युनायटेड किंगडम देशाची संपूर्ण माहिती United Kingdom Information In Marathi

United Kingdom Information In Marathi युनायटेड किंगडम हा युरोप मधील एक स्वतंत्र देश आहे. देशाला ब्रिटन म्हणून सुद्धा ओळखले जाते, या देशाची राजधानी

United Kingdom Information In Marathi

युनायटेड किंगडम देशाची संपूर्ण माहिती United Kingdom Information In Marathi

या देशातील सर्वात मोठे शहर लंडन शहर आहे. हे या देशाचे सर्वात मोठे व्यावसायिक केंद्र व आर्थिक केंद्र आहे. युनायटेड किंगडम देशाचे “गॉड सेव्ह द क्वीन” राष्ट्रगीत आहे. ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडची राज्ये एकत्र करून ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचे युनायटेड किंगडम देश तयार झाला आहे. युनायटेड किंगडम हा एक असा देश आहे, ज्यावर कोणीच हुकूमत करू शकले नाही, हा एक सार्वभौम देश आहे.

विस्तार व क्षेत्रफळ :

युनायटेड किंगडम या देशाचे एकूण क्षेत्रफळ 2,44,822 किलोमिटर एवढे आहे. आणि हा देश जगात क्षेत्रफळ दृष्टीकोनाने 79 व्या क्रमांकावर येतो. तसेच या देशाच्या सीमेला लागून उत्तर व पश्चिम दिशेला किनारपट्टीवर आहे, आणि इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंड यांचा सीमा लागलेल्या आहेत.

तसेच उत्तर व पूर्व दिशेला द ग्रेट ब्रिटन बेट आणि आयर्लंड बेटाचा भाग लाभलेला आहे. आणि ब्रिटिश बेटांमधील अनेक लहान बेटे समाविष्ट आहेत. उत्तर दिशेला आयर्लंडची भूमी आणि अटलांटिक महासागर, उत्तर समुद्र, इंग्लिश चॅनेल, सेल्टिक समुद्र आणि आयरिश समुद्र यांनी वेढलेले आहे.

लोकसंख्या :

युनायटेड किंगडम देशाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार एकूण 6,45,11,00 एवढी आहे आणि हा देश जगात लोकसंख्येच्या बाबतीत 22 व्या क्रमांकावर येतो आणि लोकसंख्येचा बाबतीत युरोपमधून 4 थ्या क्रमांकाचे येतो. आणि सर्वात मोठे राष्ट्रकुलमध्ये 5 व्या क्रमांकावर येतो. येथे विविध जाती व धर्माचे लोक राहतात. येथे ख्रिचन समाजाचे लोक जास्त प्रमाणात आहेत.

हवामान :

युनायटेड किंगडम देशातील हवामान हे थोडे उष्ण व दमट हवामान आहे. या देशात साधारणपणे थंड तापमान आणि वर्षभर भरपूर पाऊस पडतो. थंडीमध्ये येथील तापमान हे 0° पर्यत खाली येते आणि उन्हाळी सरासरी तापमान हे किंवा 30° ते 35° पर्यत राहते.

येथील समुद्र किनाऱ्यापासून दूर उंचावर असलेले इंग्लंड, वेल्स, नॉर्दर्न आयर्लंड आणि स्कॉटलंडचा काही भाग महासागर हवामान अनुभवतो या प्रदेशात सागरी वारे वाहत असल्यामुळे येथील हवामानात सतत बदल होत असतो.

या देशात अटलांटिक महासागरातून वारंवार सौम्य वारे आणि ओले हवामान जरी पूर्वेकडील काही भाग या वाऱ्यापासून आश्रय घेतात. कारण बहुतेक पाऊस पश्चिमेकडील प्रदेशांवर पडतो, म्हणून पूर्वेकडील भाग सर्वात कोरडे अटलांटिक प्रवाह गल्फ प्रवाहाने उबदार हवामन राहते.

उंच जमिनीवर इंग्लंडच्या आग्नेय भागात उन्हाळा सर्वात उष्ण असतो आणि उत्तरेकडील भाग सर्वात थंड असतो. हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस उंच जमिनीवर मुसळधार पाऊस होत असतो, येथे सरासरी 650 मी मी येवढा पाऊस होतो.

खेळ :

युनायटेड किंगडम देशाचा फुटबॉल हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. आणि इंग्लंडला फिफाने क्लब फुटबॉलचे जन्मस्थान म्हणून मान्यता दिली आहे, आणि फुटबॉल असोसिएशन ही आपल्या प्रकारची सर्वात जुनी स्पर्धा आहे.

फुटबॉलचे नियम 1863 मध्ये एबेनेझर कॉब मॉर्ले यांनी तयार केले होते. प्रीमियर लीग ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी फुटबॉल लीग आहे. या देशात खूप प्रकारचे खेळ खेळले जातात. फुटबॉल हा या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे.

युनायटेड किंगडममध्ये याच बरोबर आणखी खेळ सुध्दा खेळले जातात. येथे प्रामुख्याने असोसिएशन फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, रग्बी युनियन, रग्बी लीग, रग्बी सेव्हन्स, गोल्फ, बॉक्सिंग, नेटबॉल, वॉटर पोलो, फील्ड हॉकी, बिलियर्ड्स, डार्ट्स, रोइंग, राऊंडर्स आणि क्रिकेट हे खेळ येते खेळल्या जातात. या खेळाचा उगम युनायटेड किंगडमम मधून झाला आहे.

भाषा :

युनायटेड किंगडम देशाची मुख्य भाषा इंग्रजी आहे. ही भाषा येथे मोठया प्रमाणावर बोलली जाते. या देशातील तीन स्वदेशी भाषा बोलल्या जातात. आणि वेल्श आयरिश आणि स्कॉटिश गेलिक कॉर्निश ह्या भाषा 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात पहिली भाषा म्हणून नामशेष झाली होती. तसेच आणि दुसरी भाषा बोलणार्‍यांचा एक छोटा गट आहे. हे लोक वेल्श भाषा बोलू शकतात. काही स्थलांतरित लोक कॅनडीयन भाषा बोलतात. अशा अनेक प्रकारच्या भाषा या देशात बोलल्या जातात.

चलन :

युनायटेड किंगडम देशाचे चलन पाउंड स्टर्लिंग आहे. जे सर्वात महाग चलन मानले जाते. येथील लोक व्यवहारात या चलनाचा वापर करतात. आणि हे चलन भारतीय चलनाच्या तुलनेमध्ये 1 पाउंड स्टर्लिंग कॉइन म्हणजे 95.02 रुपये होतात.

व्यवसाय व उद्योग :

युनायटेड किंगडम देशात शेती व्यवसाय केला जातो. येथे प्रामुख्याने शेतीमध्ये गहू, ज्वारी, मका, कापुस, भुईमुग, भाजरी असे पीक घेतला जातात. त्याच बरोबर काही प्रमाणात भाजी पाले व्यवसाय पण केला जातो. येथील लोक अनेक छोटे मोठे व्यवसाय करत असतात. मासेमारी येथे कमी प्रमाणात केला जातो.

या देशात मोठ्या प्रमाणत खनिज संपत्ती उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक उद्योगाला चालना मिळाली आहे. येते कार बनवले, विमाचे साहित्य बनवले, असे अनेक उद्योग केले जातात. त्यातून मोठ्या प्रमाणत रोजगार उपलब्ध होतात.

इतिहास :

युनायटेड किंगडम देशात सन 1066 मध्ये नॉर्मन लोकांनी उत्तर फ्रान्समधून इंग्लंडवर आक्रमण केले. नंतर यामध्ये इंग्लंड जिंकल्यानंतर त्यांनी वेल्सचा मोठा भाग ताब्यात घेतला, व आपले राज्य स्थापन केले. यांनी आयर्लंडचा बराचसा भाग जिंकला आणि त्यांना स्कॉटलंडमध्ये रहिवाशी होण्यासाठी आमंत्रित केले.

प्रत्येक देशात उत्तर फ्रेंच मॉडेल आणि नॉर्मन फ्रेंच संस्कृतीवर सामंतशाही आणण्यात आली. या गोष्टीचा अँग्लो नॉर्मन शासक वर्गाने मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. नंतर त्यांनी प्रत्येक स्थानिक संस्कृतीला आत्मसात केले. त्यानंतरच्या मध्ययुगीन इंग्रज राजांनी वेल्सचा विजय पूर्ण केला.

पुढे 19 व्या शतकात आयरिश राष्ट्रवादाचा उदय झाला, आणि आयरिश होम रूलच्या अटींवरून आयर्लंडमधील वादांमुळे शेवटी 1921 मध्ये बेटाची फाळणी करण्यात आली. त्यानंतर आयरिश फ्री स्टेट स्वतंत्र झाले. व सुरुवातीला 1922 मध्ये डोमिनियन परिस्थितीसह आणि निसंदिग्धपणे स्वतंत्र होते.

1931 मध्ये उत्तर आयर्लंड हा युनायटेड किंगडमचा भाग राहिला आणि 1928 च्या कायद्याने महिलांना पुरुषांच्या बरोबरीने निवडणूक समानता देऊन मताधिकार देण्यात आला. युद्धाच्या परिणामामुळे ब्रिटन अजूनही सावरले नव्हते. नंतर देशात महामंदी आली. यामुळे जुन्या औद्योगिक भागात लक्षणीय बेरोजगारी आणि अडचणी निर्माण झाल्या. याचे गंभीर परिमाण येथील लोकांना सहन करावे लागले.

वाहतूक व्यवस्था :

युनायटेड किंगडममध्ये वाहतूक व्यवस्था एकदम सुरळीत आहे. या देशातील रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात जुने नेटवर्क आहे. विदेशी व्यापार करण्यासाठी विमान सेवा व जहाज सेवा उपलब्ध आहेत. तसेच येथील स्थानिक लोकांसाठी खाजगी बस वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे. येथील लोक आपले आपल्या मोटारसायकल तसेच गाडीचा जास्त वापर करतात. लोकांसाठी रेल्वे सेवा सुध्दा आहेत.

पर्यटक स्थळ :

युनायटेड किंगडम देशामध्ये क्राइस्ट चर्च हे जगातील सर्वात मोठे ख्रिचन समाजाचे धार्मिक व लोकप्रिय स्थळ आहे. या समजाचे लोक येथे प्रार्थना करण्यासाठी जात असतात.

या देशाची राजधानी असलेले शहर म्हणजे लंडन हे एक अतिशय सुंदर शहर आहे. हे पाहण्यासाठी लोक विदेशातून येथे मोठ्या प्रमाणात येत असतात.

लेक डिस्ट्रिक्टमधील स्किडॉ मासिफ, केसविक आणि डेरव्हेंट वॉटर हे येथील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील लोक येथे जात असतात. या देशात मोठे ऐतिहासिक वस्तू संग्रालय तसेच प्राणी संग्रालये आहेत. हे पाहण्यासाठी लोक जात असतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment