marathi

Rajasthan Information In Marathi जयपुर ही राजस्थानची राजधानी असलेले आणि गुलाबी शहर म्हणून ओळखली जाते. राजस्थानचा राष्ट्रीय प्राणी उंट आणि चिंकारा आहे. राज्यस्थान चा राष्ट्रीय पक्षी माळढोक आहे. राजस्थानचे राष्ट्रीय फूल रोहिरा आहे. चला मग राजस्थान विषयी आणखी माहिती पाहूया.

Rajasthan Information In Marathi

राजस्थान राज्याची संपूर्ण माहिती Rajasthan Information In Marathi

अरवली पर्वतरांगेमध्ये स्थित माउंट आबू राजस्थान मधील एकमेव हिलस्टेशन आहे. या राज्यात 33 जिल्हे आहेत. राजस्थानचा पश्‍चिम, उत्तर भाग खूप शुष्क आहे. राजस्थान हे राज्य अनेक देशातील देशांत पेक्षा आकाराने मोठे आहेत.

क्षेत्रफळ व विस्तार :

राजस्थान चे क्षेत्रफळ हे 342,239 चौकिमी आहे. क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो. राजस्थानची स्थापना 30 मार्च 1949 ला झाली होती. राजस्थानच्या पश्चिम उत्तर सीमेला पाकिस्तान उत्तर आणि उत्तर-पूर्वेला पंजाब आणि हरियाणा. पूर्वेला उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आणि दक्षिणेला गुजरात राज्य लागते.

राजस्थानची लोकसंख्या :

राजस्थान या राज्याची लोकसंख्या 68,548,437 (2011)एवढी आहे. लोकसंख्येनुसार राजस्थानचा भारतात सातवा क्रमांक लागतो.  राजस्थानची साक्षरता 67.06 टक्के एवढी आहे.

राजस्थानचे हवामान :

या प्रदेशात सरासरी वार्षिक पर्जन्यमान केवळ 40 सेमी आहे. वर्षभर तापमान जास्तच राहते. उन्हाळ्यात तापमान 45 अंशांच्या वर जाते, तर हिवाळ्यात तापमान शून्याच्या खाली जाते. गंगानगर हे उत्तर राजस्थानमधील भारतातील सर्वात गरम शहर आहे.

राजस्थानचा इतिहास :

भारत स्वतंत्र होण्यापूर्वी अनेक देशी संस्थानांत विभागल्या गेलेल्या या प्रदेशाचे राजपुताना  हे नाव होते. या प्रदेशातील बहुतेक सर्व जातीजमाती राजपूत लोकांशी आपला संबंध जोडतात. राजपूत लोकांचा व राजांचा प्रदेश म्हणून याचे राजपुताना असे नाव पडले व त्याचेच पुढे राजस्थान असे रूपांतर झाले.

राजस्थान मधील भाषा :

राजस्थानची राजकीय भाषा हिंदी यांनी राजस्थानी आहे. याबरोबरच हे लोक सिंधी, पंजाबी, संस्कृत आणि गुजराती या भाषेचा वापर करतात.

शेती व्यवसाय :

शेती व पशुपालन हे राज्यातील व्यवसाय आहेत. जलसिंचनाच्या पुरेशा सोयींअभावी बहुतांश शेती अनियमित व अपुऱ्या पावसावरच अवलंबून आहे. राज्यातील लागवडीखालील एकूण क्षेत्र 266 लक्ष हेक्टर होते.

समाजजीवन :

या प्रदेशातील महाजन किंवा मारवाडी हे लोक मुख्यतः व्यापारी आहेत. जाट हे राजस्थानच्या उत्तर व पश्चिम भागातील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. राजस्थानात गावोगावी ठाकूर, ठिकाणदार व जहागीरदार यांचे गड व कोट आढळतात. गायन, वादन व नृत्य करणारे कलावंत आणि ज्योतिषीही राजस्थानात मोठ्या संख्येने आहेत.

भिल्ल, ग्रासिया, कठोडी, मीन, रबारी, मेव, मेर, सहरिया इ. अनेक आदिवासी जमातींची वस्ती या राज्यातील डोंगराळ व जंगली भागात आढळते. राजस्थानी लोकांचा पोशाख रंगीबेरंगी व आकर्षक असतो. येथील मारवाडी पगडी व जोधपुरी कोट विशेष प्रसिद्ध आहेत. राजस्थानी स्त्रियांची वेशभूषाही बरीच भडक असते. प्रत्येक मंगल कार्यात स्त्रिया मेंदी लावतात, कारण ती शुभशकुनी मानली जाते.

राजस्थान मधील सण :

राजस्थान मध्ये हे सण मोठ्या थाटाने व उत्साहाने केले जातात. दिवाळी, दसरा, होळी, गणगौर, तीज, आखातीज, राखी पौर्णिमा, वसंतपंचमी, जन्माष्टमी, रामनवमी, सतीपूजन, पुष्कर उत्सव, कपिल मुनींचा उत्सव (कोलायत), रामदेवजी उत्सव, वीरपुरी उत्सव, ख्वाजा मुईनुद्यीन चिश्ती उरूस हे राजस्थानातील प्रमुख सण व उत्सव आहेत.

गणगौर हा राजस्थानातील मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा स्त्रियांचा स्थानिक उत्सव आहे. सोझी नावाचा एक कुमारिकांचा उत्सव राजस्थानात पितृपक्षात पाळला जातो. कार्तिक महिन्यात अजमीरजवळील पुष्कर येथे मोठी यात्रा भरते. त्यावेळे येथे गुरांचा मोठा बाजार भरतो. तसेच उंटांच्या गाडीच्या शर्यती हे एक महत्वाचे आकर्षण असते.

इतर उद्योग :

राजस्थानमध्ये सुती वस्त्रे, लोकरीचे कापड, साखर, सिमेंट, काच, सोडियम, ऑक्सिजन ॲसिटिलीकरण, कीटकनाशके, जस्त प्रगलन, रसायने, गोलक धारवा, रेल्वे डब्बे, पाण्याचे व विजेचे मीटर, गंधकाम्ल, दूरचित्रवाणी संच, कृत्रिम धागे, फरशी पॉलिश, स्पिरिट, मधनिर्मिती हे येथील प्रमुख उद्योग आहेत.

याशिवाय कॉस्टिक सोडा, कॅल्शियम कार्बाइडे, तांबे वितळविणे हे इतर महत्वाचे उद्योग आहेत. कशिदायुक्त पादत्राणे व चामड्याच्या थैल्या, पाण्याच्या बाटल्या, हातमागावरील कापड, खादी, कापड छपाई, लाकडी खेळणी, कृषी अवजारे, हातकागद इ. लघुउद्योगही येथे आहेत. संगमरवरावरील कोरीवकाम, लोकरी गालिचे, जड-जवाहीर, भरतकाम, चामड्याच्या वस्तू, मातीची भांडी, कोरीवकाम केलेल्या पितळी वस्तू हे येथील हस्तव्यवसाय आहेत.

वाहतूक :

राजस्थानमध्ये 48,422 किमी. लांबीचे रस्ते असून, 2,521 किमी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते. मोटारवाहनांची संख्या 5,54,388 होती. जोधपूर, मारवाड, उदयपूर, अजमेर, जयपूर, कोटा, बिकानेर व सवाई माधोपूर ही राज्यातील प्रमुख लोहमार्ग स्थानके आहेत.

जयपूर, जोधपूर, कोटा, व उदयपूर येथे विमानतळ आहेत. राज्याच्या पश्चिम भागात वाहतुकीसाठी उंटांचा अधिक वापर केला जातो.

खनिज संपत्ती :

खनिज उत्पादनाच्या बाबतीत राजस्थानचा देशात सहावा क्रमांक लागतो. कोळसा, लोहखनिज व खनिज तेल यांचे साठे मर्यादित असले, तरी इतर वेगवेगळ्या प्रकारची जवळजवळ 40 खनिजे येथे सापडतात. देशातील जस्त, पाचू व रत्ने यांचे जवळजवळ सर्व उत्पादन एकट्या राजस्थान राज्यातून होते.

देशातील 76% चांदी, 84% ॲस्बेस्टस, 94% जिप्सम, 82% शंखजिरे, 68% फेलस्पार, 50% कॅल्साइट व 12% अभ्रक यांचे उत्पादन राजस्थानमधून होते. 1985-86 मध्ये राज्यातून 30,567 कोटी टन जिप्सम व 1,72,989
टन फॉस्फेटी खडकाचे उत्पादन झाले. किशनगढ भागातून गुलाबी संगमरवर, जैसलमीर भागातून पिवळा, अजमीरमधील खाणीतून हिरवा व जयपूर भागातून काळा संगमरवर मिळतो.

बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या तांबड्या दगडाचे तसेच पीठ तयार करण्यासाठी लागणाऱ्या दगडाचे येथील उत्पादनही मोठे आहे. जोधपूर आणि भांक्री येथून छतासाठी वापरला जाणारा दगड मिळतो. राज्यातील चुनखडीचे उत्पादनही महत्त्वाचे आहे.

राज्यातील खाणकाम व्यवसायाच्या विकासासाठी  शासन प्रयत्नशील आहे. अरवली पर्वताच्या 26 किमी. लांबीच्या सोंडेच्या भागात तांब्याचे विस्तृत साठे सापडले आहेत. खेत्री व दरिबा येथील तांब्याच्या खाणी विशेष महत्त्वाच्या आहेत.

संगीत व नृत्य :

घुमर हे राजस्थानचे लोकनृत्य प्रसिद्ध आहे. संगीत, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प या कलांची राजस्थानी परंपरा बरीच जुनी आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आढळणारी मंदिरे, मूर्ती, राजप्रासाद व चित्रे म्हणजे एक बहुमोल सांस्कृतिक ठेवा आहे.

राजस्थानातील राजदरबारांत संगीताला नेहमीच मानाचे स्थान मिळत असे. त्यामुळेच संगीत शास्त्रावर राज्यात अनेक चांगले ग्रंथ निर्माण झालेले आढळतात. राजस्थानात लोकनृत्याचे विविध प्रकार वेगवेगळ्या भागांत प्रचलित आहेत. त्यातील घूमर, झूमर, डंडिया, गींदड, गैर, धूमरा, गौरी व भवाई हे प्रकार फारच लोकप्रिय आहेत.

खेळ व कला :

राजस्थानातील कळसूत्री बाहुल्यांचा किंवा कठपुतळ्यांचा खेळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. कठपुतळ्यांची निर्मितीही राज्यातच मोठ्या प्रमाणावर केली जाते. कठपुतळ्यांच्या खेळासाठी उदयपूर येथील ‘लोककला मंडळ’ विशेष प्रसिद्ध आहे.

चित्रकला ही राजस्थानातील एक महत्त्वाची कला आहे. राजस्थानातील मंदिरे व राजप्रासाद यांच्या भिंती, पुराणे व महाकाव्ये यांतील प्रसंगांच्या चित्रांनी सुशोभित केलेल्या होत्या. त्यातूनही राधाकृष्णाचा लीलाविहार हा त्यातील प्रमुख विशेष होय. रागरागिणींची चित्रे हे राजस्थानी चित्रकलेचे दुसरे वैशिष्ट्य आहे. राजस्थानी चित्रकलेतून आकाराला येणारी कोणतीही स्त्री अप्रतिम सुंदर असते व तिचे डोळे मृगनयन किंवा मीननयन असतात. राजस्थानी मूर्तिकलेची परंपरा फार जुनी आहे.

राजस्थान मधील पर्यटन स्थळ :

नैसर्गिक सौंदर्य आणि वैविध्यपूर्ण संस्कृती यामुळे राजस्थान मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते. जयपूर, उदयपूर, जोधपूर, जैसलमेर, अजमेर, बीकानेर ही ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत.

जयपूर सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथील इमारतींच्या रंगांमुळे जयपूर शहराला पिंक सिटी म्हटले जाते. जंतर-मंतर, हवा महल, नियोजित जयपूर शहर आणि आमेर किल्ला ही जयपूरची काही प्रसिद्ध पर्यटन स्थाने आहेत. उदयपूरचा लेक पॅलेस जगप्रसिद्ध आहे. जैसलमेर किल्ला, थार वाळवंट आणि येथील मध्यकालीन हवेली पर्यटकांना आकर्षित करतात. राजस्थानमध्ये जैन धर्मीयांची अनेक प्रार्थनास्थळे आहेत.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

राजस्थान मध्ये काय प्रसिद्ध आहे?

जयपूर शहराला येथील इमारतींच्या रंगांमुळे गुलाबी शहर असे म्हणतात. जयपूर शहरातील पर्यटन स्थळांमध्ये जंतर-मंतर, हवा महल, नियोजित जयपूर शहर व अंबरचा किल्ला ही प्रसिद्ध स्थळे आहेत. उदयपूर येथील तळ्यातील महाल जगप्रसिद्ध आहे.

राजस्थान हे कोणत्या प्रकारचे राज्य आहे?

राजस्थान ‘लँड ऑफ किंग्स’ किंवा ‘लँड ऑफ किंगडम’ हे भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य आहे. हे राज्य देशाच्या वायव्य भागात स्थित आहे आणि सांस्कृतिक विविधतेचे घर आहे. त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये सिंधू संस्कृतीचे अवशेष, मंदिरे, किल्ले आणि जवळजवळ प्रत्येक शहरातील किल्ले यांचा समावेश आहे.

राजस्थानमधील खास गोष्टी काय आहेत?

राजस्थानमध्ये सुमारे 14 किल्ले आहेत, त्यापैकी चित्तोडगड किल्ला हा भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे. हवा महल, लेक पॅलेस, उम्मेद भवन आणि जय महल हे देखील मोठे ड्रॉ आहेत. चित्तर हिल येथे स्थित उम्मेद भवन पॅलेस या शहरातील सुंदर आणि भव्य राजवाड्यांपैकी एक आहे.

राजस्थानच्या संस्कृतीत विशेष काय आहे?

राजस्थानमध्ये केवलदेव राष्ट्रीय उद्यान, जंतर मंतर (जयपूरमधील खगोलशास्त्रीय वेधशाळा) आणि राजस्थानचे डोंगरी किल्ले (जैसलमेर किल्ला, आमेर किल्ला, गाग्रोन किल्ला, रणथंबोर किल्ला, कुंभलगड किल्ला या सहा भव्य किल्ल्यांचा समावेश आहे) यासह आठ युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत. आणि चित्तोडगड किल्ला).

राजस्थान पर्यटनासाठी प्रसिद्ध का आहे?

“पढरो म्हारे देश” या घोषणेने राजस्थान आपल्या ऐतिहासिक किल्ले, राजवाडे, कला आणि संस्कृतीसाठी पर्यटकांना आकर्षित करते. जयपूर, गुलाबी शहर म्हणूनही ओळखले जाते, हे राजस्थानची राजधानी आणि सुवर्ण त्रिकोणाचा एक भाग असल्याने एक अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

राजस्थानमध्ये इतके महाल का आहेत?

राजस्थानमध्ये इतके किल्ले आणि राजवाडे असण्याचे कारण म्हणजे 8 व्या शतकापर्यंत या प्रदेशावर राज्य करणारे राजपूत वंश आपल्या प्रदेशाच्या संरक्षणासाठी मजबूत किल्ले बांधत असत . दुसरा मुख्य प्रदेश म्हणजे त्याची स्थलाकृति. ओबडधोबड डोंगराळ प्रदेश पठारी भागात सोयीस्करपणे बचावात्मक किल्ल्यांना परवानगी देतो.

राजस्थानच्या काही भागात वाळवंट आढळते याचे कारण काय असेल?

पर्जन्यछायेच्या प्रभावामुळे राजस्थानच्या काही भागांत म्हणजेच राजस्थानमधील वायव्य भागात वाळवंट आढळते.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment