North Korea Information In Marathi उत्तर कोरिया हा पूर्व आशियामधील एक भूभाग आहे, जो सध्या उत्तर व दक्षिण कोरिया ह्या दोन सार्वभौम देशांमध्ये विभागला गेला आहे. या देशाची राजधानी प्यॉंगयांग हे शहर असून हे तेथील सर्वात मोठे शहर आहे. किम जोंग उन हा उत्तर कोरियाचा सर्वात मोठा नेता आणि क्रूर शासक आहे. तर चला मग पाहूया उत्तर कोरिया या देशाविषयी सविस्तर माहिती.

उत्तर कोरिया देशाची संपूर्ण माहिती North Korea Information In Marathi
उत्तर कोरियाच्या मुलांनी इतिहासाच्या नावाखाली केवळ आपल्या देशाबद्दलच आणि किम जोंग आणि त्याच्या कथा विषयी वाचावं असा नियम आहे. जर तुम्ही त्याला दुसऱ्या कथा, इतिहास किंवा धार्मिक पुस्तक वाचताना दिसले तर तेथे फाशीची शिक्षा होऊ शकते.
क्षेत्रफळ व विस्तार :
उत्तर कोरिया या देशाचे क्षेत्रफळ हे 1,22,370 चौरस किमी असून देशाची लोकसंख्या ही 2020 च्या जनगणने प्रमाणे 2.5 कोटी आहे. कोरियन द्वीपकल्पावर वसलेल्या कोरियाच्या वायव्येला चीन तर ईशान्येला रशिया देश असून आग्नेये दिशेला प्रशांत महासागराचे कोरिया सामुद्रधुनी व जपानचा समुद्र कोरियाला जपानपासून वेगळे करतात. कोरियाच्या दक्षिणेस पूर्व चिनी समुद्र आहे.
हवामान :
उत्तर कोरियाचे हवामान सर्वत्र उष्ण व आद्र असते. येथे पाऊस हा मौसम प्रकारानुसार म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर या काळात व जून ते ऑगस्ट पर्यंत पडतो. आपण पावसाचे प्रमाण उत्तरे कडे पाहिले तर 50 सेंटीमीटर व दक्षिणेकडे 150 सेंटीमीटर पर्यंत असते.
तसेच दक्षिणेकडील तापमान 25° से. ते 27° से. प्यंगयांगच्या आसपास 25° से. पर्यंत व ईशान्य किनाऱ्यावर 21° से. पर्यंत तपमान असते. या देशांमध्ये हिवाळ्यात पाऊस पडत नाही. जानेवारी चे सरासरी तापमान चेजू बेटावर 4.5° से. सेऊल -5° से. म्हणजेच येथे हिवाळ्यातील तापमान खूपच थंड असते.
चलन :
उत्तर कोरिया या देशाचे चलन हे कोरियन वॉन आहे.
भाषा :
उत्तर कोरिया या देशाची भाषा ही उरल उलताईक या गटातील समजली जाते. ही भाषा तुर्की मंगोल व जपानी या भाषांशी संबंधित असून हे सातव्या शतकात देशाचे राजकीय एक्य प्रस्थापित झाले तेव्हा ही भाषा सर्वांमध्ये प्रचलित झाली. कोरियाची हांगल उपचारानुसार लिपी 1446 मध्ये शेजुंगराच्या कारकिर्दीत अस्तित्वात आली. या भाषेमध्ये पाच मुख्य स्वर व 25 व्यंजने असून पूर्वीपासून येथे चिनी भाषा व लिखित प्रचारात होते.
इतिहास :
उत्तर कोरिया येथे असलेल्या लोकजीवनावर सुरुवातीपासूनच चिनी संस्कृतीचा मोठा पगडा आपल्याला दिसून येतो. प्राचीन कोरियावर इ.स. पूर्व 57 ते इ.स. 935 दरम्यान सिल्ला, इ.स. 1392 पर्यंत कोर्यो तर इ.स. 1388 ते इ.स. 1897 सालापर्यंत चोसून ह्या साम्राज्यांची सत्ता होती. 19 व्या शतकाच्या अखेरीस जपानी साम्राज्याने कोरियावर कब्जा केला व कोरियाला एक मांडलिक राष्ट्र बनवले.
तेव्हापासून दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानच्या पराभवापर्यंत कोरिया साम्राज्यवादी जपानच्या ताब्यात होता. 1945 साली अमेरिका व सोव्हिएत संघाने कोरियाची फाळणी करण्याचे निश्चित केले व 38 रेखांशाला धरून कोरियाचे दोन तुकडे करण्यात आले. उत्तरेला सोव्हिएत संघाच्या पाठिंब्यावर कम्युनिस्ट तर दक्षिण भागात अमेरिकेच्या पाठिंब्यावर भांडवलशाही देशांची स्थापना झाली.
खनिज संपत्ती :
उत्तर कोरिया खनिजसंपन्न आहे. लोखंड, शिसे, कोळसा, जस्त, तांबे, टंगस्टन, निकेल, मँगॅनीज व ग्रॅफाइट ही खनिजे मिळतात. 1957 पासून पेट्रोलियम मिळू लागले. खाणींचे उत्पादन वाढत आहे.
उद्योगधंदे :
उत्तर कोरियामध्ये जपान सरकारने बरेच उद्योगधंदे निर्माण केले त्यामध्ये 1963 सालापर्यंत कापड धंदा अन्नप्रक्रिया धातूकाम या धंद्यांची अनुक्रमे 33%, 18.6%, व 13.7% इतकी वाढ झाली असून देशांमध्ये 90% उद्योगधंद्याचे शासकीय मालकीचे व 10% सहकारी उद्योगधंदे आहेत.
किमचेक, साँगनिम, चंगजिन, व काँगसो ही लोखंड व पोलाद उद्योगांची मुख्य केंद्रे असून बऱ्याच ठिकाणी ॲल्युमिनियम, चुना, सिमेंट, मॅग्नेशियम, शिसे, जस्त, पेट्रोलियम, ग्राफाईट, काचा, यंत्र, हत्यारे, ट्रॅक्टर व शेती अवजारे तसेच वीज उपकरणे यांची उत्पादने होतात.
वनस्पती :
उत्तर कोरिया या देशातील उत्तरेकडे सूचिपर्णी वृक्षांची अरण्ये आढळून येतात.
वाहतूक व दळणवळण :
उत्तर कोरिया या देशांमध्ये लोहमार्ग हे वाहतुकीचे मुख्य साधन आहे येथील लोहमार्गाची लांबी 11,200 किमी आहे. तसेच रेल्वेचे इंजिन व डबे या देशात स्वतः बनवली जातात. तसेच 5600 किलोमीटर लांबीचे हम रस्ते आहे. हवाई वाहतुकीला येथे विशेष महत्त्व नाही.
उत्तर कोरिया या देशांमध्ये संपर्कासाठी तार, पोस्ट, टेलिफोन, रेडिओ या सर्व साधनांचा शासनाच्या हाती कारभार असतो. प्यंगयांगहून सर्व कम्युनिस्ट देशांच्या राजधान्यांशी टेलिफोन संपर्क आहे येथे खास रेडिओ सेट वंचित आहेत आकाशवाणीचे कार्यक्रम देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ध्वनी प्रेक्षकांच्या सहाय्याने पोचवली जातात.
समाज जीवन :
उत्तर कोरिया येथील लोक मुळता मंगोलाईट वंशाच्या तुंगुइसिक लोकांचे वंशज आहे असे मानले जाते. त्यांच्यामध्ये दुसऱ्या वंशाचे मिश्रण क्वचितच पाहायला मिळते बिगर कोरियन असे काही थोडे चीनीच येथे आहेत. या देशात जपानी लोक होते ते दुसऱ्या महायुद्धानंतर परत पाठवण्यात आले. कोरियन लोक बौद्धधर्मीय या किंवा कन्फ्यूशस या विचार प्रणालीचे आहे.
उत्तर कोरियातील ग्रामीण भागात शामु पंथाचा पगडा दिसून येतो. ग्रामीण भागातील लोकांची घरे मातीच्या भिंतीची व गवती छपराची असतात. त्यांच्या खिडक्या ना झाकण्यासाठी पातळ कागदाचा उपयोग केला जातो. येथील लोक घरात जातांना चपला बाहेर काढून ठेवतात.
त्यांच्या आहारामध्ये मासे तू भोगीचा रस्सा भात यासारखे मसालेदार पदार्थ जमिनीवर किंवा चटायांवर बसून बुटक्या मेंजावर घेतात. येथील लोकांचा पोशाखात स्त्रियांना विजारी वरून पायघोळ परकर व वर चोळी पोलकी वापरतात. तसेच पायात रबरी बूट वापरून खेड्यामध्ये जास्तीत जास्त वीज उपलब्ध नसल्यामुळे पाण्यासाठी विहिरी उपलब्ध असतात.
या देशात विवाहासाठी आईवडिलांचे संमती घ्यावी लागते. तसेच विवाह बऱ्याच माध्यमांमार्फत जुळवले जातात. मुला मुलींच्या विवाहाची वय ठरवून दिलेली आहे. येथे स्त्रियांना पूर्णतः स्वातंत्र्य आहे. मात्र आता येथील लोकांमध्ये सुधार येऊन त्यामध्ये घरे, राहणीमान, वेश, खेळ इ. सर्वच बाबतींत सामाजिक बाबतीत वेग आला असून येथे लोकांमध्ये आधुनिक, पाश्चात्त्य पद्धती लोकप्रिय होत आहेत.
खेळ :
येथील खेळांमध्ये लोकप्रिय असलेले खेळ पतंग उडविणे, धनुर्विद्या व कुस्ती हे पारंपारिक खेळ होते परंतु आता त्याची जागा पाश्चात्त्य क्रीडा प्रकारांनी घेतलेली असून ऑलम्पिक सामन्यातही कोरियन खेळाडू आपली भूमिका चमकत आहे. अकीदो हा येथील कोरियन कुस्तीचा प्रकार आहे.
सण :
उत्तर कोरिया मध्ये जुन्या चंद्रवर्षाला अनुसरून अनेक पारंपारिक सण व उत्सव साजरे केले जातात येथे 8 एप्रिल बुद्ध जयंती व 5 मे पूर्वजांच्या दफनभूमीस भेट तसेच 15 ऑगस्ट रोजी चुसौंक हा कृतज्ञतेचा दिवस थँक्सगिव्हिंग आणि चिनी नववर्षदिन हे मेजवान्या व उत्सव यांचे दिवस असतात.
कला :
येथे कोगुर्योकालीन चिनी पद्धतीची भिंतीचित्रे आणि कीआँगजूजवळच्या सोक्कुराम गुहेतील दगडी शिल्प हे अति प्राचीन कोरियन कला वैभवाची साक्ष देतात. फुलगुक-सा देवालयाजवळील स्तूप व सोक्कुरामच्या बौद्ध मूर्ती शिल्पकालीन कलांचे वैशिष्ट्य दर्शवितात. यी सांग-बॉम याला जुन्या परंपरेचा व किम इन सुंग आणि यी इन साँग हे आधुनिक वास्तववादी कलाकार येथे होऊन गेले.
येथील माती पासून बनवलेल्या व धातूंच्या भांड्यावर केलेले कोरीव काम हे प्राचीन काळापासून उच्च दर्जाचे मानले जाते ते सोन्याच्या मुकुट किंवा ब्रांचचे पुतळे हे जगप्रसिद्ध आहे. हिरव्या रंगाची उत्तम नक्षी काम केलेली चिनीमातीची भांडी तसेच लाख शिंपा, पितळी नक्षीकाम व लाकूड कामास शोभा आणण्यात कोरियन कारागीर तरबेज होते.
संगीत व नृत्य :
या देशांमध्ये प्राचीन चिनी व अर्वाचीन पश्चात संगीत उच्च प्रतीचे मानतात. प्राचीन संत नृत्य प्रकारांना लोकात फार मानाचा दर्जा आहे. ग्रामीण जलद लईची नृत्य आणि नृत्यनाट्य ही येथे लोकप्रिय असून आधुनिक पाश्चात्त्य धर्तीचे नृत्यगृहे चित्रपटगृहे नाट्यगृहे येथे वाढत आहे.
पर्यटन स्थळ :
उत्तर कोरिया या देशांमध्ये प्यंगयांग या राजधानीच्या शिवाय सीमेजवळील केसॉंग, तसेच यलो नदीच्या मुखाजवळील शिनईजू, चिन्नांपो हे बंदर व पूर्व किनाऱ्यावरील वनसान, हामहुंग व चंगजिन हे बंदरे व तेथील सौंदर्य पाहण्यासाठी येथे पर्यटक दरवर्षी येत असतात.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Essay On Makar Sankranti In Marathi
- Rainy Season Essay In Marathi
- Global Warming Essay In Marathi
- Importance Of Education Essay In Marathi
- Essay On Abdul Kalam In Marathi
- Essay On Holi In Marathi
- Essay On Navratri in Marathi
- Essay On Mahashivratri In Marathi
FAQ
उत्तर कोरिया देशाची राजधानी काय आहे?
या देशाची राजधानी प्यॉंगयांग आहे.
उत्तर कोरिया या देशाचे चलन काय आहे?
उत्तर कोरिया या देशाचे चलन हे कोरियन वॉन आहे.
उत्तर कोरिया या देशाची भाषा ही कोणत्या गटातील समजली जाते?
उत्तर कोरिया या देशाची भाषा ही उरल उलताईक या गटातील समजली जाते.
उत्तर कोरियाची ओळख कशी कराल?
उत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक देश आहे जो कोरियन द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील अर्धा भाग व्यापतो . ते कोरिया उपसागर आणि चीन आणि दक्षिण कोरिया दरम्यान जपान समुद्र सीमा आहे.