आंध्रप्रदेश राज्याची संपूर्ण माहिती Andhra Pradesh Information In Marathi

Andhra Pradesh Information In Marathi आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे आहे. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी हैदराबाद व तेथील सर्वात मोठे शहर देखील हैदराबाद आहे. आंध्रप्रदेश राज्य मध्ये देशभरात व्यक्ती दिसून येतात. तर चला मग पाहूया आपण हैदराबाद राज्य विषयी माहिती.

Andhra Pradesh Information In Marathi

आंध्रप्रदेश राज्याची संपूर्ण माहिती Andhra Pradesh Information In Marathi

त्याचा बीसीई सहाव्या शतकातील असाका अवतार गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या दरम्यान होता, सोळा महाजनपदांपैकी एक आहे. आपण पाहिले तर आता नवीन तेरा जिल्ह्यांची निर्मिती सुद्धा तेथे झालेली आहे.

आंध्रप्रदेश हे 21व्या शतकातील भारतातील 28 घटक राज्यांपैकी एक आहे. आंध्र प्रदेशचा इतिहास वैदिक काळापासून सुरू होतो. ऐतरेय ब्राह्मणासारख्या संस्कृत महाकाव्यांमध्ये त्याचा उल्लेख आहे.

आंध्र प्रदेशचे विस्तार व लोकसंख्या :

आंध्रप्रदेशाचे  विस्तार हा 160.205 वर्ग कि.मी. असून क्षेत्रफळानुसार ते भारतात आठवे राज्य आहे. 2011 च्या जणगणनेुसार आंध्र प्रदेशाची लोकसंख्या 4,93,86,799 एवढी आहे.

आंध्र प्रदेशाचा प्राकृतिक भूगोल:

आंध्र प्रदेश राज्याला 972 किमीचा समुद्र किनारपट्टी लाभली आहे. आंध्र प्रदेश राज्य अक्षांश- 12°41’ते 22° उत्तर व रेखांश 77° ते 84°40′ पूर्व या सीमांमध्ये वसलेला आहे. तेथील लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 308 इतकी आहे.

आंध्र प्रदेशमधील शेती :

आंध्रप्रदेश राज्यातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी शेती हा मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे. गोदावरी, कृष्णा, पेन्ना आणि तुंगभद्रा या भारतातील चार महत्त्वाच्या नद्या राज्यातून वाहतात आणि सिंचन पुरवतात.

भात, ऊस, कापूस, मिर्ची, आंबा आणि तंबाखू ही स्थानिक मुख्य पिके आहेत. अगदी अलीकडे, वनस्पती तेलाच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणार्‍या पिकांना, जसे की सूर्यफूल आणि भुईमूग, यांना आधार मिळाला आहे.

तांदूळ हे आंध्र प्रदेशचे मुख्य पीक आहे आणि तांदूळ हे येथील लोकांचे मुख्य अन्न आहे. राज्याच्या एकूण धान्य उत्पादनात तांदळाचा वाटा 77 % आहे.

आंध्र प्रदेशातील बोलीभाषा व जातीचे प्रमाण :

आंध्र प्रदेशात तेलुगू भाषेचे महत्त्व खूप श्रेष्ठ आहे. तेलुगू बोलणारे 86%, उर्दू बोलणारे 7%, तमिळ, कानडी आणि लंबाडी मिळून 4%  याशिवाय ओरिया, गोंडी, मराठी इ. भाषिकांचा समावेश आंध्र प्रदेशात होतो.

वंजारी, लमाणी आणि लंबाडी ह्या नावांनी एकाच लोकांचा निर्देश होतो. अंध्र, भिल्ल, गोंड, प्रधान, शबर, वाल्मिकी, कोया, चेंचू, यरूकुल इत्यादी 31 प्रकारच्या भिन्न भिन्न वन्य आदिजमाती मिळून 13 लाख प्रजाती होतात. त्यांच्या भाषा व पोटभाषाही वेगवेगळ्या आहेत.

आंध्र प्रदेशातील कला व क्रीडा:

आंध्र प्रदेश हे राज्य ऐतिहासिक असल्यामुळे तेथील ऐतिहासिक परंपरांचा व कला क्रीडांचाही छंद जोपासला जातो. आंध्र प्रदेशातील लोककलांमध्ये रस्त्यावर करण्यात येणाऱ्या तेलुगू नाटकांचा ‘वीथिनाटक’ हा एक प्रकार असतो. यातील पात्रांचा परिचय स्वतः पात्रे व सूत्रधार करून देतात.

विधिनाटकामध्ये विनोद निर्मितीसाठी ‘हास्यगडू’  किंवा ‘विट’ नामक विदूषकाचे पात्र असते. विधिनाटकातील पात्रयोजनेची ओळख व पात्रांच्या संवादांचे स्पष्टीकरण ही हास्यगडूची प्रमुख कामे असतात. मुलाच्या बारशाच्या दिवशी सुवासिनींनी म्हणावयाच्या मंगलारत्या हे आंध्र प्रदेशातील लोकगीतांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

शातकर्णी राजाच्या काळामध्ये आंध्र कारागिरी व हस्तव्यवसाय प्रगत होते. परंतु त्यांच्या कारागिरी व हस्तव्यवसाय यांचा उत्कर्ष काकतीय राजांच्या काळात झाला. वरंगळ या त्यांच्या राजधानीत उत्कृष्ट कारागिरीला वाव मिळाला. येथील तलम सुती विणकामाबद्दल मार्को पोलोने ‘ही बहुमोल वस्त्रे कोळ्याच्या जाळ्यासारखी दिसतात’ असे म्हटले आहे.

आंध्रप्रदेशातील मलमलची लोकर फार प्राचीन काळापासून खूपच प्रसिद्ध असूनही लोकरीची कांबळी एकेकाळी खूपच प्रख्यात होती. रेशीमकाम हा या प्रदेशाचा आणखी एक वैशिष्ट्य आहे. रेशमी वस्त्रांचे अनेक प्रकार नागबंधनम्, पट्टेडुकावू, कादंबकावू, चंदनकावू, रुद्राक्षवन्ने, वसंतविलास, लक्ष्मीविलास, हंसावली इ. नावांनी विख्यात आहे.

मच्छलीपटनम् येथील कलमकारी कापड प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. गडवाल येथील साड्याही विशेष प्रसिद्ध आहेत. तिरुपतीची चंदनाची व पितळेची खेळणी तसेच कोंडापल्ली येथील लाकडी खेळणी प्रसिद्ध असून त्यांवर देवादिकांची चित्रे कोरलेली असतात.

विशाखापटनमचे हस्तिदंती कोरीव काम आणि शिंगावरील व कूर्मपृष्ठावरील कोरीव काम उल्लेखनीय आहे. येथील बिद्रीकामाचे नमुने पानदाणी, अत्तरदाणी इ. वस्तूंमध्ये आढळतात. काचेच्या व नकली खड्यांच्या बांगड्या व मणीही येथे तयार होतात.

आंध्र प्रदेशातील दळणवळणाचे मार्ग:

आंध्र प्रदेश ही राज्ये दळणवळणाच्या मार्गासाठी देखील खूप महत्त्वाचे आहे. आंध्र प्रदेशातून एकूण 6,224 किमी. लांबीचे लोहमार्ग गेले असून त्याचे प्रमाण दर 1000 चौ. किमी. ला 17 पडते. वॉल्टेअरच्या उत्तरेस दक्षिणपूर्व रेल्वेचा व मद्रास व गुडूर यांमध्ये दक्षिण रेल्वेचा काही भाग येतो.

परंतु राज्याला मुख्यतः दक्षिणमध्य रेल्वे-विभागातील मार्ग असून सिकंदराबाद येथे त्याचे विभाग-कार्यालय आहे. राज्यातील एकूण सडकांची लांबी 98,825 किमी. (1970-71) असून त्यांपैकी 36% पक्क्या सडका आहेत. राज्यात 1971 मध्ये एकूण 1,25,871 मोटार वाहने होती.

अंतर्गत जलमार्ग गोदावरी कालवा, कृष्णा कालवा, बकिंगहॅम कालवा, कुर्नूल-कडप्पा कालवा, कोग्मापूर कालवा वगैरे मिळून 1,845 किमी. आहेत. सागरी जलमार्गावर विशाखापटनम् व काकिनाडा ही प्रमुख बंदरे असून बंदर मच्छलीपटनम्, भीमुनीपटनम्, कृष्णापटनम्, कलिंगपटनम् इ. दहावर लहान बंदरे आहेत.

हैदराबाद येथे देशातील एक महत्त्वाचे विमानतळ आहे. हैदराबाद, विजयवाडा, कडप्पा व विशाखापटनम् येथे आकाशवाणी-केंद्रे आहेत. 1972 अखेर राज्यात 9,45, 626 रेडिओ होते. 1972 च्या अहवालानुसार राज्यात 25 दैनिके, 4 द्वि/त्रिसाप्ताहिके, 223 साप्ताहिके व 403 इतर अशी एकूण 655 नियतकालिके आहेत. यांत तेलुगू, इंग्रजी, उर्दू व काही हिंदी भाषांतीलही आहेत.

आंध्र प्रदेशात 13 नवीन जिल्ह्यांची निर्मिती :

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना नवीन जिल्ह्यांसाठी कार्यालय वाटप प्रक्रिया करण्याचे आदेश दिले होते. अधिकाऱ्यांना 4 एप्रिल रोजी सर्व नवीन 13 जिल्ह्यांमध्ये कार्यालयात हजेरी नोंदवून कामकाज सुरू करण्यास सांगण्यात आले.

6 एप्रिल रोजी मुख्यमंत्री सर्व गाव आणि प्रभाग सचिवालयात 13 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी अथक परिश्रम करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचा सत्कार झाला. अधिसूचनेनंतर, वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस सरकारने आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची फेरबदल केली आणि नवीन जिल्ह्यांमध्ये डीएम आणि एसपी नियुक्त केले. आंध्र प्रदेशमध्ये 26 जिल्हे आहेत.

जिल्ह्यांची यादी:

अनंतपुर, सत्य साई, तिरुपति, अन्नमय्य चित्तुरु, पूर्व गोदावरी, गुंटुर, कडप्पा, पार्वतीपुरम मन्यम, अनकपल्लि, अल्लुरि शीत रामा राजु, काकिनाड, कोनशीम अमलापुरम, एलुर, एन्टिर विजयवाड़ा, मिछिलि पट्नम, भावपुरि, पल्नाडु कुर्नूल, नन्ध्याल, नेल्लोर, ओंगोलु, श्रीकाकुलम, विशाखापट्टणम, विजयनगर, पश्चिम गोदावरी.

आंध्र प्रदेशातील पर्यटन स्थळे :

आंध्र प्रदेश हे राज्य पर्यटन स्थळांमध्ये उत्कृष्ट आहे. रामायण-महाभारतातील घटनांशी निगडित अशी अनेक ठिकाणे आंध्र प्रदेशात दाखवितात. बौद्ध व जैन धर्मांची एके काळी येथे भरभराट होती. छोटी-मोठी अनेक राज्ये या प्रदेशात होऊन गेली.

स्वातंत्र्यानंतर अनेक योजना कार्यवाहीत आल्या, त्यामुळे ती ठिकाणेही आधुनिक तीर्थस्थळे बनली आहेत. हैदराबाद सांस्कृतिक दृष्ट्याही राजधानी शोभते. नागार्जुनकोंडा, नागार्जुनसागर व अमरावती ही जुन्यानव्यांची मिश्रणे आहे.

हैदराबादजवळील गोवळकोंडा किल्ला, गुंतूर जिल्ह्यातील एट्टिपोतला धबधबा, गुंतूर-विजयवाडा मार्गावरील मंगलगिरी येथील गोपुर, चेझर्ली (गुंतूर जिल्हा) येथील कपोतेश्वराचे मंदिर, श्रीकाकुलम् येथील आंध्र विष्णूचे मंदिर, पापिकोंडलूजवळ गोदावरीने निर्मिलेली अजस्र घळ व तेथील रम्य वनश्री, भद्राचलमचे रामाचे मंदिर, तिरुपती येथील प्रसिद्ध वेंकटेश्वराचे देवस्थान, बारा ज्योतिर्लिंगांपैकी श्रीशैलम् येथील मल्लिकार्जुनाचे स्थान, हनमकोंडा येथील सहस्रखांबी मंदिर व शिल्पकाम, कोंडापूर येथील बौद्ध लेणी, चिंतापल्लीजवळील वन्य प्राण्यांचे जंगल ही आंध्र प्रदेशातील काही प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत.

यांशिवाय नागार्जुन, मच्छकुंड, तुंगभद्रा आदी प्रकल्प, राज्यातील अनेक तलाव, तशीच हैदराबाद, विशाखापटनम्, विजयवाडा, गुंतूर, वरंगळ, राजमहेंद्री, एलुरू, नेल्लोर, कुर्नूल, बंदर इ. शहरे आंध्र प्रदेशाचे वैभव दाखवितात.

तर तुम्हाला आंध्रप्रदेश राज्याविषयीची माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment