मलेशिया देशाची संपूर्ण माहिती Malaysia Information In Marathi

Malaysia Information In Marathi मलेशिया हा देश 13 राज्य आणि तीन संघराज्य मिळून बनलेला प्रदेश असून हा आग्नेय आशिया मध्ये स्थित आहे. मलेशिया या देशाची राजधानी क्वालालंपूर आहे व पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. तर चला मग पाहूया मलेशिया या देशाविषयी सविस्तर माहिती.

Malaysia Information In Marathi

मलेशिया देशाची संपूर्ण माहिती Malaysia Information In Marathi

मलेशिया या देशांमध्ये मुस्लीम लोक बहुसंख्य असून येथे इस्लाम आलाच देशाचा अधिकृत धर्म म्हणून मान्यता मिळालेले आहेत. या देशाची राष्ट्रीय भाषा ही मलाय ही आहे. तसेच राष्ट्रीय चलन हे मलेशियन रिंगिट हे आहे. त्या व्यतिरिक्त येथे बौद्ध विहार चर्च हिंदू मंदिर देखील असण्याची परवानगी मिळालेली आहे.

क्षेत्रफळ व विस्तार :

मलेशिया या देशाचे क्षेत्रफळ जमिनीच्या 3,29,847 चौरस किमी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने मलेशियाचा जगामध्ये 66 वा क्रमांक लागतो.
याच्या पश्चिमेला थायलंड, पूर्वेला  इंडोनेशिया व  ब्रुनेई हे देश असून दक्षिणेला जोहोर सामुद्रधुनी वरील पुलाने जोडला गेलेला सिंगापूर आहे. व्हिएतनाम व फिलिपिन्स या देशांशी मलेशियाच्या सागरी हद्दी भिडल्या आहेत.

हवामान :

मलेशिया हा देश उष्णकटिबंधीय प्रदेशात येत असल्यामुळे येथे हवामान दमट स्वरूपाचे आढळते तर येथील मैदानी भागातील दिवसाचे तापमान 32° से. तर रात्रीचे तापमान 21° से. पर्यंत असते.

डोंगराळ भागातील तापमान हे उंचीनुसार कमी जास्त होते. येथे हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे पर्जन्य यावर त्याचा परिणाम होतो. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 190 सेंमी असून पश्चिम मलेशियाच्या पूर्व किनारी भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे 332 सेंमी असते.

इतिहास :

मलेशिया या देशाचा खूप प्राचीन इतिहास आहे. येथील पुरातत्त्वीय उत्खननात ताम्रपाषाण व अश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. सहा हजार वर्षांपूर्वीपासून मलायाद्विपकल्प विभागात वसाहती असाव्या असे मानले जाते. इ.स.पू. 2,000 वर्षांपूर्वी दक्षिण चीनच्या प्रदेशातून येथे वसाहती निर्माण करण्यासाठी आलेले लोक मलेशिया यांचे पूर्वज मानले जातात.

या प्रदेशातील भारतीयांच्या वसाहती बद्दल चिनी इतिहासात तसेच पुराणात अनेक उल्लेखनीय वर्णन आढळते. पुराणात मलायाद्विपकल्प चा स्वर्ण द्वीप म्हणून उल्लेख केलेला आहे काही धाडसी भारतीयांनी व्यापाराच्या उद्देशाने या प्रदेशात येऊन इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात वसाहती स्थापन केल्या असाव्यात त्यानंतर 1,000 वर्षापर्यंत येथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव असल्याचे दिसून येते.

See also  नायजेरिया देशाची संपूर्ण माहिती Nigeria Information In Marathi

या भागातील जमिनी सुपीक नसल्यामुळे काही ठिकाणी मोठे साम्राज्य स्थापन झाले नाहीत. द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात दुसर्‍या शतकात लंका अशोक या नावाने भारतीयांचे राज्य स्थापन झालेले होते काही वर्षातच या राज्याची भरभराट होऊन त्याने या द्वीपकल्पाचा जवळजवळ सर्व उत्तर भाग व्यापला परंतु तिसऱ्या शतकात इंडोचायना मधील फूनान राज्याने हे राज्य जिंकून घेतले. सहाव्या शतकात ते पुन्हा स्वतंत्र झाले.

तिसऱ्या शतकात उत्तर भारतातील तून सून या भागातील पाचशे पेक्षाही जास्त भारतीय व्यापारी व धर्मप्रसारक येथे होते. याशिवाय येथे द्वीपकल्पाच्या पूर्व भागात तान-तान, चिह्-तू व पश्चिम भागात कदारम तसेच वायव्य भागात को-लो ही राज्य स्थापन झाले. या राज्यांपैकी पाचव्या शतकांमध्ये भारतीयांचे व्यापाराचे व बौद्ध धर्म प्रभावाचे देशातील प्रमुख केंद्र म्हणून कदारम हे राज्य होते.

सहाव्या शतकात केलांतान वा ट्रेंग्गानू या नदीच्या किनाऱ्यावर वस्ता वसलेल्या चिह्-तू, रेड अर्थ लँड या राज्यावर भारतीयांचे अधिपत्य होते. तसेच या शतकात भागात शैवपंथाचा खूप प्रचार झाला तसेच सातव्या आणि आठव्या शतकाच्या सुमारास द्वीपकल्पाच्या दोन्ही किनारी प्रदेशात पूर्व पश्चिम भागात काही लहान लहान राज्यांची निर्मिती झाली व काही चिनी लिखित पुराव्यांवरून या काळात प्रदेशात 30 राज्य होते.

वनस्पती व प्राणी :

या देशातील पूर्व व पश्चिम मलेशियाच्या भागात विषुववृत्तीय सदाहरित जंगले आढळतात. येथे अनेक शेलॉक, ओक तसेच डोंगराळ भागात एबनी, बांबू, साग, रबर, मॅहाँगणी या वनस्पती आढळतात तसेच किनारी भागात कच्छ वनश्री मोठ्या प्रमाणात आहे.

येथील जंगले घनदाट असल्यामुळे येथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आढळतात त्यामध्ये वाघ, हरणे, हत्ती, रानडुकरे, माकडे, गेंडे, अस्वल या प्राण्यांचा समावेश असतो. तसेच अजगर, सुसरी व इतर साप मोठ्या प्रमाणात आहेत. येथील जंगलांमध्ये विविध प्रकारचे पक्षी आढळतात.

See also  सुडान देशाची संपूर्ण माहिती Sudan Information In Marathi

वाहतूक :

मलेशियातील बराचसा भाग हा डोंगराळ भाग असल्यामुळे येथे वाहतुकीच्या साधनांचा फारसा विकास झालेला दिसत नाही परंतु अलीकडे या डोंगराळ भागातून रस्ते व लोहमार्ग बांधण्यात आले असून त्यावरूनच वाहतूक होऊ लागले आहे. लांब किनाऱ्यामुळे जलमार्ग विकसित झालेले आहे. केलाग, मेलका ही मलेशियातील प्रमुख बंदरे आहेत.

व्यवसाय शेती :

मलेशिया हा देश कृषिप्रधान देश असून येथील हवामान उष्ण व दमट प्रकारचे असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. हा पाऊस येथील शेतीसाठी अनुकूल असतो. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भाताची शेती केल्या जाते.

तसेच नारळ व तडफडे त्यांचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते या देशातून पाम तेलाची निर्यात केली जाते व हा देश त्या तेलासाठी प्रसिद्ध आहे डोंगर उतारावर येथे मुळे दिसून येतात त्यामध्ये लवंग मिरी इत्यादी मसाल्याचे पदार्थाचे उत्पादन घेतले जाते.

उद्योग :

शेती उद्योगाबरोबरच येथे रबरापासून वस्तू बनवणे हा एक महत्त्वाचा उद्योग आहे तसेच झाडापासून तेल काढणे, मासे वाळविण्याचे हवाबंद डब्यात भरणे, वेत व बांबू यांच्या पासून विविध वस्तू तयार करणे लाकडापासून फळ्या, फर्निचर बनवणे कापड विणणे इत्यादी प्रकारचे उद्योगही या देशात आहे.

खनिज संपत्ती :

मलेशियामध्ये कथिल सोनी डॉ तांबे इत्यादी धातू खनिजांचे साठे आहे. हे धातू व्यापाराच्या उद्देशाने खूपच महत्त्वाचे मानले जातात. हा देश पटलाच्या उत्पादनात अग्रेसर असून मलेशियाच्या इंधन साधारण मध्ये दगडी कोळसा पिठ लाकूड खनिज तेल जलविद्युत् यांचा मोठ्या प्रमाणात अंतर्भाव होतो.

दगडी कोळशा व पीट यांचे साठे आढळले असले, तरी आर्थिक दृष्ट्या त्यांचे उत्पादन होऊ शकले नाही. लोणारी कोळसा व लाकूड ही तेथील पारंपरिक इंधन सामग्री आहे.

लोक व समाजजीवन :

मलेशिया या देशांमध्ये वेगवेगळ्या धर्माचे, वंशाचे व संस्कृतीचे लोक राहतात. तरी सुद्धा येथे बौद्ध व हिंदू धर्माचा अधिक प्रभाव येथील लोकांवर झालेला दिसतो. येथील प्रत्येक जमातीचे सांस्कृतिक जीवन व सांस्कृतिक परंपरा हे भिन्न आहे. मलेरिया लोकांमध्ये भाषा, धार्मिक व सांस्कृतिक एकता दिसून येतील. मलेशियामधील बरेच भारतीय तमिळ भाषिक हिंदू आहेत.

See also  आइसलँड देशाची संपूर्ण माहिती Iceland Information In Marathi

तसेच येथील चिनी लोकांची बौद्ध बताओ हे प्रमुख धर्म असून येथे 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक चिनी जन्माने मलेशियन असले तरी त्यांनी आपली चिनी परंपरा जतन केलेली दिसते. येथील लोक शेतमजूर असले, तरी इतर सर्व आर्थिक क्षेत्रांमध्येही काही भारतीय लोक आढळतात. मलेशियातील कामगार चळवळीतही भारतीयांचा पुढाकार दिसतो. भारतीयांची येथे स्वतंत्र समाजरचना आहे.

मलेशियातील पर्यटन स्थळ :

मलेशिया अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणाने नटलेला असून येथे अनेक पर्यटक भेट देण्यासाठी एक असतात तर चला मग पाहूया अशाच काही पर्यटन स्थळाविषयी माहिती.

माउंट किनाबालु :

माउंट कीनाबालू हे 4,095 मीटर उंचीवर असलेले आग्नेय आशियातील सर्वोच्च शिखर आणि आशियातील लोकप्रिय गिर्यारोहण स्थळांपैकी एक आहे. हे जैवविविधतेसाठी जगभरात ओळखले जाते.  येथे पक्ष्यांच्या 326 प्रजाती आणि सस्तन प्राण्यांच्या 100 प्रजाती आहेत.

कॅमेरून हाईलँड्स :

कॅमेरॉन हाईलँड्स हे समुद्र सपाटीपासून पाच हजार किमी उंचीवर असलेला प्रदेश आहे.  कॅमेरॉन हाईलँड्स येथे अनेक चहाचे मळे असून सर्वात मोठा चहा उत्पादक म्हणून हा प्रदेश ओळखला जातो. येथील चहाचे मळे तसेच डोंगरावर फिरणाऱ्या शेळ्या तुम्ही पाहू शकता.

मलाक्का :

हे मलेशियामधील सर्वात मोठ्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मलाक्का, 15 व्या शतकातील बंदर, आशियातील सर्वात मोठ्या व्यापारी बंदरांपैकी एक आहे.   मलाक्का याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे येथे पुरातन वास्तू तुम्ही पाहू शकता.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment